PM Shram Yogi Mandhan Yojana 2024: या नागरिकांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन

PM Shram Yogi Mandhan Yojana 2024: असंघटित क्षेत्रातील कामगारांना म्हातारपणी आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना केंद्र सरकारने सुरु केली. कामगारांना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांच्या स्वरूपात पेन्शन रक्कम दिले जाते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

PMSYM पेन्शन योजना ही असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी आहे. असंघटित क्षेत्र म्हणजे काही असे क्षेत्र आहेत जे सरकारसोबत रजिस्टर नसतात. त्यामध्ये जसे कामगार, रस्त्यावरील धंदे करणारे वेंडर्स, रिक्षावाले आणि घरगुती काम करण्याऱ्या स्त्रिया यांचा समावेश असतो. असंघटित क्षेत्रामध्ये व संघटित क्षेत्रात कोणकोण येतात? यांची संपूर्ण यादी केंद्र सरकारने E-Shram Portal मध्ये दिलेली आहे. 

या योजनेमधून केंद्र सरकारचे मुख्य उद्देश असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा, २००८ नुसार या क्षेत्रातील नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारतर्फे विविध प्रकारची मदत केली जाते. कारण या क्षेत्रातील लोकांकडे कोणत्याही प्रकारचे सुविधा उपलब्ध नसतात. ज्यामध्ये केंद्र सरकारतर्फे कामगारांना Life Insurance, काही हेल्थ समस्या झाल्या तर Medical Insurance यांसारख्या समस्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिले जाते. 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही एक Retirement Program आहे, ज्यामधून कामगार वर्गातील नागरिकांना निवृत्तीनंतर आर्थिक मदत मिळावी यासाठी सुरु केली आहे. कारण असंघटित क्षेत्रामधील लोंकाना योग्यरीत्या रोजगार नसल्यामुळे भविष्यासाठी पैसे जमा करणे कठीण होते. 

आज आपण याच PMSYM योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत हा लेख पहा. ज्यामध्ये आम्ही योजना काय आहे? त्यांचे उद्देश, त्यामधून मिळणारे फायदे, पात्रतेच्या अटी, असंघटित क्षेत्रातील नागरिकांची यादी, अर्जासाठी लागणारे कागदपत्रे आणि अर्ज करण्यासाठी प्रकिया याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

PM Shram Yogi Mandhan Yojana in Marathi 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनाची सुरुवात फेब्रुवारी 2019 रोजी असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी केली होती. योजनेमध्ये होणाऱ्या संपूर्ण कामाची देखरेख Ministry of Labour and Employment विभाग करते. 

योजनेमधून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी LIC व CSC सेंटर अंमलबजावणी करते. LIC एक प्रकारे फंड मॅनेजर आहे, जे लाभार्थ्यांकडून येणारे आर्थिक योगदान जमा करायचे काम करते. CSC म्हणजेच सामान्य सेवा केंद्र ज्यामध्ये असंघटित क्षेत्रामधील नागरिक जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकतात. 

असंघटित क्षेत्रातील नागरिकांना महिन्याला काही छोटी रक्कम भरून 60 वर्षाचे झाल्यानंतर निवृत्ती रक्कम पेन्शन स्वरूपात कमीत कमी 3000 प्रति महिना केंद्र सरकारकडून दिले जाते. PIB च्या माहितीनुसार 22 जुलै, 2024 पर्यंत असंघटित क्षेत्रामधील 29.82 कोटी नागरिकांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनाची माहिती 2024

योजनाचे नावPradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana (PMSYM)
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
सुरु झाली01 फेब्रुवारी, 2015 रोजी
लॉन्च केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
विभागश्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार
उद्देशअसंघटित क्षेत्रामधील नागरिकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा उपलब्ध करणे
लाभार्थीभारत देशामधील असंघटित क्षेत्रातील कामगार
लाभप्रतिमाह 3000 रुपये पेन्शन
अर्ज पद्धतीऑनलाइन व ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटmaandhan.in

Pradhanmantri Shram Yogi Mandhan Yojana Aim 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनाचे मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रामधील नागरिक म्हातारपणी संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहे. आपल्या देशामध्ये जे नागरिक असंघटित क्षेत्रांमध्ये काम करत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसते. 

त्यामध्ये ते गरीब वर्गात मोडतात, ज्यामुळे त्त्यांना रोजगारामधून भविष्यामध्ये स्वतःसाठी पैसे जमा करणे जमत नाही. हे नागरिक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पोटापाण्यासाठी विविध प्रकारचे काम करून जीवन जगत असतात. अशातच त्यांना भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नसतात.

यामुळे काही नागरिकांना म्हातार वयामध्ये सुद्धा काम करून आपले जीवन जगावे लागते आणि काही जण आर्थिक अस्थिरता असल्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. नागरिकांच्या या समस्यांना कमी करण्यासाठी केंद्र सरकार PMSYM योजना अंतर्गत आर्थिक मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहेत. 

PM Shram Yogi Mandhan Yojana Benefits 

  • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनाचे फायदे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिला जातो. 
  • या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना निवृतीनंतर आर्थिक मदत मिळवी यासाठी पेन्शन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 
  • लाभार्थ्यांना या योजनेमध्ये महिन्याला फक्त 55 रुपये गुंतवणूक करून 60 वर्ष पूर्ण झाल्यांनतर 3000 रुपये प्रतिमाह पाठविले जाते. 
  • केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारी पेन्शनची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर केले जाते. 
  • जेवढी रक्कम लाभार्थ्यांकडून गुंतवणूक केली जाते, तेवढीच रक्कम केंद्र सरकारकडून आर्थिक स्वरूपात दिली जाते.
  • PMSYM ही योजना सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार संपूर्ण आर्थिक मदत करते. 
  • योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तीचे किंवा स्त्रीचे 60 वर्षा अगोदर निधन झाल्यास त्यांचे जोडीदार गुंतवणूक चालू ठेवू शकतात किंवा अकाउंट बंद करून जेवढी रक्कम भरली आहे, त्यानुसार saving Bank व्याज दर लागू होऊन रक्कम दिली जाते. 
  • लाअर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय कमी असेल तर कमी प्रीमियम भरावे लागेल आणि वय जास्त असल्यास जास्त योगदान द्यावे लागेल. 
  • वय 18 च्या जवळपास असलेल्या नागरिकांना प्रत्येक महिन्याला फक्त 55 रुपये भरावे लागेल. 
  • जर नागरिकांचे वय 40 असेल तर 200 रुपये पर्यंतची रक्कम प्रतिमाह भरावी लागेल.भार्थीचे 60 वर्षांनंतर निधन झाल्यावर त्यांची पेन्शन रक्कम जोडीदाराला 50% प्रमाणे देण्यात येते. 
  • बँकेमध्ये Auto-Debit Functionality चालू करून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यामधून प्रीमियम वजा केले जातील. यामुळे लाभार्थ्यांचे प्रीमियन चुकणार नाही आणि पेनल्टी चार्जेस सुद्धा वाचतील. 

Pradhanmantri Shram Yogi Mandhan Yojana Eligibility 

नागरिकांना अर्ज करण्याआधी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनासाठी पात्रता जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्र असणे आवश्यक आहे.  

  • या योजनेमध्ये देशामधील असंघटित क्षेत्रातील नागरिक सहभागी होण्यास पात्र आहेत. 
  • National Pension Scheme, Employees State Insurance Corporation Scheme आणि Employees Provident Fund Scheme यामध्ये सहभागी असलेले नागरिक अर्ज करण्यास पात्र नाही. 
  • त्याचप्रमाणे Income Tax Payer सुद्धा असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. 
  • लाभार्थ्यांकडे स्वतःचे Saving Bank Account असणे गरजेचे आहे. 
  • PMSYM योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी नागरिकांचे वय 18 ते 40 च्या आत असणे आवश्यक आहे.
  • या योजनामध्ये पात्र असण्यासाठी नागरिकांचे महिन्याचा पगार 15,000 रुपयांपेक्षा कमी असणे.
  • अर्ज करण्याऱ्या नागरिकांकडे E Shram Card असणे महत्त्वाचे आहे. 

PM Shram Yogi Mandhan Scheme Under Beneficiaries

  • सफाई कामगार 
  • लहान व मध्यम शेतकरी 
  • पशुपालन 
  • मासेमारी करणारे नागरिक (मत्स्यपालन) 
  • जमीन नसलेला शेतकरी 
  • चमड्याची कारागिरी करणारा व्यक्ती 
  • भाजी व फळे विकणारा वेंडर 
  • रिक्षेवाले 
  • पॅकिंगचे काम करणारे नागरिक 
  • प्रवास करून आलेले नागरिक (एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कामासाठी आलेले) 
  • घरगुती काम करणारे 
  • बांधकाम कामगार 
  • वीट भट्टी व दगड खाणीमध्ये  लेबलिंग व पॅकिंग करणारे कर्मचारी 
  • विणकाम करणारे कर्मचारी 
  • कचरा गोळा करणारे 
  • डोक्यावर ओझे उचलणारे 
  • धोबी (वॉशरमन)

PM Shram Yogi Mandhan Yojana Required Documents 

नागरिकांना अर्ज करताना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे, त्यानुसार कागदपत्रे जमा करून घेणे. 

  • ओळखपत्र 
  • वयाचे प्रमाणपत्र 
  • स्थानिक रहिवासी दाखला 
  • श्रम कार्ड 
  • आधारकार्ड (बँक लिंक असणे) 
  • पॅनकार्ड 
  • वार्षिक उत्पनाचे प्रमाणपत्र 
  • मोबाईल नंबर 
  • ई-मेल आयडी 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • बँक खात्याचे पुरावे (पासबुकचे पहिले पान) 

PM Shram Yogi Mandhan Yojana Registration 

जर तुम्ही पात्र आहात आणि प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनामध्ये अर्ज कसे करायचे? हे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करू शकता. 

  • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही LIC ऑफिस, कॉमन सर्विस सेंटर (CSC), जिल्ह्यामधील कामगार विभाग यामध्ये जाऊन अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे अर्ज करण्यासाठी तुम्ही LIC Agent ची सुद्धा निवड करू शकता. 
  • तुमच्या सोयीनुसार तुम्ही पर्याय निवडू शकता. आम्ही आहते CSC सेंटरमध्ये जाऊन कसे अर्ज करायचे याची माहिती देणार आहोत. 
  • सर्वात प्रथम तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे झेरॉक्स करून घेयचे आहेत. 
  • त्यानंतर ती कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटरला भेट देयची आहे. 
  • सेंटरमध्ये गेल्यानंतर तेथील अधिकारीसोबत PMSYM योजनाची माहिती सांगायची आहे. 
  • त्यानंतर तुम्हाला अधिकारी अर्जाचा फॉर्म देतील ते घेयचे. 
  • त्या फॉर्ममध्ये तुम्हाला योजनासाठी आवश्यक असणारी माहिती विचारली असले ती भरून घेणे. 
  • माहिती भरून झाल्यावर सर्व कागदपत्रांची झेरॉक्स फॉर्म सोबत जोडून घेणे. 
  • त्यानंतर सामान्य सेवा केंद्रामधील अधिकारी जवळ फॉर्म जमा करणे. 
  • केंद्रामधील अधिकारी तुम्हाला फॉर्मची प्रिंट देईल ती सांभाळून ठेवणे. 
  • अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करण्यासाठी प्रकिया करू शकता. 

PM Shram Yogi Mandhan Scheme Self Enrollment 

  • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनामध्ये सेल्फ एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट उघडायची आहे. 
  • त्यानंतर तुमच्या समोर वेबसाइटचे डॅशबोर्ड उघडून येईल. 
  • त्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला Click Here To Apply Now या पर्यायामध्ये जावे लागेल. 
  • पर्यायामध्ये गेल्यावर तुम्ही नवीन पेजमध्ये स्विच कराल. 
  • त्यामध्ये तुम्हाला Self Enrollment असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारतील तो भरून Proceed बटन दाबून पुढे जा. 
  • पुढे गेल्यावर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल, जसे नाव व ई-मेल आयडी इत्यादी. 
  • माहिती भरून झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकून ओटीपी वर क्लिक करा. 
  • तुमच्या मोबाईलमध्ये ओटीपी आल्यावर तो भरून व्हेरिफाय करणे. 
  • त्यानंतर तुमच्या समोर PMSYM Form उघडून येईल. 
  • फॉर्ममध्ये जे काही माहिती विचारली असेल ती लक्षपूर्वक भरून घेणे. 
  • जमा केलेली कागदपत्रे व्यवस्थितपणे स्कॅन करून अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करणे. 
  • अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करून लाभ घेऊ शकता. 

निष्कर्ष 

अशा प्रकारे PM Shram Yogi Mandhan Yojana संपूर्ण माहिती सविस्तररित्या मार्गदर्शन केले. यामध्ये आम्ही योजना का सुरु केली? कोणी सुरु केली? कशासाठी सुरु केली? यामध्ये कोणते उद्देश होते? कोण यासाठी पात्र असणार? यामध्ये लाभार्थ्यांना मिळणारे फायदे कोणते? आवश्यक कागदपत्रे कोणती? त्यामध्ये कोणकोणत्या नागरिकांचा समावेश आहे? योजनेसाठी पात्रता काय असणार? आणि अर्ज करण्यासाठी काय करावे लागणार? याबद्दल माहिती जाणून घेतली. 

तुम्हाला आमचा हा आर्टिकल आवडला असेल तर गरजू लोकांना नक्की पाठवा व अशाच योजनांच्या माहितीसाठी आम्हाला Subscribe करा. 

FAQs

पीएम श्रम योगी मानधन योजना काय आहे?

या योजनेमधून असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन दिले जाते. 

PMSYM योजनेसाठी अर्ज कसा करावा?

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला CSC सेंटर किंवा LIC ऑफिसमध्ये जावे लागेल. 

PMSYM साठी मासिक योगदान काय आहे?

केंद्र सरकारतर्फे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 55 रुपये ते 200 रुपये पर्यंत मासिक योगदान द्यावे लागेल. 

पुढे वाचा: