Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना राज्यामधील अनुसूचित जमातीच्या कुटुंबामधील विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतर राज्यांमध्ये निवास, भोजन व शैक्षणिक खर्चासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास एकूण 495 पेक्षा जास्त वसतीगृहे आहेत आणि त्यामध्ये एकूण 61,070 इतकी क्षमता विदयार्थी वर्गासाठी आहे. परंतु त्यामध्ये 491 वसतिगृहे हे शासकीय कार्यरत असून त्यामध्ये मुलांसाठी 208 तर मुलींसाठी 283 इतके वसतीगृह दोघांमध्ये वाटप केले आहेत.
या 491 शासकीय वसतीगृहांमध्ये 58,495 इतकी विद्यार्थी क्षमता आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मागील शैक्षणिक 3 वर्षांमध्ये सरासरी 75 हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त प्रवेश अर्ज केले जातात. परंतु राज्यामध्ये क्षमता कमी असल्याने, बाकीच्या राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही.
त्यामध्ये आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या कुटुंबामधील विद्यार्थ्यांना वसतीगृहांमध्ये प्रवेश न मिळाल्याने, त्यांना काही वेळेला शिक्षण सोडावे लागते तर काही वेळेला कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण करावे लागते. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार, निवास व भोजन यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना सुरु केली.
याच योजने संबंधित आपण आजच्या आपल्या लेखातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, तर तुम्ही आर्टिकल शेवटपर्यंत वाचा व योजनेचा लाभ घ्या.
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana in Marathi
महाराष्ट्र शासनातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनाची सुरुवात 15 ऑक्टोबर, 2016 रोजी करण्यात आली होती. यामध्ये लाभार्थ्यांना आर्थिक मदत योग्यरीत्या पाठविण्यासाठी आदिवासी विकास विभाग अंमलबजावणी करते.
या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना भोजन, गृह निवास व शैक्षणिक खर्चासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. राज्य सरकारचे योजनेच्या अंतर्गत मुख्य उद्देश गृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इतर राज्यात राहण्यासाठी सोय करून देणे आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार तीन टप्प्यांच्या आधारित विविध ठिकाणांसाठी विद्यार्थी वर्गाला आर्थिक मदत करते, त्याचे संपूर्ण तक्ता व आर्थिक लाभ खालीलप्रमाणे दिले आहेत.
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Funding
अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या भत्त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहेत.
खर्चाचे वर्णन | मुंबई व उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व नागपूर ठिकाणासाठी आर्थिक लाभ (रुपये) | शहरामधील व महानगरपालिका वर्गामधील महसूल विभागीय मुख्यालयासाठी आर्थिक खर्च (रुपये) | इतर जिल्ह्यांसाठी आर्थिक भत्ता (रुपये) |
भोजन भत्ता | 32,000 | 28,000 | 25,000 |
निवास भत्ता | 20,000 | 15,000 | 12,000 |
निर्वाह भत्ता | 8,000 | 8,000 | 6,000 |
एकूण वार्षिक खर्च | 60,000 | 51,000 | 43,000 |
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Overview
योजनेचे नाव | पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
कधी सुरु केली | 15 ऑक्टोबर, 2016 रोजी |
विभाग | आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन |
उद्देश | अनुसूचित जमाती वर्गामधील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक संबंधित सुविधांसाठी आर्थिक मदत करणे |
लाभार्थी | अनुसूचित जमाती कुटुंबातील १२ वी पास विद्यार्थी |
लाभ | प्रतिवर्ष 43,000 रुपये पासून ते 60,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत |
अर्ज प्रकिया | प्रकिया ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | swayam.mahaonline.gov.in |
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Objectives
महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनाचे मुख्य उद्देश राज्यामधील अनुसूचित जमाती वर्गातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसाठी आर्थिक स्वरूपात मदत पाठविणे आहे. जेणेकरून शासकीय निवास गृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, त्यांना खाजगी व इतर संस्थेच्या गृहात राहण्यास मदत मिळेल.
त्याचसोबत यामध्ये गरीब घराण्यामधील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याकारणामुळे, त्यांना आर्थिक गोष्टींची चिंता करावी लागणार नाही. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले शिक्षण योग्यरीत्या घेण्यासाठी व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
आपल्या राज्यामध्ये शिक्षणासोबत इतर गोष्टींमध्ये सुद्धा महागाई वाढली आहे, यामुळे तरुणांना आपल्या जागेवरून दुसऱ्या जागी जाताना जास्त प्रमाणात खर्च होतो. त्यामध्ये अनुसूचित जमातीमधील काही कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबले जाते, यामुळे ते बेरोजगारीच्या जाळ्यात अडकतात आणि कुटुंब आणखी गरिबीच्या स्थितीमध्ये जाते.
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Benefits
- पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनाचा फायदा महाराष्ट्र राज्यामधील अनुसूचित जमातीमधील विद्यार्थी वर्गाला दिला जातो.
- या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विद्यार्थ्यांना राज्य शासनातर्फे आर्थिक स्वरूपात मदत पाठविली जाते.
- बारावी पास होऊन पदवीसाठी किंवा पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो.
- लाभार्थ्यांना योजनेच्या अंतर्गत उच्च शिक्षणाकरता निवास, भोजन व शैक्षणिक साहित्यांसाठी होणारा खर्च दिला जातो.
- महाराष्ट्र शासनातर्फे योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फरद्वारे रक्कम पाठवली जाते.
- लाभार्थ्यांना शहरी क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक वर्षाला एकूण 60 हजार रुपये बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केले जाते.
- त्याचप्रमाणे इतर महसुली विभागीय मुख्यालय शहरातील व महानगरपालिका वर्गामध्ये उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी वर्षाला 51 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
- तसेच ग्रामीण भागातील जिल्ह्यांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 43 हजार रुपये रक्कम दरवर्षी देण्यात येते.
- पंडित दीनदयाळ योजने अंतर्गत वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला 5,000 रुपये आणि 2,000 रुपये अन्य शाखेतील विद्यार्थी वर्गाला शिक्षणाच्या साहित्यासाठी लागणारे खर्चाच्या स्वरूपात दिले जाते.
- लाभार्थी विद्यार्थीला योजनेमध्ये फक्त 7 वर्षासाठी लाभ दिला जातो.
- योजने अंतर्गत दिव्यांग व आदिम जमातीचे विद्यार्थीसुद्धा अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Eligibility
विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनाची पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे, यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या अटीनुसार पात्र असणे.
- या योजने अंतर्गत अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा स्थानिक रहिवासी असणे.
- फक्त अनुसूचित जमाती (ST) व दिव्यांग वर्गातील विद्यार्थी योजनेसाठी पात्र आहेत.
- योजनेमध्ये 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असणार.
- त्याचप्रमाणे पदवी झाल्यानंतर पदव्युत्तरसाठी शिक्षण घेत असेलला विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतो.
- आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वस्तीगृहसाठी अर्ज केलेले, परंतु त्यांना प्रवेश मिळाला नाही असे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
- अर्जदारांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- 2 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थीला लाभ मिळणार नाही. यासाठी कमीतकमी 3 वर्षाचा अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे आधारकार्ड असून ते राष्ट्रीयकृत बँक खात्यासोबत जोडलेले असणे.
- ज्या ठिकाणी विद्यार्थी राहतो, त्या शहरामधील निवासगृहांसाठी अर्ज करण्यास पात्र नसणार.
- विद्यार्थीला योजने अंतर्गत लाभ मिळाल्यानंतर संबंधित शहरामध्येच राहणे बंधनकारक आहे.
- एक विद्यार्थी फक्त एकच वेळा योजनेमधून लाभ घेऊ शकतो.
- विद्यार्थीला भारतीय, फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था या संबंधित अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय किंवा संस्थेकडून प्रवेश मिळालेले असणे.
- महाविद्यालयामध्ये किंवा संस्थेमध्ये 75% ते 80% विद्यार्थ्यांचे उपस्थिती असणे.
- ज्या विद्यार्थीला चांगले गुण आहेत, त्यांचा आधी विचार केला जाईल.
- त्याचसोबत सलग 3 ते 4 वर्षासाठी योजनेचा लाभ घेण्यास विचार करत असाल, तर प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
- योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे वय 28 वर्षाच्या खाली असणे.
- तरुणांनी आदिवासी विकास विभाग किंवा सामाजिक न्याय विभाग यांच्या अंतर्गत असणाऱ्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश केलेला नसणे.
- नोकरी व व्यवसाय करत असलेले विद्यार्थीं योजनेसाठी पात्र नसणार.
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Required Documents
रजिस्ट्रेशन करताना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनामध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे स्वतःकडे असणे, यासाठी सर्व कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे दिली आहे.
- अर्जदाराचे आधारकार्ड (बँक खात्यासोबत लिंक असणे)
- कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न दाखला
- जातीचा दाखला
- 12 वी पूर्ण झालेले मार्कशीट
- दिव्यांग असलेल्या विद्यार्थीचे प्रमाणपत्र
- कोणतेही एक स्थानिक रहिवासी पुरावा (जन्माचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र/मतदान कार्ड/रेशनकार्ड/ शाळा सोडल्याचा दाखला)
- विद्यार्थीने शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याचे शपथपत्र
- बँक खात्याची माहिती (पासबुकचे पहिले पान)
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- महाविद्यालयाचे बनाफाईड सर्टिफिकेट
- विद्यार्थी विवाहित असल्यास पुरावा
- भाड्याने राहत असाल तर (भाडे करार कागद)
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Registration
विद्यार्थ्यांना दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागेल.
- सुरुवातीला Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana ची अधिकृत वेबसाइट उघडा.
- त्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडून येईल तो भरून लॉगिन आयडी तयार करा.
- त्या फॉर्ममध्ये तुम्हाला आधार क्रमांक, तुमचे नाव, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल नंबर आणि पासवर्ड तयार करा.
- पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकून Save बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही पुन्हा डॅशबोर्डवरती पोहचाल तिथे यूजर आयडी, पासवर्ड व कॅप्चा टाकून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर डॅशबोर्ड उघडेल, त्याच्या डाव्या बाजूला Application असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एप्लिकेशन फॉर्म उघडून येईल, त्यामध्ये सर्व माहिती भरून घ्या.
- योजनेसाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती भरून घ्या.
- त्यानंतर शेवटी तुम्हाला काही नोटीस असेल, ती वाचून टिक करा आणि पुढे सबमिट करा.
- पुन्हा फॉर्म सबमिट केल्यावर तुम्ही Upload Documents मध्ये जाऊन कागदपत्रे स्कॅन करा व अपलोड करा.
- त्यानंतर तुम्ही डॅशबोर्डमधील View Form यावर क्लिक करून प्रिंट काढून घ्या.
- त्या फॉर्मची प्रिंट तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन जमा करणे.
- अशा पद्धतीने तुमचे पंडित उपाध्याय योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होईल.
निष्कर्ष
अशा पद्धतीने Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana संबंधित संपूर्ण माहिती आम्ही लेखातून दिली. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना काय आहे? त्यांची आर्थिक मदत, उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज प्रकिया अशा सर्व गोष्टींची माहिती सविस्तररित्या सांगितली.
तुम्ही सुद्धा अनुसूचित जमातीमधील असाल तर या योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घ्या आणि तुमचे शिक्षण पूर्ण करा.
FAQs
स्वयम योजनेसाठी कोण पात्र आहे?
स्वयम योजनेसाठी अनुसूचित जमाती कुटुंबातील विद्यार्थी पात्र आहे.
पंडित दीनदयाळ योजना काय आहे?
या योजेनच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील ST वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसाठी आर्थिक मदत केली जाते.
Pandit Dindayal योजनामध्ये अर्ज कसा करायचा?
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी swayam.mahaonline.gov.in या वेबसाइटमध्ये जाऊन करायचा.
पुढे वाचा: