PM Internship Yojana Registration Deadline Extended: देशामधील विद्यार्थी 15 नोव्हेंबर, 2024 पर्यंत पीएम इंटर्नशिप योजनाच्या अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in वर जाऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात.
भारत देशामधील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेवटची तारीख 12 नोव्हेंबर ठेवण्यात आली होती. परंतु Ministry of Corporate Affairs (MCA) डिपार्टमेंटची रजिस्ट्रेशनची कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे.
Read More: PM Internship Yojana
भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 03 ऑक्टोबर, 2024 मध्ये योजनेची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून देशामधील विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात आली. योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 महिन्याचा कालावधी दिला जातो.
या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये आर्थिक मदत देखील दिली जाते. ज्यामध्ये केंद्र सरकारकडून 4,500 रुपये आणि काम करत असलेल्या कंपनीकडून 500 रुपये देण्यात येते. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या महिन्यामध्ये एका वेळेला वेतन म्हणून 6 हजार रुपये सुद्धा लाभार्थ्यांना देण्यात येते.
ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांनी सरकारच्या सुरु केलेल्या ऑनलाइन पोर्टलमध्ये pminternship.mca.gov.in जाऊन 15 नोव्हेंबरच्या आधी रजिस्ट्रेशन करावे. ज्याणेंकरून लाभार्थ्यांना भारतामधील 500 पेक्षा जास्त मोठ्या कंपन्यांमध्ये काम करायची संधी प्राप्त होईल.
PM Internship Yojana Online Registration करण्यासाठी विद्यार्थ्यीचे वय 21 ते 24 असावे. त्याच शिवाय 10वी, 12वी, ITI, BA, BBA, BCA, BCom, BA, BPharama आणि Polytechnic Institute मधून डिप्लोमा केलेले विद्यार्थी योजनासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.