Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Details: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे काय? पहा संपूर्ण माहिती

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Details: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे काय? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आर्टिकल शेवटपर्यत पहा.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत देशासोबत आपल्या महाराष्ट्र राज्यमध्ये देखील बेरोजगारीचा दर वाढला आहे. देशामध्ये रोजगार संबंधित समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये सुशिक्षित तरुण वर्ग बेरोजगारीच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत, त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. त्याचसोबत आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणामुळे उच्च शिक्षण घेण्यास सुद्धा कठीण होते आहे. 

अशा तरुण युवकांना आर्थिक व शैक्षणिक दृष्टया मजबूत तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाचे पाऊल उचले आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनाची माहिती

महाराष्ट्र सरकारने राज्यामधील बेरोजगार तरुण युवकांना सक्षम बनविण्यासाठी 09 जुलै, 2024 रोजी या योजनेची सुरुवात केली आहे. योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुण युवकांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. त्याचसोबत प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आर्थिक मदत केली जाते.  

या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने एकूण 5,500 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 4 लाखांहून अधिक तरुण युवकांनी भाग घेतले आहे आणि शासनातर्फे 1 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. 

योजनेमध्ये 12 वी पास विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, आयटीआय व पदविका शिक्षण झालेल्या तरुणांना 8 हजार रुपये आणि पदव्युत्तर व पदवीधर पूर्ण असणाऱ्या युवकांना 10 हजार रुपये दिले जाते. राज्य सरकारच्या माध्यमातून ही आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे पाठविण्यात येते. 

योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी वर्ग त्यांच्या क्षेत्रामध्ये सहा महिन्याचे अतिरिक्त अनुभव सादर करू शकतात. याचा फायदा रोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी होऊ शकतो.

Read More: