PM Kisan Sampada Yojana Benefits: आपल्या आर्टिकलमध्ये प्रधानमंत्री किसान संपदा योजना काय आहे? आणि त्यामध्ये कोणकोणते फायदे आहेत? याबद्दल सविस्तर माहिती पाहायला मिळेल.
ही योजना भारतामधील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढ होण्यास मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केले आहे. ज्याचे मुख्य उद्देश देशभरामध्ये अन्नाची नासाडी थांबविणे आणि अन्न प्रकियेला चालना देऊन त्यांचा विकास करणे आहे.
आता या योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? त्याचप्रमाणे फूड क्षेत्रामध्ये देखील कोणते फायदे होतात? आणि योजनाची संपूर्ण माहिती आर्टिकलच्या माध्यमातून पाहणार आहोत, तर शेवटपर्यंत लेख वाचा.
किसान संपदा योजनाची माहिती
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 रोजी किसान संपदा योजनाची सुरवात केली होती. SAMPADA चा फुल फॉर्म हा Scheme for Agro-Marine Processing and Development of Agro-Processing Clusters आहे.
या योजनेच्या माध्यमातून भारत देशमधील कृषी संबंधित कामे होणाऱ्या ठिकाणी छोटे छोटे फूड पार्क तयार केले जाते. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून पिकवलेले फूड घेतले जाते आणि त्याच्या योग्यरित्या अन्न प्रकिया करून उत्पादन वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
किसान संपदा योजनाचे फायदे
- या योजनेच्या माध्यमातून मेगा फूड पार्क तयार केले जाते.
- त्याचप्रमाणे शेतकरी व पार्कसोबत चैन तयार करून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
- योजना अंतर्गत फूड प्रकिया आणि त्याची संरक्षण क्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येते.
- कृषी संबंधित पिकांची प्रकिया करण्यासाठी पायाभूत सुविधा योजना अंतर्गत तयार करतात.
- शेतकऱ्यांसोबत त्या क्षेत्रामधील नागरिकाने रोजगार मिळण्यास मदत होते.
- आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित अन्न आणि त्यांच्या गुणवत्तेवर भर देण्यात येते.
- केंद्र सरकारतर्फे अन्न प्रकिया करण्यासाठी हव्या असणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी 50 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
- या योजनेची केंद्र शासनाने एकूण 4,600 कोटी रुपये आर्थिक बजेट घोषित केले आहे.
Read More: