NPS Vatsalya Yojana 2024: केंद्र सरकारने 18 सप्टेंबर, 2024 रोजी एनपीएस वात्सल्य योजना लहान मुलांच्या भविष्याला उज्ज्वल बनविण्यासाठी पेन्शन स्वरूपात स्कीम सुरु केली. भारतामधील नागरिक आपल्या लहान मुलांसाठी NPS Vatsalya Scheme अंतर्गत गुंतवणूक करून भविष्यामध्ये शिक्षणासाठी व इतर गोष्टींसाठी खर्च करू शकतात.
NPS म्हणजे National Pension Scheme जी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाते आणि हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. याचाच एक भाग म्हणून लहान मुलांना पेन्शन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2024-25 च्या झालेल्या अर्थ संकल्पनेत वात्सल्य योजना संबंधित कल्पना देण्यात आली होती.
नुकतेच दिल्लीमधून केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती. निर्मला सीतारमण यांनी लहान मुलांसाठी पेंशन स्कीमची घोषणा केली त्याचे नाव NPS Vatsalya असे ठेवण्यात आले. आपल्या महाराष्ट्रामधील मुंबई, नांदेड, पुणे व नागपूर या जिल्ह्यामधील राज्य स्तरीय बँकेतर्फे प्रोग्राम ठेवण्यात आले आणि त्यामध्ये श्रीमती. निर्मला सीतारमण यांनी विडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून योजना लॉन्च केली.
आज आपल्या लेखातून याच पेन्शन योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. लेखामध्ये योजना काय आहे? त्यांचे उद्देश काय आहेत? कोणकोणते फायदे मिळणार? पात्रतेच्या अटी कोणत्या असणार? अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती लागणार? योजनेमध्ये अर्ज कसा करायचा? व कुठे अर्ज करायचा? या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत आर्टिकल पहा.
NPS Vatsalya Yojana in Marathi
एनपीएस वात्सल्य योजनाची सुरुवात केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती. निर्मला सीतारमण यांनी 18 सप्टेंबर, 2024 रोजी केली. सरकारचे ही योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्देश मुलांचे भविष्य आर्थिकदृष्टया सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या पालकांना पेन्शन खात्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन करणे आहे.
योजनेचे Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) च्या माध्यमातून प्रशासन व नियमन केले जाणार, ही Authority Atal Pension Yojana चे सुद्धा नियमन करायचे काम करतात.
NPS Vatsalya ही पेन्शन स्कीम असून ती लहान मुलांसाठी तयार केली गेली आहे. यामध्ये गरीब कुटुंबातील पालक सुद्धा खाते उघडून वर्षाला कमीतकमी 1,000 रुपयांची गुंतवणूक करू शकतात, म्हणजेच दर महिन्याला 100 रुपयांपर्यंतची रक्कम ते सहजपणे जमा करू शकतात.
योजने अंतर्गत वर्षाला एक हजार रुपयांपेक्षा जास्त कितीही रक्कम गुंतवणूक करू शकता, त्यामध्ये कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. ही दीर्घकालीन गुंतवणूक असून संपत्ती कंपाउंड होत राहील आणि त्याचा फायदा लाभार्थ्यांना होणार आहे.
योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांना PRAN Card म्हणजे Permanent Retirement Account Number दिला जाणार, जे National Pension System (NPS) चा भाग असणार.
National Pension System Vatsalya Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | एनपीएस वात्सल्य योजना |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
कधी लाँच केली | 18 सप्टेंबर, 2024 रोजी |
कोणी लाँच केली | श्रीमती. निर्मला सीतारमण, केंद्रीय वित्त मंत्री |
विभाग | पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) |
उद्देश | देशामधील लहान मुलांचे भविष्य आर्थिकदृष्टया सुरक्षित ठेवणे |
लाभार्थी | भारत देशामधील लहान मुले |
लाभ | लाभार्थीला 18 वर्षानंतर चांगले कंपाऊंडिंग रिटर्न प्राप्त होणार |
अर्ज प्रकिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | लवकरच येईल |
NPS Vatsalya Scheme Aim
एनपीएस वात्सल्य योजनाचे मुख्य उद्देश भारत देशामधील लहान मुलांना पेन्शन स्वरूपात मदत होण्यासाठी पालकांना प्रोत्साहन देणे आहे. जेणेकरून मुलांच्या भविष्याला उज्ज्वल करता येईल आणि त्यांना आर्थिकदृष्टया शिक्षणासाठी व इतर गोष्टींसाठी मदत मिळेल.
आपल्या देशामधील काही गरीब कुटुंब आहेत, ज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे मुलांचे शिक्षण, आरोग्य व लग्न यासाठी खर्च करण्यास ते सक्षम नसतात. यामुळे अशा मुलांचे भविष्य आर्थिकदृष्टया कमकुवत होते, याचा तोटा मुलांसोबत देशाच्या आर्थिक व्यवस्थेलासुद्धा होतो.
देशभरातील अशा कुटुंबाना आपल्या मुलांच्या आर्थिक समस्यांना सोडवण्यासाठी केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातून मदत करत आहे. ज्यामध्ये गरीब कुटुंबामधील पालक आपल्या मुलांसाठी वर्षाला फक्त काही रक्कम गुंतवणूक करून भविष्यात चांगले लाभ मिळवू शकतात.
NPS Vatsalya Yojana Benefits
- केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु केलेल्या एनपीएस वात्सल्य योजनाचे फायदे देशभरातील लहान मुलांना पेंशन स्वरुपात घेता येणार.
- केंद्र सरकारच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना PRAN नंबर दिला जातो, जो कायमस्वरूपी त्यांच्या सोबत राहणार.
- पालक योजनेच्या माध्यमातून वर्षाला 1 हजार रुपये किंवा त्याच्या पेक्षा जास्त रक्कम भरू शकतात.
- या योजने अंतर्गत भारतीय नागरिक आपल्या मुलांसाठी NPS Vatsalya Account उघडू शकतो.
- योजनेच्या माध्यमातून लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त झाल्यावर सामान्य NPS Tier-I Account मध्ये खात्याचे रूपांतरण केले जाईल.
- योजनेमध्ये सहभागी असलेल्या लाभार्थीचे निधन झाल्यास जमा केलेले संपूर्ण पैसे पालकांना दिले जाणार किंवा अर्ज करताना ज्यांना नॉमिनी केले होते त्यांना ते पैसे मिळणार.
- त्याचप्रमाणे एका पालकाचे जर निधन झाले, तर दुसऱ्या पालकाला म्हणजेच आई किंवा वडील यांना नियुक्त केले जाईल, परंतु त्यासाठी त्यांना KYC अर्ज करावा लागेल.
- तसेच दोन्ही पालकांचे निधन झाल्यास कायदेशीर पालक योजनेमध्ये योगदान पुढे चालू ठेवू शकतात किंवा कोणतीही गुंतवणूक न करता मुलांचे वय 18 वर्ष होईपर्यंत थांबावे लागेल.
- ही योजना एक Saving-Cum-Pension Scheme आहे, ज्याचे नियमन व प्रशासन PFRDA करते.
- 18 वर्षाखालील लहान मुलांना योजनेमध्ये लाभ घेण्यास मदत मिळेल.
- योजने अंतर्गत जमा केलेला पैसा व त्यांचे रिटर्न सर्व त्या लाभार्थी मुलांना मिळणार.
- मुलांचे पालक आपल्या मुलाच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकतात.
- पालक आपल्या मुलांसाठी सहजपणे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करून NPS Vatsalya Account उघडू शकतात.
- अर्ज करण्यास इच्छुक असलेले पालक e-NPS च्या ऑनलाइन पोर्टलमध्ये किंवा बँकेच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात.
- त्याचप्रमाणे ऑफलाइन अर्ज करण्यासाठी प्रमुख बँक शाखा, पेन्शन फंड शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन योजनेमध्ये खाते उघडून गुंतवणूक करू शकतात.
- NRI (Non Resident Indian) वर्गातील नागरिकसुद्धा योजनेमध्ये सहभागी होऊन पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.
- वात्सल्य योजनेमध्ये PFRDA च्या माध्यमातून 3 प्रकारच्या पेन्शन गुंतवणुकीची संधी मिळते, त्यामधील कोणतेही एक पालकांच्या सोयीनुसार निवडू शकतात.
- योजनेमध्ये 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिक्षण, गंभीर आजार व अपंगत्व आल्यास 25% रक्कम काढण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि पालक फक्त 3 वेळाच गुंतवणूक केलेले पैसे काढू शकतो.
- लाभार्थीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 2.5 लाख रुपयांच्या खाली Corpus असेल तर लमसम संपूर्ण पैसे काढू शकता.
- Corpus रक्कम 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 80% रकमेची Annuity विकत घ्यावी लागेल आणि 20% रक्कम लमसम काढू शकता.
NPS Vatsalya Yojana Investment Choices
एनपीएस वात्सल्य योजना अंतर्गत गुंतवणूक करताना पालक खालील दिलेल्या पर्यायांमधून एकाची निवड करू शकतात.
- Default Choice: जरी तुम्ही निवड नाही केली तर केंद्र सरकार मध्यम जीवन चक्र फंडमध्ये (LC-50) अंतर्गत 50% रक्कम Equity Exposure मध्ये गुंतवणूक केले जाणार.
- Auto Choice: यामध्ये पालक Life cycle fund Aggressive ची निवड करू शकतात, ज्यामध्ये LC -75 म्हणजे 75% Equity, मध्यम LC-50 आणि Conservative LC -25 अशा पद्धतीने रक्कम भरू शकता.
- Active Choice: या पद्धतीमध्ये किती रक्कम Equity (75% पर्यंत) , Corporate Debt (100% पर्यंत) व Alternate Asset (5% पर्यंत) मध्ये गुंतवणूक करायची आहे? ही निवड पालक सक्रियपणे करू शकतात.
NPS Vatsalya Yojana Eligibility
पालकांना आपल्या मुलासाठी एनपीएस वात्सल्य योजनेची पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे, त्यासाठी पात्रतेच्या संपूर्ण अटी खालीलप्रमाणे दिले आहेत.
- योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांचे कुटुंब भारतीय असणे आवश्यक आहे.
- वात्सल्य योजना ही फक्त लहान मुलांसाठीच आहे.
- अर्ज करणारे पालक आपल्या 18 वर्षांखालील वयोगटामधील मुलांसाठी लाभ घेऊ शकतात.
- मुलांचे कागदपत्रे नसल्यास कायदेशीर पालकांचे कागदपत्रे जमा करावे लागणार.
- जे नागरिक NRI वर्गात मोडतात आणि त्यांना आपल्या मुलांसाठी गुंतवणूक करायची असल्यास, त्यांचे NRE/NRO बँक शाखेत Individual किंवा Joint अकाउंट असणे अनिवार्य आहे.
- योजनेमध्ये अर्ज करताना पालकांकडे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.
NPS Vatsalya Yojana Required Documents
पालकांना अर्ज करताना एनपीएस वात्सल्य योजनाची आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे यादीनुसार जमा करणे महत्त्वाचे आहे.
लाभार्थीच्या पालकांचे कागदपत्रे
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- पासपोर्ट
- ड्रायविंग लायसन्स
- मतदान कार्ड
- भाड्याने असाल तर कायदेशीर कागदपत्रे
- NREGA Job Card
- राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर
- मोबाईल नंबर
- बँक खात्याचे पासबुक
- ई-मेल आयडी
मुलाचे कागदपत्रे
- जन्म दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र
- पॅनकार्ड
NRI कुटुंबाचे कागदपत्रे
- पालकांच्या संबंधित असलेले पुरावे
- लाभार्थी मुलाचे कागदपत्रे
- NRE किंवा NRO बँक अकाउंट
- बँक खात्याचे पुरावे
NPS Vatsalya Yojana Registration
पालक आपल्या मुलांसाठी एनपीएस वात्सल्य योजनामध्ये रजिस्ट्रेशन ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करू शकतात. या दोन्ही पद्धतीमध्ये अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रकिया दिलेल्या आहेत, त्यामधील तुमच्या सोयीनुसार एक निवडून खाते उघडू शकता.
NPS Vatsalya Scheme Apply Online
- एनपीएस वात्सल्य योजनामध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला eNPS ची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे.
- वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला National Pension System ची यादी दिसेल, ती स्क्रोल करणे.
- त्या यादीमध्ये तुम्हाला NPS Vatsalya (Minors) पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचे जन्म दिनांक, ई-मेल आयडी, पॅनकार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशनवर क्लिक करा.
- रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ई-मेल आणि मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो भरून वेरिफाय करा.
- वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमची व मुलाची संपूर्ण माहिती अचूक भरा.
- संपूर्ण माहिती भरल्यावर आवश्यक असणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- त्यानंतर तुम्हाला योजने अंतर्गत कमीकमी 1 हजार रुपये योगदान भरावे लागणार ते भरा.
- योगदान भरून झाल्यानंतर मुलाचा PRAN नंबर तयार होईल तो सांभाळून ठेवणे.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलाचे योजने अंतर्गत खाते उघडू शकता.
NPS Vatsalya Scheme Offline Apply
- एनपीएस वात्सल्य योजनामध्ये ऑफलाइन पद्धतीने खाते उघडण्यासाठी सुरुवातीला जवळच्या प्रमुख बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये भेट द्या.
- बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर योजने संबंधित माहिती तेथील अधिकाऱ्यांना द्या.
- त्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला अर्जाचे फॉर्म मिळतील व काही समस्या असल्यास त्यांची मदत घ्या.
- फॉर्म घेतल्यानंतर संपूर्ण वाचून लक्षपूर्वक भरून घ्या.
- फॉर्म भरल्यानंतर आवश्यकतेनुसार फोटो लावून कागदपत्रे झेरॉक्स करून जोडणे.
- त्यानंतर फॉर्म व कागदपत्रे बँकमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन जमा करणे.
- फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला योजनेमध्ये ठरल्या प्रमाणे योगदान भरावे लागेल.
- योगदान भरल्यानंतर शाखेमधील अधिकाऱ्याकडून PRAN नंबर दिला जाईल.
- अशा पद्धतीने ऑफलाइन प्रकिया करून योजने अंतर्गत मुलाचे पेन्शन खाते उघडू शकता.
निष्कर्ष
अशा पद्धतीने आम्ही या लेखातून NPS Vatsalya Yojana संबंधित संपूर्ण माहिती देऊन तुमचे मार्गदर्शन केले. लेखामधून एनपीएस वात्सल्य योजना काय आहे? त्यांचे उद्देश, त्यामधून होणारे फायदे, त्यामध्ये असणारे गुंतवणुकीचे पर्याय, त्यासाठी लागणाऱ्या पात्रतेच्या अटी, योजनेमध्ये आवश्यक असणारे कागदपत्रे, ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रकिया या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती सांगितली. लहान मुलाच्या शिक्षणासाठी एक उत्तम गुंतवणूक आहे, जी त्यांच्या भविष्याला उज्ज्वल करण्यास मदत करेल.
आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा आणि अशाच नवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या Yojana Media वेबसाइटला Subscribe करा.
FAQs
NPS वात्सल्य योजना काय आहे?
एनपीएस वात्सल्य योजना ही एक बाल पेन्शन स्कीम आहे, ज्यामध्ये कमीतकमी वर्षाला 1000 रुपये भरून खाते उघडू शकतो.
मिशन वात्सल्यसाठी कोण पात्र आहे?
मिशन वात्सल्यसाठी देशभरातील 18 वर्षाखालील मुले पात्र आहेत.
मुलांसाठी एनपीएस खाते कसे उघडायचे?
मुलांसाठी एनपीएस खाते उघडण्यासाठी बँक, पोस्ट ऑफिस किंवा eNPS पोर्टलवर जाऊ शकता.
पुढे वाचा: