Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: वरिष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ नागरिकांना वर्षाला 3000 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
प्रत्येक राज्यातील वरिष्ठ नागरिकांना सामाजिक व आर्थिकदृष्टया मदत व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकार देशामधील वरिष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना नागरिकांसाठी आणत असते. महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली.या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून वरिष्ठ नागरिक हे आपली आवश्यकता पूर्ण करण्यास सक्षम राहतील.
ज्या नागरिकांना यामध्ये अर्ज करून लाभ मिळवायचा आहे, ते नागरिक या लेखामध्ये दिलेल्या प्रकियानूसार अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे आम्ही यामध्ये योजनाचे उद्देश काय आहेत? योजनाचे फायदे काय आहेत? कोण कोण यासाठी पात्र असणार आहेत? अर्जदारांना अर्ज करताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती या लेखातून तुम्हाला मिळेल, यासाठी हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा.
Mukhyamantri Vayoshri Yojana in Marathi
5 फेब्रुवारी, 2024 रोजी कॅबिनेट बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनाची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यामधील 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील वरिष्ठ नागरिकांना आर्थिक स्वरूपात लाभ दिला जाणार आहे.
वरिष्ठ नागरिकांना सरकारकडून मिळणारा हा आर्थिक लाभ वर्षाला दिला जाणार आहे. जे वरिष्ठ नागरिक या योजनेत अर्ज करून लाभ घेणार आहेत, त्यांना प्रतिवर्षी 3 हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT म्हणजेच डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पाठविले जाते.
या योजनेमधून मिळणाऱ्या रकमेतून वृद्ध अवस्थेत असणारे वरिष्ठ नागरिक वैद्यकीय खर्चासाठी या रकमेचा उपयोग करू शकतात. त्याचप्रमाणे जे नागरिक आर्थिक दृष्टया कमकुवत असतील तर त्यांनाही या मदतीचा फायदा होईल आणि त्यांना कोणावरही अवलंबून न राहता आत्मनिर्भर राहण्यात मदत मिळेल.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची माहिती 2024
योजनाचे नाव | Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
सुरु कोणी केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी |
घोषणा कधी केली | 5 फेब्रुवारी, 2024 रोजी |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय |
उद्देश | राज्यातील गरीब वर्गातील वरिष्ठ नागरिकांना आर्थिक मदत पुरविणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील वरिष्ठ नागरिक |
लाभ | प्रतिवर्ष 3000 रुपये रक्कम |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | लवकरच येईल |
Mukhyamantri Vayoshri Scheme Aim
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करावी हे राज्य सरकारचे मुख्य उद्देश आहे. आपल्या राज्यात जास्त प्रमाणात वरिष्ठ नागरिक आहेत, ज्यांना दैनंदिन जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
त्यामध्ये काही वरिष्ठ नागरिक गरिबीमध्ये असल्या कारणामुळे आपल्या आरोग्यावर लक्ष देऊ शकत नाही. अशा लोकांना मदत व्हावी यासाठी सरकारकडून या योजने अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. वरिष्ठांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या समस्या दूर करण्यात ते सक्षम राहतील.
काही वरिष्ठ नागरिकांना निरनिराळ्या समस्या असतात. जसे कोणाला नीट दिसत नाही, कमरेचा त्रास, चालण्याचा त्रास, शौचालयाला जायचा त्रास, वय जास्त असल्यामुळे ऐकायला कमी येणे अशा प्रकारच्या बऱ्याच समस्यांना दूर करण्यासाठी या योजनेचा फायदा ते घेऊ शकतात.
महाराष्ट्र राज्यातील सरकारने वरिष्ठांचे शारीरिक व मानसिक त्रासाला तोंड देण्यासाठी या योजेनची सुरुवात केली आहे. या योजने अंतर्गत वरिष्ठ नागरिकांना आपले आरोग्य सुधारण्यास मदत होईल, त्याचप्रमाणे आर्थिक खर्चासाठीही त्यांना याची मदत होईल.
Mukhyamantri Vayoshri Yojana Benefits
- मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदा महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ नागरिकांना आर्थिक स्वरूपात दिला जातो.
- महाराष्ट्र राज्यामधील जवळपास 1.25 ते 1.50 कोटी वरिष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार.
- महाराष्ट्र राज्यामधील वरिष्ठांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारतर्फे 480 कोटींचा बजेट घोषित करण्यात आलेला आहे.
- या योजनेमध्ये राज्यातील 65 वयोगटातील वरिष्ठ नागरिक सहभागी होऊन आर्थिक लाभ घेऊ शकतात.
- वरिष्ठ नागरिकांना राज्य सरकारतर्फे योजनेच्या मार्फत 3000 रुपये आर्थिक मदत केली जाते.
- योजनेमधील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जातात.
- या योजनेतून मिळणाऱ्या मदतीमधून वरिष्ठ नागरिक आपल्या समस्यांना सहज दूर करू शकतात.
- या आर्थिक मदतीमुळे वरिष्ठ नागरिक आपला दैनंदिन खर्च करण्यास मदत मिळते.
- त्याचप्रमाणे राज्यातील अपंगत्व असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे साधने विकत घेण्यास मदत मिळेल.
- शासनातर्फे मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे ज्येष्ठ नागरिक आपल्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीमध्ये जगतील.
- त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांना वयोमानामुळे येणार अपंगत्व व अशक्तपणा यांच्या उपायोजना करण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल.
- या योजनेतील लाभार्थ्यांना शासनातर्फे नोंदणी केलेल्या योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ्य केंद्र/ प्रशिक्षण केंद्र व मनशक्ती केंद्र यामध्ये सुद्धा सहभागी होता येणार.
मुख्यमंत्री वायोश्री योजनेमधील उपकरणांची यादी
ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री वयोश्री योजनेमधून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमधून खालील दिलेल्या यादीनुसार उपकरणे विकत घेऊ शकतो.
- चष्मा
- कमोड खुर्ची
- श्रवण यंत्र
- नी-ब्रेस
- फोल्डिंग वॉकर
- लंबर बेल्ट
- स्टील व्हील चेअर
- ट्रायपॉड
- सर्वाइकल कॉलर
Mukhyamantri Vayoshri Yojana Eligibility
ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनासाठी पात्र असण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्रता असणे महत्त्वाचे आहेत.
- अर्ज करणारे अर्जदार महाराष्ट्र राज्याचे स्थानिक रहिवासी असणे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 वर्षा पेक्षा जास्त असणे
- ज्या नागरिकांचे 31 डिसेंबर, 2023 पर्यंत 65 वय पूर्ण झाले असतील, तर योजनेचा लाभ मिळणार.
- अर्ज करताना ज्येष्ठ नागरिकांकडे आधारकार्ड असणे किंवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा. (नोंदणी पावती आवश्यक)
- जर कोणत्याही नागरिकांकडे आधारकार्ड नसतील, तर स्वतंत्र ओळखपत्र असणे.
- अर्जदार नागरिकांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. यासाठी अर्जदाराचे घोषणापत्र सादर करणे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आवश्यक कागदपत्रे असणे.
- ज्या नागरिकांनी मागील तीन वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे चालविण्यात येणारे सार्वजनिक उपक्रमातून विनामूल्य उपकरणे घेतलेली नसावी. (हे सुद्धा घोषणापत्रात नमूद करणे)
- ज्येष्ठ नागरिकांचे आधारकार्ड बँक खात्याला लिंक असणे बंधनकारक आहे.
- या योजनेत राज्यातील 30 टक्के वरिष्ठ महिला अर्ज भरू शकतात.
Mukhyamantri Vayoshri Yojana Required Documents
अर्जदारांकडे मुख्यमंत्री वायोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे यादीनुसार दिलेली आहेत.
- मुख्यमंत्री वयोश्री योजना फॉर्म
- आधारकार्ड (बँक खात्याशी लिंक असलेले)
- स्वयंमचे घोषणापत्र
- वोटर आयडी कार्ड
- राष्ट्रीयकृत बँक खात्याचे पासबुक कॉपी
- ओळखपत्र
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र (इलेक्ट्रिकल बिल)
- बीपीएल रेशन कार्ड किंवा जिल्हा प्राधिकरणाचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला)
- जातीचा दाखला
Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply
जसे की तुम्हाला माहितीच असेल, 5 फेब्रुवारी, 2024 मध्ये या योजनेची घोषणा केली, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पोर्टल तयार करण्यात आलेले नाही. परंतु शासनाच्या जाहीर केलेल्या GR मध्ये नवीन स्वतंत्र पोर्टल विकसित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
Mukhyamantri Vayoshri Yojana Offline Apply
वरिष्ठ नागरिकांना लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ऑफलाइन प्रकिया सुरु करण्यात आली आहे, तर त्यामध्ये अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या ऑफलाइन रजिस्ट्रेशनची प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
- सर्वात प्रथम तुमच्याकडे Mukhyamantri Vayoshri Yojana Form असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या Telegram चॅनेलला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता किंवा तुमच्या जिल्ह्यामधील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामधून प्राप्त करू शकता.
- फॉर्म डाउनलोड केल्यानंतर प्रिंट करून घेणे.
- त्यानंतर त्यामध्ये विचारली गेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरून घेणे.
- त्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रांची झेरॉक्स काढून फॉर्मसोबत जोडणे.
- फॉर्म व कागदपत्रे तयार केल्यानंतर व्यवस्थित तपासून घेणे.
- फॉर्मची खात्री पटल्यानंतर ते कागपत्रे घेऊन तुमच्या जिल्ह्यामधील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयात जमा करणे.
- त्यानंतर कार्यालतयील अधिकाऱ्याकडून तुमच्या फॉर्मची तपासणी केली जाईल.
- या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल, तर तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे थेट रक्कम ट्रान्सफर केली जाईल.
- अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन अर्ज करून लाभ घेऊ शकता.
महत्त्वाची नोंद: या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेसंबंधित वयोश्री फॉर्म, स्वयंघोषणा पत्र एक व दोन आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. या सगळ्या फॉर्मसाठी कुठे जायची गरज लागणार नाही. तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये गेल्यावर तुम्हाला हे सगळे फॉर्म सहजरित्या भेटतील. त्यांचे PDF File डाउनलोड करा व प्रिंट करून वापरा.
Conclusion
आम्ही या लेखातून Mukhyamantri Vayoshri Yojana याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तररित्या सोप्या भाषेत सांगितली. यामध्ये आम्ही योजनाचे महत्त्व, त्याची घोषणा कधी केली? ते कोणी सुरु केले? कशासाठी सुरु केले? यातून कोणते फायदे मिळणार? कोणाकोणाला या योजनेचा फायदा होणार? यामध्ये कोणते विभाग कार्य करते? लाभार्थ्यांना काय मिळणार? अर्ज करताना पात्रता काय असणार? यामध्ये कोणकोणते उपकरणे घेता येणार? अर्ज करताना कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत? रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करू शकतो? यासंबंधित संपूर्ण माहिती मार्गदर्शन करण्यात आली.
ज्या ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये अर्ज करायचा आहे, त्यांनी आम्ही दिलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करून लाभ मिळवा आणि तुमच्या जवळील गरजू लोकांना हा लेख पाठवा व त्यांनाही मदत मिळवून द्या. अशाच प्रकारच्या नवीन योजनांच्या अपडेट्ससाठी तुम्ही आम्हाला Subscribe करू शकता.
FAQs
CM वयोश्री योजनेसाठी पात्र कोण आहेत?
या योजनेत महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील जेष्ठ नागरिक पात्र आहेत.
मुख्यमंत्री वयोश्रीमधून किती पैसे मिळणार?
या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला 3 हजार रुपये दिले जाते.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री वायोश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी जिल्ह्यामधील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन अर्ज करावा.
पुढे वाचा: