PM Internship Yojana Online Registration 2024: केंद्र सरकारने पीएम इंटर्नशिप योजनाची ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रकिया 12 तारखेपासून सुरु केली आहे. योजनेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे? याबद्दल स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती लेखाच्यामार्फत देणार आहे.
भारतामधील बेरोजगार तरुण वर्गासाठ आवडत्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी आणि कामाचा अनुभव घेण्यासाठी पीएम इंटर्नशिप स्कीमची सुरुवात केली आहे. जेणेकरून प्रत्येक युवा तरुण योजनेच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून इच्छुक असलेल्या क्षेत्रात व त्याचसोबत देशामधील मोठ्या कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी जॉईन करून आपल्या भविष्याला सक्षम बनवू शकतात.
आपल्या आजच्या लेखामध्ये तुम्हाला पीएम इंटर्नशिप योजनामध्ये लाभ घेण्यासाठी कसे अर्ज करावे? त्याचसोबत योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कोणते युवा तरुण पात्र असणार? त्यांना कोणत्या प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता अर्ज करताना लागणार? आणि योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्या लागतील? याबद्दल सविस्तर माहिती आर्टिकलच्या माध्यमातून जाऊन घेणार आहोत तर शेवटपर्यंत ध्यानपूर्वक प्रक्रिया बघा.
PM Internship Yojana Registration Details 2024
प्रोग्रामचे नाव | पीएम इंटर्नशिप स्कीम |
मुख्य लक्ष्य | बेरोजगार युवा तरुणांना इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणे |
मंत्रालय | Ministry of Corporate Affairs, Go |
रजिस्टेशन प्रकिया | ऑनलाईन पद्धत |
ऑनलाईन पोर्टल | pminternship.mca.gov.in |
योजनेची स्थापना | 03 ऑक्टोबर, 2024 रोजी |
रजिस्ट्रेशनची सुरुवात | 12 ऑक्टोबर, 2024 |
रजिस्ट्रेशन अंतिम तारीख | 25 ऑक्टोबर, 2024 |
कालावधी | 12 महिने |
पगार | प्रतिमाह 5,000 रुपये |
कंपन्यांचा समावेश | 500 पेक्षा जास्त |
पात्र | दहावी पास असलेले युवा तरुण |
PM Internship Yojana काय आहे?
पीएम इंटर्नशिप योजनाच्या माध्यमातून भारत देशामधील दहावी पास असलेल्या युवा तरुणांना ५०० हुन अधिक मोठ्या कंपन्यांमध्ये 12 महिने काम करायची संधी केंद्र सरकारतर्फे देण्यात येते आहे. जे तरुण युवा योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन पूर्ण करतील, त्यांना मोठ्या कंपनीसोबत आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळणार.
त्याचसोबत केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये देखील देण्यात येणार आणि पहिल्याच महिन्यामध्ये 6,000 रुपये सुद्धा ग्रांटच्या स्वरूपात देण्यात येणार. लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम यामध्ये केंद्र सरकार 4,500 रुपये व 500 रुपये खाजगी कंपनीतर्फे बँक खात्यामध्ये जमा केले जाणार.
तसेच योजनेमध्ये निवड केलेल्या तरुणांना केंद्र सरकारच्या माध्यमातून PM Jeevan Jyoti Bima Yojana आणि Pradhan Mantri Suraksha Bima Yojana अंतर्गत विमाचे फायदे सुद्धा देण्यात येणार आहे. तसेच आवडत्या क्षेत्रात व कंपनीमध्ये काम करण्यासाठी स्वतःच्या निवडीप्रमाणे अर्ज करण्यास संधी उपल्बध करून दिली आहे.
PM Internship Yojana चे उद्देश काय आहेत?
आपल्या भारत देशामध्ये तरुण वर्ग सुशिक्षित आहे, परंतु त्यांच्या कौशल्य व अनुभव नसल्या कारणामुळे त्यांची प्रगती होत नाही. यामुळे देशामध्ये बेरोजगारी दरचे प्रमाण जास्त वाढले आहे आणि रोजगार कमी प्रमाणात उपल्बध आहेत. देशभरातील युवा तरुणांच्या अशा समस्यांचे दूर करणे व योग्यरीत्या सुविधा उपलबध करून देणे हे पीएम इंटर्नशिप योजनाचे उद्दिष्ट्ये केंद्र सरकारचे आहे.
या इंटर्नशिपच्या सुविधा उपल्बध करून देशामधील बेरोजगारी प्रमाण पूर्णपणे संपविणे व देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळण्याचे योजनेच्या अंतर्गत प्रयत्न आहेत. लवकरात लवकर चांगली प्रगती होण्यासाठी व तरुणांना लाभ मिळवून देण्यासाठी येत्या वर्षांमध्ये 1 कोटी पेक्षा जास्त इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देण्याचा लक्ष्य सरकारचा आहे.
PM Internship Yojana साठी कोण पात्र आहेत?
पीएम इंटर्नशिप योजनाच्या कोणकोणत्या पात्रतेच्या अटी आहेत? त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास खालीलप्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे.
- योजनेमध्ये अर्ज करणारा युवा तरुण भारत देशाचा स्थानिक रहिवासी असला पाहिजे.
- अर्ज करणाऱ्या तरुणांचे वय कमीतकमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्ष या वयोगटामधील असणे.
- योजने अंतर्गत नोंदणी करून लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या खाली असणे.
- १० वी चे शिक्षण पूर्ण होऊन उत्तीर्ण आलेले तरुण युवा नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहे.
- त्याचप्रमाणे पुढे दिलेल्या क्षेत्रामधील बीबीए, बीसीए, बीफार्म, बीकॉम, बीएसी व बीए पदवीधर तरुण वर्ग सुद्धा इंटर्नशिपसाठी नोंद करू शकतो.
- शैक्षणिक पात्र असलेले युवा तरुण बेरोजगार म्हणजेच कुठेही नोकरी करत नसावे.
- केंद्र किंवा राज्य सरकारने सुरु केलेल्या इतर इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण प्रोग्राम अंतर्गत कोणते तरुण लाभ घेत असतील तर ते या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
- योजनेमध्ये अर्ज करताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सुद्धा सादर करणे बंधनकारक आहे.
- तुमचे बँक खाते आधकार्डसोबत सिड करणे आवश्यक आहे.
PM Internship Yojana ची आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
पीएम इंटर्नशिप योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी युवा तरुण वर्गाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे, त्याची संपूर्ण यादी क्रमानुसार खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
- दहावी पास झाल्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र
- डिग्री किंवा डिप्लोमा पूर्ण झाल्याचा पुरावा
- बँकेला लिंक असलेले आधारकार्ड
- अर्जदार युवाचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी
- वयाचे प्रमाणपत्र
- कुटुंबचे वार्षिक उत्पनाचा पुरावा (तहसीलदारकडून घेऊ शकता)
- आर्थिक मदत मिळावी यासाठी अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती
- पासपोर्ट साइज फोटो
PM Internship Yojana 2024 Online Apply
Youth रजिस्ट्रेशन करून घेणे
- सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये PM Internship Scheme Official Website उघडायची आहे.
- वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डमध्ये Youth Registration ऑपशन दिसेल, त्यामध्ये प्रवेश करणे.
- त्यानंतर तुमचा आधारकार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून खालील दिलेल्या बॉक्सला टिक करून सबमिट करा.
- सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल तो भरून सबमिट करणे.
- पुढे तुमच्या समोर Consent चा डायलॉग बॉक्स उघडून येईल, त्याला टिक करून Agree बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला मोबाईलमध्ये करेन्ट पासवर्ड मिळेल तो सुरुवातीला भरून घ्या आणि 8 नंबरी युनिक नवीन पासवर्ड तयार करून सबमिट करा.
आधारनुसार e-KYC करणे
- युथ रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल.
- त्यामध्ये 6 वेगवेगळे स्टेप्स दिसतील, त्यामधील सुरवातीला इकेवायसी प्रकिया करून घेणे.
- इकेवायसी करण्यासाठी Proceed Further बटनावर क्लिक करा.
- तुमच्या जवळ जर Digilocker account असेल तर व्हेरिफाय करणे किंवा नसेल तर यामध्येच लिंक करू शकता.
- त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाका व Next बटनावर क्लिक करा.
- नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ओटीपी येईल तो भरून Continue बटन दाबा.
- जर तुमचे खाते डिजिलॉकर अंतर्गत असेल तर एमपिन टाकून Continue करणे.
- पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला साइन इनचा करण्यासाठी तीन प्रकारचे पर्याय दिसतील.
- त्यामधील एकाची निवड करून I Consent वर टीक करा साइन इन करून घ्या.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी व्हेरिफाय करायचा आहे तो टाका.
- ई-मेल ऍड्रेसवर पुन्हा ओटीपी येईल तो भरून सबमिट करणे.
- त्यानंतर तुम्ही डिजिलॉकरच्या वेबसाइटमध्ये रिडिरेक्ट होऊन तुम्हाला Allow करायचा आहे.
- योजना अंतर्गत ईकेवायसीची प्रकिया पूर्ण होईल.
तुमचे Personal Details भरून घेणे
- ईकेवायसी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे.
- पहिले तुम्हाला 500 KB साइजच्या आतील JPG किंवा PNG फॉरमॅटमधील पासपोर्ट फोटो अपलोड करा.
- त्यानंतर तुमचे व वडिलांचे, आईचे किंवा जोडीदाराचे नाव भरणे.
- पुढे तुमचा जन्म दिनांक, लिंग व तुम्ही कोणत्या जातीची आहे? त्याची निवड करून घेणे.
- पुढे तुम्हाला कायमचा व राहत्या ठिकाणाचा पत्ता भरायचा आहे, त्यामध्ये तुमचे अपार्टमेंट क्रमांक, राज्य, जिल्हा, ब्लॉक, शहर/गाव आणि पिनकोड टाकून घेणे.
- डॅशबोर्डमध्ये खाली आल्यानंतर तुम्ही विकलांग वर्गातील असाल तर Yes करणे अथवा No करून Save अँड Next बटनावर क्लिक करणे.
तुमचे Contact Details भरणे
- पीएम इंटर्नशिप योजना रजिस्ट्रेशनच्या तिसऱ्या स्टेप तुम्हाला संपर्क करण्यासाठीची माहिती भरावी लागेल.
- सुरवातीला तुम्हाला रजिस्टर्ड असलेले मोबाईल नंबर भरायचा आहे.
- त्यानंतर तुमचा कोणता अल्टर्नेटीव्ह मोबाईल नंबर असेल तर तो द्यायचा आहे आणि नाही दिले तरी चालेल.
- पुढे तुमचा ई-मेल आयडी भरून Save च्या बटनावर क्लिक करा.
तुमचे Education Details भरणे
- सर्वात पहिले तुमचे झालेले शिक्षण कोणते? ते निवडणे. ज्यामध्ये दहावीची माहिती सुद्धा तुम्ही देऊ शकता.
- त्यानंतर तुम्ही कोणते कोर्स व स्ट्रीम केले त्याची निवड करा.
- नंतर तुमच्या बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचे नाव नोंदवा.
- तुम्ही शिकलेल्या संस्थेचे नाव व तुमची पासिंग वर्ष कोणता? ते द्या.
- तुम्हाला मिळालेले गुण आणि टक्केवारी भरून घ्या.
- तुमचे शैक्षणिक पात्रता असलेले मार्कशीट 2 MB च्या PDF स्वरूपात स्कॅन करून अपलोड करा.
- जेवढे तुमचे शिक्षण पूर्ण झाले त्याची अशाच पद्धतीने माहिती भरून सेव्ह अँड नेक्स्टवर बटन दाबून पुढे जावा.
तुमची Bank Details भरणे
- प्रथम तुम्हाला तुमचे बँक खाते आधारकार्ड सोबत सीड आहे का? ते विचारले जातील.
- तुमचे बँक खाते सीड असल्यास Yes करा.
- जर तुमचे बँक आधारकार्ड सोबत सीड नसेल तर करून घेणे आवश्यक आहे, कारण याच मार्गाने ऑनलाईन रक्कम खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
- तुम्हाला बँकेत जायचे आहे आणि NPCI Mapper फॉर्म भरून जमा करायचे आहे.
- त्यानंतर तुमचे बँक आधारकार्डसोबत सीड केले जातील.
- पुढे सेव्ह व प्रोसिड यावर क्लिक करून पुढे जाणे.
तुमच्या Skills बद्दल माहिती देणे
- शेवटच्या स्टेपमध्ये तुमच्या जवळ कोणकोणते कौशल्य आहे? त्यांची नोंद करा.
- त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या भाषा बोलायला येतात? ती निवडा.
- तुम्ही याआधी कमी नोकरीचा अनुभव घेतला असेल तर त्याची माहिती द्या.
- पुढे तुमच्या जवळ काही अतिरिक्त प्रमाणपत्र असल्यास त्याची माहिती भरा.
- त्यानंतर तुमचे PM Internship Scheme अंतर्गत प्रोफाइल पूर्ण होईल.
- परंतु सबमिट करण्याआधी भरलेली सर्व माहिती एकदा तपासून Complete Profile वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला डाउनलोड Resume चा पर्याय दिसेल तो करून घेणे.
Internship Job साठी Apply करणे
- प्रोफाइल तयार केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये Internship Opportunities चा ऑपशन मिळेल, त्यावर क्लिक करणे.
- त्यानंतर PM Internship Yojana अंतर्गत समावेश असलेल्या कंपनीची यादी तुमच्या स्क्रीनवर येईल.
- तुम्हाला पीएम इंटर्नशिप योजनामध्ये नोंदणी करण्यासाठी राज्य, जिल्हा, सेक्टर आणि तुमच्या फिल्डची निवड करा.
- त्यानंतर तुमच्या निवडलेल्या माहितीनुसार इंटर्नशिपची यादी येईल.
- त्यामधील एकाची निवड करून View ऑपशनमध्ये जावा.
- त्यामध्ये तुम्हाला त्या कंपनीची सर्व माहिती पाहायला मिळेल ती पाहून अर्ज करा.