PM Internship Yojana 2024: सुरु झाली प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, युवकांना मिळणार प्रतिमाह 5000 रुपये

PM Internship Yojana 2024: केंद्र सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना चालू केली आहे. देशामधील युवा तरुण पिढींना लाभ घेण्यासाठी PM Internship Scheme अंतर्गत Registration Portal सुद्धा सुरु करण्यात आलेले आहेत. लवकरच अर्जाची प्रकिया जाणून घ्या आणि योजनेमध्ये नोंदणी करून इंटर्नशिपचा लाभ घ्या. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या भारत देशामध्ये बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे, ज्यामध्ये विशेष करून सुशिक्षित तरुण बेरोजगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे. यामुळे बेरोजगारीच्या समस्यांबद्दल जास्त प्रमाणात चर्चा केली जात आहे. 

याचे कारण सांगण्यात येत आहे की तरुण पिढीमधील मुलांमध्ये कौशल्याची कमतरता आहे. यामुळे केंद्र सरकारने भारतामधील बेरोजगार तरुण पिढींना योग्य व हुशार बनविण्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना घेऊन आले आहेत. 

आपल्या आजच्या आर्टिकलमध्ये पीएम इंटर्नशिप योजना काय आहे? तरुणांना अर्ज करण्यासाठी पात्रता कोणती असणार? त्याचप्रमाणे ज्या तरुणांना लाभ घेण्याचा ते कसे अर्ज करू शकतात? यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी पूर्ण प्रकिया सांगण्यात येणार. इंटर्नशिप किती दिवसांसाठी असणार? लाभार्थ्यांना योजने अंतर्गत किती रुपये वेतन दिली जाणार? या सर्व गोष्टींबद्दल लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

PM Internship Yojana in Marathi 

केंद्र सरकारच्या माध्यमातून 03 ऑक्टोबर, 2024 या दिवशी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनाची सुरुवात करण्यात आली. या वर्षीच्या अर्थ संकल्पनेत केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमन यांनी इंटर्नशिप स्कीमची घोषणा केली होती. 

केंद्र सरकार सुरु करण्यात आलेल्या योजनेमधून तरुणांना 12 महिन्याच्या कालावधीसाठी इंटर्नशिप मिळणार. त्याचसोबत प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आर्थिक स्वरूपात स्टायपेंड सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार. 

केंद्र सरकारच्या माध्यमातून निवडलेल्या युवकांना सुरुवातीलाच One Time Grant म्हणून 6,000 रुपये वेतन दिले जाणार. त्याचसोबत प्रत्येक लाभार्थी तरुणाला सरकाच्या इतर योजनांच्या अंतर्गत विमा सुरक्षा प्रदान केले जातील.

योजनेमध्ये भारतामधील जवळपास 500 पेक्षा जास्त कंपन्या रजिस्टर करण्यात आले. ज्यामध्ये काही मोठ्या कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे. ज्याची अंमलबजावणी भारत सरकारची Ministry of Corporate Affairs डिपार्टमेंट करते. 

PM Internship Scheme 2024 Overview

योजना नावप्रधानमंत्री इंटर्नशिप योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
लॉन्च कोणी केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
कधी सुरु झाली03 ऑक्टोबर, 2024 मध्ये
विभागकॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार
मुख्य उद्देशदेशामधील 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देऊन बेरोजगारी दूर करणे
लाभार्थीभारतामधील 21 ते 24 वयोगटामधील तरुण युवक
फायदा1 वर्षासाठी इंटर्नशिप व प्रतिमाह 5000 रुपये वेतन
अर्ज प्रकियाऑनलाईन
अधिकृत वेबसाइटpminternship.mca.gov.in

PM Internship Yojana Aim

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनाचे मुख्य लक्ष्य 2024-25 वर्षामध्ये भारतामधील जवळपास सव्वा लाख तरुण युवकांना इंस्टर्नशिपचा फायदा करून देणे आहे. त्याचसोबत देशभरातील बेरोजगारी कमी करण्यासाठी येत्या पाच वर्षांमध्ये 1 कोटींपेक्षा जास्त युवा तरुणांना योजने अंतर्गत लाभ देण्याचा सुद्धा लक्ष्य भारत सरकारने ठेवला आहे. 

इंटर्नशिपच्या माध्यमातून तरुणांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये योग्यरीत्या अनुभव घेण्यासाठी आणि अनुभवानंतर चांगल्या ठिकाणी नोकरीसाठी त्यांना मदत मिळेल या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने योजनेची स्थापना केली आहे. 

PM Internship Yojana Benefits 

  • प्रधानमंत्री इंटर्नशिप स्कीम अंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे 4,500 रुपये आर्थिक मदत आणि कंपनीतर्फे 500 रुपये असे एकूण 5,000 रुपये वेतन प्रत्येक महिन्याला देण्यात येणार. 
  • तसेच युवकांना इंटर्नशिपच्या सुरुवातीमध्ये योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. 
  • त्याचप्रमाणे युवकांना PM Jeevan Jyoti Bima YojanaPradhan Mantri Suraksha Bima Yojana च्या विमा सुरक्षा सुद्धा प्रदान केले जाणार. ज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून विमाचे योगदान भरले जाणार.
  • पोर्टलमध्ये अर्जदारांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एक बायोडेटा तयार करण्यात येणार. 
  • त्यानंतर लाभार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामधील कंपन्यांमध्ये अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार. 
  • तसेच तरुणांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्या राज्यात व जिल्ह्यामध्ये इंटर्नशिप करायची आहे? ते निवडण्याची संधी सुद्धा देण्यात येणार. 
  • तरुण वर्ग आपल्यानुसार 5 इंटर्नशिपमध्ये नोंदणी करण्यासाठी प्राधान्य देऊ शकतात. 
  • त्याचप्रमाणे युवकांना 12 ऑक्टोबर पासून रजिस्ट्रेशन करण्यासाठी पोर्टल उघडण्यात येणार आहेत. 
  • इंटर्नशिपच्या पहिल्या रजिस्ट्रेशन प्रक्रियांसाठी पोर्टल 25 ऑक्टोबरपर्यंत चालू ठेवण्यात येणार. 
  • 26 ऑक्टोबर दरम्यान निवडलेल्या तरुणांची यादी कंपनीतर्फे देण्यात येतील. 
  • ज्या लाभार्थ्यांना योजना अंतर्गत निवड करण्यात येणार त्यांची इंस्टर्नशिप 02 डिसेंबर, 2024 पासून सुरु करण्यात येतील आणि ही इंटर्नशिप 1 वर्षापर्यंत लागू करण्यात येणार आहे. 
  • कंपनींना आवश्यक असणाऱ्या क्षेत्रानुसार व तरुणांच्या प्राधान्यनुसार लाभार्थ्यांची यादी काढण्यात येणार आहे. 
  • या योजने अंतर्गत दिव्यांग, अनुसूचित जाती व जमाती आणि आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या मुलांसाठी आरक्षणाचे नियम लागू करण्यात आले आहेत. 
  • आतापर्यंत महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात आणि उत्तराखंड राज्यांमधील 100 पेक्षा जास्त कंपन्यांना योजनामध्ये समावेश करण्यात आलेले आहे. 
  • कंपन्यांच्या माध्यमातून योजना अंतर्गत 1,100 हुन अधिक नोकऱ्यांची संधी पोर्टलद्वारे देण्यात आली आहे. 
  • योजनामध्ये समावेश असणाऱ्या कंपन्यांच्या नावांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि मॅक्सलाईफ विमा यांनी सहभाग घेतला आहे. 
  • पीएम इंटर्नशिप योजना अंतर्गत कंपन्यांना production व maintenance ग्रुपमध्ये काम करण्यासाठी तरुणांची गरज आहे. 
  • त्याचप्रमाणे योजनेमध्ये सहभागी असलेल्या युवकांना भारतामधील पाच मोठ्या कंपन्यांमध्ये काम करायची संधी प्राप्त होणार. 
  • पहिल्या बॅचमध्ये जर तुमचे अर्ज स्वीकारण्यात नाही आले, तर पुन्हा योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकता. 

Various Sectors under PM Internship Yojana

  • Housing 
  • Infrastructure and construction 
  • IT and Software Development 
  • Metals and Mining 
  • Pharmaceutical 
  • Telecom 
  • Textile Manufacturing 
  • Travel and Hospitality
  • Aviation and Defense 
  • Chemical Industry 
  • Consulting Services 
  • Diversified conglomerates 
  • Gem and Jewelry
  • Manufacturing and Industrial 
  • Media, Entrainment and Education 
  • FMCG (Fast Moving Consumer Goods) 
  • Healthcare
  • Oil, Gas and Energy 
  • Retail and Consumer Durables 
  • Agriculture and Allied 
  • Automotive 
  • Banking and Financial Services 
  • Cement and Building Materials 

PM Internship Yojana Eligibility

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत सहभागी होण्यासाठी पात्रता कोणती आहे? आणि कोण यामध्ये अर्ज करू शकतात? हे जाणून घेऊयात. 

  • या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या युवकांनाचे वय 21 ते 24 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. 
  • पीएम इंस्टर्नशिप स्कीम अंतर्गत नोंदणी करण्यासाठी तरुणांचे शिक्षण कमीत कमी दहावी पास असणे. 
  • बारावी पूर्ण केलेले विद्यार्थी सुद्धा योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • तसेच BA, B.Sc, B.com, BCA, BBA, B.Pharma या क्षेत्रामधील पदवीधर तरुण सुद्धा पात्र आहेत. 
  • जी मुले पात्र असून कोणत्याही क्षेत्रात नोकरी काम करत नसतील ते योजनेमधून लाभ घेऊ शकतात. 
  • तसेच रजिस्ट्रेशन करून फायदा घेण्यासाठी तरुणांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसावे. 
  • स्कीम अंतर्गत सहभागी होण्यासाठी तरुणाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. 
  • ITI व पॉलिटेक्निकल क्षेत्रामध्ये डिप्लोमा केलेले विद्यार्थी सुद्धा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. 
  • त्याचप्रमाणे IIT व IIM क्षेत्रातील व CA, CMA, MBBS, BDS, CS आणि MBA क्षेत्रामध्ये डिग्री घेत असलेले तरुण पात्र नाही. 
  • त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारतर्फे इतर योजनेमधून राबविण्यात आलेले विद्यार्थी प्रशिक्षण प्रोगाम, इंटर्नशिप, apprenticeship मध्ये लाभ घेतलेला नसावा. 

PM Internship Yojana Documents

पीएम इंटर्नशिप योजनाची आवश्यक कागदपत्रे युवकांना अर्ज करण्याआधी जमा करणे महत्त्वाचे आहे. यासाठी खालीलप्रमाणे सर्व कागदपत्रांची यादी देण्यात आलेली आहे. 

  • तरुण युवकाचे आधारकार्ड 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • कुटुंबामधील वार्षिक उत्पन्न दाखला 
  • शैक्षणिक पुरावा (प्रमाणपत्र/मार्कशीट) 
  • ई-मेल आयडी 
  • मोबाईल नंबर 
  • बँक पासबुकचे पहिले पान (आधार नंबरसोबत जोडलेले असणे)
  • वयाचे पुरावे

PM Internship Yojana Registration

जसे आपण पहिले केंद्र सरकारमार्फत नुकतीच पीएम इंटर्नशिप प्रोग्राम लॉन्च केली आहे. त्यामुळे शासनाने पोर्टल तर तयार केले आहेत, परंतु प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनाची रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आलेले नाही. 

शासनाच्या माहितीनुसार पोर्टलवरती म्हणजेच योजनेच्या तयार केलेल्या वेबसाइटवरती 12 ऑक्टोबर 2024 पासून पहिल्या इंटर्नशिप बॅचसाठी रजिस्ट्रेशन उघडण्यात येणार आहे आणि रजिस्ट्रेशन प्रकियाचा शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आली आहे. 

जे तरुण वर्ग योजनेमधून लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी आमच्या Telegram किंवा WhatsApp चॅनेला जॉईन करून ठेवा. जेणेकरून केंद्र सरकारच्या माध्यमातून जशी नोंदणी प्रकिया चालू होईल, तशी माहिती तुम्हाला त्वरित मिळण्यात मदत होईल.

त्याचप्रमाणे कोणत्या 500 कंपन्या योजना अंतर्गत रजिस्टर करून घेतल्या आहेत?, त्यांच्या संपूर्ण यादीची PDF सुद्धा तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटून जाईल. ज्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करताना त्या तुमच्या आवडीप्रमाणे यादीमधील कंपन्यांची निवड करू शकता. 

निष्कर्ष 

आम्ही आशा करतो, आमच्या लेखामधून तुम्हाला PM Internship Yojana संबंधित संपूर्ण माहिती मिळायला मदत झाली असेल. तसेच योजनेमधून युवकांना कोणते फायदे देण्यात येणार? सरकारने का योजना सुरु केली? यामधून किती लोकांचे भविष्य चांगले होणार आहे? सध्या भारतामध्ये बेरोजगारीची स्थिती काय चालू आहे? कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत योजना राबिवली जात आहे? रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणते पोर्टल तयार करण्यात आले? कोणते तरुण योजनेसाठी पात्र आहेत? त्यांना नोंदणी करताना कोणते कागदपत्र अपलोड करावी लागणार? अशा सर्व प्रश्नांबद्दल माहिती जाणून आपण घेतली.

FAQs

PM Internship Scheme कधी सुरु केले? 

केंद्र सरकारने पीएम इंटर्नशिप स्कीम 03 ऑक्टोबर, 2024 मध्ये सुरु केले. 

पीएम इंटर्नशिप प्रोग्रामसाठी कोण पात्र आहेत? 

या प्रोग्रामसाठी भारतामधील दहावी शिक्षण पूर्ण असलेले युवक पात्र आहेत. 

पीएम इंटर्नशिप योजनामध्ये कसे अर्ज करायचे? 

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला pminternship च्या सरकारी वेबसाइटमध्ये जावे लागेल.