Nikshay Poshan Yojana Online Registration: असे रजिस्ट्रेशन करून टीबी रुग्ण मिळवू शकतात 500 रुपये

Nikshay Poshan Yojana Online Registration: देशामधील टीबी रुग्णांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने निक्षण पोषण योजना अंतर्गत ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आर्टिकलच्या माध्यमातून प्रकिया जाणून ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण करा.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत सरकारने 01 एप्रिल, 2018 रोजी निक्षय पोषण योजनाची सुरुवात केली. ज्याच्या माध्यमातून देशामधील टीबी रुग्णांना प्रत्येक महिन्याला आर्थिक मदतीच्या स्वरूपात 500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात. त्याचसोबत योजनेमध्ये सहभागी असलेल्या लाभार्थ्यांना फळे व इतर गोष्टी देखील दिल्या जातात. 

टीबी रुग्णांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत डीबीटीच्यामार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी Nikshay Portal तयार करण्यात आले आहे. एक टीबी रुग्ण या योजनेमध्ये पोर्टलद्वारे कशा प्रकारे अर्ज करू शकतो? याची प्रकिया खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

निक्षय पोषण योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रकिया

  • रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईलमध्ये Nikshay Portal ची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे. 
  • सुरुवातीला तुम्हाला लॉगिन आयडी तयार करून घ्यायची आहे. 
  • त्यासाठी तुम्ही डॅशबोर्डमधील New Informant Registration मध्ये जाणे. 
  • त्यानंतर डॅशबोर्डवर फॉर्म उघडून येईल, त्यामध्ये तुमचा पत्ता, तुमची काही वैयक्तिक माहिती आणि बँकेची डिटेल्स भरून घ्या. 
  • ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर सबमिटच्या बटनावर क्लिक करा. 
  • पोर्टलमध्ये रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करा. 
  • त्यानंतर पोर्टल लॉगिन करून New Enrollment च्या ऑप्शनमध्ये जावा. 
  • त्या ऑप्शनमध्ये प्रवेश केल्यावर जी काही माहिती विचारली असेल ती भरून घेणे. 
  • त्यापुढे पोर्टलसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करणे. 
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन जमा करणे. 

Read More: