PM Awas Yojana New Gramin List Check 2024: असे चेक करा, पीएम आवास योजना ग्रामीणची नवीन लिस्ट

PM Awas Yojana New Gramin List Check 2024: ग्रामीण क्षेत्रामध्ये विकास होण्यासाठी खूप जलद गतीने पीएम आवास योजना ग्रामीणचे काम चालू आहे. ज्यामध्ये गरीब वर्गातील नागरिकांना योजनेच्या माध्यमातून सरकार घर उपलब्ध करून देत आहे.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

तुम्ही ग्रामीण क्षेत्रामधील असून दारिद्र्य रेषेखाली असाल तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला देखील घरासाठी आर्थिक मदत मिळविण्याची संधी मिळेल. तुम्ही या योजनेमध्ये अजूनही अर्ज केला नसेल, तर लवकरच ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून या योजनेचा लाभ मिळवा.

सध्याच केंद्र सरकारने पीएम आवास योजना ग्रामीण लिस्ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये ज्यांनी अर्ज केला असेल, त्यांची नावे या लिस्टमध्ये आलेली असेल. तर ज्यांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे, त्यांनी आर्टिकलमलध्ये दिलेल्या प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आपली नावे चेक करा.

PM Awas Yojana Gramin List 2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 2015 रोजी पीएम आवास योजना ग्रामीण या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रामध्ये गरिबी रेषेखाली राहत असलेल्या कुटुंबाना घर उपलब्ध करून देण्यासाठी 1,30,000 रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

ज्यामध्ये मध्यम वर्ग एक व दोन, अनुसूचित जाती व जमाती, आर्थिक दृष्टया कमकुवत असलेले नागरिक आणि सामाजिक आर्थिक जात जनगणना कायदा 2011 अंतर्गत मोडणारे कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

या योजनेमध्ये पात्र असलेल्या ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांनी ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज केला असेल, तर त्यांची नावे सरकारने पोर्टलवर सादर केलेल्या लिस्टमध्ये आलेले असेल. आपले नाव पोर्टलमध्ये जाऊन कशा प्रकारे चेक करायचे? याची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पीएम आवास योजना ग्रामीण लिस्ट कशी चेक करायची?

  • सर्वात प्रथम PMAYG योजनेच्या पोर्टलमध्ये प्रवेश करा.
  • त्यानंतर डॅशबोर्डमध्ये Awaassoft वर क्लिक करून Report ला सिलेक्ट करा.
  • स्क्रीनमध्ये Social Audit Reports यामधील Beneficiary Details for Verification मध्ये जावा.
  • पुढे स्क्रीनवरती MIS Report उघडून येईल, त्यामध्ये राज्य, जिल्हा, ब्लॉक व गाव निवडा.
  • त्यानंतर डॅशबोर्डमध्ये कॅप्चा कोड असेल, तो भरून सबमिट बटन दाबा.
  • स्क्रीनवर योजनेची संपूर्ण यादी उघडून येईल, त्यामध्ये अर्जदाराचे नावे तुम्ही पाहू शकता.

Also Read: