PM Fasal Bima Yojana 2024: भारत देशामधील सगळ्या शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2016 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीचे भरपाई करण्यास केंद्र सरकार मदत करते.
केंद्र सरकारतर्फे सुरु केलेल्या प्रधानमंत्री फसल बीमा योजना या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकासाठी विमा काढला जातो आणि या विमासाठी भरावे लागणारे प्रीमियमच्या रक्कमेतला काही भाग सरकार देते आणि काही भाग शेतकरी देतो. जर काही कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला नुकसान झाले तर या योजनेच्या माध्यमातून काढलेला विम्यामधून शेतकरी त्याच्या विमा कंपनीतर्फे रक्कम क्लेम करू शकतो.
जर तुम्ही एक शेतकरी आहात आणि तुम्हाला या पीक विम्याबद्दल काही माहिती नाही. तर आमच्या या लेखातून तुम्हाला पीक विमा योजना बद्दलची संपूर्ण माहिती प्राप्त करता येईल. यामध्ये आम्ही योजनेचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रकिया आणि बरेच काही माहिती सविस्तररित्या सांगितली आहे ती शेवटपर्यंत लक्षपूर्वक जाणून घ्या आणि PMFBY Scheme मध्ये अर्ज करून या योजनेचा लाभ मिळवा.
प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे काय? | PM Fasal Bima Yojana in Marathi
18 फेब्रुवारी 2016 रोजी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या उत्पनासाठी विमा सेवा सुरु केला. PMFBY full form म्हणजेच प्रधानमंत्री फसल बिमा योजना. शेतकरी आपल्या पीक नुकसानीसाठी रिपोर्ट या योजनेच्या माध्यमातून करू शकतो. नुकसानीसाठी रिपोर्ट केल्यानंतर त्याच्या नुकसानीची रक्कम विम्याद्वारे क्लेम करू शकतो.
पीक विमा योजना माहिती
योजनाचे नाव | Pradhanmantri Pik Vima Yojana |
कोणी सुरु केली | केंद्र सरकारने |
कधी सुरु केली | 18 फेब्रुवारी 2016 रोजी |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
मंत्रालय | कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग |
उद्देश | शेतकऱ्यांना आर्थिक मदत |
लाभार्थी | भारतातील सगळ्या शेतकरी वर्गासाठी |
लाभ | 2 लाखापर्यंत रक्कम |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | pmfby.gov.in |
हेल्पलाईन नंबर | 1800-180-1111/1800-110-001 |
Pik Vima Yojana Aim
केंद्र सरकारने सुरु केलेल्या या प्रधानमंत्री पीक विमा योजनाचे उद्देश आपल्या देशामधील शेतकऱ्यांना झालेल्या पिक अपयशाला विमा संरक्षण प्रदान करणे हे आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे नुकसान होते. त्यामुळे खर्च करून केलेल्या शेतीला अशा प्रकारच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते.
यासाठी त्यांच्या नुकसानीचे परतफेड म्हणून सरकारतर्फे ही योजना राबविण्यात आली. शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमध्ये त्यांचे आर्थिक स्थिती सुरळीत ठेवण्यासाठी या विमा मदत करतात.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे हा सरकारचा हेतू आहे. त्याचसोबत, कृषी क्षेत्रामधील शेतकऱ्यांचा पुरवठा योग्यरित्या होऊन शेतीमध्ये होणाऱ्या उत्पादनाच्या जोखीमेपासून संरक्षण करणे.
त्याचप्रमाणे, कृषी क्षेत्रामध्ये गतिशील विकास होण्यासाठी आणि अन्नसुरक्षासाठी या योजनाची सुरुवात करण्यात आली आहे.
Pradhan Mantri Fasal Bima Scheme Benefits
- प्रधानमंत्री फसल बीमा योजनातून देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार.
- शेतकरी वर्गाला प्राकृतिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी पूर्ण बीमा रक्कम प्राप्त होणार.
- यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमाची कॅल्क्युलेटरची सुविधासुद्धा मिळणार.
- या योजनेमधून शेतकऱ्यांना भरावे लागणारे प्रीमियम फार कमी असणार आहे.
- या योजनेमध्ये शेतकरी सोप्या पद्धतीमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- सरकारतर्फे चालू केलेल्या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना २४ तासाची हेल्पलाईन सुविधा मिळणार.
- केंद्र सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार.
- मिळालेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सामग्री प्रोत्साहनामुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रामध्ये विकसित होण्यामध्ये चालना मिळेल.
- शेतकरी वर्गाला या विमा योजनेमधून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे त्यांचे अन्नपुरवठा स्थिर राहण्यास मदत होणार आहे.
Pik Vima Included Crops
जर तुम्हाला प्रधानमंत्री फसल बिमा अंतर्गत अर्ज करून लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या पिकांच्या यादीनुसार तुमच्या शेतामध्ये पीक असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला विमाचे फायदे घेता येतील.
पिकांचे वर्गवारी | खरीप हंगामाचे पीक | रबी हंगामाचे पीक |
कडधान्य आणि तृणधान्य पिके (अन्नधान्य पिके) | भात, मका, नाचणी, खरीप ज्वारी, बाजरी, उडीद, तुर | उन्हाळी भात, बागायत व जिरायत रबी ज्वारी, बागायत गहू, हरभरा |
गळीत धान्य पिके | सोयाबीन, तीळ, कारळे, भुईमुग, सूर्यफुल | उन्हाळी भुईमुग |
नगदी पिके | खरीप कांदा आणि कापूस | रब्बी कांदा |
PM Fasal Bima Scheme Eligibility
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पात्रता असलेले शेतकरी यामधे अर्ज करून लाभ घेऊ शकतात. खालील दिलेल्या माहितीनुसार पात्र असणे आवश्यक आहे.
- देशामधील अनुसूचित क्षेत्रामधील सगळे शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
- जे शेतकरी कुळाने आणि भाडेपट्टीने शेती करतात ते सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
- देशामधील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी सुद्धा यामध्ये त्यांच्या इच्छेनुसार सहभागी होऊ शकतात.
- पीक विमा योजनेमध्ये फक्त भारतील स्थानिक रहिवासी शेतकरी लाभ घेऊ शकतात.
- शेतकरी मध्यमवर्ग आणि गरीब वर्गातील परिवारमधील असणे गरजेचे आहे.
PM Fasal Bima Scheme Required Documents
- अर्जदाराचे आधारकार्ड
- शेत जमिनीचे कागदपत्र
- बँक खात्याचे पासबुक
- पेरणी प्रमाणपत्र
- गावचा पटवारी
- गोवर संख्या
PM Fasal Bima Yojana Apply Online
- प्रधानमंत्री पीक विमा योजनामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या होमपेजवर farmer Corner च्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- फॉर्मर कॉर्नरमध्ये गेल्यावर तुम्हाला Guest Farmer च्या ऑपशनवर क्लिक करायचे आहे.
- त्या पर्यायामध्ये गेल्यावर तुमच्या समोर पीक विमा अर्जाचा फॉर्म उघडेल.
- त्यानंतर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये विचारल्या गेलेल्या माहिती प्रमाणे सगळंकाही व्यवस्थितरित्या भरणे.
- माहिती भरून झाल्यावर कॅप्चा कोड टाकून Create Users बटनावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारतील तो टाकून घेणे.
- नंबर टाकून झाल्यावर तुम्ही PMFBY Portal वर लॉगिन करून घ्या.
- पोर्टलमध्ये लॉगिन झाल्यावर योजनेसंबंधित अर्जाच्या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती देणे.
- फॉर्म भरून झाल्यावर लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घेणे.
- फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे तपासून सबमिट बटनावर क्लिक करणे.
- अशाप्रकारे तुमचे योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
PMFBY Application Status
- जर तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनामध्ये अर्ज केला आहे आणि तुम्हाला अर्जाची स्थिती पाहायची असेल तर खालील दिलेल्या माहितीनुसार स्टेप बाय स्टेप प्रकिया पार पाडा.
- सगळ्यात आधी तुम्हाला PMFBY ची अधिकृत वेबसाईट उघडायची आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर होम पेज उघडेल.
- होम पेज उघडल्यानंतर तुम्हाला PMFBY status यावर क्लिक करायचे आहे
- स्टेटस पर्यायामध्ये गेल्यावर तुम्हाला अर्जाच्या वेळेला भेटलेला एप्लिकेशन नंबर टाकायचा आहे.
- नंतर कॅप्चा कोड टाकून check status च्या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर तुम्ही अर्ज केलेले स्टेटस समोर दिसेल.
- अशा प्रकारे पिक विमाने स्टेटस तपासण्यासाठी प्रकिया पूर्ण झालेली आहे.
Fasal Bima Claim Process
फसल बिमा योजनामध्ये क्लेम करण्यासाठी तुमचे पीक खराब झाल्याच्या 72 तासांमध्ये विमा कंपनीला सूचना देणे महत्त्वाचे आहे. 14 दिवसाच्या आतचा क्लेम रिपोर्ट तुम्हाला पाठवणे गरजेचे आहे. 14 दिवसाच्या नंतर जर तुम्ही विम्यासाठी क्लेम केले तर तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकते. तुम्ही पीक नुकसान भरपाईसाठी मोबाईल प्रक्रियानुसार रिपोर्ट करू शकता.
- सगळ्यात आधी तुम्हाला प्ले स्टोरमध्ये जाऊन Crop Insurance App डाउनलोड करायचा आहे.
- डाउनलोड झाल्यावर अँप उघडून तुमच्या समोर डॅशबोर्ड ओपन होईल.
- त्यामध्ये तुमच्या सोयीनुसार भाषा निवडून पुढे जायचे आहे.
- त्यानंतर विमा लॉगिन करून पिकांचे खराबी झालेली आहे त्याचे रिपोर्ट करा.
- पुढे Crop Loss Intimation पर्यायावर क्लिक करणे.
- तुम्ही अर्ज करताना जो मोबाईल नंबर टाकला आहे तोच टाकून घेणे.
- नंतर तुम्हाला त्या नंबरवर ओटीपी येईल तो टाकून घेणे.
- ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल.
- त्यामध्ये तुमचे कोणत्या हंगामाचे पीक होते जसे Kharif किंवा Rabi ते निवडणे.
- पुढे तुम्हाला 2024 चे वर्ष टाकायचे आहे.
- ते केल्यावर Scheme मध्ये Pradhan Mantri Fasal Bima Yojana सिलेक्ट करायचे आहे.
- शेवटी तुमचे राज्य कोणते आहे? ते निवडणे.
- नंतर तुम्हाला from where did you enroll असा प्रश्न विचारतील त्यामध्ये तुमचे बँक किंवा CSC निवडणे.
- परत तुम्हाला Do you have application / policy number हा प्रश्न विचारतील ते निवडून done वर क्लिक करणे.
- तुमच्या समोर तुमची पॉलिसी उघडेल.
- शेवटी तुमच्या खराब पिकाचे फोटो आणि व्हिडिओ टाकून क्लेमसाठी अर्ज करायचा आहे.
- अशा प्रकारे तुमचे पीक भरपाईची क्लेम अर्ज प्रकिया पूर्ण झालेली आहे.
निष्कर्ष
आम्ही या लेखातून तुम्हाला PM Fasal Bima Yojana संदर्भात सविस्तर माहिती सांगितली आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला योजनेचे उद्देश काय आहेत? त्यांचे फायदे काय आहेत? कोणत्या पिकांसाठी विमा घेऊ शकता? यामध्ये अर्ज करण्यासाठी कोण कोण पात्र ठरणार आहेत? तसेच अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? आणि अर्ज केल्यानंतर स्टेटस कसे तपासायचे? अशा संपूर्ण माहिती या लेखातून तुम्हाला सोप्या पद्धतींमध्ये सांगितली आहे.
जर तुम्ही शेतकरी आहे आणि तुमच्या पिकांची सुद्धा नुकसानी झाली आहे किंवा होते आहे तर या योजनेचा फायदा घेऊन तुमची भरपाई करून घेऊ शकता. या योजनेचा फायदा जर तुम्ही पात्र असाल आणि सरकारने दिलेल्या पिकांच्या यादीनुसार तुमचेही पीक असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल.
आम्ही आशा करतो, या लेखातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल, हा लेख तुमच्या शेतकरी मित्रांना/मैत्रिणींना पाठवून त्यांनासुद्धा आर्थिक भरपाई करून घेण्यास मदत करा.
अशाच योजनेसंबंधित माहितीसाठी आम्हाला Subscribe करून ठेवा किंवा Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करा.
FAQs
राष्ट्रीय पिक विमा योजना कधी सुरू झाली?
राष्ट्रीय पिक विमा योजना 18 फेब्रुवारी 2016 रोजी सुरु करण्यात आली होती.
पीक विमा म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
पीक विमाच्या माध्यमातून तुम्हाला पिकांचे झालेले नुकसान भरपाई मिळते आणि यामध्ये खरीप व रब्बी हंगामाचे प्रकार आहेत.
पीक विम्याचे महत्त्व काय?
पीक विम्यातुन शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई करण्यात मदत होते.
फसल विमा योजनेसाठी कोण पात्र आहे?
फसल विमा योजनेसाठी भारतातील अनुसूचित क्षेत्रामधील सगळे शेतकरी पात्र आहे.
हे सुद्धा वाचा: