PM Kisan Yojana Registration 2024: पीएम किसान नोंदणी कशी करावी? जाणून घ्या अर्ज प्रकिया

PM Kisan Yojana Registration 2024: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पीएम किसान योजना नोंदणी ऑनलाइन सुरु केली. जेणेकरून देशभरातील शेतकरी वर्ग घरी बसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून आर्थिक लाभ मिळवू शकतात.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आज ही भारत देशामधील काही शेतकरी नागरिक आहेत, ज्यांना PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत लाभ मिळालेला नाही. अशा नागरिकाना योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत सहजरित्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी ऑनलाइन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

त्या PM Kisan योजनामध्ये कशा प्रकारे अर्ज करू शकतो? व अर्ज करताना त्यामध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती लागणार? आणि अर्ज केल्यानंतर रजिस्ट्रेशनची स्थिती कशी पाहायची? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखाच्या माध्यमातून सविस्तर दिलेले आहे. 

PM Kisan Yojana Details 2024

योजनेचे संपूर्ण नावप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
स्कीमकेंद्र सरकारी योजना
प्रकारसेंट्रल सेक्टर स्कीम
स्थापना कधी झाली24 फेब्रुवारी, 2019 मध्ये
स्थापना कोणी केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
डिपार्टमेंटकृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार
मुख्य उद्देशदेशामधील सर्व शेतकरी वर्गातील नागरिकांना आर्थिक मदत करणे
पात्रशेतकरी कुटुंब
फायदाशेतकऱ्यांना 6000 रुपये लाभ
अर्ज करायची प्रकियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटpmkisan.gov.in

PM Kisan Yojana काय आहे? 

पीएम किसान योजना ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, ज्याची सुरुवात केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी केली होती. देशभरातील शेतकरी वर्गातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेली कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय योजनेची अंमलबजावणी करण्याचे कार्य करते. 

PM Kisan Scheme अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वर्षाला 6000 रुपये ट्रान्स्फर केले जाते. केंद्र शासनातर्फे वर्षातून 3 हफ्त्यांच्या स्वरुपात दर चार महिन्यांनी 2000 रुपये निधी शेतकऱ्यांच्या बँकेत Direct Benefit Transfer (DBT) द्वारे जमा करण्यात येते. 

भारत देशामधील जवळपास 11 कोटींपेक्षा जास्त शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत 2.81 लाख कोटी रुपये डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून केंद्र शासनातर्फे पाठविण्यात आलेले आहेत. तसेच योजना सुरु केल्यानंतर आतापर्यंत 17 PM Kisan Installments देण्यात आले.

PM Kisan Yojana साठी आवश्यक कागदपत्रे कोणती? 

शेतकरी वर्गातील नागरिकांना अर्ज करण्यासाठी पीएम किसान योजनाची कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची यादी क्रमानुसार खाली देण्यात आलेली आहेत. 

  • तुमचे बँक खात्यासोबत लिंक असलेले आधारकार्ड 
  • तुमच्या शेत जमिनीचे सर्व कागदपत्रे 
  • तुमच्या बँक खात्याचे कागदपत्रे (पासबुक) 
  • आधारकार्डसोबत जोडलेला तुमचा मोबाईल नंबर 
  • उघडलेले ई-मेल आयडी 

PM Kisan Yojana Registration कसे करावे? 

तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला पीएम किसान योजनामध्ये अर्ज करून लाभ घ्यायचे असेल तर खालीलपैकी स्टेपनुसार प्रकिया करा व आर्थिक मदतीचे लाभ घ्या. 

Step No-1: PM Kisan Yojana Official Website उघडणे

  • सुरुवातीला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पीएम किसान योजनाच्या अधिकृत वेबसाइटला उघडायचे आहे. 
  • वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्या समोर डॅशबोर्ड ओपन होईल. 
  • त्या डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला New Farmer Registration Form हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म मिळेल, त्यामध्ये सुरुवातीला Rural Farmer Registration व Urban Farmer Registration असे दोन पर्याय दिसतील. 
  • जर तुम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असाल, तर Rural चा ऑपशन निवडा आणि जर शहरी भागातील असतील, तर Urban चा पर्याय निवडा. 
  • पूढे आधारकार्ड व मोबाईल नंबरचा बॉक्स मिळेल ते भरून घेणे. 
  • त्यानंतर तुम्ही कोणत्या राज्यात राहतात, त्याची निवड करा. 
  • त्यामध्ये कॅप्चा कोड दिलेला असेल ते वाचून कोड भरून घ्या. 
  • नंतर गेट ओटीपीवर क्लिक करून तुम्ही दिलेल्या मोबाईलवर नंबर येईल. 
  • तो ओटीपी नंबर बॉक्समध्ये भरून Submit च्या बटनावर क्लिक करा. 
  • पुढे तुमच्या आधारकार्ड सोबत जोडलेल्या मोबाईल नंबरवर सुद्धा ओटीपी येईल तो टाकून व्हेरिफाय करून घ्या. 

Step No-2: पीएम किसान योजनाचा फॉर्म भरून घेणे 

  • ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या समोर योजनेचा अर्जाचा फॉर्म उघडून येईल. 
  • त्या फॉर्मच्या सुरवातीला तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा,उप-जिल्हा, ब्लॉक आणि तुमच्या गावाचे नाव बघून निवड करा. 
  • त्यानंतर तुमची व वैयक्तिक माहिती द्यायची आहे, ज्यामध्ये तुमचे संपूर्ण नाव व लिंग आधार नंबरच्या साहाय्याने ऑटोमॅटिकली घेतले असेल. 
  • पुढे तुम्हाला Category चा ऑपशन दिसेल, त्यामध्ये General/Others, ST व SC असे तीन पर्याय दिसतील, तुमच्यानुसार त्यापैकी एकाची निवड करा. 
  • त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचे शेतकरी आहेत? हे विचारले जातील.
  • जर तुमच्याकडे 1 ते 2 हेक्टर शेतजमीन असेल तर Small (1-2Ha) यावर क्लिक करा अथवा जास्त असेल तर Others  सिलेक्ट करा. 
  • पुढे तुमचे आधार क्रमांक, मोबाईल नंबर व तुमच्या आधारकार्ड प्रमाणे असलेला पत्ता, पिनकोड, तुमच्या वडिलांचे, आईचे किंवा पतीचे नाव हे सगळे ऑटोमॅटिकली भरले गेले असतील, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडखानी करून नये. 
  • त्यानंतर Land Registration ID विचारला जाईल, तो तुमच्याजवळ असेल, तर भरा किंवा नाही भरले तरीही चालेल. 
  • तसेच तुमचा रेशनकार्ड वरील नंबर भरून घ्या. (हे सुद्धा पर्यायी आहे) 
  • जर तुम्ही PM Kisan Mandhan Yojana अंतर्गत लाभ घेत असाल तर Yes करा, जर नसेल तर No चा पर्याय निवडा.

Step No-3: तुमच्या जमिनीचे Ownership संबंधित माहिती भरणे

  • Ownership पर्यायामध्ये Single व Joint असे दोन ऑपशन असतील. 
  • त्यामध्ये जर तुम्ही जमिनीचे मालक एकटे असाल तर Single चा पर्याय सिलेक्ट करा आणि तुमच्यासोबत आणखी कोणी असेल तर Joint वर टिकमार्क करा. 
  • त्यानंतर तुम्हाला Add च्या बटनावर क्लिक करायचे आहे. 
  • पुढे तुमचे Survey/Khata No व Dag/Khasra No भरून घेणे. 
  • तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे? त्याची हेक्टरप्रमाणे अंक द्या, तुमच्याकडे Decimal नुसार अंक असतील तर गूगलमध्ये जाऊन हेक्टरप्रमाणे Calculate करून माहिती द्या. 
  • त्यानंतर Land Transfer Status मध्ये, ज्यामध्ये तुम्ही 01-02-2019 आधी जमीन घेतली आहे की नंतर त्याची नोंद करणे. 
  • Land Transfer Details मध्ये 5-6 वेगवेगळे करणे दिलेली आहे, त्यामधील तुमच्यानुसार असणारे पर्याय निवडा. 
  • पर्याय निवडून झाल्यानंतर तुम्ही जमीन केव्हा vesting करण्यात आली, त्याचे दिनांक भरून घ्या. 
  • तुमच्या जवळ Patta No/RFA नंबर असेल तर Yes क्लिक करा, नसल्यास नो वर टिक करा. 
  • जमिनी संबंधित संपूर्ण माहिती भरून झाल्यावर Add च्या बटनावर क्लिक करा. काही चूक झाली असल्यास त्याचे तक्ता दिसेल, ते डिलीट करून पुन्हा माहिती भरू शकता. 

Step No-4: पीएम किसान योजनासाठी लागणारी कागदपत्रे अपलोड करा 

  • यामध्ये तुम्हाला Supporting Documents चा ऑपशन दिसेल, त्यामध्ये 200 KB च्या खालील साईजचे pdf स्कॅन करून अपलोड करावे लागतील. 
  • PM Kisan Yojana Documents मध्ये आधारकार्ड, बँक पासबुक व तुमच्या जमिनी संबंधित असलेले कागदपत्रे individual स्कॅन करून अपलोड करून Save बटन दाबा. 
  • जसे तुम्ही सेव्ह करून फॉर्म सबमिट कराल, तेव्हा तुमचे अर्जाचे फॉर्म यशस्वीपणे पूर्ण होईल आणि तुम्हाला Farmer Id नंबर मिळेल तो योग्य ठिकाणी नोंद करून घेणे.
  • अर्ज पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागातर्फे तुमचे अर्ज तपासले जातील व त्यानुसार तुमचे स्टेटस पोर्टलवर सादर करण्यात येईल. 

Step No-5: PM Kisan Yojana Status तपासणे 

  • अर्ज पूर्ण झाल्यानंतर पीएम किसान योजनाची स्थिती पाहण्यासाठी वेबसाइटच्या पोर्टलमध्ये यावे लागेल. 
  • पोर्टलमध्ये आल्यानंतर तुम्हाला Status of Sell Registration Farmer/CSC Farmer या ऑपशनवर क्लिक करायचे आहे. 
  • त्यानंतर तुमचे आधार नंबर व कॅप्चा कोड भरून Search या बटनावर क्लिक करायचे. 
  • सर्च केल्यानंतर तुमच्या समोर Farmer Application Status चा तक्ता उघडून येईल. 
  • त्यामध्ये तुमची जे काही स्टेटस असेल ते पाहायला मिळेल. 

पीएम किसान लाभार्थी म्हणजे काय? 

PM Kisan Beneficiary  म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ज्यांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहेत. त्यानंतर केंद्र शासनेच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाकडून Beneficiary List पोर्टलमध्ये प्रकाशित केली जाते, त्यामध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची नावे Beneficiary List मध्ये येतात. ते योजने अंतर्गत लाभार्थी असतात आणि त्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत बँक खात्यामध्ये 2000 रुपयांच्या प्रमाणे Installments स्वरूपात पाठवण्यात येते. 

निष्कर्ष 

अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला PM Kisan Yojana Registration संबंधित संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप दिली. तसेच योजना काय आहे? त्यांची संपूर्ण माहिती, त्यासाठी उघडण्यात आलेले पोर्टल, किती रुपयांची आर्थिक मदत दिली जाते? तसेच नोंदणी करण्यासाठी महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे आणि अर्ज केल्यानंतर स्टेट्स पाहण्याची प्रकिया या संदर्भात सविस्तररित्या माहिती देण्यात आली. 

तुम्ही सुद्धा पीएम किसान अंतर्गत अर्ज करून लाभ घेतला नसेल तर लगेच आमच्या लेखामधील माहिती पाहून रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि मिळवा केंद्र सरकारकडून आर्थिक मदत.

FAQs

पी एम किसान रजिस्ट्रेशन कसे करायचे?

पी एम किसान रजिस्ट्रेशन pmkisan च्या अधिकृत वेबसाइटमध्ये जाऊन करायचा. 

पीएम किसान योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

पीएम किसान योजनेचा लाभ वर्षातून 3 हफ्त्यांच्या स्वरूपात बँक खात्यामध्ये थेट डीबीटीमार्फत रक्कम पाठवली जाते. 

पीएम किसान सन्मान निधीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पीएम किसान सन्मान निधीसाठी तुमचे आधारकार्ड, बँक पासबुक आणि तुमच्या जमीचे कागदपत्रे आवश्यक आहेत.