PM Kaushal Vikas Yojana 2024: भारतचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशामधील बेरोजगार युवकांसाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना सुरु केली आहे. या योजनाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना निरनिराळ्या क्षेत्रामधील मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याचसोबत तरुणांना योजनेतर्फे मिळणारी प्रशिक्षण प्राप्त करताना दरमहा ८००० रुपयेचा आर्थिक लाभ सुद्धा देण्यात देते. जेणेकरून ते तरुण आपल्या योग्यतानुसार रोजगार प्राप्त करून देशामधील विकासासाठी हातभार लावण्यास मदत करेल.
या योजनेच्या माध्यमातून ज्या बेरोजगारांना कोणत्याही प्रकारचे कौशल्य नाही, त्यांना यामधून विविध प्रकारे कौशल्य शिकून ज्ञान प्राप्त करू शकतात. देशामधील तरुणांचे रोजगार वाढून देशाचा विकास होण्यासाठी ही PMKVY योजना महत्त्वपूर्ण आहे. देशामधील प्रत्येक राज्यमध्ये बेरोजगार चांगल्या नोकरीसाठी भटकत आहेत. त्यामध्ये त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच नोकरी नसल्यामुळे कुटुंबाला आर्थिक स्वरूपात मदत करू शकत नाही. अश्या बेरोजगार लोकांना या योजनाचा फायदा चांगल्याप्रकारे घेता येईल.
PMKVY training मध्ये विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते, यामध्ये लाभार्थी चांगले शिक्षण प्राप्त करून चांगले रोजगारसुद्धा कमवत आहेत. जर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत अर्ज करून लाभ घेण्याचा विचार करत आहात, तर आम्ही दिलेल्या लेखातून संपूर्ण माहिती शेवटपर्यंत जाणून घ्या आणि लाभ मिळवा. यामध्ये आम्ही योजनाचे उद्देश, फायदे, पात्रता, कोर्सेसची यादी,आवश्यक कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन प्रकिया याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली आहे.
PM Kaushal Vikas Yojana in Marathi
केंद्र सरकारने PMKVY म्हणजेच प्रधानमंत्री कौशल विकास योजना याची सुरुवात 16 जुलै 2015 रोजी केली. या योजनाचे सुरु करण्यामागचे उद्दिष्ट्ये देशामधील बेरोजगार वर्गातील तरुणांना Short Term Training (STT) आणि Recognition of Prior Learning (RPL) द्वारे प्रशिक्षण देणे.
भारत देशामधील बेरोजगार तरुणांनासाठी या योजनेच्या माध्यमातून ४० पेक्षा जास्त ट्रेनिंग कोर्सेस तयार केले आहेत. यामध्ये बेरोजगार तरुण ४० ट्रेनिंग कोर्सेसमधून कोणत्यातरी एका कोर्सची निवड करून प्रशिक्षण घेऊ शकतो आणि त्याच क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करून आपले रोजगार निर्माण करू शकतो. तसेच प्रशिक्षण दरम्यान योजनातर्फे आर्थिक स्वरूपात 8000 रुपये दरमहा दिले
जाते. जेणेकरून प्रशिक्षण घेता, वेळेस आर्थिक अस्थिरता आणि दैनंदिन खर्च करण्यास समस्या न येता शिक्षणावर लक्ष केंद्रित राहील. केंद्र सरकारतर्फे लाभार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते.
PM Kaushal Vikas Yojana 4.0
केंद्र सरकारने २०१५ ला सुरु केलेल्या प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे म्हणजेच PMKVY चे तीन टप्पे पूर्ण झालेले आहेत. यामध्ये Press Release Frame Page (PIB) च्यासांगण्यानुसार PMKVY 1.0 मध्ये १९ लाख उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले, त्यासोबत PMKVY 2.0 मार्फत १ कोटी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण प्राप्त केले आणि PMKVY 3.0 च्या माध्यमातून ८ लाखाहून अधिक तरुणांनी आपले प्रशिक्षण प्राप्त केले. सरकारतर्फे आता PMKVY 4.0 सुद्धा सुरु करण्यात येणार आहेत, त्यामधून अजून अपडेटेड कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना केंद्र सरकारने |
सुरु कोणी केली | केंद्र सरकारने |
कधी सुरु झाली | 16 जुलै 2015 रोजी |
विभाग | Ministry of Skill Development and Entrepreneurship (MSDE) |
उद्देश | बेरोजगार वर्गातील तरुणांना प्रशिक्षण देणे व आर्थिक मदत करणे |
लाभार्थी | देशामधील बेरोजगार तरुण |
लाभ | प्रशिक्षण व दरमहा ८ हजार रुपये |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाइट | pmkvyofficial.org |
PM Kaushal Vikas Yojana Aim
भारत सरकारने चालू केलेल्या प्रधानमंत्री कौशल विकास योजनाचे उद्देश देशामधील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन प्रत्येक राज्यामध्ये आर्थिक स्थिरता आणणे आणि रोजगार निर्माण होणे. या योजनामध्ये केंद्र सरकारने ४० पेक्षा जास्त क्षेत्रामधील कोर्स प्रदान केले आहेत, जेणेकरून बेरोजगार युवकांना आपल्या इच्छेनुसार क्षेत्र निवडून प्रशिक्षण घेऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण करून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात.
त्याचसोबत बेरोजगार तरुण आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करून आपले भविष्य उज्ज्वल करू शकतात. केंद्र सरकारने बेरोजगारी कमी होण्यासाठी तसेच राष्ट्राचा विकास वाढण्यासाठी युवकांना मोफत प्रशिक्षण सोबत आर्थिक मदतही केली जाते. यातून चांगली नोकरी मिळून रोजगार प्राप्त करतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधार येण्यात मदत होईल.
PM Kaushal Vikas Yojana Important Keys
- सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री कौशल विकास योजनाची देखरेख कौशल विकास व उद्योजकता मंत्रालय अंतर्गत होत आहे.
- या योजनेच्या माध्यमातून देशामधील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाते.
- यामध्ये तरुणांना Short Term Training (STT) आणि Recognition of Prior Learning (RPL) प्रशिक्षण दिले जाते.
- लाभार्थी विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण घेण्याचा कालावधी १५० ते ३०० तासांचं असतो.
- या योजने अंतर्गत लाभार्थी विद्यार्थांना २ लाखाचा अपघात विमा सुद्धा दिला जातो.
- लाभार्थीचे कोणत्याही कारणामुळे अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यास पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो.
PM Kaushal Vikas Yojana Benefits
- प्रधानमंत्री कौशल विकास योजनाचे फायदे देशामधील बेरोजगार तरुणांना आर्थिक स्वरूपात मदत घेता येते.
- केंद्र सरकारने सुरु केलेली योजना ही एक महत्त्वाची व कल्याणकारी तसेच विकासशील उपक्रम आहे, जेणेकरून भारतातील युवा पिढी सक्षम होण्यात मदत होते.
- या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार वर्गाला मोफत प्रशिक्षण दिले जाते.
- त्याचसोबत तरुणांना प्रशिक्षण घेत प्रत्येक महिन्याला ८००० रुपये आर्थिक मदत दिली जाते.
- बेरोजगार तरुणांना मिळणारी रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट direct Benefit Transfer (DBT) द्वारे ट्रान्सफर केले जाते.
- या योजनेमध्ये तरुणांसाठी ४० हुन अधिक निरनिराळ्या क्षेत्रामधील कोर्सेस प्रदान केले आहेत.
- या योजनाची विशेष गोष्ट म्हणजे लाभार्थी तरुण स्वतःच्या इच्छेनुसार क्षेत्र निवडून प्रशिक्षण घेऊ शकतो.
- जे लाभार्थी या योजनेतून प्रशिक्षण पूर्ण करतील त्यांना सरकार सर्टिफिकेट सुद्धा देते.
- सरकार तर्फे मिळालेल्या प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रच्या मदतीने बेरोजगार तरुण चांगली नोकरी प्राप्त करू शकतो.
- लाभार्थी विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून टी-शर्ट, जॅकेट, डायरी, बॅग आणि आयडी कार्डसुद्धा दिले जातात.
- सरकारने सुरु केलेल्या या रुपक्रमामुळे देशामधील गरीब वर्गातील तरुणांना चांगले लाभ मिळतील.
PM Kaushal Vikas Yojana Courses List
- फर्निचर व फिटिंग
- अन्न प्रकिया उद्योग
- इलेकट्रॉनिकस
- बांधकाम
- गुड्स व कॅपिटल
- विमा, बँकिंग व वित्त
- सौंदर्य व निरोगीपणा
- ऑटोमोटिव्ह
- पोशाख
- रिटेल
- ऊर्जा उद्योग
- प्लम्बिंग
- खाण
- मीडिया व मनोरंजन
- लॉजिस्टिक
- जीवन विज्ञान
- लेदर
- आयडी
- अपंग व्यक्तीसाठी कौशल्य परिषद
- हॉस्पिटॅलिटी व टुरिझम
- टेक्सटाईल
- टेलिकॉम
- सुरक्षा सेवा
- रबर
- लोह आणि स्टील कोर्स
- रोल-प्लेइंग कार्स
- आरोग्य सेवा कोर्स
- ग्रीन जॉब
- जेम्स व ज्वेलरी
PM Kaushal Vikas Yojana Eligibility
- प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमध्ये पात्र होण्यासाठी अर्जदारांना देशाचे स्थानिक नागरिक असणे आवश्यक आहे.
- ही योजना फक्त देशातील बेरोजगार वर्गातील तरुणांसाठीच आहे.
- यामध्ये अर्ज करणारे बेरोजगार तरुण कमीत कमी १०वी किंवा १२वी पास असणे.
- बेरोजगार तरुणांना हिंदी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.
- बेरोजगार वर्गातील तरुणांचा उत्पनाचा कोणताही स्रोत नसला पाहिजे.
PM Kaushal Vikas Yojana Required Documents
बेरोजगार विद्यार्थ्यांना या उपक्रमांत सहभागी होऊन लाभ घेण्यासाठी खालील दिलेले प्रधानमंत्री कौशल विकास योजनासाठी आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहेत.
- अर्जदाराचे आधारकार्ड (बँक लिंक असणे)
- पॅनकार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- बँक पासबुकचे पहिले पान
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- दहावी किंवा बारावीचे मार्कशीट
- ओळखपत्र
- आयडी कार्ड
- वोटर आयडी
- रहिवासी प्रमाणपत्र
PM Kaushal Vikas Yojana Registration
बेरोजगार तरुणांना प्रधानमंत्री कौशल विकास योजनामध्ये रजिस्ट्रेशन करून लाभ मिळविण्यासाठी खालील दिलेल्या अर्ज प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम PMKVY ची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल, त्यामधील स्किल इंडिया या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल, त्यामधील Register as a candidate या पर्यायावर क्लिक करणे.
- त्या पर्यायामध्ये गेल्यानंतर रजिस्टर फॉर्म तुमच्या समोर उघडेल.
- त्या फॉर्ममध्ये तुमचे बेसिक माहिती विचारलेली असेल ती लक्षपूर्वक भरून घ्या.
- त्याचसोबत तुमचे कागदपत्रे अपलोड करून घेणे.
- फॉर्म आणि कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करून लॉगिन करून घेणे.
- अशाप्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन तुमची नाव नोंदणी झालेली आहे.
- त्यानंतर तुमच्या निवडीनुसार तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाइन कोर्स दिले जातील.
- कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही योजनेच्या पोर्टलवर जाऊन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता.
निष्कर्ष
अशाप्रकारे आम्ही तुम्हाला PM Kaushal Vikas Yojana (PMKVY) याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली. यामध्ये आम्ही योजनेचे महत्त्व काय आहेत? ते का सुरु करण्यात आले? कोणातर्फे सुरु करण्यात आले? कोणत्या उद्देशाने सुरु करण्यात आले? त्याचे फायदे काय आहेत? यामध्ये कोण लाभ घेऊ शकतो? काय लाभ मिळणार? अर्ज करण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत? त्याचप्रमाणे कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत? अर्ज करण्यासाठी काय करायला लागेल? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही सोप्या पद्धतीने सांगितली.
आपल्या देशातील बेरोजगारांना या योजनेचा चांगला लाभ घेता येईल आणि जे तरुण यामध्ये सहभागी होऊन लाभ मिळविण्यास इच्छुक आहेत, त्यांनी आमच्या दिलेल्या लेखातील माहितीनुसार अर्ज करून लाभ प्राप्त करू शकतात.
तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा पाठवून त्यांना प्रशिक्षण घेण्यास मदत करू शकता.
अशाच उपयुक्त आणि फायदेशीर योजनांसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करा किंवा आमच्या Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करा. जेणेकरून नवीन नवीन अपडेस्टस तुम्हाला येतील.
FAQs
PMKVY महत्वाचे का आहे?
या योजनेच्या मार्फत देशामधील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण मिळून रोजगार निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
PMKVY पैसे पुरवते का?
होय, योजनेच्या मार्फत प्रशिक्षण घेत दरमहा ८००० रुपये रक्कम पुरवली जाते.
PMKVY साठी किमान पात्रता काय आहे?
यासाठी किमान तरुण बेरोजगार असून त्याचे शिक्षण १० वी व १२ वी पास असणे.
पुढे वाचा: