PM Silai Machine Yojana Online Apply 2024: भारतामधील महिला वर्ग आता घरी बसल्या प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. जेणेंकरून केंद्र सरकारतर्फे योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन घेण्यासाठी 15,000 रुपये मिळण्यात मदत होईल आणि ती रक्कम परतफेड करायची सुद्धा गरज लागत नाही.
ज्या महिलांना शिलाई कामाचे अनुभव आहे किंवा त्यांना या कामामध्ये आवड आहे, ते नागरिक प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनामध्ये नोंदणी करून घरी बसल्या उत्पन्न चालू करू शकतात. जास्त करून ही योजना गृहिणींना उपयोगी पडणार आहे, ज्यांना घरामध्येच राहून कुटुंबासाठी काही तरी करायची इच्छा आहे.
आपल्या लेखामध्ये शिलाई मशीन योजनाची रजिस्ट्रेशन प्रकिया जाणून घेणार आहोत, त्याचसोबत योजनेसाठी कोणत्या पात्रतेच्या अटी ठेवण्यात आले आहेत? कशाप्रकारे योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकता? आणि योजनेमध्ये अर्ज करता असताना कोणत्या कागदपत्रांची जुळवणी करावी लागणार? याप्रकारची सर्व माहिती पाहायला मिळेल, तर आर्टिकल पूर्ण शेवटपर्यंत पहा.
PM Silai Machine Yojana in Marathi
प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना ही PM Vishwakarma Yojana चा एक भाग आहे. ज्यामध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामधील नागरिकांना प्रशिक्षण व आर्थिक मदत केली जाते. ही योजना Ministry of Micro, Small and Medium Enterprises अंतर्गत लागू करण्यात आलेली आहे, ज्याची अंमलबजावणी करण्याचे काम हे विभाग करते.
लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत शिलाई मशीन घेण्यासाठी 15,000 रुपये आर्थिक स्वरूपात मदत केली जाते. तसेच शिलाई क्षेत्रामधील प्रशिक्षण सुद्धा देण्यात येते, ज्यामध्ये लाभार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी प्रत्येक दिवस 500 रुपये वेतन सुद्धा दिले जाते.
त्याचप्रकारे ज्या नागरिकांना शिलाई क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरु करायचा असल्यास 1 लाख रुपये लोन तेही वर्षाला 5% व्याजदराप्रमाणे देण्यात येते. तसेच लाभार्थी व्यक्तीने योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते.
PM Silai Machine Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना |
डिपार्टमेंट | सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम, भारत सरकार |
अर्ज करायची | अंतिम तारीख 31 मार्च 2028 |
प्रशिक्षण कालावधी | 5 ते 15 दिवस |
कर्ज | 1 लाख रुपये लोन, 5% व्याजदरानुसार |
आर्थिक लाभ | 15,000 रुपये |
लाभार्थी | भारतामधील 20 ते 40 वयोगटातील नागरिक |
अर्ज प्रकिया | ऑनलाईन |
Eligibility For PM Silai Machine Yojana
केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनासाठी पात्रतेच्या अटी लागू करण्यात आलेले आहेत ते खालीलप्रमाणे मांडले आहे.
- योजने अंतर्गत सहभागी होणारा नागरिक भारत देशाचा रहिवासी असणे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तींचे वय 20 ते 40 वर्षांच्या आतील असणे आवश्यक आहे.
- योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 1.44 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी.
- केंद्र सरकारच्या माध्यमातून गरीब व आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या सदस्यांना विशेष लाभ देण्यात येते.
- त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्ती व विधवा महिला वर्ग सुद्धा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसावा.
PM Silai Machine Yojana Documents
अर्ज करणाऱ्या व्यक्तींना लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनाची कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेल्या यादीनुसार जमा करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वयाचे प्रमाणपत्र (जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला)
- ओळखपत्र (मतदान आयडी किंवा आधारकार्ड)
- वार्षिक उत्पन्न पुरावा
- मोबाईल नंबर
- बँक खात्याचे पासबुक (आधार नंबरसोबत लिंक असणे)
- विधवा प्रमाणपत्र (लागू करण्यात आले असेल तर)
- अपंगत्व असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र (लागू केले असेल तरच)
- पासपोर्ट आकारचे फोटो
PM Silai Machine Yojana 2024 Online Registration
अर्जदारांना लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या रजिस्ट्रेशन प्रकिया स्टेप बाय स्टेप जाणून घेणे आवश्यक आहे.
विश्वकर्मा योजनेची वेबसाइट उघडणे
- सर्वात प्रथम तुम्हाला डेस्कटॉप किंवा मोबाईलवर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाची वेबसाइट उघडायची आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर विश्वकर्मा योजनेचा डॅशबोर्ड उघडेल, त्यामधून तुम्ही माहिती सुद्धा घेऊ शकता.
- तुम्हाला डॅशबोर्डच्या लॉगिन पर्यायाला क्लिक करावे लागेल.
- परंतु लॉगिन करण्यासाठी तुम्हाला CSC लॉगिन आयडी व पासवर्ड असणे गरजेचे आहे.
- CSC लॉगिन तयार करण्यासाठी तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रच्या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता.
पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत वेरीफिकेशन करून घेणे
- सीएससी आयडी तयार करून घेतल्यानंतर तुम्ही CSC Register Artisans पर्यायामध्ये जाणे.
- पुढे तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील, ज्यामध्ये तुमच्या घरात सरकारी नोकरीमध्ये कोणी आहे का? आणि तुम्ही केंद्र सरकारच्या इतर योजनां अंतर्गत जसे PM SVANidhi Yojana, PMEGP Loan Yojana आणि Mudra Yojana व्यवसायासाठी कर्ज घेतले आहेत का? नसतील तर No करून Continue बटन दाबा.
- पुढे अर्जदाराचे आधारकार्डला लिंक असलेले मोबाईल नंबर टाका.
- त्यानंतर आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरून घ्या.
- पुढे टर्म्स व कंडिशन वाचून टिकमार्क करून Continue करा.
- तुमच्या मोबाईल नंबरवर आधार वेरिफिकेशनसाठी ओटीपी येईल तो भरून घेणे.
- त्यानंतर तुम्हाला अंगठा देऊन सुद्धा वेरीफिकेशन करावे लागेल.
- वेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर तुमच्यासमोर फॉर्म उघडून येईल.
तुमचे वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती भरणे
- त्या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागणार ज्यामध्ये तुमचे नाव आणि वडील/जोडीदाराचे नाव द्यावे.
- त्यानंतर तुमची जन्म तारीख आणि तुमचा लग्न झाला आहे का? त्याची नोंद करा.
- पुढे तुमचे लिंग व तुमची कोणत्या वर्गात मोडतात? त्याची निवड करणे.
- तुम्ही दिव्यांग कॅटेगरी मधील असाल तर काही ऑपशन असतील ते निवडून घ्या.
- तुम्ही राहता त्या राज्यामध्ये व्यवसाय करायचा आहे का ? आणि तसेच त्याच जिल्ह्यामध्ये बिजनेस करणार आहे का ? तर Yes करा.
- पुढे तुम्हाला Minority डिटेल्स विचारली जातील असेल तर टाकून घ्या.
- त्यानंतर तुमच्या कुटुंबाची माहिती रेशनकार्ड प्रमाणे द्यावी लागेल.
- माहितीमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे Add करून घ्या आणि जे महिला अर्ज करणार आहे त्याचे नाव delete करून घ्या.
- आधारकार्ड प्रमाणे पुढे ऑटोमॅटिकली सर्व पत्ता फील होऊन येईल.
- जर तुम्ही सेम ठिकाणी राहत असाल तर Same as Aadhar Address वर क्लिक करा आणि जर नसाल तर Other या पर्यायावर क्लिक करून विचारलेली माहिती भरा.
- तुम्ही ग्रामपंचायत अंतर्गत येता का? त्याचे Yes/No च्या उत्तरावर टिक करून काही माहिती विचारली जाईल ती भरा.
तुमची Profession/Trade Details भरणे
- वैयक्तिक माहिती भरल्यानंतर खाली येऊन तुम्हाला Profession/Trade Name मध्ये फ्री शिलाई मशीनसाठी Tailor (Darzi) हा पर्याय निवडा.
- पुढे Sub Trade विचारले असेल ती यादी पाहून निवड करावा अथवा सिलेक्ट हा पर्याय राहू द्या.
- त्यानंतर Declaration दिली असेल त्यावर टिक करून घेणे.
- तुम्हाला Business Address द्यावा लागेल, त्यासाठी खालीलप्रमाणे तीन पर्याय दिसतील, त्यामधील तुमच्या सोयीनुसार टिकमार्क करून घेणे.
- जर तुम्ही Other ऑपशनला सिलेक्ट करत असाल तर तुम्ही ज्या ठिकाणी बिजनेस चालू करणार आहे , त्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता द्यावा लागेल.
- व्यवसायसाठी लागणार संपूर्ण पत्ता भरून माहिती Save करा.
तुमची बँक खात्याची माहिती व्यवस्थित भरणे
- व्यवसायसाठी माहिती भरून झाल्यावर Next वर क्लिक करून पुढच्या पेजमध्ये याल.
- त्या पेजमध्ये तुमच्या बँकेचे नाव, IFSC कोड, ब्रांचचे नाव, तुमचे खाते क्रमांक भरून घेणे.
- जर तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत लोन घ्यायचे असेल तर Yes करा जर गरज नसल्यावर माहिती नो करून घ्या.
- लोन घेत असाल तर तुम्हाला लोन किती हवा आहे? त्याची माहिती द्या.
- ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे, त्यामधून कर्ज हवे असेल तर ती सिलेक्ट करा अथवा दुसऱ्या बँकेची निवड करून त्यांची माहिती द्या.
- नंतर तुम्ही लोन कोणत्या उद्देशासाठी घेता आहेत? त्यामध्ये काही बॉक्स असतील ते टिक करा.
- जर तुमच्या नावावरती कर्ज चालू असेल तर माहिती द्या अथवा नाही दिली चालेल.
- पुढे तुमच्याकडे फोनपे किंवा गूगलपे असेल तर Digital Incentive Details मध्ये Yes करा.
- जर अकाउंट डिजिटल नसेल तर इतर आवश्यक असणारी माहिती देऊन Next करणे.
PM Silai Machine Yojana Online Form सबमिट करणे
- बँकेचे तपशील दिल्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन योजनाचे फायदे सांगण्यात येईल तसेच तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट हवा असेल तर निवड करू शकता.
- पुढे Declaration Details मध्ये येऊन PM Vishwakarma अंतर्गत असणारे अटी वाचून टिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
- या पद्धतीने तुमचा Application Form सबमिट झाला आहे. Done चा ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करून पुढे जावा.
- त्यानंतर तुम्हाला अर्ज केल्याचे pdf फाईल डाउनलोड करून प्रिंट करावी लागेल.
- यासाठी तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर डाउनलोडचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- एप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घेतल्यानंतर जर तुम्ही ग्रामीण क्षेत्रात राहत असतील तर ग्रामपंचायतमध्ये जाऊन Approval ग्रामसेवकांकडून करून घेणे.
- जर तुम्ही शहरी भागात राहत असतील तर नगरपालिका व महानगरपालिकेमधून मान्यता घ्या.
- त्यानंतर तुम्हाला योजने संबंधित फायदे क्रमाने देण्यात येतील.
PM Silai Machine Yojana Registration Status Check
- प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनाचे रजिस्ट्रेशन स्थिती पाहण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेच्या पोर्टलमध्ये जावा.
- त्यानंतर मेनुबारमध्ये वरच्या बाजूला लॉगिनहा ऑपशन दिसेल तो सिलेक्ट करा.
- त्यामध्ये Application/Beneficiary Login चा पर्याय निवडा.
- तुमच्यासमोर लॉगिन डॅशबोर्ड उघडेल त्यामध्ये रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाका.
- नंतर कॅप्चा कोड विचारला असेल तो भरून लॉगिन बटणावर क्लिक करा.
- लॉगिन झाल्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशन केलेले स्टेटस काय आहे ते दिसून येईल.
निष्कर्ष
अशा प्रकारे आम्ही PM Silai Machine Yojana Online Apply कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती क्रमानुसार दिली. ज्यामध्ये योजनेमधून अर्ज करून कसे लाभ मिळवू शकता आणि कशा प्रकारे स्टेटस पाहू शकता? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्ही पैसे कमविण्याच्या कल्पना शोधत असतील तर सरकारतर्फे फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत लाभ घ्या.