Nikshay Poshan Yojana 2024: केंद्र सरकारने टीबी रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता निक्षय पोषण योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत रजिस्टर असलेल्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे प्रत्येक महिन्याला 500 रुपयांच्या स्वरूपात आर्थिक मदत पाठविली जाते.
WHO म्हणजे World Health Organization च्या माहितीनुसार, टीबीचे रुग्ण पूर्ण दुनियामध्ये 2/3 प्रमाणात 8 देशांमध्ये आहेत, त्या आठ देशामध्ये आपल्या आपला भारत देश सुद्धा समाविष्ट आहे. ज्यामध्ये 2021 च्या डेटानुसार 28% टीबी रुग्ण आपल्या देशामध्ये आहेत.
भारत देशामधील टीबी रुग्ण कमी करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने निक्षय पोषण योजनाची सुरुवात केली आहे. ज्यामधून आर्थिक मदतीसोबत विविध प्रकारचे लाभ सुद्धा लाभार्थ्यांना देण्यात येते.
आजच्या आपल्या लेखातमध्ये याच योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये योजनाचे उद्देश, त्यासाठी तयार करण्यात आलेले प्लॅटफॉम, त्यामधून रुग्णांना मिळणारे फायदे, आतापर्यंत करण्यात आलेली कामगिरी, पात्रतेच्या अटी, आवश्यक असणारी कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन प्रकिया या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत लक्षपूर्वक आर्टिकल पहा.
Nikshay Poshan Yojana in Marathi
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निक्षय पोषण योजनाची सुरवात 01 एप्रिल, 2018 रोजी केली होती. ज्यामध्ये Ministry of Health and Family Welfare विभाग योजनेची अंमलबजावणी करण्याचे काम करते. ही योजना राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत असून सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे, त्यामध्ये केंद्र व राज्य सरकार योजनेचे संपूर्ण खर्च मिळून करते.
या योजनेच्या माध्यमातून टीबी रुग्णांना प्रति महिना ५०० रुपयांची आर्थिक मदत DBT म्हणज डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर पद्धतीने बँक खात्यामध्ये पाठवले जाते. लाभार्थ्यांना 01 एप्रिल, 2018 नंतर NIKSHAY Portal मध्ये जाऊन रजिस्टर करावे लागणार, त्यानंतर आर्थिक मदत व इतर सुविधांचा लाभ देण्यात येतात.
What is E-Nikshay Platform?
Nikshay मधील Ni चा अर्थ दूर करणे व Shay चा अर्थ क्षयरोग असा आहे. केंद्र सरकारने निक्षय पोषण योजना अंतर्गत टीबी रुग्णांना लाभ देण्यासाठी व इतर गोष्टींच्या सुविधा पुरविण्यासाठी E-Nikshay Platform ची सुरुवात केली.
या पोर्टलचे विकास व मॅनेज करायचे काम Union Health Ministry अंतर्गत असलेली CTD म्हणजे Central Tuberculosis Division करते. या पोर्टलला WHO, National Informatics Centre (NIC) आणि Union Health Ministry हे सगळे मिळून मॅनेज करत आहेत.
Functions of E-Nikshay Platform
- या पोर्टलमध्ये भारतामधील पब्लिक व खाजगी क्षेत्रांमधील आरोग्यसेवा कामगारांची संख्या दिसते.
- त्यांच्या देखरेख अंतर्गत रजिस्टर असलेले प्रकरणे व त्यांचे रिकॉर्ड पोर्टलमध्ये नोंद असते.
- देशामधील विविध हॉस्पिटलमधून आलेले लॅबचे टीबी रिपोर्ट सुद्धा प्लॅटफॉर्मवरती अपलोड केले जातात.
- त्याचप्रमाणे आजाराबद्दलचे उपचार माहिती सुद्धा पोर्टलमध्ये रेकॉर्ड करून ठेवण्यात आले आहेत.
- आजाराचे प्रकरण विविध आरोग्यसेवा प्रोव्हायडरकडे ट्रान्स्फर करण्यात येतात.
- उपचार कोणते चालू आहेत? व कशाप्रकारचे चालू आहेत? त्यांची देखरेख केली जाते.
Nikshay Poshan Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | निक्षय पोषण योजना |
प्रकार | सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
कधी लॉंच केली | 01 एप्रिल, 2018 रोजी |
कोणी लॉंच केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
विभाग | आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | भारत देशामधील टीबी रुग्णांना आर्थिक मदत करून संख्या कमी करणे |
पात्र | देशामधील टीबी रुग्ण |
फायदा | प्रतिमाह बँक खात्यामध्ये 500 रुपये आर्थिक मदत |
अर्ज पद्धती | ऑनलाइन व ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | www.nikshay.in |
Nikshay Poshan Yojana Objectives
केंद्र सरकारने चालू केलेल्या निक्षय पोषण योजनाचे मुख्य उद्देश भारत देशामधील टीबी रुग्णांना दैनंदिन आरोग्य विषयी खर्चासाठी आर्थिक मदत करणे आहे. जेणेकरून त्यांना आजारासाठी जे काही गोळ्या, औषधे व उपचार घेण्यास मदत मिळेल.
त्याचप्रमाणे केंद्र शासनाचे मुख्य लक्ष्य टीबी रुग्णांसाठी एका असा प्लॅटफ्रॉम तयार करणे जिथे त्यांना उपचार पद्धती मिळतील, त्यांच्यावर लक्ष देता येईल आणि त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोहचविण्यात येईल.
तसेच केंद्र सरकारच्या विभागाच्या माध्यमातून रुग्णांचे डेटासुद्धा रिकॉर्ड करणे, त्याचप्रमाणे रुग्णांना चांगले व परवडणारे जेवण व पोषण मिळण्यात मदत करणे. टीबी रुग्णानाचे होणारे उपचाराचे यशस्वी दर वाढविणे आणि मृत्यू दर कमी करण्यावरती लक्ष देणे.
Nikshay Poshan Yojana Benefits
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातर्फे सुरु करण्यात आलेल्या निक्षय पोषण योजनाचे फायदे भारत देशामधील टीबी रुग्णांना देण्यात येणार.
- या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारतर्फे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदत पाठवण्यात येते.
- लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदत हे 500 रुपये प्रति महिन्यानुसार डीबीटीद्वारे थेट बँकेत जमा करण्यात येणार.
- 01 एप्रिल 2018 च्या दिवसापासून ज्या नागरिकांनी अर्ज केले आहेत, त्यांना योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार. त्याचप्रकारे एकाच महिन्यामध्ये पूर्ण वेतन दिले जातील आणि काही महिने सोडले जातील.
- तसेच योजनेच्या माध्यमातून शासनातर्फे काही वेळेला फळे, औषधें किंवा पैसे देण्यात येतील.
- रुग्णांना राज्य सरकारतर्फे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची परवानगी घेऊन अतिरिक्त फळे व इतर गोष्टींची मदत देऊ शकतात.
- देशामधील सर्व क्षेत्र जसे केंद्रशासित प्रदेश व सर्व पसरलेले राज्यामध्ये योजना राबविली जाते.
- देशामध्ये काही Ni-kshay Mitras म्हणजेच NGO, corporations व राजकीय पार्टी असतात ते संस्था उघडून पोर्टल संबंधित संपूर्ण माहिती देतात, त्याचसोबत केंद्र सरकारसोबत मिळून इतर सुविधा सुद्धा प्रदान करतात.
- तसेच NGO च्या माध्यमातून टीबी संबंधित देशभरात जागरूकता पसरवली जात आहे.
- रुग्णांना NGO च्या माध्यमातून सप्लिमेंट, औषधे, गोळ्या व इतर सुविधा देण्यात येतात.
- 2021 च्या डेटानुसार 21 लाखांपेक्षा जास्त TB च्या केसेस पोर्टलवरती रजिस्टर करण्यात आले.
- योजनेच्या माध्यमातून 62.1% लोकांनी कमीतकमी एकदा आर्थिक मदत घेतलेली आहे.
- एप्रिल 2018 पासून ते फेब्रुवारी 2022 पर्यंत योजने अंतर्गत 57.3 लाख रुग्णांनानी रजिस्टर करून लाभ घेतला आहे.
- केंद्र सरकारने योजने अंतर्गत 1,488 कोटी रुपये लाभाच्या स्वरूपात रुग्णांना देण्यात आले आहेत.
Nikshay Poshan Yojana Eligibility
रुग्णांना निक्षय पोषण योजनाची पात्रता जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या अटीनुसार पात्र असणे आवश्यक आहे.
- सर्वात प्रथम निक्षय पोर्टलवर अर्ज करणारा नागरिक भारताचा स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे.
- या योजनेमध्ये 6 महिन्याच्या बाळापासून ते 6 वर्षाच्या मुले सहभागी होण्यासाठी पात्र असणार आहेत.
- भारत देशामधील 12 राज्य व 2 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- अर्ज करणाऱ्या मुलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे.
- सहभागी होणारे मुले अनुसूचित जाती व जमाती वर्गामधील असणे आवश्यक आहे.
- त्याचप्रमाणे आदिवासी समाजामधील सुद्धा मुले अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
- कुपोषित असलेली मुले योजनेमध्ये पात्र असणार आहेत.
Nikshay Poshan Yojana Required Documents
नागरिकांना अर्ज करताना निक्षय पोषण योजनासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे यादीनुसार देण्यात आलेली आहे.
- जातीचे पुरावे
- घरचा पत्ता
- बँक खात्याची माहिती (पासबुकचे पहिले पान)
- टीबी रुग्ण असल्याचे पुरावे (हॉस्पिटलमधून पत्र)
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला
- आधारकार्ड (बँक खात्यासोबत लिंक असणे)
- ABHA Card (पर्यायी)
Nikshay Poshan Yojana Registration
निक्षय पोषण योजनामध्ये रजिस्ट्रेशन करून आर्थिक मदत व इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागेल.
- सुरुवातीला तुम्हाला निक्षय योजनेची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर योजनेची वेबसाइट उघडून येईल.
- त्या पोर्टलमध्ये तुम्हाला लॉगिन करण्यासाठी आयडी तयार करावे लागेल.
- आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर काही ऑपशन दिसतील, त्यामधील New Informant Registration यावर क्लिक करायचे आहे.
- क्लिक करून झाल्यावर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल.
- त्या नवीन पेजवरती राज्य, जिल्हा, ब्लॉक, सुविधा व घरचा पत्ता विचारले असेल ती भरून घेणे.
- त्यानंतर पुढे तुमचे नाव, तुम्ही कोण आहेत त्याची निवड करा, मोबाईल नंबर व ई-मेल आयडी टाकायचा आहे.
- पुढे तुमचे बँक खात्याची संपूर्ण माहिती भरून घ्यावी लागेल.
- त्यापुढे लॉगिन माहिती येईल, त्यामध्ये आयडी म्हणून तुमचा रजिस्टर नंबर दिसेल.
- शेवटी सबमिट करून तुम्हाला मोबाईलवर ओटीपी येईल तो भरून घेणे.
- पुन्हा डॅशबोर्डमध्ये येऊन लॉगिनवर क्लिक करा आयडी टाकून मोबाईल नंबरवर पासवर्ड आला असेल तो भरून लॉगिन करणे.
- त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्याच्या डाव्या बाजूला New Enrollment पर्याय असेल, तो निवडणे.
- त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला योजनेमध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती भरून घ्यावी लागेल.
- माहिती भरून झाल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन तुम्ही निवडलेल्या हॉस्पिटलमध्ये अर्ज सादर करण्यात येईल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे कागदपत्रे घेऊन हॉस्पिटलमध्ये जावे लागेल.
निष्कर्ष
अशा प्रकारे आम्ही तुम्हाला Nikshay Poshan Yojana संदर्भात संपूर्ण माहिती मार्गदर्शन केले. ज्यामध्ये निक्षाय पोषण योजना काय आहे? त्यांचे महत्त्व काय आहेत? केंद्र सरकारने ती का सुरू केली? कोणत्या नागरिकांसाठी सुरु केली? कोणते मुख्य उद्देश होते? यामधून कोणते फायदे दिले जातात? यामध्ये कोणते मंत्रालय लक्ष देतात? योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत? त्यांना नोंदणी करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? आणि योजनेमधून लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करावे लागणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तर सविस्तररित्या देण्यात आल्या.
तुमच्या अवतीभोवती कोणी टीबी रुग्ण असतील, तर त्यांना हा लेख पाठवून केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारे लाभ घेण्यास प्रोत्साहित करा. केंद्र व राज्य सरकारच्या नवीन योजनांच्या माहितीसाठी योजना मीडियाच्या वेबसाइटला Subscribe करा किंवा Telegram चॅनेला जॉईन करा.
FAQs
निक्षय पोशन योजना कशी मिळवायची?
निक्षय पोशन योजनाचा लाभ Nikshay पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून मिळवायची.
टीबी रुग्णांना सरकारकडून किती पैसे मिळतात?
टीबी असलेल्या रुग्णांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला 500 रुपये रक्कम दिले जाते.
निक्षय पोषण योजना कोणी सुरू केली?
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निक्षय पोषण योजना सुरु केली.
पुढे वाचा: