PM Saubhagya Yojana 2024: सौभाग्य योजनातून मिळणार फ्री वीज कनेक्शन, जाणून घ्या माहिती

PM Saubhagya Yojana 2024: भारत देशामधील गरीब कुटुंबाला विजेची सुविधा पुरविण्यासाठी प्रधानमंत्री सौभाग्य योजना भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरु केली. या योजने अंतर्गत देशातील जे गरीब वर्ग वीज कनेक्शन घेऊ शकत नाही किंवा ज्यांच्याकडे वीज उपलब्ध नाही त्यांना मोफत वीज कनेक्शन दिले जाते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामध्ये गरीब वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात किंवा सुविधा न पोहचल्यामुळे आधीपासून समस्या उद्भवलेल्या असतात. अशाच समस्यांना कमी करण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजनांची सुरुवात करत असतात. जेणेकरून गरीब वर्गातील नागरिकांना चांगले आयुष्य जगण्यात मदत मिळते. 

आपल्या देशात अजूनही काही राज्यात गरीब वर्ग राहतात, त्यांना विजेची सुविधा पोहोचलेली नाही किंवा आर्थिक अस्थिरतेमुळे त्यांना ते परवडत नाही. यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. 

या सगळ्यांचा विचार करता, आपला भारत देश विजेने उज्ज्वलीत होण्यासाठी तसेच गरीब वर्गाला समस्यांपासून दूर करण्यासाठी केंद्र सरकारने Pradhan Mantri Sahaj Bijli Har Ghar Yojana या नावाने ही योजना सुरु केली. 

गरीब वर्गातील नागरिक प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनामध्ये अर्ज करून कशाप्रकारे फ्री वीज कनेक्शनचे लाभ घेऊ शकतो? याबद्दल संपूर्ण माहिती या लेखातून सांगणार आहोत. त्याचसोबत, योजनेचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन प्रकिया याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती देणार आहोत यासाठी शेवटपर्यंत लेख जरूर वाचा.

PM Saubhagya Yojana in Marathi 

प्रधानमंत्री सौभाग्य योजनाची सुरवात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी 2017 रोजी केली होती. आपल्या देशातील काही गरीब वर्गामधील कुटुंबामध्ये आजही वीज सुविधा त्यांच्या घरात उपलब्ध नाही. अशा लोकांना मोफत वीज कनेक्शन पुरविण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल गरिबांसाठी उचलले आहे.

यामध्ये देशामधील ग्रामीण क्षेत्रामधील तसेच शहरी क्षेत्रामधील ज्या गरिबांच्या घरात वीज उपलब्ध नाही, त्यांना सरकारतर्फे वीज उपलब्ध करून दिली जाते. 

प्रत्येक राज्यातील गरीब कुटुंबाला या योजनेच्या माध्यमातून फ्री वीज कनेक्शन तर दिले जाते, परंतु त्यासोबत पाच वर्षांसाठी मीटरची दुरुस्ती सुविधा, एक डीसी पंखा, एक डीसी पॉवर प्लग आणि LED बल्ब सुद्धा दिले जाते. जेणेकरून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च होणार नाही आणि आर्थिक ओझेही  कमी होते. 

Saubhagya Scheme यामध्ये अर्ज करून मोफत वीज कनेक्शन मिळवण्यासाठी भारत देशामधील गरीब कुटुंबातील नागरिकांचे सामाजिक, आर्थिक, जातीय जनगणना 2011 यामध्ये नाव असल्यास लाभ घेता येतो. 

परंतु जर यामध्ये कोणत्याही गरीब वर्गातील कुटुंबाचे नावे नसल्यास त्यांना केंद्र सरकारतर्फे फक्त पाचशे रुपयांमध्ये वीज कनेक्शन लावून दिले जाते आणि यामध्ये गरीब वर्गाला आर्थिक ओझे सहन करायला नको, म्हणून ते 500 रुपये दहा हफ्त्यांच्या स्वरूपात परतफेड करू शकतात.

Saubhagya Scheme 2024 Overview

योजनाचे नावेप्रधानमंत्री सौभाग्य योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
कोणाद्वारे सुरु झालेप्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी
कधी सुरु केले25 सप्टेंबर, 2017 रोजी
उद्देशदेशामधील गरीब वर्गातील नागरिकांना मोफत वीज कनेक्शन प्रदान करणे
लाभार्थीदेशातील गरीब वर्ग
लाभफ्री वीज कनेक्शन
अर्ज प्रकियाऑनलाइन व ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://saubhagya.gov.in/
हेल्पलाईन टोल फ्री नंबर1800-121-5555

Pradhan Mantri Saubhagya Yojana Objective 

2017 साली केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री सौभाग्य योजनाचे मुख्य उद्देश देशामधील प्रत्येक गरीब कुटुंबाकडे वीज कनेक्शन पोहचविणे हे आहे. देशातील काही ग्रामीण व शहरी भागातील छोट्या घरांमध्ये विजेची सुविधा उपलब्ध नाही. गरीब नागरिकांच्या आर्थिक मंदीमुळे त्यांना विजेसाठी खर्च करण्यास शक्य होत नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना अंधारातच राहून विविध प्रकारच्या समस्यांना दैनंदिन जीवनात तोंड द्यावे लागते. 

अशाच गरीब कुटुंबियांना वीज उपलब्ध करून मदत करण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील अशाच कुटुंबियांना मोफत वीज सुरक्षा प्रदान केली जाते. जेणेकरून त्यांच्या कुटुंबामधील प्रत्येक लहान मोठे सदस्य आपले स्वप्न उज्ज्वल प्रकाशात राहून साकार करतील.

PM Saubhagya Yojana Benefits 

  • देशामधील प्रत्येक घरा-घरांमध्ये वीज या योजनेच्या माध्यमातून पोहोचवली जाणार आहे. 
  • या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक राज्यातील गरीब परिवारांना मोफत वीज कनेक्शन दिले जाणार आहे. 
  • त्याचप्रमाणे गरीब परिवाराला सरकारतर्फे मोफत बल्ब, डीसी पंखा, डीसी पावर प्लग आणि 5 वर्षांसाठी मीटर दुरुस्ती फ्री दिले जाते. 
  • ग्रामीण व शहरी भागातील गरीब नागरिक यामध्ये सहभागी होऊन आपल्या घरात वीज कनेक्शन करू शकतात. 
  • देशातील प्रत्येक घराघरात वीज उपलब्ध झाल्यामुळे लोकांच्या जीवनात सुधारणा होणार. 
  • ज्या ग्रामीण भागात जसे डोंगराळ किंवा अडचणीमध्ये असलेल्या घरांमध्येसुद्धा सरकारतर्फे वीज पुरवठा दिला जाणार. 
  • गरीब वर्गातील नागरिकांना वीज कनेक्शन विकत घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च करावा लागणार नाही. 
  • या योजनेतून घरोघरी वीज आल्यामुळे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया वाढ होण्यास मदत मिळेल. 
  • गरीब वर्गातील नागरिकांना या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी कुठेही न जाता मोबाईलद्वारे सहजरित्या अर्ज करता येऊ शकतो. 

PM Saubhagya Yojana Eligibility 

अर्जदार नागरिकांना यामध्ये अर्ज करून लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या पात्रतानुसार प्रधानमंत्री सौभाग्य योजनासाठी पात्र असणे गरजेचे आहे. 

  • या योजनेमध्ये अर्ज करणारा व्यक्ती भारत देशामधील स्थानिक रहिवासी असणे. 
  • देशामधील फक्त गरीब वर्गातील कुटुंब या योजनेत सहभागी होऊन लाभ घेऊ शकतो. 
  • सामाजिक, आर्थिक, जातीय जनगणना 2011 यामध्ये ज्या नागरिकांचे नाव आहेत त्यांनाच फ्री वीज कनेक्शन दिले जाणार. 
  • ज्या नागरिकांचे सामाजिक, आर्थिक, जातीय जनगणना 2011 यामध्ये नावे नसल्यास त्यांना काही कमी रक्कम देऊन वीज कनेक्शन करावे लागेल. 
  • ज्या कुटुंबामध्ये कोणतेही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असतील, त्या परिवारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
  • ज्या नागरिकांच्या घरामध्ये पहिल्यापासून वीज कनेक्शन उपलब्ध आहे, परंतु अर्ज केल्यास रद्द केले जातील. 
  • जर अर्जदार व्यक्तीच्या घरात तीन पेक्षा जास्त खोल्या असल्यास अर्ज करू शकत नाही. 
  • तसेच कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याकडे दुचाकी किंवा चारचाकी नसली पाहिजेत.

PM Saubhagya Yojana Documents 

अर्जदारांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करून सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या प्रधानमंत्री सौभाग्य योजनाचे आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहेत. 

  • अर्जदाराचे आधारकार्ड 
  • रेशनकार्ड 
  • पॅनकार्ड 
  • वोटर आयडीकार्ड 
  • बीपीएल कार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • मोबाईल नंबर

PM Saubhagya Yojana Apply Online 

जे नागरिक गरीब परिवारातील असून योजनेच्या पात्रतानुसार पात्र असतील आणि ते अर्ज करून लाभ घेण्यास इच्छुक असतील, तर त्यांनी खालील दिलेल्या प्रधानमंत्री सौभाग्य योजनाचे रजिस्ट्रेशन प्रकिया फॉलो करा. 

  • तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल. 
  • त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल त्यामध्ये तुम्हाला गेस्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 
  • त्या पर्यायामध्ये गेल्यानंतर नवीन पेज उघडून येईल त्यामध्ये साइन इनचा पर्याय दिसेल.
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचे Role ID आणि पासवर्ड टाकावे लागेल. 
  • आयडी आणि पासवर्ड टाकून झाल्यावर साइन इन बटनावर क्लिक करावे लागेल. 
  • त्यानंतर तुमच्या समोर Saubhagya Application Form उघडून येईल. 
  • त्या फॉर्ममध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरून घेणे. 
  • फॉर्म भरल्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घेणे. 
  • शेवटी सगळं काही झाल्यानंतर व्यवस्थित तपासणी करून सबमिट बटनावर क्लिक करणे. 
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन प्रकिया करून अर्ज करू शकता.

PM Saubhagya Yojana Offline Registration 

ज्या नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्यास कोणत्याही समस्या येत असतील तर खालील दिलेल्या प्रधानमंत्री  सौभाग्य योजनाचे ऑफलाइन रजिस्ट्रेशन प्रकिया फॉलो करून अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

  • सर्वात प्रथम नागरिकांना ऑफलाइन अर्ज करण्यासाठी जवळच्या वीज विभाग कार्यालयामध्ये जावे लागेल. 
  • वीज विभाग कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्याला या योजने संबंधित माहिती देणे. 
  • त्यानंतर तुम्हाला अधिकाऱ्याकडून ऑफलाइन अर्जासाठी फॉर्म दिले जातील. 
  • त्या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती ध्यानपूर्वक भरावी लागेल. 
  • संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर लागणारे सगळे आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून घेणे. 
  • त्यानंतर फॉर्ममध्ये तुमचे पासपोर्ट साईझ फोट चिकटवणे. 
  • हे सगळं केल्यानंतर तुमचा फॉर्म आणि कागदपत्रे घेऊन वीज कार्यालयामधील अधिकारीकडे जमा करणे. 
  • त्यानंतर तुम्हाला त्या अधिकाऱ्याकडून अर्ज केल्याची पावती तुम्हाला प्राप्त होईल. 
  • अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता.

निष्कर्ष 

आम्ही या लेखामधून तुम्हाला PM Saubhagya Yojana संबंधित संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगितली. सरकारने सुरु केलेल्या या योजनेतून देशामधील प्रत्येक गरीब परिवारांना मोफत वीज मिळून त्यांचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे.  या योजनेचे उद्देश काय होते? ते का चालू करण्यात आले? देशातील गरीब वर्गाला याचा फायदा कसा होईल? गरीब वर्गातील नागरिकांना यामध्ये फायदा कसा घेता येईल? त्याचप्रमाणे नागरिकांना अर्ज करताना कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत?  तसेच या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कोण पात्र असणार आहेत? आणि अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकियांना फॉलो करावे लागेल? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही या लेखातून मार्गदर्शन केले. 

जे नागरिक या योजनेच्या माध्यमातून आपल्या घरात मोफत वीज कनेक्शन करण्यासाठी इच्छुक आहे, त्यांनी आम्ही दिलेल्या लेखातून संपूर्ण माहिती वाचून अर्ज करणे आणि सरकारच्या या योजनेचा फायदा करून घेणे. जर तुम्हाला आमचा हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या जवळील गरजू कुटुंबियांना पाठवा आणि त्यांना मदत करा. 

तुम्हाला अशाच प्रकारचे फायदेशीर आणि उपयुक्त योजनांची माहिती त्वरित भेटण्यासाठी आमच्या वेबसाइटला Subscribe करा.

FAQs

भारतात मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करावा?

भारतात मोफत वीज योजनेसाठी पीएम सौभाग्याचा अधिकृत वेबसाइटमध्ये अर्ज करावा लागेल. 

काय आहे सौभाग्य योजना?

या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब परिवाराला मोफत वीज कनेक्शन केंद्र सरकारतर्फे दिली जाते. 

सौभाग्य योजनेसाठी कोण पात्र आहेत? 

या योजनेमध्ये फक्त देशामधील गरीब कुटुंब यामध्ये पात्र आहेत.

पुढे वाचा: