PM Matsya Sampada Yojana 2024: मस्त्य व्यवसाय करण्यासाठी ६०% सबसिडी मिळणार, जाणून घ्या पूर्ण माहिती

PM Matsya Sampada Yojana 2024: भारत देशामधील मत्स्यपालन करणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजना सुरु केली. यामध्ये केंद्र सरकारचे PMMSY योजनेच्या माध्यमातून मुख्य उद्देश मस्त्यपालन करणाऱ्या नागरिकांचे उत्पन्न 2024-25 मध्ये दुप्पट करणे आणि त्यांची साखळी वाढविणे आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

मत्स्यपालन विभागाकडून सांगितल्यानुसार, आपला भारत देश हा मासे उत्पादनामध्ये पूर्ण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचसोबत मस्त्यपालन राष्ट्रांमध्ये दुसरा मोठा देश आहे. 

आपल्या देशामध्ये विकसित टेकनिक आल्याकारणामुळे जास्त प्रमाणात मस्त्यपालन केले जाते, यामध्ये समुद्रामधील लहान-लहान मास्यांनासुद्धा त्यामध्ये काढले जाते आणि याचा प्रभाव भविष्यातील उत्पादनामध्ये होतो. यामुळे केंद्र सरकारने सुरु केलेली योजना ही मस्त्यपालनामध्ये टिकाऊ उत्पादन व वाढ होण्यात लक्ष्य ठेवते. 

यामध्ये मस्त्यपालन करणाऱ्या नागरिकांना जास्त उत्पादन करण्यापासून रोखले तर, त्यांच्या कमाईमध्ये समस्या निर्माण होईल. याचे उपाय म्हणून केंद्र सरकार PMMSY Scheme च्या अंतर्गत मस्तपालन वर्गाला सबसिडी प्रदान केली जाते. मासेमारी करणारे नागरिक सबसिडीच्या रक्कमेनुसार नवीन नवीन व्यवसाय चालू करून पैसे कमाऊ शकतो. त्याचसोबत मास्यांचे उत्पादनसुद्धा वाढविण्यात मदत करू शकतो. 

या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारला ब्लु रेव्होल्यूशन सोबत टिकाऊ उत्पादन सुद्धा वाढवायचे आहे. जेणेकरून समुद्रातील मासेमारी कमी होऊन भविष्यात होणारे उत्पदनावर त्याचा प्रभाव पडणार नाही. 

आज आपण केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचसोबत योजना काय आहे? त्यांचे उद्देश काय आहे? त्यामधून कोणते फायदे मिळणार? यामध्ये मासेमारी करणाऱ्या नागरिकांसाठी पात्रता काय असणार? कशाप्रकारे लाभ दिला जाणार? त्यामध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती असणार? आणि अर्ज करण्यासाठी कोणती प्रकिया असणार? अशा सर्व गोष्टीबद्दल जाणार घेणार आहोत तर आर्टिकल शेवटपर्यंत पहा.  

PM Matsya Sampada Yojana in Marathi 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कोविडच्या काळात 10 सप्टेंबर, 2020 रोजी ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनाची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून मास्यांचे उत्पादन आणि जलचर (Aquatic) प्रॉडक्ट्स वाढविले जाते. केंद्र सरकारने 2020 ते 2025 पर्यंत अंमलबजावणी कालावधी ठेवला आहे. योजनाची सर्व अंमलबजावणी मस्त्यपालन मंत्रालय, भारत सरकार करत आहे. 

PMMSY ही केंद्रीय योजना असल्यामुळे यामध्ये विविध प्रकारचे योजनांचा सुद्धा समावेश असतो. यामध्ये अन्न प्रकिया उद्योग मंत्रालयाचा सुद्धा समावेश आहे. ज्यांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये पहिले मत्स्यपालन मेगा फूड पार्क बनविले गेले आहेत. जे आंध्र प्रदेश, पश्चिम गोदावरी जिल्ह्यामधील तुंदुररू (Tundurru) गावांमध्ये उभारण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारकडून PMMSY अंतर्गत मत्स्यपालन क्षेत्रातील विकास करण्यासाठी 20,050 कोटी रुपये खर्च दिले गेले. त्यामध्ये दोन घटकांचा समावेश आहे, पहिले घटक केंद्रीय क्षेत्र (SC) स्कीम आणि दुसरे केंद्रीय स्पॉन्सर्ड स्कीम (CSS) ज्यामध्ये खर्चाचे वाटप केले जाते. 

Components of PMMSY

Central Sector Scheme (CS)

केंद्रीय सेक्टर स्कीम म्हणजे केंद्र सरकार सर्व काम स्वतःच करते. सेंट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाते. ज्यामध्ये सामान्य कॅटेगरीमधील नागरिकांना 40% सबसिडी आणि अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) तसेच महिला वर्गातील नागरिकांना 60% सबसिडी योजनाच्या माध्यमातून प्रदान केली जाते. 

Central Sponsored Scheme (CSS) 

केंद्रीय स्पॉन्सर्ड स्कीममध्ये जर राज्य सरकारला त्यांच्या पातळीवर काही करायचे असल्यास केंद्र सरकार त्यांना आर्थिक स्वरूपात मदत करते. यामध्ये  ईशान्यकडील राज्यांसाठी 90%, केंद्रशासित प्रदेशांना 100% आणि इतर राज्यांना 60% सबसिडी केंद्र सरकार देते. 

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 Details

योजनेचे नावप्रधानमंत्री मस्त्य संपदा योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
सुरु कोणी केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
कधी सुरु झालीवर्ष 10 सप्टेंबर, 2020 रोजी
विभागमत्स्यपालन मंत्रालय, भारत सरकार
उद्देशभारतामधील मत्स्य उत्पादन व ब्लू विकास वाढविणे
लाभार्थीमस्त्यपालन वर्गातील नागरिक
लाभमस्त्यपालन संबंधित व्यवसाय करण्यासाठी सबसिडी
अर्ज पद्धतऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटpmmsy.dof.gov.in

PM Matsya Sampada Yojana Aim

प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनाचे मुख्य उद्देश भारतामधील मस्त्यपालन वर्गाच्या उत्पादनामध्ये वाढ करणे आणि संबंधित व्यवसायांना प्रोत्सहन देऊन रोजगार निर्माण करण्यासाठी मदत करणे आहे. केंद्र सरकारतर्फे ब्लु रेव्होल्यूशन अंतर्गत 2022-23 मध्ये मास्यांचे उत्पादन 20 लाख टनचे लक्ष्य होते. आता ते 2024-25 मध्ये ते वाढवून 22 लाख ठेवण्यात आले आहे. 

PMMSY योजनेच्या माध्यमातून 2018-19 च्या 137.58 लाख मेट्रिक टनपेक्षा 9% वाढ 2024-25 मध्ये होण्यासाठी 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. यामध्ये केंद्र सरकारचा उद्देश 2024-25 मध्ये 9 टक्क्याने वाढून 220 लाख मेट्रिक टन इतके करणे आहे. 

मासेमारीमध्ये होणाऱ्या नुकसानीला 25% मध्ये कमी करून 10% पर्यंत आणणे हे सुद्धा लक्ष्य सरकारचे आहेत. त्याचबरोबर देशामधील घरांमध्ये वर्षाला 5 ते 6 kg मास्यांच्या वापरामध्ये वाढ करून 12 kg करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहेत. 

PM Matsya Sampada Yojana Features & Benefits

  • प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनाचे फायदे देशामधील मस्त्यपालन संबंधित क्षेत्रात काम करत असलेली नागरिकांना होतो. 
  • मस्त्यपालन क्षेत्रातील मच्छीमार वर्ग व फिश फार्मर यांना PMMSY योजनेतून सबसिडी दिली जाते. 
  • योजनेच्या माध्यमातून ST/SC/Women या वर्गातील नागरिकांना 60% सबसिडी व्यवसाय चालू करण्यासाठी दिली जाते. 
  • त्याचप्रमाणे सामान्य श्रेणीमधील नागरिकांना मस्त्यपालन संबंधित व्यवसाय करण्यासाठी 40% सबसिडीचा लाभ दिला जातो. 
  • केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून 2024-25 वर्षांमध्ये 1 लाख कोटी एक्स्पोर्ट कमाई करण्याचा उद्देश ठेवला आहे, याचा फायदा मस्त्यविक्री करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. 
  • या योजनेमार्फत देशामध्ये 15 लाखांपेक्षा जास्त डायरेक्ट व इनडायरेक्ट रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

PM Matsya Sampada Yojana Beneficiaries 

प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनामध्ये लाभार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे, त्यानुसार क्षेत्रामधील नागरिक सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात. 

  • मच्छीमार
  • मस्त्य फार्मर 
  • देशामधील राज्य सरकार 
  • अनुसूचित जाती व जमातीमधील नागरिक 
  • मास्यांचे व्यवसाय क्षेत्रातील गट 
  • मस्त्यपालन सहकारी संस्था व महासंघ 
  • खाजगी फर्म व उद्योजक जे मत्स्य संबंधित क्षेत्रात काम करत 
  • महिना वर्ग 
  • मस्त्य क्षेत्रातील कामगार 
  • मासे विकणारे वेंडर्स 

PM Matsya Sampada Yojana Required Documents

मस्त्यपालन वर्गातील नागरिकांना अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाची आवश्यक कागदपत्रे जमा करणे महत्त्वाचे आहेत. यासाठी कागदपत्रांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. 

  • अर्जदाराचे आधार कार्ड (बँक खात्यासोबत लिंक असलेले) 
  • पॅनकार्ड 
  • वोटर आयडी कार्ड 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • पार्टनरशिप डीड किंवा MOA (भागीदार असल्यास) 
  • जमिनीचे रिकॉर्ड (भाडेपट्टी करार/NOC/जमीन मालिकेचे कागदपत्रे)
  • प्रोजेक्ट रिपोर्ट 
  • बँक खात्याची माहिती 
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र 
  • घोषणापत्र 
  • हमीपत्र 
  • मोबाईल नंबर

PM Matsya Sampada Yojana Apply Online 

नागरिकांना प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनामध्ये अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करू शकता. 

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नागरिकांना सर्वात प्रथम PMMSY च्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल. 
  • त्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करावे लागेल. 
  • ते तयार करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन पर्यावर क्लिक करणे. 
  • त्यानंतर त्यामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरून आयडी व पासवर्ड बनविणे. 
  • आयडी व पासवर्ड तयार करून झाल्यानंतर लॉगिन करून घेणे. 
  • लॉगिन केल्यांनतर तुमच्या समोर अर्जाचा फॉर्म उघडून येईल. 
  • त्या अर्जाच्या फॉर्ममध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती वाचून भरून घेणे. 
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करून घेणे. 
  • त्यामध्ये तुम्हाला SCP आणि DPR तयार करून तेही अपलोड करणे. 
  • अशा प्रकारे अर्ज करून लाभ मिळवू शकता. 

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Apply Offline 

जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यास समस्या होत असतील तर तुम्ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनामध्ये ऑफलाइन अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या माहितीनुसार प्रकिया पार पाडून लाभ घेऊ शकता. 

  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला PMMSY Form लागेल, यासाठी तुम्ही आमच्या Telegram Group मध्ये जाऊन प्रस्ताव डाउनलोड करू शकता किंवा तुमच्या जवळील मस्त्यपालन मंत्रालयात भेट देऊन अर्जाचा फॉर्म प्राप्त करू शकता. 
  • अर्जाचा फॉर्म प्राप्त केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण फॉर्म अचूक भरणे गरजेचे आहे. 
  • फॉर्मच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, प्रवर्ग, मोबाईल नंबर भरून घेयचा. 
  • दुसऱ्या पानावर गेल्यानंतर तुम्हाला विहित नमुना अर्ज प्रपत्र – अ दिसेल, त्यामध्ये दिनांक, सहायक आयुक्तांचे मत्स्यव्यवसाय जिल्हा माहिती, विषयामध्ये योजनेचे नाव, तुमचे वय, वर्ष, पत्ता, तुमची जात आणि शेवटी सही करायची. 
  • नंतर तुम्हाला प्रपत्र-ब मध्ये तुम्हाला मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव भरायचा आहे, त्यामध्ये तुमचे नाव, पत्ता, योजनेचे नाव, प्रकल्पाचे ठिकाण आणि विचारलेल्या प्रश्नानुसार होय/नाही मध्ये उत्तर देणे. 
  • त्यानंतर तुम्हाला 100 रुपयांच्या हमीपत्रावर व घोषणा पत्रावर नोटरी करून घेयची आहे ते सुद्धा त्या pdf मध्ये मिळवून जाईल. 
  • नंतर undertaking घोषणा करून आवश्यक असलेले कागदपत्रे व DPR जोडणे. 
  • त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामधील मस्त्यव्यवसाय विभागामध्ये जाऊन जमा करणे. 
  • विभागातील अधिकाऱ्याकडून तुम्हाला पावती दिली जाईल. 
  • त्यानंतर अधिकाऱ्याकडून तपासणी करून तुम्ही लाभार्थी असाल तर लाभ दिले जाते. 

निष्कर्ष 

आम्ही या लेखातून PM Matsya Sampada Yojana (PMMSY) बद्दल संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीमध्ये मार्गदर्शन केले. यामध्ये योजनाचे महत्त्व, ती कधी सुरु करण्यात आली? कोणी सुरु केली? त्यांचे उद्देश, त्यांचे फायदे, लाभार्थ्यांची यादी, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रकिया अशा सर्व गोष्टींबद्दल सांगितले. 

तुम्हाला सुद्धा मस्त्य व्यवसायामध्ये रुची असल्यास तुम्ही केंद्र सरकारच्या या योजनेतून अर्ज करून फायदा घेऊ शकता. आमचा आर्टिकल तुम्हाला आवडला असेल तर गरजू लोकांना पाठवून त्यांची मदत करा. 

FAQs

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कधी सुरू झाली?

या योजनेची सुरुवात वर्ष 10 सप्टेंबर, 2020 रोजी झाली होती. 

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेसाठी मासेमारी क्षेत्रात काम करत असलेले नागरिक पात्र आहेत.

भारतात मत्स्यपालनासाठी सबसिडी किती आहे?

भारतामध्ये मत्स्यपालनासाठी 40% सामान्य नागरिकांना व SC/ST?महिला वर्गाना 60% सबसिडी दिली जाते.

पुढे वाचा: