PM Jeevan Jyoti Bima Yojana: फक्त 436 रुपये भरा, 2 लाखांचा जीवन विमा मिळवा

PM Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY): केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना देशामधील नागरिकांना आपल्या कुटुंबासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून अर्ज करण्याऱ्या नागरिकांना विमाच्या साहाय्याने वर्षाला 2 लाख रुपये दिले जातात. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

PMJJBY ही योजना एक प्रकारे term insurance plan आहे, ज्यामध्ये मात्र वर्षाला काही रक्कम भरून दोन लाखांचा विमा कव्हर प्राप्त करू शकता. देशभरात दरवर्षी काही न काही आजार व अपघात होत असतात, यामुळे होणाऱ्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागते. यासाठी एखाद्या कुटुंबातील कमावणाऱ्या नागरिकांच्या परिवाराला आर्थिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी ही योजना मदत करते. 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर आमचा हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. यामध्ये आम्ही योजनेचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रकिया याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.

PM Jeevan Jyoti Bima Yojana in Marathi 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाची सुरुवात केंद्र सरकारने 9 मे 2015 रोजी केली होती. देशामधील गरीब वर्गातील नागरिकांसाठी विमा स्वरूपात आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. सरकारने सुरु केलेल्या या योजनेमधून नागरिकांना फक्त वर्षाला 436 रुपये भरून 2 लाखांचा विमा घेता येतो. तसेच दर महिन्याला बघायला गेलो तर फक्त 40 रुपयांच्या आसपास रक्कम भरावी लागते. जर कुटुंबातील त्या अर्जदार व्यक्तीचे निधन झाल्यास या योजनेमधून मिळणारी रक्कम त्यांच्या कुटुंबियांना डीबीटी द्वारे बँक खात्यामध्ये पाठविले जाते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना Details

योजनेचे नावप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
सुरु कोणी केलीकेंद्र सरकारने
कधी सुरु झाली9 मे 2015 रोजी
विभागआर्थिक सेवा मंत्रालय
उद्देशदेशामधील गरीब वर्गाला आर्थिक मदत पुरवणे
लाभार्थीभारत देशामधील नागरिक
लाभवर्षासाठी 2 लाखांचा विमा
अर्ज प्रकियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइटjansuraksha.gov.in

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Scheme Aim 

केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाचे मुख्य उद्देश लाभार्थी व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत प्रदान करणे. देशामधील प्रत्येक नागरिकांकडे हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यात मदत होते.  

इतर खाजगी विमाच्या तुलनेत ही PMJJBY विमा सुरक्षित आणि खिश्याला परवडणारी आहे. वर्षाला साधारण 400 ते 500 रुपये आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी घालवणे काही मोठी रक्कम नाही. तुमची ऑटोडेबिट प्रकिया चालू असेल तर ती रक्कम वर्षाला ऑटोमॅटिक वजा होऊन योजनेसाठी जमा होऊन जाईल.

PM Jeevan Jyoti Bima Yojana Benefits 

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत भारत देशामधील गरीब वर्गातील नागरिक अर्ज करून या विमाचा लाभ घेऊ शकतात. 
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नागरिकांचे वय 18 ते 55 वर्षाचे असणे गरजेचे आहे. 
  • या योजनेच्या माध्यमातून वर्षाला मिळणाऱ्या विमाची रक्कम 2 लाख रुपये आहे. 
  • गरीब वर्गातील नागरिकांना फक्त वर्षाला 436 रुपये भरून टर्म इन्शुरन्स प्राप्त करता येणार. 
  • PMJJBY मध्ये नागरिकांनी अर्ज केल्याच्या 30 दिवसानंतर लाभार्थी व्यक्तीला काही झाल्यास त्याची पूर्ण रक्कम भेटली जाणार. 
  • नागरिकांना दर वर्षी 31 मे महिन्याच्या आत योजनेचे नवीनीकरण करण्यासाठी पैसे भरण्याची संधी असते. 
  • यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे जेणेकरून योग्यरित्या या योजनेचा लाभ घेता येईल. 
  • या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्ही बँक, पोस्ट ऑफिस किंवा LIC मध्ये जाऊन अर्ज करू शकता. 
  • यामध्ये सहभागी असलेल्या सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर योजनेसंबंधित आर्थिक मदत देण्यात येणार. 
  • यामध्ये सगळ्या वर्गातील नागरिक सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात. 
  • यामधील अर्जदाराला 1 जून ते 31 मे पर्यंत असा एक वर्षाच्या कालावधीसाठी विमा मान्य केला जातो. 
  • लाभार्थी व्यक्ती यामधून कधीही बाहेर पडू शकतो आणि भविष्यात पुन्हा अर्ज करून लाभ मिळवू शकतो. 
  • अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे, जर नसल्यास नवीन बँक खाते उघडणे. 
  • खाजगी क्षेत्रामध्ये इन्शुरन्ससाठी मेडिकल चेकअप केला जातो, परंतु या योजनेच्या अंतर्गत लाभार्थीना कोणतीही मेडिकल चाचणी करावी लागत नाही. 
  • 18 ते 50 च्या वयोगटातील अर्जदाराचे वय कितीही असो सगळ्यांना प्रीमियम सारखेच द्यावे लागते. 
  • वर्षाला भराव्या लागणाऱ्या प्रीमियमसाठी ऑटो पेमेंट सिस्टिमची सुविधा असल्याकारणामुळे सोप्या पद्धतीने तुमचे प्रीमियन बँक खात्यामधून वजा केले जातील. 

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Eligibility 

या उपक्रमात अर्ज करून लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाचे पात्रता असणे आवश्यक आहे. 

  • PMJJBY योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार भारताचा स्थानिक नागरिक असणे गरजेचे आहे. 
  • या योजनेत अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 50 वर्षांपेक्षा कमी पाहिजे. 
  • या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असून त्यामध्ये ऑटोडेबिट सुविधा चालू असणे. 
  • तसेच बँक खात्यासोबत खातेदारकाचे आधारकार्ड जोडलेले असणे. 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाचे अटी व शर्ती 

  • या योजनेमध्ये सहभागी असलेला लाभार्थी फक्त वयाच्या 55 वर्षापर्यंत लाभ घेऊ शकतो. 
  • जर अर्ज करण्याऱ्या व्यक्तीचे वय 50 पेक्षा जास्त असेल तर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. 
  • जर लाभार्थीने बँक/पोस्ट ऑफिस खाते बंद केल्यास योजनासुद्धा ऑटोमॅटिकली बंद करण्यात येईल. 
  • लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये विमाची रक्कम नसल्यास विमा सुविधा बंद करण्यात येईल. 
  • या योजनासंबंधित अर्जदाराने 2 ठिकाणी अर्ज करून विमाचे फायदे घेताना आढळल्यास 2 लाख आणि प्रीमियम जप्त केले जातील. 
  • लाभार्थींना विमा सुरळीत चालू ठेवण्यासाठी दरवर्षी 30 जूनच्या आतमध्ये बँकेत जाऊन प्रीमियम भरणे गरजेचे आहे.
  • जर अर्जदाराचे एक पेक्षा जास्त बँकेमध्ये खाते असल्यास कोणत्याही एका saving account मध्ये विमासाठी अर्ज करणे. 
  • या योजना अंतर्गत भरलेल्या प्रीमियमचा maturity साठी वापर होत नाही, ही फक्त life Insurance साठीच आहे. 
  • जर एखाद्या अर्जदाराला खाते बंद करायचे असल्यास 1 जूनच्या आधी बंद करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचे नेट प्रीमियम वजा केले जातील. 

PM Jeevan Jyoti Bima Yojana Documents 

PMJJBY मध्ये अर्ज करताना लागणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे दिलेली आहे. 

  • अर्जदाराचे आधारकार्ड 
  • पॅनकार्ड 
  • मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • बँक पासबुकचे पहिले पान
  • वयाचे प्रमाणपत्र 
  • ओळखपत्र

PM Jeevan Jyoti Bima Yojana Registration  

नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही ऑनलाइन प्रकिया सरकारतर्फे चालू करण्यात आलेली नाही. परंतु जर तुम्हाला या पॉलिसीमध्ये ऑनलाइन रजिस्टर करायचे असल्यास तुम्ही ही योजना उपलब्ध असलेल्या बँकेच्या वेबसाइटवरून रजिस्टर करू शकता किंवा तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून लाभ घेऊ शकता, यासाठी खालील दिलेले प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा. 

  • सर्वात प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाच्या अधिकृत वेबसाइट मध्ये जावे लागेल. 
  • त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल. 
  • त्या होमपेजमध्ये तुम्हाला वरच्या बाजूला Form चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणे. 
  • त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 3 पर्याय दिसतील त्यामधील प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या पर्यायामध्ये जाणे 
  • तिथे तुम्हाला PMJJBY Form PDF वेगवेगळ्या भाषेत मिळेल. 
  • त्यामध्ये मराठी किंवा तुमच्या सोयीनुसार तो PDF डाउनलोड करून घेणे. 
  • फॉर्म डाउनलोड करून झाल्यावर प्रिंट करून घेणे. 
  • जर तुम्हाला फॉर्म डाउनलोड करण्यास समस्या होत असतील तर आमच्या telegram चॅनेलमध्ये जाऊन या योजनेच्या नावाने pdf शोधून डाउनलोड करू शकता. 
  • नंतर त्या फॉर्ममध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरून घेणे. 
  • फॉर्म भरून झाल्यावर त्यामध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडून घेणे. 
  • भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन अधिकाऱ्याकडे जमा करणे. 
  • त्यानंतर बँकेतील अधिकाऱ्याकडून तुमचे फॉर्म तपासले जातील आणि तुम्ही पात्र असाल तर लाभ मिळेल. 
  • पात्र ठरल्यानंतर तुमच्या बँक खात्यामधून वर्षाची रक्कम वजा केली जाईल, यासाठी तुमच्या बँक खात्यात लागणारी रक्कम उपलब्ध असणे गरजेचे आहे. 
  • अशा प्रकारे PMJJBY योजने अंतर्गत तुमची अर्ज प्रकिया पूर्ण झालेली आहे. 

निष्कर्ष 

अशाप्रकारे आम्ही तुम्हाला PM Jeevan Jyoti Bima Yojana याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीमध्ये सांगितली. यामध्ये आम्ही योजना काय आहे? ती का सुरु करण्यात आली? कधी सुरु करण्यात आली? कोणी सुरु केली? यामागचा उद्देश काय होता? यामध्ये फायदे काय होणार? यासाठी लाभ किती मिळणार? यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता काय हवी? तसेच अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार? आणि यामध्ये अर्ज कशाप्रकारे करू शकतो? याबद्दल सविस्तररित्या मार्गदर्शन केले. 

तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासाठी भविष्यामध्ये आर्थिक स्थिरता कायम ठेवण्यासाठी या योजनेमध्ये आम्ही दिलेल्या माहितीनुसार अर्ज करून लाभ मिळवू शकता. तसेच आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या कुटुंबातील गरजू लोकांना यामध्ये सहभागी होऊन आर्थिक लाभ मिळविण्यासाठी मदत करा. 

अशाच फायदेशीर योजनांसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करू शकता अथवा Telegram/WhatsApp च्या चॅनेलला जॉईन करून नवीन अपडेट्स मिळवू शकता.

FAQs

Pmjjby चे फायदे काय आहेत?

या योजनाचे फायदे गरीब वर्गातील नागरिकांना वर्षाला 2 लाखांचा विमा सुरक्षा मिळतो. 

PMJJBY चा लाभ कोण घेऊ शकतो?

या योजनेमध्ये 18 ते 50 वर्ष वयोगटातील नागरिक अर्ज करून लाभ घेऊ शकतो. 

PMJJBY साठी कोण पात्र नाही?

यासाठी 50 वर्षाच्या वरील नागरिक पात्र नाही. 

PMJJBY मध्ये कोण नॉमिनी होऊ शकते?

यामध्ये तुमचे कुटुंब किंवा त्या व्यक्तीचा जोडीदार नॉमिनी होऊ शकते.

पुढे वाचा: