PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024: या कुटुंबाना मिळणार फ्री वीज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024: केंद्र सरकारतर्फे देशामधील नागरिकांसाठी फ्री वीज मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना सुरु करण्यात आली आहे. ज्या घरांमध्ये 300 युनिट पेक्षा वीज वापरली जाते, त्यांच्या घरांमध्ये सोलर पॅनल लावण्यात येणार. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामध्ये जास्त प्रमाणात वीज वापरली जाते, त्यामध्ये काही नागरिकांना वीज बिल सुद्धा जास्त प्रमाणात येते. त्यामुळे ते नागरिक विजेचा जास्त खर्च देऊन त्रस्त झाले आहेत. तसेच देशामध्ये विजेचा वापर कमी करून सौर ऊर्जा या नैसर्गिक पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा. यासाठी केंद्र सरकारने देशामधील रहिवासी लोकांसाठी प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना या वर्षी लाँच केली आहे. 

आपल्या आजच्या आर्टिकलमध्ये आपण केंद्र सरकारने सुरु केलेल्या या योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामधून नागरिकांना कसा फायदा मिळेल? कशाप्रकारे योजनेचा लाभ घेता येईल? केंद्र सरकारतर्फे किती खर्च करण्यात येणार आहे? तसेच कशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येते? अशा सर्व गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत तर शेवटपर्यंत लेख वाचा आणि फ्री विजेचा लाभ घ्या. 

PM Surya Ghar Muft Bijli Yojana Marathi 2024

योजनेचे नावप्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना
स्कीमसौर ऊर्जा योजना
स्थापना01 फेब्रुवारी, 2024 मध्ये
कोणी स्थापित केलेभारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी
विभागनवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार
मुख्य उद्देशनागरिकांना सबसिडी प्रदान करून देशभरात सौर ऊर्जाचा स्रोत वाढविणे
पात्रभारत देशामधील निवासी कुटुंब
लाभफ्री वीज व 40% सबसिडीचा लाभ
नोंदणीऑनलाइन
बजेट75,000 कोटी रुपये
ऑफिशिअल वेबसाइटpmsuryaghar.gov.in

What is PM Surya Ghar Muft Bijli Yojana?

प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना ही एक Rooftop Solar Scheme असून त्यामधून लाभार्थ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यात येतो. 01 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पनेत फ्री वीज योजनेची घोषणा केली होती. 

त्यानंतर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर (X) प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 13 फेब्रुवारी, 2024 रोजी PM Surya Ghar Muft Bijli Yojana याची अधिकृतपणे घोषणा केली. 

या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येणार आणि त्यांच्या घराच्या छप्परवर सोलर पॅनल लावले जातील. सोलर पॅनलसाठी लावण्यात येणारा सर्व खर्च केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार. 

तसेच ज्या कुटुंबांच्या घरात 300 युनिट पेक्षा जास्त वीज असेल, तर त्यांना सोलर पॅनल विकत घ्यावे लागेल, परंतु यामध्ये सुद्धा केंद्र सरकारने 40% सबसिडीची सुविधा ठेवली आहे. 

Implementation of PM Surya Ghar Muft Bijli Yojana

केंद्र शासनाच्या अंतर्गत असलेली Ministry of New and Renewable Energy (MNRE) यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना डिझाइन करण्यात आली आणि याच मंत्रालय अंतर्गत संपूर्ण प्रोग्रामची अंमलबजावणी करायचे काम REC Ltd Agency करते. 

या मंत्रालयाने आर ई सी संस्थेला सौर ऊर्जा योजने संबंधित संपूर्ण काम बघायचे हक्क दिले आहेत. सर्व लाभार्थ्यांना सोलर पॅनल लावण्याकरिता कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी REC संस्थाच्या माध्यमातून 1,20,000 कोटी रुपयांची आर्थिक रक्कम बाजूला काढण्यात आलेली आहे. 

REC बोर्डने देशभरात सौर ऊर्जाचे काम योग्यरित्या होण्यासाठी आठ केंद्रीय पब्लिक सेवा कंपन्या नेमल्या आहेत. या आठ कंपन्या Renewable Energy Services Companies म्हणून काम करणार आणि आर ई सी संस्थेतर्फे प्रत्येक कंपनीला 15,000 कोटी रुपये दिले जातात. 

Renewable Energy Services Companies under REC Agency 

केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना अंतर्गत 8 केंद्रीय पब्लिक क्षेत्रामधील कंपन्यांना नियुक्त केले आहेत. या कंपन्यांच्याद्वारे भारतामधील सर्व राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.

  • National Thermal Power Corporation (NTPC)
  • National Hydroelectric Power Corporation (NHPC)
  • Energy Efficiency Services Limited (EESL)
  • PowerGrid
  • Grid-India
  • Tehri Hydro Development Corporation (THDC)
  • Satluj Jal Vidyut Nigam (SJVN)
  • North Eastern Electric Power Corporation Limited (NEEPCO)

PM Surya Ghar Muft Bijli Yojana Subsidy 

केंद्र सरकारच्या माध्यामातून प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनामध्ये सबसिडी प्रदान केली जाते. जे लाभार्थी Rooftop Solar Equipment विकत घेतील व इन्स्टॉल करतील, त्यामध्ये होणाऱ्या खर्चामध्ये केंद्र सरकार 40% सबसिडीचा लाभ देते. लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीची रक्कम थेट डीबीटीमार्फत ट्रान्स्फर करण्यात येते. 

Subsidy Structure for Residential Households

सरासरी प्रतिमाह युनिटीसौर ऊर्जा प्लांट क्षमतासबसिडी (रुपये)
0-1501-2 kW30,000/- ते 60,000/-
150-3002-3 kW60,000/- ते 78,000/-
3003 kW78,000/-

Benefits of PM Surya Ghar Muft Bijli Yojana

  • केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनासाठी 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 
  • केंद्र सरकारचा योजनेच्या माध्यमातून भारत देशामधील जवळपास 1 कोटी घरांना लाभ देण्याचा उद्देश आहे. 
  • गरीब कुटुंबातील नागरिकांना केंद्र सरकारच्यामार्फत छतावर फ्रीमध्ये सोलर इन्स्टॉल करून मिळेल. 
  • देशामधील असे कुटुंब जे तीनशे युनिट प्रत्येक महिन्याला वीज वापरतात, अशा एक कोटी लोकांना मोफत वीज वापरायला संधी देणार. 
  • PM Awas Yojana अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनासुद्धा मोफत विजेचे लाभ देण्यात येणार. 
  • सोलर पॅनल उपकरणे विक्री करण्यावर आणि स्थापना करण्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये केंद्र सरकार 40% सबसिडी प्रदान करते. 
  • लाभार्थ्यांना पाठविण्यात येणारी सबसिडी ही त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीमार्फत ट्रान्स्फर करण्यात येणार, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे समस्या होणार नाही. 
  • योजनेची अंमलबजावणी व देखरेख करण्यासाठी मंत्रालयाने REC संस्था तयार केली आहे.
  • त्याचप्रकारे कोणत्याही नागरिकांना सोलर पॅनल विकत घेण्यासाठी कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जाते. 
  • तसेच Urban Local Bodies आणि पंचायत कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक शहर, जिल्हा व गावोगावांपर्यंत सोलर पॅनल पोहोचवण्याचे लक्ष्य पूर्ण केल्यास केंद्र शासनातर्फे आर्थिक स्वरूपात प्रोत्साहन सुद्धा दिले जाते. 

PM Surya Ghar Muft Bijli Yojana ची पात्रता 

  • प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनामध्ये अर्ज करणारे कुटुंब भारत देशाचे स्थानिक रहिवासी असणे. 
  • सोलर पॅनलसाठी इतर ठिकाणावरून सबसिडी घेत असतील तर योजनेसाठी पात्र नसणार. 
  • अर्ज करणाऱ्या नागरिकांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. 
  • अर्जदाराचे आधारकार्ड बँक खात्यासोबत जोडलेले असणे. 
  • सोलर पॅनल लावण्यासाठी अर्जदारांकडे स्वतःचे घर असून त्यावर छत असणे. 
  • नागरिकांच्या घरामध्ये वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. 

PM Surya Ghar Muft Bijli Yojana ची आवश्यक कागदपत्रे 

खालीलप्रमाणे दिलेल्या यादीनुसार प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अर्जदारांकडे असणे आवश्यक आहे. 

  • चालू वीज बिल 
  • घराचे मालकी हक्क (प्रॉपर्टीचे कागदपत्रे) 
  • मोबाईल नंबर 
  • अर्जदाराचे ओळखपत्र (आधारकार्ड/रेशनकार्ड)
  • राहत्या ठिकाणाचा पत्ता 
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र 
  • बँक खात्याचे पुरावे (बँकेचे पासबुक) 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • अर्ज करणाऱ्यांचा ई-मेल आयडी 

PM Surya Ghar Muft Bijli Yojana Registration

अर्जदारांना प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनामध्ये नोंदणी करण्यासाठी आम्ही दिलेल्या प्रकिया क्रमानुसार वाचून अर्ज करावा लागेल.  

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला योजनेची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल. 
  • त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये वरच्या बाजूला Apply For Rooftop Solar असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • क्लिक केल्यावर Registration पर्याय निवडून त्यामध्ये तुमचे राज्य, वीज वितरण कंपनी, ई-मेल आयडी, ग्राहक क्रमांक आणि वीजकेंद्रामध्ये रजिस्टर असलेला मोबाईल नंबर भरून घ्या. 
  • त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोडचा पर्याय दिसेल, त्यामध्ये कोड भरून Next वर क्लिक करा. 
  • सुरुवातीची रजिस्ट्रेशन प्रकिया पूर्ण होईल, त्यानंतर पुन्हा मागे येऊन ग्राहक क्रमांक व मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा. 
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला रुफटॉप सोलर रजिस्ट्रेशन पर्याय दिसेल तो निवडा. 
  • तुमच्या समोर योजनेचा संपूर्ण फॉर्म उघडून येईल, तो व्यवस्थित वाचून भरून घ्या. 
  • त्यानंतर तुमच्या क्षेत्रानुसार निवडलेल्या वीज केंद्राकडून तपासणी केली जाईल व त्यांच्याकडून मान्यता देण्यात येईल.
  • वीज केंद्र विभागातून मान्यता मिळाल्यानतंर तुमच्या सोयीनुसार सोलर लावून देणारी कंपनी निवडा. 
  • निवड केलेल्या कंपनीच्या माध्यमातून प्लांट इन्स्टॉल केले जातील व Net Meter सेटअप करून देण्यात येईल. 
  • त्यानंतर सर्व उपकरणे बसल्यानंतर पोर्टलच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल. 
  • प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचे बँक खात्याची माहिती व कागदपत्रे पोर्टलमध्ये सबमिट करायची आहे. 
  • अशा पद्धतीने पोर्टलवर जाऊन अर्ज करून 30 दिवसांमध्ये सबसिडीची रक्कम बँक खात्यामध्ये घेऊ शकता. 

निष्कर्ष 

या लेखाच्या माध्यमातून PM Surya Ghar Muft Bijli Yojana संदर्भात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. योजनेमार्फत कुटुंब कसे मोफत वीज प्राप्त करू शकतात? किती रुपयांपर्यंत सबसिडी रक्कम मिळवू शकतात? केंद्र सरकारने कोणत्या दिवशी योजनेची घोषणा केली? कोणती एजेन्सी योजनेची अंमलबजावणी करत आहे? किती कंपन्यांना REC संस्थे अंतर्गत समावेश करण्यात आले? नागरिकांना कोणत्या कागदपत्रांना सादर करायची गरज लागणार? कोणकोणते कुटुंब योजनेमधून सबसिडीचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत? त्याचप्रकारे कोणत्या वेबसाइटमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल? आणि कशा पद्धतीने नोंदणी करून लाभ घेऊ शकतो? याबद्दल सविस्तर माहिती लेखातून देण्यात आली. 

आपल्या देशामध्ये मानव निर्मित विजेचा वापर कमी होऊन नैसर्गिक पद्धतीचा वापर जास्तीत जास्त होण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना कुटुंबाना मदत करू शकते. आमच्या योजना मीडिया चॅनेला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला केंद्र व राज्य सरकारने सुरु केलेल्या नवनवीन योजने संबंधित माहिती त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल.  

FAQs

प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनाची सुरुवात कधी करण्यात आली? 

केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात 01 फेब्रुवारी, 2024 रोजी करण्यात आली होती. 

Surya Ghar Muft Bijli योजनामध्ये किती सबसिडी दिली जाते? 

या योजने अंतर्गत केंद्र सरकारतर्फे 40% सबसिडी सोलर ऊर्जा उपकरणांसाठी दिले जातात. 

केंद्र सरकारने सूर्य घर मुफ्त बिजली योजनासाठी किती रक्कम मंजूर केले आहे?

केंद्र सरकारने या योजनेकरिता 75 हजार कोटी रुपये रक्कम मंजूर केले आहे.

पुढे वाचा: