Namo Shetkari Yojana Information: नमो शेतकरी योजना काय आहे?  जाणून घ्या संपूर्ण माहिती

Namo Shetkari Yojana Information: या आर्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला नमो शेतकरी योजना काय आहे? याची संपूर्ण माहिती मिळण्यास मदत होईल. त्याचसोबत शेतकरी वर्गाला याचा काय फायदा होतो? हे देखील पाहायला मिळेल.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अंतर्गत देशामधील शेतकऱ्यांना 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. त्याचप्रमाणे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी वर्गाला शासनाकडून आर्थिक मदत पाठविली जाते. 

आता ती आर्थिक मदत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती मिळते? आणि कशा पद्धतीने मिळते? हे या आर्टकिलमधून जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत लेख पहा.

नमो शेतकरी योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये आर्थिक मदत शासनातर्फे पाठविली जाते. योजने अंतर्गत देण्यात येणारी आर्थिक मदत ही 3 टप्प्यांच्या स्वरूपात शेतकऱ्यांना पाठवले जाते. 

प्रत्येक वर्षाच्या चौथ्या महिन्यामध्ये योजनेमध्ये सहभागी असलेल्या शेतकरी बांधवाना 2,000 रुपये DBT म्हणजे डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर या प्रकियाद्वारे थेट बँकेत जमा केले जाते.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचण नको या कारणामुळे योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेमधून शेतकर्यां आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने 6,900 कोटी रुपयांचा आर्थिक बजेट मंजूर केला आहे.

महाराष्ट्र राज्यामधील ज्या शेतकऱ्यांकडे आपली स्वतःची जमीन आहे, त्यांना योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच पीएम किसान योजना अंतर्गत सुद्धा लाभ घेत असतील, तरी देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतात. दोन्ही योजनांचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये मिळते.

Read More: