Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana 2024: वैद्यकीय उपचारासाठी 2 लाख रुपये मिळणार, असे करा अर्ज

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana 2024: महाराष्ट्र राज्यामधील गरीब व मध्यम वर्गातील कुटुंबाना वैदकीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना सरकारतर्फे सुरु करण्यात आले. योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या नागरिकांना विविध प्रकारचे वैदकीय उपचार करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

घरामध्ये कोणत्याही सदस्यांना आजारपण किंवा गंभीर दुखापत झाल्यावर सर्वात मोठी अडचण म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे योग्य प्रकारचे उपचार घेता येत नाही. त्याचप्रमाणे जरी आर्थिक स्थिती थोडीफार चांगली असल्यास हॉस्पिटलमधील साधारण खर्च सुद्धा खिशाला मोकळा करतो. 

आपल्या देशासोबत राज्यातही वैद्यकीय खर्च जास्त महाग आहे ते कोणाच्याही खिशेला परवडणारे नसतात. अचानक कोणत्याही सदस्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करणे व त्यासाठी वेळीच पैशांची जोडणी करणे होत नाही. गरीब व मध्यम वर्गातील नागरिकांच्या अशा समस्यांना दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना आणली आहे. 

आपल्या आर्टिकलमध्ये या योजनेचा लाभ सामान्य नागरिक कसा घेऊ शकतो? त्यामध्ये कोणकोणत्या आजाराचा किंवा शास्त्रक्रियांचा समावेश आहे? योजनेमधून किती रुपये आर्थिक मदत लाभार्थ्यांना दिली जाते? त्यामध्ये कोणत्या अटी व शर्ती शासनातर्फे लावण्यात आलेले आहेत? सामान्य नागरिकांना लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची जुळवणी करणे आवश्यक आहे? शासनाने कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज प्रकिया सोपी केली आहे? आणि कुठे जाऊन ऑनलाईन अर्ज करावा? या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana in Marathi 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनाची सुरुवात आधीच करण्यात आली होती. परंतु त्यामध्ये हवे तसे यश न मिळाल्याने ते लोकांपर्यत पोहचले नाही. त्यानंतर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा पदावर आले, तेव्हा त्यांनी पुन्हा योजनेमध्ये बद्दल घडवणून आणले.

ज्यामध्ये योजनेमधून सर्व लाभार्थ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष या डिपार्टमेंटची स्थापना करण्यात आले. या डिपार्टमेंटच्या अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज तपासले जातात व पात्र असलेल्या अर्जदारांचे स्वीकार केले जाते. योजनेमध्ये स्वीकारलेल्या लाभार्थ्यांना 2 लाखांपर्यंत वैद्यकीय सुरक्षा अंतर्गत आर्थिक मदत पाठविले जाते. 

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana 2024 Highlights

योजनाचे नावमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना
उद्देशराज्यामधील कुटुंबाना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करून निरोगी बनविणे
श्रेणीमहाराष्ट्र सरकारी योजना
स्थापना केलीमहाराष्ट्र सरकारने
डिपार्टमेंटमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष
पात्रतामहाराष्ट्र राज्यामधील गरीब व आर्थिक दृष्टया कमकुवत असलेले नागरिक
रजिस्ट्रेशन प्रकियाऑनलाईन
अधिकृत वेबसाइटmahacmmrf.com

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Objectives

महाराष्ट्रामधील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना अंतर्गत वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करणे हे मुख्य उद्देश महाराष्ट्र शासनाचे आहे. त्याचप्रकारे राज्यामध्ये राहत असलेल्या प्रत्येक कानाकोपऱ्यांमधील नागरिकांपर्यंत आरोग्य उपचारासाठी आर्थिक मदत पोहचविण्याचे प्रयत्न सुद्धा शासन करत आहेत. 

त्याचप्रकारे सर्व नागरिकांचे आरोग्य चांगले राहून दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी अशा विविध योजना केंद्र व राज्य सरकार घेऊ येत असतात. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील नागरिकांना आरोग्य विषयक होणाऱ्या खर्चाचा विचार न करता चांगल्या हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार उपलब्ध व्हावा हाच सरकारचा ध्येय आहे. 

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Benefits

  • मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनाचे फायदे महाराष्ट्र राज्यामधील गरीब व दारिद्रय रेषेखालील नागरिकांना वैद्यकीय उपचार करण्यासाठी आर्थिक स्वरूपात होते. 
  • या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 25 हजार पासून ते 2 लाखांपर्यंतचे आर्थिक मदत आरोग्य उपचारासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येतात. 
  • त्याचप्रमाणे ही आर्थिक मदत एकूण 20 आजारांच्या उपचार करण्यासाठी लाभार्थ्यांना दिले जातात. 
  • महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक कानाकोपऱ्यामधील नागरिकांना त्वरित व सोप्या पद्धतीने आर्थिक मदत पोहचविण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा चालू करण्यात आलेले आहेत. 
  • ज्या नागरिकांना सोप्या पद्धतीने आर्थिक मदत हवी आहे त्यांना 8650567567 या नंबरवर फक्त मिस्ड कॉल करायचा आहे आणि त्यांना अर्जाची लिंक मिळून जाईल. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनामध्ये समावेश असणारे आजार 

  • मेंदू आजार 
  • हृदय प्रत्यारोपण 
  • लहान बालकांचे शास्त्रकिया 
  • रस्त्यांवर होणारे अपघात 
  • किडनी प्रत्योपण 
  • नवजात शिशूंना होणारे आजार 
  • कर्करोग (केमोथेरपी व रेडिएशन) 
  • यकृत प्रत्यारोपण 
  • हिप रिप्लेसमेंट 
  • कर्करोगाचे शस्त्रक्रिया 
  • हृदयरोग 
  • गुडघ्याचे प्रत्यारोपण 
  • अस्थिबंधन 
  • डायलिसिस 
  • फुफुस प्रत्यारोपण
  • 2 ते 6 वर्षाखालील मुलांचे कॉकलियर इम्प्लांट  
  • हाताचे प्रत्यारोपण 
  • बर्न रुग्ण 
  • बोन मॅरो 
  • विद्युत अपघात 

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Eligibility

रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनामध्ये लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटींनुसार पात्र असणे आवश्यक आहे, त्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या अटी प्रमाणे पात्र असल्यास अर्ज करण्यासाठी मान्यता देण्यात येतील. 

  • रुग्णांना योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा स्थायी रहिवासी असणे. 
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही हॉस्पिटलमधील योजनेचा लाभ मिळत नाही. 
  • त्याचप्रमाणे राज्याबाहेरील नागरिक परंतु ते महाराष्ट्रात राहत आहेत, त्यांना देखील सहभागी होता येणार नाही. 
  • अर्ज करणारे नागरिक Pradhan Mantri Jan Arogya Yojana आणि Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana अंतर्गत लाभ घेत असतील तर ते देखील योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. 
  • ज्या नागरिकांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे ते योजनेमधून आर्थिक मदत घेण्यास पात्र नसणार. 
  • तसेच उपचार पूर्ण झाल्यानंतर काही नागरिक अर्ज करत असतील तर त्यांना सुद्धा लाभ देण्यात येणार नाही. 
  • जे अजर्दार खोटी माहिती किंवा बनावट अर्ज करतील त्यांच्यावर कायदेशीर पोलीस कारवाई करण्यात येईल. 
  • Ayushman Bharat Yojana, राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम आणि धर्मादाय रुग्णालय यामध्ये सहभागी असणारे नागरिक अर्ज करू शकत नाही. 
  • योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या सर्व नागरिकांना आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे स्व-सांक्षाकित म्हणजेच सेल्फ अटेस्टेड केलेले असणे. तसेच योजनेमधील लाभार्थ्यांना खाजगी रुग्णालयामधुन १ लाखांपेक्षा जास्त वैद्यकीय खर्च आल्यास खर्चाचे प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयातील अधीक्षक यांच्या कडून प्रमाणित करणे.
  • योजनेमध्ये अर्ज करणारा व्यक्तीच्या कुटुंबातील मागील वर्षाचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त नसावी.  
  • महाराष्ट्र शासनाकडून योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 वर्षातून फक्त एकदाच आर्थिक मदत वैद्यकीय उपचारासाठी देण्यात येते. 

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Documents

महाराष्ट्रामधील रुग्णांना किंवा अर्जदारांना सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनाची कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेल्या यादीनुसार जवळ असणे बंधनकारक आहे. 

  • रुग्णांचे वैद्यकीय खर्च प्रमाणपत्र 
  • अर्जदाराचे रेशनकार्ड/रहिवासी प्रमाणपत्र/आधारकार्ड (महाराष्ट्र राज्यामधील) 
  • मोबाईल नंबर 
  • ई-मेल आयडी
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे बँक पासबुक व सर्व माहिती 
  • कुटुंबामधील मागील वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसिलदार कार्यालमधून घेणे) 
  • अर्जदाराच्या जवळील शाखेमधील आमदार किंवा खासदार याचे शिफारस पत्र
  • अवयव प्रत्यारोपण करायचे असल्यास ZTCC नोंदणी पावती किंवा रुग्ण मान्यता प्रमाणपत्र 
  • रुग्णाचे आजार रिपोर्ट 
  • अपघात झाले असल्यास FIR किंवा MLC करणे आवश्यक
  • अर्जदार आणि रुग्णाचे पासपोर्ट साईज फोटो  

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Registration 

ज्या नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत हवी आहे, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनाची ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रकिया पाहावी लागेल आणि त्यानुसार अर्ज करावा लागेल. 

  • ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनाचे अधिकृत वेबसाइट उघडावे लागेल. 
  • त्यानंतर तुमच्या समोर योजनेचा संपूर्ण डॅशबोर्ड उघडून येईल. 
  • त्या डॅशबोर्डमध्ये सुद्धा योजने संबंधित संपूर्ण माहिती आणि त्याचसोबत योजनेमध्ये नोंद असलेल्या हॉस्पिटलांची यादी सुद्धा पाहायला मिळेल. 
  • तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी अर्जाचा फॉर्म तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. 
  • त्याच डॅशबोर्डमध्ये स्क्रोल करून खाली गेल्यावर पिवळ्या बॉक्समध्ये फॉर्मसाठी लिंक दिली असेल, त्यावर क्लिक करा. 
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही सूचना असती ते सुरुवातीला वाचून घ्या. 
  • सूचना वाचून झाल्यानंतर फॉर्मसाठी काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल. 
  • त्यामध्ये तुमचा ई-मेल आयडी, अर्जदाराचे नाव, आधार क्रमांक, संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे. 
  • पुढे रुग्णांशी तुमचे संबंध किंवा नाते काय आहे? ते विचारले जातील, त्यामधील एकाची निवड करून सबमिट बटनावर क्लिक करणे. 
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडून येईल. 
  • त्या पेजमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना फॉर्म मिळण्यासाठीचा लिंक असेल त्यावर क्लिक करा. 
  • त्यानंतर पुन्हा नवीन पेजवरती याल तिथे तुम्हाला योजनेमध्ये अर्ज करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची माहिती दिली असेल ती पाहून घ्या. 
  • पुढे त्याच पेजमध्ये खाली स्क्रोल करून आल्यावर डाउनलोड फॉर्म असा ऑपशन दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • तुमच्या समोर योजनेच्या फॉर्मचा PDF स्वरूपात पेज उघडून येईल तो डाउनलोड करून प्रिंट करा. 
  • त्यानंतर प्रिंट केलेला फॉर्म संपूर्ण पेनाने व्यवस्थितपणे भरून घ्या. 
  • पुढे फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सांगितल्या प्रमाणे जमा करून त्याची झेरॉक्स सोबत जोडणे. 
  • तसेच अर्जदार आणि रुग्णाचे फोटो सुद्धा शेवटी चिटकवून सही करून घेणे. 
  • त्यानंतर फॉर्म व कागदपत्रे पीडीफ स्वरूपात स्कॅन करून aao.cmrf-mh@gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवून देणे 
  • महाराष्ट्रामधील नागरिक या पद्धतीने फॉर्म प्राप्त करून अर्ज करू शकतो. 
  • अर्ज करताना किंवा योजने संबंधित काही समस्या आल्यास 022222025540/02222026948 या लँडलाईन नंबर वर संपर्क साधू शकता. 

निष्कर्ष 

महाराष्ट्रमधील नागरिकांसाठी सरकारने सुरु केलेल्या Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही लेखातून प्रयत्न केला. त्या प्रयत्नांमध्ये योजनेची सुरुवात का करण्यात आली? कोणते कक्षामधून योजनेचे लाभ दिले जाते? कोणकोणत्या आजारांसाठी आर्थिक खर्च दिला जातो?

त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना किती रक्कम वैद्यकीय उपचारासाठी दिले जाते? रुग्णाना कशा प्रकारे फायदे करून दिले जाते? महाराष्ट्रमधील नागरिकांना कोणत्या पात्रतेच्या अटींचे पालन करावे लागणार? तसेच अर्ज करताना कोणकोणत्या कागदपत्रांना जमा करावे लागणार? आणि कोणत्या प्रकिया अर्ज करताना फॉलो करावे लागतील? अशा सर्व गोष्टींबद्दल माहिती दिली.