Namaste Yojana 2024: केंद्र सरकारने देशामधील स्वच्छता कामगारांसाठी नमस्ते योजना सुरु केली. केंद्र शासन या योजनेच्या माध्यमातून भारत देशामधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीवनात परिवर्तन करून आण्यासाठी मदत केली जाते. त्याचप्रमाणे कामगारांना प्रशिक्षण आणि प्रत्येक महिन्याला 3000 रुपये वेतनचा लाभ दिले जातो.
आपल्या देशामधील स्वच्छता कामगारांना सर्वात जोखीमचे काम करावे लागते. यामध्ये त्यांच्या जीवाला धोका सुद्धा असतो. स्वच्छता कर्मचारी आपल्या रोजीरोटीसाठी कामे करत असतात. परंतु त्यांना यामध्ये विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
2013 च्या आधी काही नागरिक आपल्या रोजीरोटीसाठी गटार व निचरा पाईप साफ करून कमाई करत होते, यामुळे जास्त प्रमाणात जीवित हानी सुद्धा झाली आहे. यामुळे कोर्टाने 2013 रोजी अशा सफाई कर्मचाऱ्यांसाठी कायदा काढला, ज्यामध्ये कोर्टाने अशा कामांसाठी लोकांची बंदी घालण्यात आली.
भारतामधील नागरिकांचे स्वच्छतेला घेऊन जीवित हानी होऊ नये म्हणून केंद्र सरकारने NAMASTE Scheme ची सुरुवात केली आहे. आपल्या आजच्या लेखातून याच योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत लेख पहा. त्यामध्ये योजना काय आहे? त्यांचे उद्देश, त्यांचे फायदे, त्यांचे मंत्रालय, योजनेची लॉन्चिंग दिनांक, त्यांचे प्रकार, त्यासाठी सुरु करण्यात आलेली वेबसाइट, लाभार्थी, बजेट, आर्थिक मदत आणि प्रशिक्षण संबंधित जाणून घेणार आहोत.
Namaste Yojana in Marathi
NAMASTE योजनाचा पूर्ण अर्थ National Action for Mechanised Sanitation Ecosystem असा आहे. केंद्र सरकारचे या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही नागरिकांना आपल्या हाताने घाण साफ न करून देणे आणि त्यांना अशा प्रकारच्या कामांसाठी जागरूक करणे हे मुख्य उद्देश आहे.
या योजनेच्या माध्यमातून अशा कामगारांना जीवनामध्ये कसे परिवर्तन घडवून आणायचे आहे?, त्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना आर्थिक मदत सुद्धा केली जाते. तसेच यामध्ये स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना कमाई करण्यासाठी संबंधित पर्याय सुद्धा दिले जाते.
केंद्र सरकारतर्फे Ministry of Social Justice and Empowerment (MoSJE) आणि Ministry of Housing and Urban Affairs (MoHUA) यांच्या एकत्रित पुढाकारच्या माध्यमातून योजनेची सुरवात 2022 रोजी करण्यात आली होती.
या योजेनच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छते संबंधित कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते, तसेच लाभार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण करतेवेळी प्रत्येक महिन्याला 3000 रुपये वेतन म्हणून आर्थिक मदत केंद्र सरकारतर्फे करण्यात येते.
तसेच सफाई एजन्सीला स्वच्छता करणाऱ्या मशीन विकत घेण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि त्यामध्ये मशीन विकत घेण्यासाठी व कर्जासाठी सबसिडी प्रदान केली जाते. या कर्जासाठी लाभार्थ्यांना फक्त वर्षाला 4% ते 6% व्याज दर लागू केला आहे. जेणेकरून त्यांना स्वच्छतेसाठी लागणाऱ्या मशीन व इतर गोष्टींसाठी मदत मिळते.
Namaste Scheme 2024 Overview
योजनेचे नाव | National Action for Mechanised Sanitation Ecosystem Scheme (नमस्ते योजना) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु केली | वर्ष 2022 रोजी |
कोणी सुरु केली | केंद्र सरकारने |
प्रकार | सेंट्रल सेक्टर स्कीम |
विभाग | सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयमंत्रालयसोबत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | देशभरातील सफाई कामगारांना स्वतःच्या हाताने घाण साफ करण्यापासून रोखणे व त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणे |
लाभ | कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, पर्यायी रोजगार संधी व आर्थिक मदत |
लाभार्थी | सफाई कर्मचारी |
अधिकृत वेबसाइट | namastescheme.com |
Namaste Scheme Aim
केंद्र सरकारने सुरु केलेल्या नमस्ते योजनाचे मुख्य उद्देश देशभरातील स्वच्छता कामगारांना जीवित हानी पासून वाचविणे व त्यांना पर्यायी संधी उपलब्ध करून आर्थिक मदत करणे आहे. जेणेकरून स्वच्छता कामगार आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून चांगले व निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत होईल.
National Commission for Safai Karamcharis (NCSK) यांच्या माहितीनुसार गटार सफाईचा कामामुळे देशभरातील 24 राज्यांमधील व केंद्र शासित प्रदेशमधील जवळपास 1056 मृतसंख्याचा आकडा आहे. यामुळे केंद्र सरकार योजेनच्या माध्यमातून आधुनिक मशीन व तंत्रांचा वापर करून सफाईचे काम करून घेण्यास प्रयत्न करत आहेत.
Namaste Yojana Benefits
- केंद्र सरकारने सुरु केलेल्या नमस्ते योजनाच्या माध्यमातून SSWs म्हणजे Sewer व Septic Tank Workers यांना फायद होतो.
- नमस्ते योजना ही एक Central Sector Scheme आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार योजने संबंधित संपूर्ण खर्च करण्यास सक्षम आहेत.
- या योजनेची अंमलबजावणी करायचे काम National Safai Karamchari Financial Development Corporation (NSKFDC) agency करते.
- तसेच योजनेमध्ये सर्व कामांचे देखरेख सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय करते.
- केंद्र सरकारने योजने अंतर्गत 2022-23 ते 2025-26 च्या चार वर्षांसाठी 360 कोटी रुपयांचा आर्थिक बजेट घोषित केला आहे.
- योजनेच्या माध्यमातून 2023-24 मध्ये केंद्र सरकारतर्फे 97.41 कोटी रुपयांची वाटप करण्यात आली.
- सुरुवातीला योजनेच्या माध्यमातू केंद्र सरकार 500 AMRUT राज्यांना कव्हर करणार होते, परंतु शासनाने Urban Local Bodies (ULBs) म्हणजेच संपूर्ण शहरांना यामध्ये समावेश करण्यात आले आहेत.
- योजनेमध्ये आता जवळपास 4,800 पेक्षा जास्त लोकल शहर आहे, त्यांची अंमलबजावणी करण्यात येते.
- स्वच्छतेच्या कामांमधून एका व्यक्तीचे सुद्धा मृत्यू होणार नाही यावर केंद्र शासनातर्फे लक्ष्य केंद्रित असणार.
- भारतामध्ये स्वच्छते संबंधित असणारे सर्व कामे कौशल्यपूर्ण अनुभवी असणाऱ्या व्यक्तीकडूनच करण्यात येणार.
- नमस्ते योजना अंतर्गत सेल्फ हेल्प ग्रुप (SHGs) तयार केले जाते आणि त्यांना स्वच्छता उपक्रम राबवण्यासाठी संधी दिली जाते.
- त्याचप्रमाणे मानव निर्मित मल पदार्थाच्या स्वच्छेतेसाठी कोणत्याही नागरिकांना थेट संपर्कात आणू दिले जात नाही.
- योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांना गटाराच्या सफाई कामासाठी तयार नसतील, तर त्यांना स्वच्छते संबंधित पर्यायी कामांमध्ये संधी दिली जाते.
- लाभार्थ्यांना योजनेच्यामार्फत 15 लाखांपर्यंच्या स्वच्छता मशीन विकत घेण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतची सबसिडी प्रदान केले जाते.
- त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि त्यामध्ये 4% पासून ते 6% पर्यंत व्याज दर लागू केला जातो.
- तसेच योजनेमधून लाभार्थ्यांना कर्ज घेतल्यानंतर सुद्धा सबसिडीचा लाभ केंद्र सरकारतर्फे देण्यात येतो.
- स्वच्छेतेच्या मशीन चालविण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते.
- त्याशिवाय प्रशिक्षण घेण्याच्या दरम्यान कामगारांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंडच्या स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.
- नमस्ते प्रोग्राम अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना Ayushman Bharat – PM Arogya Yojana च्या मदतीने आरोग्य विमा देण्यात येतो.
- ज्या कर्मचाऱ्यांचे AB-PMJAY अंतर्गत खाते नाही, त्यांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यामार्फत प्रीमियम भरण्यात येणार.
- भारत देशामधील सर्व गटारे मशीनच्या मदतीने साफ केले जाते.
- तसेच Sewer/Septic Tank Workers (SSWs) च्या समूहांना कोणत्याही आरोग्य संबंधित समस्या न होण्यासाठी PPE Kits प्रदान केले जातात.
- Sanitation Response Units (SRUs) असतील, त्यांना सुरक्षा साधनसुद्धा दिले जाते.
- केंद्र सरकारद्वारे IEC म्हणजेच Information Education and Communication Campaign चालविण्यात येते, यामधून नमस्ते स्कीम अंतर्गत जागरूकता पसरवली जाते.
- या योजनेच्या माध्यमातून देशभरातील गटार सफाई करणाऱ्या नागरिकांचे जीव वाचण्यात मदत मिळेल आणि त्यांना आरोग्य विमाच्या मदतीने सुरक्षा प्राप्त होईल.
Eligible Cities under Namaste Yojana
नमस्ते योजनामध्ये पात्र असलेलं शहरांसाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे सविस्तर दिलेल्या आहेत.
- योजने अंतर्गत AMRUT 500 शहरांचा समावेश केला जाणार.
- महानगरपालिका व नागरी क्षेत्रामध्ये एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागांना समावेश करण्यात येणार.
- त्याचप्रमाणे राज्यांमधील सर्व राजधानी शहरे आणि केंद्र शासित प्रदेश याचा समावेश असणार.
- भारत देशामधील 10 राज्यांमधील डोंगराळ, पर्यटक डेस्टिनेशन व बेट यांचासुद्धा समावेश करण्यात येणार, परंतु कोणत्याही राज्यामधील एकाची निवड करण्यात येणार.
निष्कर्ष
आमच्या लेखाच्या मदतीने Namaste Yojana संबंधित संपूर्ण माहिती सांगण्यात आली. यामध्ये योजना काय आहे? ती का सुरु करण्यात आली होती? कोणी सुरु केली? कोणासाठी सुरु केली? यामधून कोणाला फायदे दिले जाते? यामध कोणकोणते फायदे मिळतात? त्याचप्रमाणे कोणकोणते मंत्रालय काम करत आहेत? कोणती एजेन्सी योजनेची अंमलबजावणी करत आहे? कोणती वेबसाइट तयार करण्यात आली? केंद्र सरकारने किती रुपयांचा बजेट सादर केला आहे? कोणत्या प्रकारचे स्कीम आहे? कोणकोणते राज्य योजनेमध्ये पात्र असणार? किती राज्यांचा समावेश करण्यात आले आहेत? अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती मार्गदर्शन केले.
आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर भविष्यात येणाऱ्या अशाच योजनांच्या माहितीसाठी आमच्या वेबसाइटला Subscribe करून ठेवा किंवा आमच्या Telegram/WhatsApp चॅनेला जॉईन करून लेटेस्ट माहिती मिळवा.
FAQs
नमस्ते योजना काय आहे?
नमस्ते योजनाच्या माध्यमातून देशभरातील सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आण्यासाठी मदत केली जाते. त्यामध्ये त्यांना प्रशिक्षणसोबत प्रतिमाह 3 हजार रुपये वेतन दिले जाते.
आयुष्मान कार्डमध्ये नमस्ते योजना काय आहे?
या योजनेमधील नागरिकांना आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आरोग्य विमा दिले जातो, ज्यामध्ये लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड प्रदान करण्यात येते.
नमस्ते कधी सुरू झाले?
या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने वर्ष 2022 रोजी केली होती.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयासह कोणते केंद्रीय मंत्रालय नमस्ते योजना लागू करते?
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयासह गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय संयुक्त काम करतात.
सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी कामगारांच्या कोणत्या गटाला नमस्ते योजना प्राधान्य देते?
सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी कामगारांच्या Sewer/Septic Tank Workers गटाला प्राधान्य देते.
पुढे वाचा: