PM Matru Vandana Yojana (PMMVY) 2024: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत गर्भवती स्त्रियांना 5000 रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारतर्फे दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशामधील गरिबीमध्ये असलेल्या गर्भवती महिलांना आर्थिक स्वरूपात रक्कम बँक खात्यामध्ये पाठविली जाते.
गर्भवती स्त्रियांना योग्यरित्या या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने महिला व बाल विकास विभाग कार्यालयाकडे हे काम सोपवले आहे. गरीब वर्गातील काही महिला मजदुरी करून आपले पालनपोषण करते, त्यांना गर्भावस्थामध्ये सुद्धा काम करावे लागते. अशा महिलांना PMMVY Scheme च्या माध्यमातून योग्य आराम व आर्थिक स्थिरता मिळण्यात मदत होईल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये गर्भवती महिलांना अर्ज करून लाभ मिळवण्यासाठी आमचा हा लेख शेवटपर्यंत संपूर्ण वाचावा लागेल. यामध्ये आम्ही ही योजना काय आहे? त्यांचे उद्देश, फायदे, पात्रता, लागणारे कागदपत्रे, ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज प्रकिया याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.
PM Matru Vandana Yojana in Marathi
केंद्र सरकारने सुरु केलेल्या PMMVY चा अर्थ प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आहे. ही योजना मिशन शक्तीचा एक घटक असून गरोदर महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने 1 जानेवारी 2022 रोजी याची घोषणा केली.
या योजनेच्या माध्यमातून गरीब व उपासमार महिलांच्या बाळाच्या जन्मापूर्वी व जन्मानंतर त्यांना आराम मिळवा यासाठी आर्थिक स्वरूपात 5000 रुपयांची मदत दिली जाते. यातून एक गरोदर महिला आपल्या पहिल्या बाळंतपणाला 5 हजार रुपये तर दुसऱ्या बाळंतपणाला 6 हजार रुपये प्राप्त करू शकते. ही आर्थिक मदत महिलांच्या बँक खात्यामध्ये Direct Bank Benefit Transfer (DBT) द्वारे पोर्टलवरून ट्रान्सफर केली जाते.
PMMVY 2024 Overview
योजनाचे नाव | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु कोणी केली | केंद्र सरकारने |
कधी सुरु केली | 1 जानेवारी, 2022 रोजी |
विभाग | महिला व बाल विकास मंत्रालय |
उद्देश | गरोदर महिलांना आर्थिक मदत |
लाभार्थी | गरोदर महिला |
लाभ | 5,000 रुपये |
अर्ज पद्धती | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | pmmvy.wcd.go.in |
PM Matru Vandana Scheme Aim
भारत सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री वंदना योजनाचे मुख्य उद्देश गरीबीतील महिलांना गरोदरपणामध्ये विश्रांती आणि आर्थिक मदत पुरवणे. जेणेकरून बाळंतपणा दरम्यान त्यांना होणारा मानसिक ताण कमी होण्यात मदत होईल. तसेच मजदूर वर्गातील स्त्रियांना या मदतीमुळे घरी राहून आराम करण्यासाठी तसेच आर्थिक स्वरूपात पालनपोषण करण्यात मदत होईल.
Pradhan Mantri Matru Vandana Yojana Benefits
- केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाचा फायदा गर्भवती महिलांना आर्थिक स्वरूपात होणार.
- या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे 5000 रुपये पाठविले जाणार.
- हे पाच हजार रुपये 3 हफ्त्यांच्या स्वरूपात महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातात.
- जेव्हा महिला गर्भवती होते तेव्हा 1000 रुपये, महिलेला 6 महिने झाल्यावर 2000 रुपये आणि बाळाच्या जन्मावेळी 2000 रुपये असे तीन टप्प्यात दिले जाते.
- या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे मजदुरी करणाऱ्या गरोदर महिलांना आराम करण्यासाठी आणि आपले आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होईल.
- त्याचप्रमाणे दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी सुद्धा 6000 रुपयांच्या स्वरूपात आर्थिक लाभ सरकारकडून देण्यात येतो.
PM Matru Vandana Scheme Eligibility
गर्भवर्ती महिलांना अर्ज करून लाभ मिळवण्यासाठी खालील दिलेल्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनासाठी पात्रता असणे आवश्यक आहे.
- या योजनेमध्ये सहभागी होऊन अर्ज करण्यासाठी महिला भारतातील स्थानिक रहिवासी असणे.
- जी महिला या योजनेत अर्ज करून लाभ घेण्यासाठी इच्छुक आहे तिचे वय 19 वर्षापेक्षा जास्त असणे.
- यामध्ये फक्त गरोदर महिला व बाळाच्या जन्मानंतर दूध पाजणारी महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात.
- तसेच ज्या महिलांनी यामध्ये पहिल्या बाळंतपणासाठी लाभ घेतला आहे ते दुसऱ्या बाळंतपणासाठी ही लाभ घेऊ शकतात.
- ज्या महिलांना यामध्ये अर्ज करून आर्थिक लाभ मिळवायचा आहे, त्यांचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
PM Matru Vandana Yojana Documents
महिलांना अर्ज करताना खालील दिलेल्या यादीनुसार प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे आवश्यक कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहेत.
- महिलेचे व पतीचे आधारकार्ड
- पॅनकार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुकचे पहिले पान
- मातृ शिशु सुरक्षा कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- रहिवासी दाखला
PM Matru Vandana Yojana Online Apply
महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्र यामध्ये जाऊन गरोदर असल्याची नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर महिला या खाली दिलेल्या ऑनलाइन प्रक्रियानुसार माहिती जाणून अर्ज करून लाभ मिळवू शकतात.
- सर्वात प्रथम महिलेला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे.
- वेबसाइट उघडून झाल्यावर तुम्हाला Citizen Login हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे.
- त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर विचारतील तो टाकून घ्या.
- मोबाईल नंबर टाकून झाल्यावर Verify बटनावर क्लिक करा.
- व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्या समोर PMMVY Application Form उघडेल.
- रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये विचारली गेलेली माहिती योग्यरित्या संपूर्ण भरून घेणे.
- फॉर्म भरून झाल्यावर आवश्यक असणारी कागदपत्रे एक एक करून अपलोड करून घेणे.
- फॉर्म आणि कागदपत्रे पुढे पाठविण्याआधी संपूर्ण तपासणी करून घेणे.
- तपासणी पूर्ण झाल्यानंतर Submit बटनावर क्लिक करणे.
- एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त होईल तो सांभाळून ठेवणे.
- त्यानंतर नेमलेल्या कार्यालयाकडून तुमच्या कागदपत्रांची तपासणी होईल.
- तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आर्थिक स्वरूपात मिळणारी रक्कम डीबीटीद्वारे पाठविली जाईल.
- अशा प्रकारे तुमचे ऑनलाईन अर्ज प्रकिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे.
PMMVY Scheme Offline Registration
जर कोणत्या महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी समस्या येत असतील, तर ते प्रधानमंत्री मातृ वंदना योजनामध्ये ऑफलाइन अर्ज करून लाभ मिळवू शकतात. फक्त अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागेल.
- गरोदर महिलांना सर्वातआधी जवळच्या आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर त्याच केंद्रामधून तुम्ही ऑफलाईन अर्जासाठी PMMVY Registration फॉर्म प्राप्त करून घेणे.
- नंतर फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे एकूण एक माहिती लक्षपूर्वक पूर्ण भरून घेणे.
- फॉर्म भरून झाल्यावर त्यामध्ये लागणारे कागदपत्रे प्रिंट करून त्यासोबत जोडून घेणे.
- त्यानंतर फॉर्म व कागदपत्रे घेऊन आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करणे.
- त्यानंतर त्याच्या नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून पाहणी होईल.
- तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला आर्थिक लाभ तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील.
- अशा प्रकारे ऑफलाइन अर्ज प्रकिया संपन्न झाली.
PM Matru Vandana Yojana Form Download
तुम्ही ऑफलाइन पद्धतीने आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन फॉर्म प्राप्त करू शकता. तुमचा वेळ वाचण्यासाठी आमच्या ऑफिशिअल चॅनेलमध्ये जाऊन फॉर्म डाउनलोड करू शकता. महिलांना ऑफलाइन अर्ज करण्यासाठी लागणारा प्रधानमंत्री मातृ वंदना योजना फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आमच्या Telegram चॅनेलवर जाऊन फॉर्म डाउनलोड करू शकता. त्यामध्ये फक्त तुम्हाला चॅनेल जॉईन करून फाइल्समध्ये गेल्यावर फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि नंतर प्रिंट करून घ्या.
PMMVY Beneficiary List Check
- सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जायचे आहे.
- त्यानंतर होम पेजवरील Citizen login वर क्लिक करा.
- लॉगिन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुमचे एप्लिकेशन आयडी, आधारकार्ड नंबर आणि मोबाईल नंबर लागेल.
- तुम्ही लॉगिन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण भरलेली माहिती अशाप्रकारे दिसेल (Name of the applicant, permanent address, contact details, District/village, amount to be funded आणि bank details)
- तुमची सगळी माहिती व्यवस्थित आहे की नाही ते तपासणे.
- सबमिट बटनावर क्लिक करून उजव्या बाजूच्या तीन डॉट्सवर क्लिक करणे.
- त्यानंतर तुम्हाला यादी दिसेल त्यामधील reports किंवा annual reports सिलेक्ट करणे.
- रिपोर्ट उघडल्यानंतर तुमच्या समोर योजनेची यादी उघडून येईल.
- ती डाउनलोड करून तुमचे नाव तपासणे.
- अशा तऱ्हेने तुम्ही लाभार्थी यादी प्राप्त करू शकता.
निष्कर्ष
आम्ही या लेखामधून तुम्हाला PMMVY म्हणजेच PM Matru Vandana Yojana याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली. यामध्ये आम्ही तुम्हाला गर्भवर्ती महिलांसाठी ही योजना कशी मदतगार ठरू शकते? त्याच सोबत त्यांचे फायदे कसे घेऊ शकतात? केंद्र सरकारने ही योजना का सुरु केली? कधी सुरु केली? कशासाठी सुरु केली? यामागचा उद्देश काय होता? यामध्ये कोणते मंत्रालय कार्य बघते आहे? यामधून स्त्रियांना किती लाभ होणार? यासाठी पात्रता काय असणार? तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात? कशाप्रकारे अर्ज करून लाभ घेऊ शकता? यासाठी official Website कोणती आहे? याबद्दल सविस्तररित्या मार्गदर्शन केले.
तुम्ही सुद्धा एक गरोदर बाई असाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी इतर गरोदर असेल तर आम्ही दिलेल्या माहितीनुसार या योजनामध्ये अर्ज करून लाभ मिळवू शकता. तसेच तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल, तर तुमच्या ओळखीतील गरोदर महिलांनासुद्धा पाठवून त्यांना आर्थिक लाभ घेण्यास मदत करा.
अशाच महिलां संदर्भात आणि फायदेशीर योजनांसाठी आम्हाला subscribe करू शकता किंवा आमच्या Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करून नवनवीन अपडेट्स मिळवू शकता.
FAQs
PMMVY योजनेच्या पात्रतेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेच्या पात्रतेसाठी भारतातील गर्भवती महिला पात्र आहेत.
pmmvy कडून 5000 कसे मिळवायचे?
यामधून 5000 मिळवण्यासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाइन अर्ज करून मिळवू शकता.
गरोदर महिलांना 6000 रुपये कसे मिळणार?
गरोदर महिलेने मातृत्व वंदना योजना अंतर्गत दुसऱ्या बाळंतपणासाठी अर्ज करून 6000 रुपये मिळवू शकतात.
गर्भवती महिलांसाठी कोणत्या योजना आहेत?
गर्भवती महिलांसाठी भारतामध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आहे.
इतर योजनांच्या माहितीसाठी हे वाचा.