Paramparagat Krishi Vikas Yojana 2024: देशामधील शेतकऱ्यांसाठी परंपरागत कृषी विकास योजना (PKVY) केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कृषी वर्गातील शेतकऱ्यांना जैविक शेती करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत पुरवली जाते. जेणेकरून जैविक शेती संबंधित उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ होण्यात मदत मिळेल.
सध्या सगळीकडे नैसर्गिक शेतीची चर्चा चालू आहे, कारण आपल्या देशामध्ये 86% शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांना अजैविक शेती करण्यासाठी परवडत नाही, कारण या शेतीमध्ये जास्त प्रमाणात पैशांची गुंतवणूक करावी लागते. यासाठी केंद्र सरकारने 2020-21 मध्ये भारतीय प्रकृती कृषी पद्धती (BPKP) ची सुरुवात परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत केली. यामध्ये देशभरातील शेतकरी वर्गांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
आपल्या भारत देशामध्ये जास्त प्रमाणात जैविक शेतीवर लक्ष केंद्रित केले जाते. जैविक शेती म्हणजे एकप्रकारे माणसांनी तयार केलेली शेती, ज्यामध्ये केमिकलचा वापर केला जात नाही. यामुळे देशभरात कीटकनाशक व कृषी संबंधित रसायने कमी वापरली जातात. केंद्र सरकारने यामुळे जैविक शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात उत्पादन प्राप्त होण्यासाठी PKVY योजनाची सुरुवात केली.
आज आपण आपल्या लेखातून या योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये योजना काय आहे? त्यांचे उद्देश काय आहेत? त्यामधून कोणते फायदे दिले जातात ? यामध्ये कोण कोण पात्र असणार आहेत? लाभार्थ्यांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता पडणार आहे? तसेच शेतकरी कशाप्रकारे अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो? अशा सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत लेख पहा.
Paramparagat Krishi Vikas Yojana in Marathi
भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी परंपरागत कृषी विकास योजनाची सुरुवात वर्ष एप्रिल 2015 रोजी केली होती. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे मुख्य उद्देश देशभरात जैविक शेतीला प्रोत्सहन देणे आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय करते. PKVY ही योजना भारतातील शाश्वत शेतीचे राष्ट्रीय अभियानाचा एक भाग आहे आणि ते सॉईल हेल्थ व्यवस्थापना अंतर्गत येते.
या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 3 वर्षासाठी प्रति हेक्टर 50,000 रुपये आर्थिक स्वरूपात जैविक शेती करण्यासाठी दिले जातात. ज्यामध्ये बियाणे, कीटकनाशक व सेंद्रिय खत विकत घेण्यासाठी 31 हजार रुपये आणि बाकीचे मार्केटिंग व क्लस्टर निर्माण करायला एकूण रक्कम दिली जाते. क्लस्टर फॉर्मशनच्या अंतर्गत पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी व त्यांच्या 50 एकरपेक्षा जास्त जमीनी यांना एकत्रित करून त्यांच्या जमिनीमध्ये ऑरगॅनिक फार्मिंगबद्दल सर्वाना एकत्र प्रशिक्षण दिले जाते.
Components of PKVY Scheme
- Modern Organic Cluster Demonstration: यामध्ये शेतकऱ्यांचे समूह तयार करून आधुनिक जैविक शेती करून दाखवली जाते.
- Model Organic Farm: यामध्ये लहान व मध्यम आकाराच्या भूखंडामध्ये विविध प्रकारची प्रजाती एकत्रित करून इकोसिस्टिम बनविली जाते.
- PKVY Induced Cluster Formation: यामध्ये मंत्रालय एकप्रकारे क्लस्टर तयार करते, ज्यामध्ये 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकत्रित करून जैविक शेतीबद्दल प्रोत्साहन दिले जाते.
Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | परंपरागत कृषी विकास योजना (PKVY) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु कोणी केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
कधी सुरु केली | एप्रिल, 2015 मध्ये |
विभाग | कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | देशभरात जैविक शेतीबद्दल प्रोत्साहन देणे |
लाभार्थी | भारत देशामधील शेतकरी वर्ग |
लाभ | 3 वर्षासाठी 50,000 रुपये आर्थिक मदत |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | https:pgsindia-ncof.gov.in/PKVY |
Paramparagat Krishi Vikas Yojana Objectives
केंद्र सरकारने सुरु केलेल्या परंपरागत कृषी विकास योजनाचे मुख्य उद्देश देशभरात अजैविक शेतीच्या प्रमाणाला कमी करून जैविक शेतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत देणे आहे. जेणे करून शेतकरी जैविक शेती करण्यासाठी पुढाकार घेईल आणि नागरिकांना पौष्टीक जेवण मिळण्यासाठी मदत होईल.
त्याचप्रमाणे कृषी जमिनीमध्ये प्रजनन क्षमता वाढविण्यास क्लस्टर घटकांचा वापर करून प्रोत्साहन देणे. ज्यामुळे शेत जमिनीमधील मातीची गुणवत्ता वाढवून सुधार आणण्यास मदत मिळेल. योजनेच्या माध्यमातून केमिकलयुक्त रसायने व कीटकनाशके वापरणे कमी करणे हे ध्येय सरकारने ठेवले आहेत.
Paramparagat Krishi Vikas Yojana Benefits
- केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत विविध प्रकारचे फायदे दिले जातात.
- शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून जैविक शेती करण्यासाठी प्ररित केले जाते.
- शेतकऱ्यांना जैविक शेतीसंबंधित माहिती देण्यासाठी PKVY Induced Cluster Formation घटकाचा वापर केला जातो.
- या योजनेमधून केंद्र सरकार जैविक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत करते.
- या आर्थिक स्वरूपाच्या मदतीमध्ये सरकार शेतकऱ्यांना 3 वर्षासाठी प्रति हेक्टर 50,000 रुपये रक्कम प्रदान करते.
- त्या पन्नास हजार रुपयांमध्ये 31,000 रुपये कीटकनाशक व बियाणेसाठी, 8800 रुपये मूल्यवर्धन व वितरण म्हणून देते, त्याचबरोबर 3000 रुपये रक्कम क्षमता वाढविण्यासाठी प्रदान केले जातात.
- शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या रक्कमेला थेट बँक खात्यामध्ये डीबीटीमार्फत पाठविले जाते.
- ही Scheme Soil Health अंतर्गत येते त्यामुळे जमिनीमधील मातीची गुणवत्ता वाढविण्यावर सुद्धा फोकस केला जातो.
- त्याचप्रमाणे या योजनेच्या माध्यमातून देशभरामध्ये जैविक शेतीसोबत नैसर्गिक शेतीलासुद्धा प्रोत्साहन दिले जाते.
- केंद्र सरकारने PKVY योजना अंतर्गत देशभरामध्ये 1197 कोटी रुपये खर्च मागील चार वर्षांमध्ये केला आहे.
- PKVY योजना अंतर्गत 60:40 चे प्रमाण ठरवले गेले आहे, यामध्ये केंद्र सरकार 60% व राज्य सरकार 40% खर्च देते.
- ईशान्येकडील राज्यांना तसेच हिमालय राज्यामध्ये 90% केंद्र सरकार व 10% राज्य सरकारला आर्थिक मदत करावी लागते.
- आपल्या भारत देशामधील सिक्कीम राज्य हे पहिले ऑर्गनिक राज्य म्हणून ठरले आहेत.
- देशामधील मोठ्या शहरांमध्ये मध्य प्रदेशला पहिले ऑरगॅनिक सर्टिफिकेशन प्राप्त झाले आहेत.
Paramparagat Krishi Vikas Yojana Eligibility
शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजनामध्ये पात्र असणे आवश्यक आहे. यासंबंधित पात्रता जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे अटी दिलेल्या आहेत.
- PKVY योजनामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी नागरिक भारताचा स्थानिक रहिवासी असणे.
- सरकारने सुरु केलेल्या योजनेमध्ये फक्त शेतकरी वर्गातील नागरिक अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
- शेतकऱ्यांना योजनेमधून लाभ घेण्यासाठी स्वतःची शेतजमीन असणे बंधनकारक आहे.
- अर्ज करताना शेतकऱ्यांकडे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे उपलब्ध असणे.
- या योजनेमध्ये अर्ज करणारा शेतकरी बंधू 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटामधील असणे.
Paramparagat Krishi Vikas Yojana Required Documents
परंपरागत कृषी विकास योजनामध्ये आवश्यक असणारे कागदपत्रे शेतकरी बांधवांकडे असणे गरजेचे आहे. यासाठी खालीलप्रमाणे संपूर्ण यादी दिली आहे, त्यानुसार कागदपत्रे जमा करणे.
- शेत जमिनीचे पुरावे (संपूर्ण कागदपत्रे)
- स्थानिक रहिवासी दाखला
- रेशनकार्ड
- अर्जदार शेतकऱ्याचे आधारकार्ड (बँक लिंक असणे)
- शेतकऱ्याचे बँक खात्याचे पुरावे (पासबुकचे पहिले पान)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- चालू असलेला मोबाइल नंबर
- ओळखपत्र (वोटर आयडी/पासपोर्ट/पॅनकार्ड)
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- ई-मेल आयडी
Paramparagat Krishi Vikas Yojana Apply Online
शेतकरी वर्गातील नागरिकांना लाभ घेण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजनामध्ये ऑनलाइन अर्ज करावा लागेल आणि तुम्ही ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करू शकता.
- PKVY योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल.
- वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल.
- त्या होमपेजमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन पर्यायामध्ये गेल्यानंतर तुम्ही नवीन पेजमध्ये एंटर कराल.
- त्या नवीन पेजमध्ये Individual Farmer या ऑपशनवर क्लिक करा.
- त्यामध्ये गेल्यावर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल ती भरून घेणे.
- माहिती भरून झाल्यावर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी यूजर आयडी व पासवर्डची गरज लागेल.
- यासाठी आयडी व पासवर्ड तयार करून लॉगिन करून घ्या.
- त्यानंतर तुम्हाला योजनाचे फॉर्म दिसेल, त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, राज्य व पूर्ण पत्ता भरावा लागेल.
- फॉर्ममधील माहिती भरून झाल्यानंतर लागणारी कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
- इथे तुमचा अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण होईल आणि तुमच्या मोबाईलवर रजिस्टर नंबर येईल तो सांभाळून ठेवणे.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता.
PKVY Portal Login
परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करणे महत्त्वाचे आहे, यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया दिल्या गेल्या आहेत त्या फॉलो करणे.
- सर्वात प्रथम तुम्हाला PKVY योजनाची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे.
- वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला होमपेजमध्ये लॉगिनचा पर्याय दिसेल, त्यामध्ये जाणे.
- लॉगीनमध्ये गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणे.
- त्यामध्ये गेल्यावर तुम्हाला तुमची माहिती टाकून नवीन आयडी व पासवर्ड तयार करावे लागेल.
- माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट बटन दाबायचे आहे.
- अशाप्रकारे तुम्ही लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून पोर्टल लॉगिन करू शकता.
निष्कर्ष
आमच्या या आर्टिकलमध्ये Paramparagat Krishi Vikas Yojana (PKVY) संदर्भात संपूर्ण माहिती देऊन सविस्तररित्या मार्गदर्शन केले गेले आहे. यामध्ये योजना का सुरु केली? कोणासाठी सुरु केली? कशासाठी सुरु करण्यात आली? यामध्ये कोणते विभाग काम करत आहेत? त्यामध्ये किती घटकांचा समावेश आहे? त्यासोबत प्रमुख उद्देश काय होते? यातून कोणत्या प्रकारचे फायदे दिले जाते? यामध्ये नागरिकांना अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार? पात्र असतील तर कागदपत्रे कोणती लागणार? योजनेत अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रक्रिया कराव्या लागणार? आणि पोर्टल लॉगिन पद्धत कोणती? हे सुद्धा लेखातून तुम्हाला सांगण्यात आलेले आहे.
सर्वसामान्यांच्या आहाराचा विचार करता, केंद्र सरकारने कृषी विभागात आपल्या देशाची चांगली वाढ होण्यासाठी उत्तम योजना सुरु केली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर परंपरागत कृषी विकास योजनातून जास्तीत जास्त जैविक शेती करण्यासाठी पुढाकार घ्या.
तुम्हाला आमचा लेख उपयुक्त वाटला असेल तर आमच्या Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करून अशाच योजनांचे नवीन अपडेट्स त्वरित मिळवा.
FAQs
परंपरागत कृषि विकास योजनेसाठी कोण पात्र आहेत?
या योजनेसाठी भारत देशामधील संपूर्ण शेतकरी वर्ग पात्र आहेत.
PKVY योजनेचा पूर्ण अर्थ काय आहे?
PKVY चा पूर्ण अर्थ परंपरागत कृषी विकास योजना असा आहे.
Paramparagat Krishi Vikas Yojana कधी सुरु झाली?
केंद्र सरकारकडून या योजनेची सुरवात 2015 च्या एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आली होती.
पुढे वाचा: