National Pension Yojana 2024: देशामधील नागरिकांना निवृत्तीनंतर आर्थिक मदत व्हावी यासाठी नॅशनल पेन्शन योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना गुंतवणूक करून निवृत्तीनंतर चांगल्या प्रकारचे आर्थिक परतावा मिळण्यासाठी व त्याचप्रमाणे दर महिन्याला पेन्शन स्वरूपात रक्कम प्राप्त होण्यासाठी मदत होते.
मॅक्सलाईफच्या एका अभ्यासाप्रमाणे सांगण्यात आले आहे की, ९०% पेक्षा जास्त ५० वर्षाच्या वरील नागरिकांना दुःख होते, त्याचे कारण म्हणजे तरुण काळामध्ये निवृती प्लॅनिंग लवकर सुरु नाही केली. जर निवृतीनंतर कोणती आर्थिक प्लॅनिंग करायची असेल, तर केंद्र सरकारने सुरु केलेली नॅशनल पेन्शन योजना एक चांगला पर्याय ठरू शकते.
जास्त करून नागरिक टॅक्सबद्दल काही माहिती न घेता National Pension Yojana मध्ये पैसे गुंतवतात. परंतु याचे काही फायदे असून त्यांचे तोटे सुद्धा या योजनेमध्ये आहेत. तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून NPS संबंधित संपूर्ण माहिती बघणार आहेत.
What is National Pension Yojana (NPS)?
नॅशनल पेन्शन योजना ही एक रिटायर पेन्शन स्कीम आहे, जी केंद्र सरकारने ०१ जानेवारी, २००४ रोजी केंद्रीय सरकारी कर्मचारी व आर्म फोर्ससाठी सुरु केली होती. परंतु २००९ साली केंद्र शासनाने ती भारत देशामधील सर्व नागरिकांसाठी लागू केली. या योजनेला PFRDA म्हणजे Pension Fund Regulatory and Development Authority नियंत्रित करते.
नॅशनल पेन्शन योजनेला National Pension System (NPS) या नावाने सुद्धा ओळखले जाते. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना सेवा निवृती नियोजन व टॅक्स बचत या दोन प्रकारचे फायदे दिले जाते. लाभार्थ्यांकडून गुंतवणूक केलेली रक्कम ही शासनाच्या माध्यमातून शेअर बाजार, सरकारी बॉण्ड व कॉर्पोरेट बॉण्ड यामध्ये NPS अंतर्गत invest केली जाते.
NPS योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना १२ अंकाचे PRAN नंबर नियुक्त केले जातात. PRAN नंबर म्हणजे Permanent Retirement Account Number असे पूर्ण अर्थ होतो.
Types of NPS Account
वर्णन | खाते स्थर 1 | खाते स्थर 2 |
उद्देश | पहिल्या खात्यामधून निवृती नियोजन करणे | दुसऱ्या खात्यामध्ये गुंतवणूक नियोजन करणे |
पात्रता | १८ ते ७० वयोगटातील भारतीय नागरिक | ज्यांचे स्थर १ मध्ये आधीच खाते आहेत, ते पात्र असणार |
लॉकिंग कालावधी | ३ वर्षानंतर थोडी रक्कम काढू शकतो आणि ६० वर्षानंतर पूर्ण | इथे लॉकिंग कालावधी नसतो |
योगदान | कमीतकमी ५०० रुपये | कमीतकमी २५० रुपये परंतु योगदान देणे बंधनकारक नाही |
सुरुवातीचे योगदान | खाते उघडताना ५०० रुपये भरावे लागते | इथे खाते उघडण्याच्या दरम्यान १००० रुपये भरावे लागते |
गुंतवणुकीची मर्यादा | कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही | कितीहि रक्कम जमा करू शकतो |
टॅक्सचे फायदे | २ लाख रुपयांपर्यंतचे टॅक्स क्लेम करू शकतो | यामध्ये कोणत्याही प्रकारचे टॅक्स फायदे मिळत नाही |
National Pension Yojana Eligibility
गुंतवणूकदारांना नॅशनल पेन्शन योजनाची पात्रता जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे काही अटी दिलेल्या आहेत, त्यानुसार पात्र असणे बंधनकारक आहेत.
- या योजने अंतर्गत सरकारी कर्मचारी, कॉर्पोरेट कर्मचारी, व्यापारी, स्वतःचे रोजगार असलेलं व्यक्ती आणि NRIs सुद्धा गुंतवणुक करू शकतात.
- त्याचप्रमाणे अर्ज करून गुंतवणूक करणारा व्यक्ती भारतामधील रहिवासी असणे.
- योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ७० वर्षापेक्षा जास्त नसावी.
- अर्जदाराचे आधारकार्ड बँक खात्यामध्ये लिंक असणे म्हणजेच KYC पूर्ण असावी.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे योजने संबंधित लागणारे सर्व कागदपत्रे असणे.
How is the Structure of National Pension Yojana?
1st Step: Choose Pension Fund Manager
सर्वात प्रथम लाभार्थ्यांना आपले एक पेन्शन फंड मॅनेजर निवडावे लागते, NPS योजना अंतर्गत ८ पेन्शन फंड मॅनेजर यांचा समावेश असतो, त्याची खालीलप्रमाणे यादी आहे.
Pension Fund Managers (PFM) under NPS
- Birla Sunlife Pension Management Ltd.
- ICICI Prudential Pension Funds Management Company Ltd.
- HDFC Pension Management Company Limited
- LIC Pension Fund Ltd
- UTI Retirement Solutions Limited
- Reliance Capital Pension Fund Ltd
- SBI Pension Funds Private Limited
- Kotak Mahindra Pension Fund Limited
2nd Step: Select Investment Option
दुसऱ्या स्टेपमध्ये अर्जदारांना Active Choice आणि Auto Choice हे दोन गुंतवणुकीचे पर्याय दिले जाते, त्यामध्ये कोणत्या एकाची निवड करणे आवश्यक आहे. ऍक्टिव्ह चॉईस पर्याय जर आपण निवडले तर पैसे कुठे गुंतवायचे? यासाठी दर वर्षी बदल करू शकतो आणि ऑटो चॉईस पर्यायाची निवड केल्यानंतर आपले सर्व पैसे ऑटोमॅटिकली invest होत राहतात. योजनेच्या माध्यमातून या दोन्ही पर्यायामधील पैसे चार श्रेणींमध्ये गुंतवले जाते.
Categories of National Pension Yojana Investments
- Government Bonds: यामध्ये गुंतवणुकीचा कमी धोका असतो.
- Corporate Bonds: कॉर्पोरेट बॉंडमध्ये मध्यम प्रमाणात धोका असतो.
- Stock Market: या पर्यायामध्ये सर्वांनाच माहित आहे, जास्त धोका असते.
- Alternate Investment Funds (AIF): हे खाजगी क्षेत्रातील असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात गुंतवणुकीचा धोका असतो.
What is an Active Choice under National Pension Yojana?
नॅशनल पेन्शन योजनेमधील ऍक्टिव्ह चॉईस पर्यायामध्ये लाभार्थी चार श्रेणीमधील कोणतेही गुंतवणूक पर्याय निवडू शकतो. या पर्याय अंतर्गत शेअर बाजारमध्ये ५० वर्षांपर्यंत फक्त ७५% रक्कम जमा करू शकतो, त्यानंतर हे दरवर्षी २.५% खाली पडतो.
यामुळे वयाच्या ६० वर्षापर्यंत जास्तीत जास्त ५०% रक्कम लागू शकते आणि एका वर्षातून २ वेळा गुंतवणूक करण्यामध्ये बदल करू शकतो. ऍक्टिव्ह चॉईसच्या माध्यमातून AIF मध्ये फक्त ५% पर्यंत रक्कम गुंतवणूक करण्यासाठी परवानगी असते.
What is an Auto Choice under National Pension Yojana?
नॅशनल पेन्शन योजना अंतर्गत ऑटो चॉइसमध्ये संपूर्ण गुंतवणुकीचे वाटप Pension Fund Manager ठरवतो. यामध्ये लाभार्थीच्या वयानुसार गुंतवणूक केली जाते. लाभार्थ्यांना ऑटो चॉइसमध्ये ३ प्रकारच्या पर्यायांची निवड करण्यास संधी मिळते.
Aggressive Life Cycle Fund
जे जास्त रिस्क घेणारे नागरिक असतात, ते अग्रेसिव्ह लाईफ चक्र फंडमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये वयाच्या ३५ वर्षापर्यंत ७५% वाटप शेअर बाजारामध्ये केले जाते, त्यानंतर ५५ वर्षापर्यंत १५% पर्यंत कमी करत आणले जाते.
Moderate Life Cycle Fund
या पर्याया अंतर्गत ३५ वर्षापर्यंत ५०% शेअर बाजारची रक्कम मर्यादित केली जाते आणि ५५ वर्षापर्यंत गुंतवणुकीचे प्रमाण १०% पर्यंत कमी केले जाते.
Conservative Life Cycle Fund
ज्या नागरिकांना जास्त प्रमाणात रिस्क नको ते यामध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये ३५ वर्षात २५% रक्कम शेअर बाजारामध्ये जमा केली जाते, त्यानंतर ५५ वयाच्या होईपर्यंत ५% पर्यंत कमी केले जाते.
National Pension Yojana Benefits
- नॅशनल पेन्शन योजनाचे फायदे भारत देशामधील आर्थिक नियोजन करणाऱ्या नागरिक होणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायची संधी उपलब्ध असते.
- ज्या नागरिकांना निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन स्वरुपात रक्कम हवी असल्यास योजनेमध्ये अर्ज करू शकतो.
- NPS योजनेच्या माध्यमातून ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ६०% लम्पसम रक्कम दिली जाते.
- ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ४०% Annuity Purchase च्या आधारे दिले जाते, ज्यामध्ये विमा सुविधा प्रदान करतात व दर महिन्याला थोडे थोडे पैसे पेन्शन स्वरुपात पाठविले जातात.
- Annuity Purchase च्या ४०% मध्ये विमाच्यामार्फत मिळणाऱ्या रक्कमेवर ५% ते ८% रिटर्न दिले जाते.
- लाभार्थ्यांनी शेअर बाजारात गुंतवलेल्या पूर्ण रक्कमेतून १०% ते १२% रिटर्न दिले जाते.
- निवृत्तीनंतर ज्यांना कमी रिस्कमध्ये महिन्याला ६% ते ७% रिटर्न कमाई करायची असल्यास त्यांच्यासाठी NPS योजना उत्तम आहे.
National Pension Yojana or NPS Calculation Process
नॅशनल पेन्शन योजना अंतर्गत NPS Calculate करायचा असेल तर खालील प्रमाणे प्रकिया दिलेली आहे.
- अर्जदारांना सुरवातीला NPS Calculator साठी अधिकृत वेबसाइटला जावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर Pension Calculator चा संपूर्ण डॅशबोर्ड उघडून येईल.
- त्या डॅशबोर्डमध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचे जन्म दिनांक टाकायचा आहे.
- त्यानंतर महिन्याला किती रक्कम जमा करणार आहे? ती भरणे.
- तुम्हाला किती वर्षापर्यंत गुंतवणूक करायची आहे? ती निवडा.
- त्यानंतर गुंतवणुकीवर अंदाजे कमीतकमी १०% रिटर्न नोंद करा.
- नोंद केल्यावर Annuity Purchase कमीत कमी ४०% ठेवणे.
- Annuity Rate ६% अपेक्षित निवड करून घेणे.
- त्यानंतर तुम्हाला सर्व calculations दिसून येईल.
- त्यामध्ये एकूण Total Investment, Total Corpus व Total Gain मध्ये सर्व डेटा दिसेल.
- अशा पद्धतीने नॅशनल पेन्शन अंतर्गत calculation करण्यासाठी प्रकिया करू शकता.
National Pension Yojana Withdrawal Rules
- प्रामुख्याने नॅशनल पेन्शन योजना ही Retirement Scheme असल्यामुळे जास्तीत जास्त पैसे निवृतीनंतरच प्रदान केले जाते.
- या योजने अंतर्गत लाभार्थी ३ वर्षानंतर फक्त २५% रक्कम काढू शकतो.
- लाभार्थ्यांनी योजनेमध्ये जेवढी रक्कम ३ वर्षात जमा केली आहे, त्याच्यानुसार २५% रक्कम काढता येईल नाकी कंपाऊंडिंग रक्कमेप्रमाणे.
- २५% रक्कम फक्त काही आणिबाणीमध्येच काढण्यासाठी परवानगी आहे, ज्यामध्ये लाभार्थ्यांच्या हेल्थ समस्यांसाठी, मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठ, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि घर बांधण्यासाठी पैसे काढू शकता.
- यामध्ये Partial Withdrawal साठी कोणत्याही प्रकारचे टॅक्स लावले जात नाही.
- योजनेमध्ये लागू केलेल्या कार्यकाळामध्ये फक्त ३ वेळाच Partial Withdrawal करण्यासाठी मान्यता आहे.
- या Withdrawal मध्ये कमीतकमी ५ वर्षांचा अंतर असणे गरजेचे आहे.
निष्कर्ष
अशा पद्धतीने National Pension Yojana संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये योजनेची सुरवात कधी करण्यात आली? कोणते विभाग यामध्ये काम करत आहेत? कोणते फायदे लाभार्थ्यांना दिले जाते? कोणकोणते नागरिक यामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असणार? NPS अकाउंटचे प्रकार किती आहेत? नॅशनल पेन्शन योजनाचे स्ट्रक्चर कसे आहेत? योजनामध्ये पेन्शन फंड मॅनेजर किती व कोणते आहेत? NPS ची गणना कशी करावी? व योजनाचे नियम कोणते आहेत? अशा सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले.