PM Awas Yojana Eligibility: प्रधानमंत्री आवास योजनाचा लाभ घेण्यासाठी आर्टिकलमध्ये पात्रतेच्या संपूर्ण अटी दिलेल्या आहे. ती सर्व अटी योजनेमध्ये अर्ज करण्याआधी जाणून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे अर्ज सरकारच्या माध्यमातून रद्द केले जाणार नाही.
भारत देशामधील गरीब व मध्यम वर्गातील कुटुंबाना आपले स्वतःचे घर उपलब्द करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 रोजी प्रधानमंत्री आवास योजनाची सुरुवात केली होती. ज्यामध्ये राज्य व केंद्र सरकार विविध क्षेत्राच्या परिस्थितीनुसार योजनेसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीचा वाटा उचलते.
भारत देशामधील त्या क्षेत्रांमधील योजनेमध्ये पात्र असलेल्या कुटुंबाना घरासाठी 1.2 लाख रुपये ते 1.3 लाख रुपये इतकी रक्कम प्रदान केली जाते. त्याचसोबत सरकारच्या इतर योजनांचा लाभ देखील लाभार्थ्यांना देण्यात येतो.
चला तर आपल्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोण पात्र आहेत? त्यासाठी कोणकोणत्या अटी लागू करण्यात आलेले आहे? अर्ज करणाऱ्या नागरिकांचे वय किती असावे? कोणत्या वर्गातील कुटुंबाना प्राध्यान्य दिले जाते?
प्रधानमंत्री आवास योजनाची पात्रता काय आहे?
- नागरिकांना आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी भारत देशामधील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- योजनेमध्ये अर्ज करणारे कुटुंब SECC 2011 च्या जनगणनामध्ये रजिस्टर असायला पाहिजे.
- देशामधील गरीब व दुर्बळ वर्गातील नागरिकांकडे योजनेमधून लाभ घेण्यासाठी स्वतःचे घर नसावे.
- कुटुंबातील एकाच सदस्याला योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
- तसेच ज्या जोडप्यांचे लग्न झाले आहे, त्यामधील देखील कोणी एक सदस्य अर्जासाठी पात्र असणार आहे.
- योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे महत्त्वाचे आहे.
- योजनाच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावाने घर नसावे.
- ज्या नागरिकांकडे 21 Sq Meter च्या आत पक्के घर असून दुरुस्त करण्यासाठी आर्थिक मदत हवी ते देखील योजने अंतर्गत पात्र आहेत.
Read More: