Namo Shetkari Yojana 2024: जाणून घ्या, काय आहे नमो शेतकरी योजना?

Namo Shetkari Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना या उपक्रमाची सुरुवात राज्यातील शेतकऱ्यांसाठी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील छोट्या भागातील गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना सरकारतर्फे सुरु करण्यात आली. महाराष्ट्र सरकारतर्फे या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना शेतीमध्ये लागणाऱ्या गरजू कामांसाठी प्रतिवर्ष 6000 रुपयांच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana आणि PM Kisan Samman Nidhi Yojana एकाप्रकारे सारखीच आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना आणखी एक आर्थिक मदत म्हणून दिली जाते. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना वर्षातून एकूण 12000 रुपयांचा लाभ घेता येतो. PM Kisan Samman Nidhi मध्ये संपूर्ण देशामधील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये आर्थिक स्वरूपात दिले जातात. 

तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना अंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहा. यामध्ये आम्ही या योजनाचे फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि हफ्ते कसे तपासायचे? याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

Namo Shetkari Yojana in Marathi

केंद्र शासनाकडून देशामधील शेतकऱ्यांना PM Kisan अंतर्गत सुरु केलेल्या योजनेमधून दरवर्षी आर्थिक मदत मिळतेच आहे. त्याशिवाय आपल्या महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीमध्ये भर घालण्यासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पनेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांच्याकडून ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ या योजनेची घोषणा करण्यात आली. 

या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 6000 रुपयांची देणगी ही वर्षातून 3 हफ्त्यांच्या स्वरूपात 4 महिन्यांनी दिली जाते. वर्षातून चार महिन्यांनी दिल्या जाणाऱ्या हफ्त्यांची रक्कम ही 2000 रुपये अशी ठेवण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या हफ्त्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे तक्त्यामध्ये दिलेले आहे.

हफ्त्यांचे टप्पेकालावधीमध्येहफ्त्यांची मिळणारी रक्कम
पहिला हफ्ताएप्रिल ते जुलै महिन्यामध्ये2000 रुपये
दुसरा हफ्ताऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यामध्ये2000 रुपये
तिसरा हफ्ताडिसेंबर ते मार्च महिन्यामध्ये2000 रुपये

Namo Kisan Yojana 2024 Overview

योजनाचे नावNamo Shetkari Maha Samman Nidhi Yojana, Maharashtra
सुरु कोणी केलीमहाराष्ट्र सरकारने
कधी सुरु केली15 जुन, 2023 रोजी
श्रेणीमहाराष्ट्र सरकारी योजना
विभागकृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र
उद्देशअन्नदाता बळीराजाच्या उत्पनामध्ये वाढ होण्यासाठी
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग
लाभप्रतिवर्ष 6000 रुपये
अर्ज पद्धतीऑनलाईन/ऑफलाईन
अधिकृत वेबसाईटnsmny.mahait.org

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana चे उद्देश | Purpose

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या या नमो शेतकरी योजना अंतर्गत मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी आर्थिक मदत पुरवणे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील जवळपास 1.5 कोटी शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीचा लाभ घेता येणार. 

जेणेकरून शेतकरी आपल्या शेतीमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी या मिळणाऱ्या रकमेमधून शेतीच्या गरजा भागवू शकतील. सरकारकडून मिळणाऱ्या 6000 रुपयांनी शेतकऱ्यांना आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारण्यात मदत होईल.

Namo Shetkari Yojana चे फायदे | Benefits 

  • या योजनेचा फायदा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात होणार. 
  • महाराष्ट्रातील जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार. 
  • या योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये रक्कम प्रदान केली जाणार. 
  • शेतकऱ्यांना मिळणारी ही रक्कम 3 टप्प्यामध्ये 2000 रुपयांच्या स्वरूपात बँक खात्यामध्ये डीबीटी पद्धतीने पाठविण्यात येणार. 
  • शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्षातून दर चौथ्या महिन्यात ही रक्कम पाठवली जाणार. 
  • या योजनेच्या सोबत पीएम किसान सम्मान निधीमधून मिळणाऱ्या रक्कमेचा सुद्धा फायदा होणार. 
  • राज्य सरकारतर्फे ही योजना चालविण्यासाठी 6900 कोटी बजेट ठरवला आहे. 

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana Eligibility

  • नमो शेतकरी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • या योजनामध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे शेतीसाठी स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. 
  • जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनामध्ये लाभार्थी आहेत, त्यांनाच यामध्ये अर्ज करता येणार. 
  • जो शेतकरी अर्ज करतो आहे, तो आयकरदाता नसला पाहिजे. 
  • या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये नोकरीवर नसले पाहिजेत. 
  • त्याचप्रमाणे, यामध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. 
  • यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
  • हे बँक खाते अर्जदाराच्या आधारकार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे.

Namo Shetkari Yojana Required Documents 

  • अर्जदाराचे आधारकार्ड (बँकेसोबत लिंक असणे) 
  • महाराष्ट्र राज्यातील स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र 
  • वार्षिक उत्पनाचा दाखला 
  • पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर 
  • मोबाईल नंबर 
  • बँक खात्याचे पासबुकचे पहिले पान 
  • पासपोर्ट साईझ फोटो 
  • पॅनकार्ड 
  • शेतजमिनीचे कागदपत्र (फेरफार, 7/12 आणि 8-A) 
  • मतदान आयडी
  • रेशन कार्ड 

Namo Shetkari Yojana Registration 

नमो शेतकरी योजना महाराष्ट्र यामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी अर्ज पत्र सादर करण्याची गरज नाही. जर ते शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये लाभार्थी असतील. जर PM-Kisan अंतर्गत शेतकरी लाभ घेत असतील, तर ऑटोमॅटिकली ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अशा प्रकारे या शेतकऱ्यांना कोणताही अर्ज भरायची आवश्यकता नाही. 

जर तुम्ही पात्र असाल आणि प्रधानमंत्री किसान सम्मान निधीमध्ये अर्ज केलेला नसेल तर खालील दिलेल्या प्रकिया फॉलो करून अर्ज करू शकता आणि दोन्ही योजनांचे लाभ घेऊ शकता.

PM Kisan Online Registration

  • सर्वात प्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. 
  • वेबसाईट उघडल्यानंतर तुमच्या होमपेजवर Farmer corner या पर्यायामध्ये जावे लागेल. 
  • फार्मर कॉर्नर पर्यायामधील New Farmer Registration च्या पर्यायाला क्लिक करायचे आहे. 
  • त्या पर्यायावर क्लिक करून झाल्यावर तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडून येईल. 
  • त्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे पर्याय विचारले जातील, Rural Farmer Registration आणि Urban Farmer Registration असे. 
  • तुम्ही ग्रामीण किंवा नागरी क्षेत्रामधील असाल त्यानुसार पर्याय निवडून घेणे. 
  • रजिस्ट्रेशन पर्याय निवडल्यानंतर आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाकणे. 
  • त्यानंतर त्यामध्ये सांगितल्या प्रमाणे कॅप्चा कोड टाकणे. 
  • तुमच्या मोबाईल नंबरवर OTP विचारला जाईल तो टाकून verify करून घेणे. 
  • वेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या समोर फॉर्म उघडेल. 
  • त्या फॉर्ममध्ये तुमचे आणि तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती भरून घेणे. 
  • फॉर्ममध्ये सगळी माहिती भरून झाल्यावर ती सबमिट करणे. 
  • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रकिया पूर्ण होईल आणि तुम्ही दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकाल. 

Namo Shetkari Yojana Beneficiary Status Check

नमो शेतकरी योजना लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी खालील दिलेल्या प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करणे. 

  • सर्वातआधी तुम्हाला Namo Kisan Yojana च्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. 
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या समोर होम पेज उघडेल. 
  • होम पेज उघडल्यानंतर त्यामध्ये Beneficiary Status चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करणे. 
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबरचा पर्याय दिसेल. 
  • त्यापैकी एक पर्याय निवडून त्याची माहिती भरून एंटर बटन दाबायचे आहे. 
  • त्यामध्ये सांगितलेल्या कॅप्चा कोड टाकून घेणे. 
  • कॅप्चा कोड टाकल्यावर गेट मोबाईल ओटीपीच्या पर्यायावर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो त्यामध्ये टाकून घेणे. 
  • त्यानंतर तुमच्या समोर लाभार्थीचे स्टेटस ओपन होईल. 
  • अशा प्रकारे तुमचे स्टेटस तुम्हाला तपासायला मिळेल.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनाच्या यादीमध्ये नाव कसे शोधायचे? 

Namo Shetkari Yojana Beneficiary list 2024 मध्ये तुमचे नाव शोधण्यासाठी खाली दिलेल्या प्रकिया फॉलो करा. 

  • सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर visit करायचे आहे. 
  • वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला होमपेज वर beneficiary list चा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा. 
  • लाभार्थी यादीमध्ये गेल्यावर तुम्हाला तुमचा जिल्हा, ब्लॉक, गाव यांसारखी माहिती भरून घ्यायची. 
  • विचारलेली संपूर्ण माहिती भरून झाल्यावर कॅप्चा कोड टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. 
  • अशा प्रकारे लाभार्थी यादी तुमच्या समोर उघडेल. 
  • त्या यादीमध्ये तुमचे नाव तपासून घेणे. 
  • जर तुमचे नाव त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये जमा केले जातील.

Namo Shetkari Yojana 4th Installment Date

तुम्हाला माहितच पडले असेल, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना नमो योजनामधून वर्षातून 3 वेळा installment स्वरूपात आर्थिक मदत बँकेत डीबीटीच्या माध्यमातून पाठवतात. नुकतेच 2024 च्या वर्षांमध्ये 24 जूनला चौथा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात आला. 

परंतु ज्यांना कोणाला धनराशी प्राप्त झाली नाही, त्यांना जुलैच्या महिन्यात जमा होऊन जाईल असे सांगण्यात आलेले आहे. जर तुम्हाला 4th installment status check करायचा असल्यास वर दिलेल्या beneficiary स्टेटसच्या प्रक्रियेनुसार तपासणे. 

निष्कर्ष 

आम्ही या लेखामधून Namo Shetkari Yojana याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितली. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कशाप्रकारे सरकारकडून आर्थिक लाभ मिळेल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचसोबत योजनेचे उद्देश काय ? त्यांचे फायदे काय? कोणत्या स्वरूपात पैसे मिळणार? यासाठी कोण-कोण पात्र असणार आहेत? अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत? त्याचप्रमाणे यासाठी अर्ज कशाप्रकारे करू शकतो? तसेच येणारे हफ्त्याचे पैसे कसे तपासायचे? यादीमध्ये नाव कसे तपासायचे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला या लेखातून कळल्या असतील. 

तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि या योजेनसाठी अर्ज करत असाल तर उत्तमच आहे. आम्ही दिलेल्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक वाचा आणि अर्ज करून या योजनेचा लाभ मिळवा. 

आम्ही आशा करतो हा लेख तुम्हाला आवडला असेलच, तुमच्या शेतकरी मित्रांना/मैत्रिणींना हा लेख पाठून त्यांनासुद्धा या योजनाचा लाभ घेण्यास मदत करा. अशाच नवनवीन योजनांसाठी आम्हाला Subscribe करा आणि लेटेस्ट माहितीसाठी Telegram किंवा  WhatsApp channel ला जॉईन करा.

FAQs

कोणत्या राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली?

महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी महासन्मान योजना सुरु केली. 

नमो शेतकरी योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पात्र आहे. 

महाराष्ट्रामध्ये Namo Farmer Scheme काय आहे? 

महाराष्ट्रातील Namo Farmer Scheme च्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. 

हे सुद्धा पहा: