PM Gati Shakti Yojana 2024: देशामधील पायाभूत सुविधांचा होणार विकास, जाणून घ्या माहिती

PM Gati Shakti Yojana 2024: देशामधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गती शक्ती योजना सुरु केली. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 100 लाख कोटींचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामध्ये शासनातर्फे नवीन पक्के रस्ते तयार केले जाते, त्यानंतर काही दिवसांमध्ये कोणत्या वेगळ्या विभागातील काम त्याच रस्त्यावर सुरु केले जाते. यामुळे चांगल्या प्रकारे तयार केलेला रस्ता पुन्हा खराब होतो. जसे सरकार एखाद्या जागेवर नवीन रस्ते बनवते, त्यानंतर पाण्याच्या पाईपलाइनचे काम किंवा इतर कामे चालू करतात. अश्याने तयार केलेला सूंदर रस्त्यांची वाट लावली जाते. 

याप्रकारची योजना सुरु करणे महत्त्वाचे होते, कारण जर घर चालवायचे असेल तर घरामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. तसेच देशामध्ये विविध डिपार्ट्मेंटचे समन्वय व्यवस्थित नसल्यामुळे आपल्या सारख्या सामान्यांचे पैसे टॅक्समधून लागतात, तर ते अशा कामांसाठी वाया जातात. यामुळे देशाचा विकास होत नाही आणि त्याचे परिणाम सामान्य नागरिकांना होतो. 

अशा सर्व विविध विभागाच्या कामांना एकत्रित समन्वय पद्धतीने सुरळीत पार पाडण्यासाठी व देशभरात वेगाने पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री गती शक्ती योजनाची सुरुवात करण्यात आली होती. आज आपण याच योजनेच्या विषयावर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, तर आर्टिकल शेवटपर्यंत पहा. 

PM Gati Shakti Yojana in Marathi 

प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गती शक्ती योजनाची सुरुवात 13 ऑक्टोबर, 2021 रोजी केली होती. ज्यामध्ये 100 लाख कोटी नॅशनल मास्टर प्लॅन तयार करण्यात करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून देशामधील पायाभूत सुविधांचा विकास करून लॉजिस्टिक खर्च कमी करणे आणि अर्थव्यवस्थेला चालना देणे  हे मुख्य लक्ष्य आहे. 

देशामध्ये विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून निरनिराळे काम केले जाते. याना एकत्रित करून समन्वय पद्धतीने काम करण्यासाठी Multi Model Connectivity पद्धतीचा वापर केलं जात आहे. जेणेकरून जिथे कामासाठी वेळ जास्त लागत होता, तिथे कमी काम होईल. त्याचप्रमाणे जे प्रकल्प चालू केले जातील, त्यामध्ये वेगाने काम केले जाईल व आर्थिक खर्च कमी करण्यावर जोर दिला जाईल. 

केंद्र सरकारच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म डिझाईन केला आहे, ज्यामध्ये Infrastructure च्या कामासाठी संबंधित असलेले सर्व मंत्रालय किंवा विभाग एकाच ठिकाणी समन्वय पद्धतीने काम करतील. यामध्ये 16 केंद्रीय सरकारी मंत्रालयांचा समावेश करण्यात आले आहे, ज्यामध्ये रेल्वे, रोड, हायवे, पेट्रोलियम, गॅस, पॉवर, टेलिकॉम, शिपिंग, एव्हिएशन व इतर विभागांचा समावेश आहे. 

PM Gati Shakti Yojana चे महत्त्वाचे स्तंभ 

  • प्रसार: योजनेच्या माध्यमातून एक पोर्टल तयार केले आहेत, ज्यामध्ये मंत्रालय, विभाग, भारमाला, सागरमाला, बंदर, उड्डाण, रेल्वे व आर्थिक क्षेत्र यांच्या कामाचा समावेश केला जातो. 
  • प्राधान्य: देशामध्ये अंतर भागात चालविण्यात येणाऱ्या प्रकल्पाना सक्षम बनविण्यासाठी प्राधन्य दिले जाते. 
  • रूपांतर: देशामधील अंतर भागात होणाऱ्या महत्वाच्या प्रकल्पांची योजना तयार करण्यात मदत होते. 
  • रूपांतरण: परिवहनामध्ये optimal route निवडण्यासाठी मदत केली जाते. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी येण्यासाठी जाण्यासाठी एकीकृत कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाते. 
  • विश्लेषणात्मक: योजने अंतर्गत GIS आधारित योजना व 200 पेक्षा जास्त लेयर्स असलेले उपकरण तयार केले गेले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण कामाचा डेटा एकत्रित केला जातो. जेणेकरून व्यवस्थितरीत्या सर्व कामांची एकाच ठिकाणी निरीक्षण केले जाते. 
  • गतिमान: त्याचप्रमाणे योजना अंतर्गत विविध प्रकल्पांची होणारी प्रगती नियमित आधारे अपडेट केली जाते. 

PM Gati Shakti Yojana 2024 Details

योजनाचे नावप्रधानमंत्री गती शक्ती योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
लॉंच केलेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
लॉन्च कधी केली13 ऑक्टोबर, 2021 रोजी
विभागउद्योग संवर्धन और आंतरिक व्यापार विभाग
उद्देशदेशामधील पायाभूत सुविधांचा विकास करून अर्थव्यवस्था बळकट करणे
लाभार्थीभारत देशामधील नागरिक
लाभनागरिकांना रोजगाराची संधी प्राप्त होणार व व्यवसाय वाढणार
बजेट100 लाख कोटी रुपये 
अधिकृत वेबसाइटpmgatishakti.gov.in

PM Gati Shakti Yojana Aim 

प्रधानमंत्री गती शक्ती योजनाचे मुख्य उद्देश विविध डिपार्टमेंटला एकाच पोर्टलमध्ये एकत्रित आणून समन्वय पद्धतीने काम करण्यास प्रवृत्त करणे व देशाच्या विकासाला चालना देणे आहे. जेणेकरून देशभरातील नागरिकांना रोजगाराची संधी मिळेल व नागरिकांकडून होणाऱ्या टॅक्स खर्चाचा व्यवस्थित उपयोग होईल. 

विविध प्रकारच्या डिपार्टमेंटमधून होणाऱ्या कामांमुळे महत्त्वाच्या कामांना वेळ होतो व त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था ढासळते. या सर्व कामांना योजनेच्या माध्यमातून व्यवस्थित होण्यासाठी केंद्र सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे. ज्याचे मुख्ये ध्येय देशाचा विकास करणे व नागरिकांना जागोजागी रोजगाराची संधी उपलब्ध करणे. अशा सर्व कामांना एकत्रितपणे व्यवस्थित चालण्यासाठी व सर्व सामान्यांच्या समस्या दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

आपल्या भारत देशामध्ये निरनिराळ्या मंत्रालयाकडून कामे चालविण्यात येतात, त्यामध्ये त्यांचे समन्वय एकमेकांशी नसतात. यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये सामान्य नागरिकांना जास्त करून समस्या निर्मांण होते. त्याचप्रमाणे आर्थिक दृष्टया जास्त खर्च केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून होतो. 

PM Gati Shakti Yojana Benefits 

  • प्रधानमंत्री गती शक्ती योजनाचे फायदे देशाला विकास करण्यासाठी होईल. 
  • या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 100 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे 
  • त्याचप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास वेगाने होण्यासाठी नॅशनल मास्टर प्लॅन तयार केला आहे. 
  • ही योजना एकप्रकारची अम्ब्रेला स्कीम आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील योजनांचा समावेश केला जातो. 
  • या योजनेच्या माध्यमातून देशभरातील बेरोजगार नागरिकांसाठी रोजगाराची संधी उपल्बध करून दिले जाते. 
  • त्याचप्रमाणे लॉजिस्टिक कामांमध्ये आर्थिक खर्च कमी होणार. 
  • देशामध्ये होणाऱ्या विविध क्षेत्रातील पुरवठा साखळीमध्ये सुधार होऊन चांगली होण्यात मदत होईल. 
  • आपल्या देशामधील स्थानिक वस्तूचा विश्व स्थरावर प्रति स्पर्धक ठरेल. 
  • गुंतवणूकदारांना आपल्या व्यवसायासाठी उपयूक्त स्थान प्राप्त होणार व व्यवसायाची योजना सक्षम बनविण्यासाठी मदत होते. 
  • योजनेच्या मदतीने आपला भारत देश विश्व स्थरावर इन्फ्रा प्रकल्पांचा केंद्र बनणार. 
  • बंदरांवर योजेनच्या माध्यमातून कार्गोचे क्षमता 1282 वरून वाढून 1759 एमएमटीपीए पर्यंत झाली आहे. 
  • राष्ट्राच्या जलमार्गावरील कार्गोची 74 मिलियन मीट्रिक टन वाढवून 95 इतकी वाढविण्यात येणार. 
  • त्याचप्रमाणे गंगेच्या कार्गोच्या हालचालीसाठी 9 मिलियन मीट्रिक टन वाढवून 29 करण्यात येणार आहे. 
  • ही योजना भारत देशामधील पायाभूत सुविधांच्या समस्यांना दूर करण्यात मदत करेल. 
  • योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना कमी खर्चात सर्वोत्तम गुणवत्ता प्राप्त होणार. 
  • पीएम गती शक्तीच्या मदतीने आपल्या देशातील निर्यात प्रकियाला फायदा होईल. 

National Master Plan Targets under Gati Shakti 

  • 2024-25 पर्यंत 109 फार्मा आणि मेडिकल डिवाइस क्लस्टर तयार केले जाणार. 
  • 90 टेक्सटाईल क्लस्टर/ मेगा टेक्सटाईल पार्क बनविले जाणार. 
  • 2024-25 मध्ये 202 फिशिंग क्लस्टर/बंदरे/लँडिंग केंद्रच्या आधारे निर्यात करण्यासाठी दुप्पट काम केले जाणार. 
  • त्याचप्रमाणे 2 रक्षा कॉरिडॉर व 11 औद्योगिक कॉरिडॉर जवळपास 25 हजार एकरात तयार करण्यात येणार. 
  • कृषी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना फायदा मिळण्यासाठी 197 मेगा फूट पार्क आणि कृषी प्रक्रिया केंद्र बनविले जातील. 
  • खाद्य प्रकिया आणि संरक्षण क्षमतेमध्ये 847 लाख मेट्रिक टन करण्यात येणार. 
  • भारत देशामधील सर्व ग्रामीण क्षेत्रामध्ये 4G मोबाईल कनेक्टिव्हिटी तयार उपलब्ध करणार. 
  • योजनेच्या अंतर्गत अक्षय ऊर्जाची क्षमता 225 गिगावॅट पर्यंत वाढवणार. 
  • ट्रान्समिशन नेटवर्क 4,54,000 सर्किट किलोमीटर करण्यात येणार. 
  • देशभरात 17,000 किलोमीटरची अतिरतिक्त गॅस पाईपलाईन टाकले जाणार. 
  • 220 विमानतळ, हेलीपोर्ट व वॉटर एरोड्रम तयार केला जातील. 
  • रेल्वेच्या माध्यमातून परिवहन क्षेत्रात 1600 मिलियन टन करो तयार केले जातील. 
  • 2 लाख किलोमीटर इतका लांब राष्ट्रीय राज्यमार्ग तयार होणार. 

निष्कर्ष 

अशा पद्धतीने PM Gati Shakti Yojana संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये योजना का सुरु करण्यात आली? योजना काय आहे? त्यांचे उद्देश काय आहेत? केंद्र सरकारने किती रुपयांचा बजेट मान्य केला आहे? कोणकोणते डिपार्टमेन्टचा समावेश केले? योजनेची सुरवात कधी करण्यात आली? कोणते विभाग याचे काम राबविते? योजनेसाठी कोणते पोर्टल तयार केले गेले? कोणत्या महत्त्वाच्या स्तंभावर गती शक्ती सुरु करण्यात आली? तसेच देशाला व नागरिकांना कोणते फायदे होणार आहेत? कोणत्या क्षेत्रातील कामांचा समावेश करण्यात आले? नॅशनल मास्टर प्लॅन अंतर्गत कोणते लक्ष्य असणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तारित्या सांगितले. 

प्रधानमंत्री गती शक्ती योजना आपल्या भारत देशाच्या प्रगतीला एक वेगळे वळण देण्यासाठी व देशाचा विकास घडविण्यासाठी उत्तम प्रकारे मदत करेल. त्याचप्रमाणे देशामधील उद्योगजकताना व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत होईल आणि आपले आर्थिक वाढ होईल. 

अशा फायदेशीर योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आमची वेबसाइट Subscribe करा किंवा Telegram/WhatsApp ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स त्वरित मिळेल. 

FAQs

पीएम गती शक्ती योजनेमधून सामान्य माणसाला कसा फायदा होणार? 

या योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला रोजगाराची संधी मिळण्याचा फायदा होणार. 

PM Gati Shakti योजनेची सुरुवात कधी झाली? 

केंद्र सरकारने योजनेची सुरवात 13 ऑक्टोबर, 2021 रोजी करण्यात आली. 

राष्टीय मास्टर प्लॅन काय आहे? 

राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या आधारे भारत देशामधील रेल्वे, रोड, बंदरे व कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधार करण्यात येणार. 

गती शक्ती योजनेमध्ये किती स्तंभ आहे?

या योजने अंतर्गत एकूण 6 स्तंभाचा समावेश करण्यात आले आहे. 

गती शक्तीसाठी किती बजेट सादर करण्यात आले?

केंद्र शासनातर्फे 100 लाख कोटींचा बजेट सादर करण्यात आले. 

पुढे वाचा: