PM Mitra Yojana 2024: या 7 राज्यांमध्ये बनणार पीएम मित्र पार्क, जाणून घ्या माहिती

PM Mitra Yojana 2024: केंद्र सरकारने वस्र सेक्टरची वाढ करून निर्यात योग्यरीत्या होण्यासाठी पीएम मित्र योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशभरातील विविध महत्त्वाच्या राज्यांमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क सुरु करणार आहेत. जेणेकरून देशामधील नागरिकांना त्यामुळे रोजगार प्राप्त होईल आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणखी बळकट होईल.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामध्ये काही शतका अगोदर ब्रँडेड कपडे सहजपणे मिळत नसायचे. परंतु आज भारतामध्ये दुनियामधील मोठमोठे ब्रँड छोट्या छोट्या जागी सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे काही बाहेरच्या मोठ्या कंपन्या भारतामध्येच कपडे तयार करून निर्यात करतात. 

आपल्या भारत देशाने आपल्या निर्यातीमध्ये 400 अब्ज डॉलरचा आकडा पार केला. त्यामध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रांचा समावेश आहे, त्या क्षेत्रामधील आठव्या नंबरवर रेडिमेड गारमेंट येतो. पूर्ण देशामध्ये कपड्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालवला जातो. यामधून देशभरातील लाखो लोकांना रोजगाराची संधी दिली जाते. 

कापड हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. येत्या काही वर्षांमध्ये संपूर्ण दुनियामध्ये कापड क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी केंद्र सरकारने पीएम मित्र योजनाची सुरुवात केली आहे. याच योजने संबंधित आपण आमच्या लेखातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत आर्टिकल पाहत रहा. 

PM Mitra Yojana in Marathi

2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पनेत ऑक्टोबर, 2021 रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मित्र योजनाची सुरुवात केली. MITRA चा पूर्ण अर्थ Mega Integrated Textile Region and Apparel असा आहे. या योजनेची अंमलबजावणी Ministry of Textiles विभाग करते. 

केंद्र सरकारने 2021-22 ते 2027-28 या आर्थिक वर्षांसाठी पीएम मित्र योजना अंतर्गत एकूण 4,445 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये PPP Module नुसार म्हणजेच Public Private Partnership द्वारे देशामधील खाजगी व सरकारी कंपन्या एकत्र येऊन टेक्सटाईल क्षेत्रात काम करणार आहेत.

या योजनेच्या माध्यमातून भारत देशामध्ये मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. जेणेकरून भारत देशामधील वस्त्र क्षेत्रामध्ये प्रगती होईल, लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. 

Seven PM Mitra Parks 

पीएम मित्र योजनाच्या माध्यमातून भारत देशामधील 7 राज्यांमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार, त्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. 

  • अमरावती, महाराष्ट्र 
  • कलबुर्गी, कर्नाटक 
  • लखनऊ, उत्तर प्रदेश 
  • वारंगळ, तेलंगणा 
  • धार, मध्यप्रदेश 
  • विरूधुनगर, तामिळनाडू 
  • नवसारी, गुजरात

PM Mitra Scheme 2024 Overview

योजनाचे नावपीएम मित्र योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
कधी सुरु झालीऑक्टोबर, 2021
विभागवस्त्रोद्योग विभाग, भारत सरकार
उद्देशभारत देशामधील वस्त्रद्योग क्षेत्रामध्ये वाढ करून रोजगार निर्माण करणे व अर्थव्यवस्थेमध्ये वाढ करणे
लाभार्थीभारत देश व देशामधील नागरिक
बजेट4,445 कोटी
लाभमेगा वस्रोद्योग पार्क तयार करण्यात येणार

PM Mitra Yojana Aim 

केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम मित्र योजनाचे मुख्य उद्देश वस्रोद्योग क्षेत्राला दुनियामधील सर्वात मोठा उद्योग बनविणे आहे. ज्यामध्ये योजनेच्या माध्यमातून पार्कच्या स्वरूपात पायाभूत सुविधा तयार केल्या जातील. उभारण्यात येणाऱ्या पार्कमध्ये Cutting Edge Technology चा वापर केला जाणार आहे. 

या योजनेच्या माध्यमातून टेक्सटाइल उद्योगामध्ये FDI म्हणजे Foreign Direct Investment आणि लोकल गुंतवणूक वाढवण्यावरती लक्ष केंद्रित केले जाणार. त्याचसोबत टेक्सटाइल उद्योगामध्ये Value Chain तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकात्मता व आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे ध्येय केंद्र सरकारचे आहे. 

PM Mitra Yojana 5F Vision 

आपल्या भारत देशामध्ये वस्त्रद्योगसाठी लागणारे शेत एका ठिकाणी, तर फायबर तयार करणारी कंपनी दुसऱ्या ठिकाणी तसेच कपडे तयार करणारे कारखाने वेगळ्याच राज्यामध्ये या गोष्टींमुळे जास्त वेळ व पैसा वाया जातो आहे. त्याचसोबत ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा जास्त खर्च होतो. 

या सर्व गोष्टी 5F vision अंतर्गत सर्व गोष्टींचा एकाच जागेवर समावेश करून Value Chain तयार करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मित्र योजना अंतर्गत 5F स्टेप्सच्या आधारे वस्त्रद्योग क्षेत्रात काम केले जाणार, त्यांचे पाच स्टेप्स खालीलप्रमाणे दिलेले आहेत. 

  • Farm 
  • Fibre 
  • Factory 
  • Fashion 
  • Foreign 

Significance of PM Mitra Scheme

  • Reduce Logistics Cost: पीएम मित्र योजना अंतर्गत टेक्सटाइलमध्ये होणाऱ्या लॉजिस्टिक खर्चाला कमी केले जाणार, ज्यामध्ये भारतामधून बाहेरील देशामध्ये निर्यातीचे प्रमाण वाढण्यात मदत मिळणार. 
  • Employment: या पार्कच्या मदतीने जवळपास 70 हजार कोटींची गुंतवणूक होणार आणि यामुळे देशभरातील 20 लाख लोकांना नोकऱ्या मिळण्यास मदत होणार. 
  • Attract Foreign Direct Investment (FDI):  भारतामधील टेक्सटाइल क्षेत्रामध्ये एप्रिल 2000 पासून ते सप्टेंबर 2020 पर्यंत FDI अंतर्गत 20,468.62 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. परंतु आता या योजनेमुळे जास्तीत जास्त गुंतवणूक FDI अंतर्गत केल्या जातील. 
  • Competitiveness: या योजनेच्या माध्यमातून टेक्सटाइल क्षेत्रात जास्त प्रमाणात कपडे तयार केले जाणार आणि कपड्याची गुणवत्ता वाढवण्यात येणार ज्यामुळे स्पर्धात्मक दृष्टीकोन निर्माण होणार. 

PM Mitra Yojana Benefits 

  • पीएम मित्र योजनाचे फायदे भारत देशामधील वस्त्रद्योग क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी व अर्थव्यवस्था चांगली करण्यासाठी होणार. 
  • या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार विविध राज्यांमध्ये 7 PM Mitra Parks तयार करणार. 
  • हे मित्र पार्क ग्रीनफिल्ड म्हणजे जिथे उद्योग नाही त्या ठिकाणी आणि ब्राउनफिल्डमध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी आधीच उद्योग आहेत आणि त्यामध्ये विकास करायचा आहे तिथे उभारण्यात येणार. 
  • केंद्र व राज्य सरकारतर्फे योजनामधून मित्र पार्क तयार करण्यासाठी Special Purpose Vehicle कंपनीची स्थापना करण्यात येणार.
  • या Special Purpose Vehicle कंपनीमध्ये PPP Mode द्वारे पब्लिक व प्रायव्हेट कंपन्यांना एकत्र मिळून काम करण्याची संधी मिळणार. 
  • प्रायव्हेट कंपन्यांना Master Developer ची पदवी दिली जाणार, ज्यामधून पार्कचा विकास होणार आणि जोपर्यंत टेंडर असेल तोपर्यंत त्यांना पार्कची देखभाल पण करावी लागणार. 
  • केंद्र सरकारच्यामार्फत एका राज्यामध्ये 1 हजार एकर क्षेत्रामध्ये मित्र पार्क तयार केले जाणार. 
  • या पार्कमध्ये Incubation Centre, Common Processing House, Common Effluent Treatment Plant आणि टेक्सटाइल डिझाइन व टेस्टिंग संबंधित सेंटरचा समावेश असणार आहे. 
  • योजने अंतर्गत सचिवात्मक, व्यवस्थापकीय व अंमलबजावणी सपोर्ट देण्यासाठी आणि कामाची देखरेख करण्यासाठी Project Management Agency (PMA) नियुक्त केली जाणार. 
  •  केंद्र व राज्य सरकारने सुरु केलेल्या Special Purpose Vehicle कंपनीद्वारे पीएम मित्र योजना अंतर्गत गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्यानुसार  निधी जारी केला जाणार. 
  • या योजनेमध्ये एक इकोसिस्टिम तयार केले जाणार जिथे स्पिनिंग, विणकाम, डाईंग, प्रिंटिंग व कपडे उत्पादन एकाच ठिकाणी असणार. ज्यामुळे ट्रान्सपोर्टेशन व इतर खर्च वाचण्यात मदत मिळणार. 
  • आपल्या व बाहेरील देशांमधून योजना अंतर्गत 70,000 कोटी रुपयांचे गुंतवणूक येण्याचे अपेक्षित आहे. 
  • योजनेमधून जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होण्याची क्षमता असणार. 
  • केंद्र सरकारने सप्टेंबर, 2027-28वर्षापर्यंत योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 4,445 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. 
  • या योजनेमध्ये केंद्र व राज्य सरकार मिळून काम करणार आहेत. 
  • केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून Special Purpose Vehicles कंपनी तयार करण्यात येणार. त्यामध्ये 51% केंद्र सरकारचे तर राज्य सरकारचे 49% शेअरहोल्डिंग असणार आहे. 
  • भारतामध्ये कृषी क्षेत्रानंतर दुसऱ्या नंबरवर टेक्सटाइल क्षेत्र आहे, जिथे जास्त प्रमाणात रोजगार निर्माण केला जातो. 
  • टेक्सटाइल निर्यातीच्या क्षेत्रात पूर्ण दुनियामध्ये आपला भारत देश सहाव्या क्रमांकावर येतो. 

PM Mitra Yojana Incentives 

केंद्र सरकारकडून पीएम मित्र योजना अंतर्गत खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार. ज्यामध्ये खालीलप्रमाणे दिलेल्या माहितीचा समावेश असणार आहे. 

  • केंद्र सरकार Competitiveness Incentive Support (CIS) अंतर्गत 300 कोटी रुपयांचा फंड उत्पादन सुविधा उपलब्ध करण्यासाठी देण्यात येणार. 
  • योजनेमार्फत Greenfield Park Developer ला केंद्र सरकारतर्फे 30% भांडवल सपोर्ट दिले जाणार, ज्याची मर्यादा 500 कोटींपर्यंत असणार आहे. 
  • त्याचप्रमाणे Brownfield Sites Developer ला केंद्र सरकार 30% भांडवल सपोर्ट देणार ज्याची मर्यादा 200 कोटीपर्यंत असणार. 
  • Developer ला पार्कच्या माध्यमातून 25 वर्ष भाडेपट्टी मिळत राहणार. 
  • Anchor Plants उभारणारे गुंतवणूकदारांकडे 100 लोकांपेक्षा जास्त कर्मचारी असतील तर त्यांना प्रत्येक वर्षाला 10 कोटी प्रोत्साहन देण्यात येणार आणि याचा कालावधी 3 वर्षांसाठी असणार.  

निष्कर्ष 

आमच्या लेखाच्या माध्यमातून PM Mitra Yojana संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केला. लेखामध्ये योजना काय आहे? ती का सुरु करण्यात आली? त्यामागचे मुख्य उद्देश काय होते? कोणत्या क्षेत्रासाठी सुरु केली आहे? त्यामधून कोणकोणते फायदे होणार? कोणाकोणाला फायदे घेता येणार? किती रुपयांचा योजनेसाठी बजेट काढण्यात आला? यामधून कशाप्रकारे प्रोत्साहन दिले जाते? कोणत्या 5F स्टेप्सचा वापर केला जातो? अशा सर्व गोष्टींबद्दल सांगितले. 

तुम्ही जर फॅशन क्षेत्रामधील असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. भविष्यामध्ये आपला देश पूर्ण दुनियामध्ये पीएम मित्र योजनाच्या माध्यमातून विकसित होणार आहे. त्याचसोबत लाखो लोकांना याचा फायदा मिळणार आहे. 

तुम्हाला आमचा आर्टिकल उपयुक्त वाटला असेल तर फॅशन संबंधित क्षेत्रामधील सदस्यांना पाठवा आणि अशाच योजनांच्या माहितीसाठी योजना मीडियाच्या वेबसाइटलाSubscribe करु शकता किंवा Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करू शकता. 

FAQs

कोणते मंत्रालय पीएम मित्र योजना लागू करते?

वस्त्रोद्योग मंत्रालय पीएम मिंत्रा योजना लागू करते. 

पीएम मित्र योजनेचे उद्देश काय आहेत? 

या योजनेच्या माध्यमातून वस्त्रोद्योग क्षेत्राला पूर्ण दुनियामध्ये पसरवणे व निर्यात वाढवणे हे उद्देश आहेत. 

कोणत्या राज्यांमध्ये पीएम मित्र पार्क असणार?  

पीएम मित्र पार्क महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये असणार. 

पुढे वाचा: