Mukhyamantri Yojana Doot 2024: योजनादूतसाठी 50 हजार जागांसाठी भर्ती, असे करा रजिस्ट्रेशन

Mukhyamantri Yojana Doot 2024: महाराष्ट्रातील राज्य सरकारने तरुणांसाठी मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत 50,000 जागांची भर्ती सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामधील शहरी व ग्रामीण क्षेत्रामधील तरुण अर्ज करून प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये योजनेच्या माध्यमातून कमवू शकतो.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महाराष्ट्र राज्यामधील तरुणांना नोकरी व शासकीय कामाचा अनुभव मिळण्यासाठी इंटर्नशिप स्वरूपात मुख्यमंत्री योजना दूत प्रोग्रामची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेमध्ये भर्ती करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सरकारच्या इतर योजनेच्या कामकाजाची कामे देण्यात येणार.

परंतु हे इंटर्नशिप प्रोग्राममध्ये फक्त शासकीय काम असल्यामुळे इतर क्षेत्रात त्याचा कोणत्याही ठिकाणी या अनुभवाचा फायदा घेता येणार नाही. तसेच Mukhyamantri Yojana Doot GR अंतर्गत तरुणांना फक्त 6 महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाणार आणि याचा सरकारी नोकरीच्या भर्तीसाठी सुद्धा फायदा होणार नाही असे सांगण्यात आलेले आहे. 

जर तुम्हाला 1 वर्षासाठी तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव व वेतन प्राप्त करायचा आहे, तर तुम्ही नुकत्याच लॉन्च केलेल्या PM Internship Yojana अंतर्गत रजिस्ट्रेशन करून लाभ घेऊ शकता.

मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम काय आहे? त्याचप्रमाणे तरुणांची निवड कशा प्रकारे करण्यात येणार? त्यांना कोणत्या अटींचे पालन करावे लागणार? योजना अंतर्गत कोणते लाभ देण्यात येणार? आणि कशा पद्धतीने तरुण वर्ग योजनेमध्ये अर्ज करू शकतो? याबद्दलची माहिती आपण या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. 

Mukhyamantri Yojana Doot in Marathi

महाराष्ट्र सरकारतर्फे Yuva Karya Prashikshan Yojana राबिवली जात आहे. ज्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री योजना दूत भर्तीची सुरुवात 07 ऑगस्ट, 2024 मध्ये सामान्य प्रशासन विभागातर्फे करण्यात आले. 

हे उपक्रम महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष या कार्यांच्या माध्यमातून एकत्रित राबविण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या अंतर्गत 50 हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार, ज्यामध्ये ग्रामीण क्षेत्रामधील एका ग्रामपंचायतसाठी 1 आणि शहरी क्षेत्रात 5,000 लोकसंख्या असणाऱ्या भागासाठी 1 असे निवड केले जाणार. 

शासनातर्फे निवडण्यात आलेल्या योजनादूतांना 6 महिन्यासाठी इंटर्नशिप व प्रत्येक लाभार्थी प्रतिमाह 10,000 रुपये पगार सुद्धा देण्यात येणार आणि दहा हजार पगारामध्ये प्रवासाचा खर्च तसेच इतर भत्ते सुद्धा समावेश असणार आहे. 

Mukhyamantri Yojana Doot Details 2024

प्रोग्रामचे नावमुख्यमंत्री योजनादूत
योजनामहाराष्ट्र सरकारी योजना
आर्थिक खर्च300 कोटी रुपये
कोणी लॉन्च केलेमहाराष्ट्र राज्य सरकार
लॉन्च दिनांक07 ऑगस्ट, 2024
उद्दिष्टराज्यामधील नागरिकापर्यंत इतर योजनांची माहिती पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देणे
भर्तीसाठी पात्रमहाराष्ट्रामधील तरुण वर्ग
नोंदणी पद्धतऑनलाईन
फायदेप्रतिमाह 10 हजार रुपये पगार
अधिकृत वेबसाइटmahayojanadoot.org
कालावधी6 महिने

Mukhyamantri Yojana Doot Aim

शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती महाराष्ट्र राज्यामधील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवणे व त्यांना लाभ घेण्यासाठी मदत करणे हे मुख्यमंत्री योजना दूतचे मुख्य लक्ष्य आहे. 

यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे तब्बल 50,000 योजनादूतांची भर्ती केली जाणार. ज्याच्या माध्यमातून विविध योजनांची प्रचार केले जाणार व प्रसिद्धी वाढविण्यासाठी मदत घेतली जाणार. 

तसेच योजनेमधून पन्नास हजार लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने 300 कोटी रुपयांचा खर्च सुद्धा करण्यास मान्यता दिली आहे. योजनेमधून संपूर्ण खर्च कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे करण्यात येणार आहे. 

Mukhyamantri Yojana Doot Eligibility 

राज्यामधील युवकांना मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमाअंतर्गत भर्ती होण्यासाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे. 

  • जे युवा वर्ग योजनेमध्ये सहभागी होणार आहे, ते महाराष्ट्र राज्याचे स्थानिक रहिवासी असणे. 
  • भर्तीसाठी अर्ज करणारे युवा तरुण कमीतकमी 18 वर्ष व जास्तीस्त जास्त 35 वयोगटामधील असले पाहिजेत. 
  • त्याचप्रमाणे कोणत्याही क्षेत्रामधील पदवीधर शैक्षणिक पात्रता पूर्ण असणे. 
  • योजनेमधून आर्थिक मदत मिळविण्यासाठी युवकांकडे आपले बँक खाते असून ते आधाकार्डसोबत जोडलेले असणे. 
  • सहभागी होणाऱ्या उमेदवारांना संगणक यंत्रणा संबंधित ज्ञान येणे आवश्यक आहे. 
  • तसेच योजनेमधून काम राबविण्यासाठी उमेदवाराकडे मोबाईल असणे महत्त्वाचे आहे.

Mukhyamantri Yojana Doot Documents 

उमेद्वारांना मुख्यमंत्री योजना दूतसाठी आवश्यक कागदपत्रे नोंदणी करताना सादर करणे आवश्यक आहे, त्यासाठी खालीलप्रमाणे संपूर्ण यादी देण्यात आली आहे. 

  • सक्षम यंत्रणातर्फे देण्यात आलेला अधिवास दाखला 
  • बँक खात्याचे पुरावे (पासबुक)
  • अर्जासोबत असलेले हमीपत्र 
  • उत्तीर्ण असल्याचे शैक्षणिक पुरावा व सर्व माहिती (मार्कशीट/प्रमाणपत्र) 
  • युवकांचे आधाकार्ड (ते सुद्धा बँक खात्यासोबत लिंक असलेले) 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • योजनादूतमध्ये ऑनलाईन केलेले अर्ज
  • युवकांचा मोबाईल नंबर 
  • ई-मेल आयडी 

Mukhyamantri Yojana Doot 2024 Apply Online 

उमेद्वारांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या मुख्यमंत्री योजना दूतची अर्ज प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करावी लागणार. 

  • सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या Mahayojanadoot ची अधिकृत वेबसाइट मोबाईल किंवा डेस्कटॉपमध्ये उघडावी लागेल. 
  • महायोजनादूतच्या वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला योजने संबंधित संपूर्ण माहिती डॅशबोर्डमध्ये दिसेल, ती सुद्धा पूर्ण वाचून घेऊ शकता. 
  • त्यानंतर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला Register चा पर्याय दिसेल, तो निवडून त्यामधील Youth Registration ऑपशनवर क्लिक करा.
  • तुम्ही खाली स्क्रोल करून आल्यावर आधार नंबर टाकावा लागेल आणि तिथे कॉन्सेंटचा बॉक्स दिसेल, त्यावर टिकमार्क करणे. 
  • पुढे आधारनंबर व टिकमार्क केल्यानंतर Verify बटनावर क्लिक करणे. 
  • त्यानंतर तुम्हाला रोबॉट नसल्याचे टिकमार्क करावे लागेल, नंतर गेट ओटीपी बटन दाबणे. 
  • तुमचा जो मोबाईल नंबर आधारकार्डसोबत जोडलेला आहे, त्या नंबरवर ओटीपी येईल तो बॉक्समध्ये भरून व्हेरिफाय करणे. 
  • वेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज घडून येईल, त्यामध्ये तुमची काही वैयक्तिक माहिती विचारली असेल. 
  • तुमचा आधारकार्डप्रमाणे संपूर्ण नाव, तुमचा ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, लिंग आणि जन्म दिनांक टाकून घेणे. 
  • त्यानंतर तुम्ही SC,ST, VJ/NT, OBC, SBC व Open यामधील कोणत्या जातीमध्ये मोडता? याची निवड करणे. 
  • तुमचा जो कोणताही व्हाट्सअँप नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे. 
  • पुढे तुम्हाला तुमचा संपूर्ण घरचा पत्ता टाकावा लागेल. 
  • तसेच तुमचा जो काही राज्य व जिल्हा असेल तो निवडणे आणि तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाचा पिनकोड टाकणे. 
  • त्यानंतर तुमच्याकडे मोबाईल आहे का? असा प्रश्न विचारला असेल, त्यामध्ये Yes किंवा No मध्ये उत्तर देणे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ मोबाईल असणे आवश्यक आहे. 
  • तुमचे उच्च शिक्षण किती झाले आहे? त्यासाठी Bachelor’s व PG (Post Graduation) असा पर्याय दिसेल, त्यामधील एकाची निवड करा. 
  • त्यापुढे योजने संबंधित माहिती तुम्हाला कशी मिळाली? त्याची निवड करण्यासाठी यादी देण्यात आली आहे, त्यामधील एकाची निवड करा. 
  • तुम्हाला स्क्रोल करून खाली यावे लागेल, तिथे पुन्हा ओटीपी विचारला जाईल. 
  • वेरीफिकेशनसाठी गेट ओटीपी करणे व आलेला नंबर सादर करून Register बटनावर क्लिक करा. 
  • तुमच्या स्क्रिनवर Complete Profile चा ऑपशन येईल, त्यावर क्लिक करणे. 
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण भरलेली माहिती उघडून येईल त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, तर करून घ्या. कारण पुढे जाऊन पुन्हा काही बदल करू शकत नाही. 
  • पुढे तुम्हाला तुमच्या वयाचे पुरावे द्यावे लागेल, त्यामध्ये तुमचे आधाकार्ड स्कॅन करून अपलोड करा. 
  • त्यानंतर तुम्ही स्वतः अर्ज करत आहे का? किंवा इतर ठिकाणावरून मदत घेत आहेत, त्याची नोंद करणे. 
  • योजनेमधून मिळणाऱ्या नोकरीसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे? तो निवडणे. 
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या शैक्षणिक क्षेत्र संबंधित माहिती भरावी लागेल. 
  • त्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे? ती निवडा. 
  • तुम्ही कोणता कोर्स केला आहे? त्याची माहिती द्या. 
  • तुमची कोणत्या ब्रान्चमधून शिक्षण पूर्ण केले आहे? त्याची नोंद करा. 
  • पुढे तुमची Board/University चे नाव काय? ते भरा. 
  • तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला? आणि किती टक्केवारी पडली? त्याची सुद्धा माहिती द्या. 
  • त्यानंतर तुमचे मार्कशीट पीडीफ फाईल अंतर्गत स्कॅन करून अपलोड करा. 
  • अपलोडींग पूर्ण झाल्यावर Add to List पर्याय सिलेक्ट करून Save बटन दाबा. 
  • तुमचे Mukhyamantri Yojana Doot Online Form पूर्ण भरून होईल. 
  • त्यानंतर नोकरीमध्ये अर्ज करण्यासाठी डॅशबोर्डमध्ये Matching Jobs या पर्यावर क्लिक करणे. 
  • त्यामध्ये तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागातील आहेत यासाठी टिकमार्क करा. 
  • आणखी तुमचा ब्लॉक, जिल्हा व ग्रामपंचायत विचारले जातील, ते सिलेक्ट करून Search बटन दाबणे. 
  • तुमच्या निवडलेल्या जिल्ह्याप्रमाणे Yojanadoot Vacancy दाखविण्यात येतील. 
  • दाखविण्यात आलेल्या नोकरीमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता व Apply बटनावर क्लिक करणे.
  • अशा पद्धतीने तुमचा योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज यशस्वीपणे पूर्ण झालेले आहे. 
  • तसेच इतर जिल्ह्यांमधील नोकरीच्या जागांसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. 

निष्कर्ष 

आमच्या आर्टिकलच्या माध्यमातून Mukhyamantri Yojana Doot काय आहे? त्यामध्ये कशा प्रकारे लाभ देण्यात येतो? कोणते युवा यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत? सरकारने योजनेसाठी किती बजेट घोषित केला आहे? युवकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकिया फॉलो करावे लागतील? तसेच अर्ज करतेवेळी आवश्यक असणारी कागपत्रांची यादी सुद्धा सादर करण्यात आलेली आहे. 

महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या महायोजनादूत पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करायची अंतिम तारीख 02 ऑक्टोबर, 2024 रोजी होती असे सांगण्यात येत आहे. परंतु भविष्यामध्ये पुन्हा सरकारतर्फे रजिस्ट्रेशन चालू झाल्यावर ही संपूर्ण माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. 

FAQs

योजना दूत म्हणजे काय?

योजना दूत अंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील तरुणांना 6 महिन्यांसाठी इंटर्नशिप सुविधा दिली जाते, ज्यामध्ये प्रतिमाह 10,000 रुपये पगार दिला जातो. 

मुख्यमंत्री योजना दूतची रजिस्ट्रेशनसाठी शेवटी तारीख काय आहे? 

योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेवटची तारीख 02 ऑक्टोबर, 2024 होती. 

Yojanadoot मधून किती रुपये पगार दिला जातो? 

या योजनेमधून प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये पगार लाभार्थ्यांना दिला जातो.