PM Aasha Yojana 2024: 35 हजार कोटींची पीएम आशा योजनासाठी देण्यात आली मंजुरी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Aasha Yojana 2024: बुधवारी केंद्रीय मंत्री मंडळाची बैठक झाली, त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेनुसार 2025-26 च्या वर्षासाठी प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (PM-AASHA) योजना अंतर्गत 35,000 कोटी रुपयांचा बजेट मंजूर करण्यात आले. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

जेणेकरून भारतामधील शेतकऱ्यांना व ग्राहकांना पीएम आशा योजना अंतर्गत फायदा होईल असे केंद्र शासनाने सांगितले आहे. या घोषणेमुळे देशभरात व शेतकरी वर्गात सर्वत्र योजने संबंधित चर्चा चालू आहे. 

तर आजच्या आर्टिकलमध्ये आपण जाणून घेणार आहोत, प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना नेमकी काय आहे? याची सुरुवात केंद्र सरकारने कधी केली होती? शेतकरी वर्गाला योजनेमधून काय फायदा मिळेल? त्याचप्रकारे कशा पद्धतीने फायदा दिला जातो? योजने अंतर्गत कोणकोणत्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे? त्यामुळे लेख शेवटपर्यंत बघा. 

PM Aasha Yojana in Marathi 

पीएम आशा योजनाचा पूर्ण अर्थ प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान असा होतो. तर केंद्र सरकारने सप्टेंबर, 2018 रोजी शेतकऱ्यांना चांगले दर मिळावे व ग्राहकांना महागाईमुळे समस्या होऊ नये यासाठी योजनेची सुरवात केली होती आणि ही योजना Ministry of Agriculture and Farmers Welfare अंतर्गत मोडते. 

2025-26 वर्षामध्ये केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातून तेलबियांच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या 25% उत्पादन हमी भावानुसार खरेदी करणार आहेत. यामधून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव व अधिक प्रमाणात तेलबिया खरेदी करण्यात येणार. 

त्याचप्रमाणे कडधान्य पिकांमधील मसूर, उडद व तूर 100% प्रमाणात केंद्र सरकार योजनेच्या मार्फत खरेदी करणार आहेत. 

NAFED अंतर्गत असलेले E-Samridhi Portal आणि NCCF च्या Esamyukti Portal मध्ये नोंद केलेल्या शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी केंद्र सरकारतर्फे योजनेमधून करण्यात येणार आहे.

Components of PM Aasha Yojana

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विविध प्रकारे आर्थिक मदत करण्यासाठी पीएम आशा योजनामध्ये 3 घटक समाविष्ट करून घेतले आहे. त्यांची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 

Price Support Scheme (PSS)

प्राईज सपोर्ट स्कीम अंतर्गत शेतकऱ्यांकडून फिसिकल मार्गातून डाळी, तेलबिया व सुखे खोबरे विकत घेण्यात येणार. यामध्ये NAFED व FCI चॅनेल अंतर्गत शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्यात येणार. यामध्ये होणारे नुकसान व सर्व खर्च केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

Price Deficiency Payment Scheme (PDPS)

प्राईज डेफिशिअन्सी पेमेंट स्कीम अंतर्गत शेतकऱ्यांना मार्केटमध्ये पिकांचे विक्री करत असताना जेवढा तोटा झाला आहे, त्याची भरपाई MSP व Selling/Model Price प्रमाणे केंद्र सरकारकडून थेट ट्रान्स्फर करण्यात येणार. 

Pilot of Private Procurement and Stockist Scheme (PPPS) 

या स्कीम अंतर्गत केंद्र सरकार भारतामधील मोठ्या खाजगी कंपन्यांना व एजंसीला शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन केले जाणार. ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगल्या दरात हमीभाव प्राप्त होऊन आर्थिक स्थिरता आणण्यात मदत होईल. 

Pradhan Mantri Annadata Aay SanraksHan Abhiyan Scheme 2024 Overview

योजनाचे नावप्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना
कोणासाठी सुरु केलीभारतामधील शेतकऱ्यांसाठी
कधी सुरु केलीवर्ष सप्टेंबर, 2018 मध्ये
विभागकृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार
लक्ष्यभारतामधील शेतकऱ्यांना योग्य दरात आर्थिक मदत करून उत्पन्न दुप्पट करणे
बजेट2024 मध्ये 35 हजार कोटी रुपये

PM Aasha Yojana Aim

शेतकऱ्यांना गॅरेंटीनुसार हमीभाव देऊन त्यांच्या उत्पनाला सुरक्षित करणे हे पीएम आशा योजनाचे मुख्य उद्देश केंद्र सरकारतर्फे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न प्राप्त होण्यात मदत होईल. 

आपल्या देशामधील कृषी क्षेत्र हे सर्वात मोठा भाग आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जास्त फायदा करून देण्यासाठी केंद्र सरकारने MSP म्हणजे Minimum Support Price या उपक्रमाची सुरुवात केली होती. ज्यामध्ये शेतकरी वर्गाला बाजारमध्ये पीक विक्रीसाठी प्रोत्साहन करत आहेत. 

ज्यामध्ये शेतकऱ्यांना चांगले भाव न मिळाल्यास केंद्र सरकार ठरवलेल्या भावानुसार त्यांना आर्थिक मदत करते. यामध्ये सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येत नाही. तसेच काही प्रमाणात MSP मध्ये समस्या आहेत, त्यांना दुरुस्थ करण्यासाठी व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा करून देणे हेच पीएम आशा योजनाचे लक्ष्य आहे. 

Importance of PM Aasha Yojana 

पीएम आशा योजनाचे महत्त्व खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहेत, ज्यामधून देशातील शेतकऱ्यांना विविध प्रकारे फायदा होणार आहे. 

  • प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना अंतर्गत फिसिकल पद्धतीने शेतकऱ्यांकडून तेलबिया, डाळ व कोपरा यांसारख्या पिकांचे खरेदी करण्यात येणार. 
  • त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून पिके खरेदी करण्याची सिस्टिम ही या योजनेमधून सुरु करण्यात आली. 
  • MSP मधील होणाऱ्या आव्हाना कमी त्यांच्यामधील गॅप भरण्यासाठी योजनेचा फायदा होणार आहे. 
  • तसेच शेतकरी वर्गाला मार्केटमध्ये अपयश आल्यास योजनेच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात स्थिर राहण्यात मदत मिळेल. 
  • प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान ही  योजना भारतामधील नवीन मार्केटला तयार करायचे काम करणार, ज्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होईल. 

Benefits of PM Aasha Yojana 

  • पीएम आशा योजनाचे फायदे भारतामधील शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात होणार आहे. 
  • शेतकऱ्यांना जरी मार्केटमध्ये हमीभाव हवा तसा मिळाला नाही तरी देखील केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातून मदत करणार. 
  • त्याचप्रमाणे MSP ला घेऊन जे आव्हाने केंद्र सरकारला आले, त्यांना सुद्धा नव्याने बदल घडून योग्यरीत्या करण्यात येणार. 
  • केंद्र सरकाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत व फायदा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजनेचे कालावधी 2025-26 पर्यंत वाढविण्यात आलेले आहेत. 
  • प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान स्कीमसाठी केंद्र सरकारने 35 हजार कोटी रुपयांचा आर्थिक बजेट मंजूर केला आहे. 
  • ज्या शेतकऱ्यांनी NAFED आणि NCCF या दोन्ही पोर्टलमध्ये नोंदणी केली आहे, त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक खरेदीसाठी आर्थिक मदत केली जणार आहे. 
  • शेतकऱ्यांना योग्यरीत्या आर्थिक मदत करून दुप्पट उत्पन्न करण्यासाठी शासनाने PSS, PDPS, PPPS आणि MIS यांसारख्या घटकांचा समावेश योजनेमध्ये केले आहे.
  • MSP अंतर्गत 22 पिकांची खरेदी केंद्र सरकारकडून करण्यात येते. 
  • त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार खाजगी एजन्सीना व कंपनीना प्रोत्साहित करते. 
  • यामध्ये ज्या शेतकरी नागरिकांनी सुरुवातीलाच प्री-रजिस्ट्रेशन केले आहे, त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 
  • शेतकऱ्यांना मालाची विक्री दरम्यान झालेल्या तोटीसाठी योजनेमध्ये अर्ज करून नुकसानीचे भरपाई केंद्र सरकारच्या माध्यमातून करून घेऊ शकतात. 

Challenges in PM Aasha Yojana 

पीएम आशा योजनाचे काही आव्हाने आहे, ज्यामुळे MSP सारखे उपक्रम योग्यरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही ते खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत.  

  • नीती आयोगच्या 2016 च्या रिपोर्टच्या माध्यमातून सांगल्यात आले, भारतामध्ये स्टोरेज करायचे सुविधा व पायाभूत सुविधा उपल्बध नाही. 
  • पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याकारणामुळे केंद्र सरकारतर्फे जास्त प्रमाणात पिकांची खरेदी करण्यात येत नाही. 
  • त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून पिके घेण्यास व ग्राहकांना देण्यास वितरण सिस्टीम व्यवस्थित नाही. 
  • NAFED जवळ शेतकऱ्यांकडून घेतलेला जवळपास 4 मिलियन टन तेलबियांचा माल आहे, परंतु वितरण सिस्टिम नसल्या कारणांमुळे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे समस्या निर्माण झाली आहे. 
  • त्याचप्रकारे मालाची खरेदी विक्री करत असताना मार्केटमधील मधले ट्रेडर्स जास्त प्रमाणात घोळ करतात. 
  • प्रत्येक राज्यांजवळ शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्यास व साठवून ठेवण्याची सुद्धा मर्यादा ठरवून ठेवण्यात आलेली आहे. 
  • तसेच मार्केटमधील बसलेल्या एजेन्सीच्यामार्फत शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी केली जात नाही, यामुळे शेतकरी आर्थिक समस्यांना सामोरे जात आहेत. 
  • भारतामध्ये अन्न धान्याचे सप्लाय जास्त प्रमाणात होती आणि मागणी कमी प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका आर्थिक स्वरूपात बसतो. 

निष्कर्ष 

आम्ही तुम्हाला लेखाच्या माध्यमातून PM Aasha Yojana म्हणजेच प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये योजना का जास्त चर्चेत आली? केंद्र सरकारने 2025-26 वर्षासाठी किती रुपयांचा बजेट सादर केला आहे? ही  योजना सुरु करण्यामागचे त्यांचे उद्देश काय आहे? कोणत्या विभागाचा समावेश करण्यात आलेला आहे? कोणकोणते पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला जातो?

कोणते तीन घटकांचा समावेश योजनांमध्ये करण्यात आलेला आहे? त्यामध्ये योजनेचे महत्त्व काय आहे? कोणकोणते फायदे शेतकऱ्यांना दिले जाते? आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोणकोणती आव्हाने केंद्र सरकारजवळ आहे? अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही लेखातून केला आहे. 

तुम्ही शेतकरी असून तुम्हाला पाहिजे तसे मार्केट भाव विक्रीत करताना मिळत नसल्यास पीएम आशा योजनेचा लाभ घ्या आणि आपली आर्थिक परिस्थिती बळकट करा. अशाच योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम किंवा व्हाट्सअप चॅनेला जॉईन करू शकता व नवीन अपडेट्स  पाहू शकता.  

FAQs

पीएम आशा योजनासाठी किती बजेट मंजूर करण्यात आले? 

केंद्र सरकारतर्फे योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले. 

केंद्र सरकारतर्फे पीएम आशा योजना अंतर्गत कोणत्या पिकांचे खरेदी 100% करण्यात येणार? 

केंद्र सरकारतर्फे पीएम आशा योजना अंतर्गत तूर, मसूर व उडद या पिकांची खरेदी १००% करण्यात येणार. 

प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियानची सुरुवात कधी करण्यात आली? 

प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान सुरुवात सप्टेंबर, 2018 रोजी केंद्र सरकारतर्फे करण्यात आली. 

PM Aasha Yojana चा पूर्ण अर्थ काय आहे? 

PM Aasha Yojana चा पूर्ण अर्थ प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना आहे. 

पीएम आशा स्कीममध्ये कोणत्या घटकांचा समावेश केला आहे. 

पीएम आशा स्कीममध्ये PSS, PDPS, PPPS आणि MIS या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. 

Read More: