Mukhyamantri Annapurna Yojana 2024: महाराष्ट्र सरकारतर्फे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांसाठी सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गरीब परिवारांना सरकारकडून वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे.
28 जून, 2024 च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थ संकल्पनेत महाराष्ट्राचे वित्त मंत्री अजित पवार यांच्यातर्फे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा वित्त मंत्रीतर्फे सांगण्यात आले की, राज्यातील पात्र असलेल्या 52 लाख 16 हजार कुटुंबाना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि अकराशे रुपयांचा सिलेंडर तीन वेळेला मोफत मिळणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाला साहाय्यभूत ठरेल असे जाहीर करण्यात आले.
जूनमध्ये घोषणा केल्यानंतर अखेर महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाचा GR दिनांक 30 जुलै, २०२४ रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. हा GR शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आला.
या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा? यासाठी कोण पात्र असणार आहेत? तसेच यामधून कसा फायदा मिळणार? त्याचप्रमाणे योजनेचे उद्देश काय आहेत? त्यांचे फायदे कोणते आहेत? अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? याबद्दल आमच्या या लेखात सविस्तर माहिती सांगितली आहे. योग्यरीत्या माहिती जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत पहा.
Mukhyamantri Annapurna Yojana in Marathi
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाची सुरुवात दिनांक 30 जुलै, 2024 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील कुटुंबाना गॅस परवडण्यासाठी एका वर्षासाठी 3 मोफत LPG सिलेंडर देण्यात येणार आहेत. जेणेकरून राज्यातील कुटुंबियांना आर्थिक स्थरावर मदत होईल.
या योजनेमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील पात्र ठरलेल्या 52,16,412 लाभार्थींनासुद्धा मोफत सिलेंडर दिले जाणार आहे. तसेच लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेत समावेश करून लाभ दिला जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळणारे गॅस सिलेंडर हे खाजगी कंपनीद्वारेच दिले जाणार आहे. लाभार्थींना यासाठी सुरुवातीला पूर्ण पैसे भरावे लागणार. नंतर राज्य सरकार सबसिडीच्या मार्फत पुन्हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे पाठविण्यात येणार आहे. या सबसिडीची रक्कम एका सिलेंडरमागे 530 रुपये इतकी GR मध्ये घोषित करण्यात आलेली आहे.
Mukhyamantri Annapurna Yojana Mahiti 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
सुरु कोणी केली | महाराष्ट्रातील राज्य सरकारने |
घोषणा | 28 जून, 2024 रोजी |
कधी सुरु झाली | 30 जुलै, 2024 रोजी |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
उद्देश | राज्यातील गरीब कुटुंबाना स्वच्छ इंधन पुरवणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील कुटुंब |
लाभ | वर्षाला मोफत 3 गॅस सिलेंडर |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | लवकरच येईल |
Mukhyamantri Annapurna Yojana Purpose
महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे मुख्य उद्देश राज्यातील कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर वाटप करणे हे आहे. जेणेकरून देशामधील महिलांना धूरमुक्त वातावरणामध्ये राहता येईल. महिलांचा स्वयंपाक घरात जेवण करण्यात जास्त वेळ निघून जातो.
त्याचप्रमाणे त्यांना जेवण करताना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच गरीब घराण्यामधील स्त्रियांना घरातल्या आर्थिक तंगीमुळे गॅस विकत घेणे परवडत नाही. अशा समस्यांना तोंड देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात मोफत गॅस पुरविण्याचे ध्येय हाती घेतले आहे.
सरकारतर्फे मिळणाऱ्या या योजनेच्या मदतीमुळे गरीब कुटुंबातील महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल. त्याचप्रमाणे घरामध्ये अन्नपुवठा व्यवस्थित होण्यासाठी मदत होईल. स्त्रियांना गॅससाठी आर्थिक खर्च करण्यासाठी आता चिंता करावी लागणार नाही. या योजनेतून मिळणाऱ्या मदतीमुळे आर्थिक खर्च आटोक्यात येऊन चार पैश्यांची बचत करण्यात त्यांना मदत मिळेल.
Mukhyamantri Annapurna Yojana Features
- राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यात येत आहे.
- राज्यामधील गरजू कुटुंबाना सामाजिक व आर्थिक दृष्टया मदत होणार आहे.
- महाराष्ट्राचे वित्त मंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पनेत या योजनाची घोषणा केली.
- या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या परिवारांना दर वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातील.
- या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिला वर्गातील स्त्रियांना सक्षम बनविणे हे आहे.
- सरकारचे मुख्य धोरण राज्यामधील ग्रामीण क्षेत्रातील स्त्रियांना चुलीपासून निरोगी ठेवणे.
- ग्रामीण भागातील घरात चूल पेटविल्यामुळे होणारे प्रदूषण थांबविणे व रोगराई कमी करणे हे सरकारचे या योजनेतून प्रयत्न आहेत.
- पर्यावरणाला हानी होऊ नये व प्रदूषण वाढू नये यासाठी सुद्धा सरकारकडून अशाप्रकारचे पावले उचलली जात आहेत.
Mukhyamantri Annapurna Yojana Benefits
- राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाचे फायदे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंब घेऊ शकतो.
- महाराष्ट्र सरकारतर्फे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील स्त्रियांना विनाशुल्क 3 LPG गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.
- महिलांना हे मोफत सिलेंडर वर्षातून 3 वेळा वापरता येणार.
- महाराष्ट्र सरकारकडून ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या माध्यमातून लाभ घेत आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार.
- महाराष्ट्र्रात आताच सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनामध्ये सहभागी असणाऱ्या स्त्रियांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार.
- राज्यामधील उज्ज्वला योजनेतील एकूण 52 लाख 16 हजार महिलांना यातून मोफत सिलेंडर दिला जाणार.
- या योजने अंतर्गत महिलांना महाराष्ट्र सरकारकडून सबसिडी दिली जाणार आहे.
- सरकारकडून मिळणारी सबसिडी ही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये DBT म्हणजेच डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर माध्यमातून पाठविली जाणार आहे.
- जे लाभार्थी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत सहभागी आहेत त्यांना शासनाकडून एका सिलेंडरमागे 300 रुपये सबसिडी दिली जाते.
- लाभार्थीना उज्ज्वला सबसिडी सोबत आता या योजनेची सबसिडी रक्कम 530 रुपये सुद्धा दिली जाणार आहे.
- लाभार्थी महिलांना उज्ज्वला योजना व अन्नपूर्णा योजना या दोन्ही सबसिडीचे पैसे बँक खात्यामध्ये जमा केले जाणार.
- लाभार्थ्यांना एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर मोफत दिले जाणार नाही.
- EKYC झालेल्या नागरिकांना या योजनेतून लाभ मिळणार आहे, जर कोणाचे इकेवायसी झालेले नसेल तर त्यांनी तेल कंपनीमध्ये जाऊन करून घेणे.
Mukhyamantri Annapurna Yojana Eligibility
राज्यातील नागरिकांना अर्ज करण्यासाठी आधी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनासाठी पात्र ठरणे महत्त्वाचे आहे. यासाठी लाभार्थ्यांची पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे.
- या योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले नागरिक महाराष्ट्र राज्याचे मूळ स्थानिक रहिवासी असणे.
- ज्या महिला सदर योजनेत अर्ज करणार आहेत, त्या महिलेच्या नावाने गॅसजोडणी असणे आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनामधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
- महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनामधील लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेत सहभागी होता येणार.
- राज्यातील रेशन कार्डप्रमाणे एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेसाठी अर्ज करता येणार.
- मोफत सिलेंडर फक्त 14.2 किलो ग्रॅम वजनाचा गॅस सिलेंडर वापरणाऱ्या कुटुंबालाच दिले जाणार.
- ज्या नागरिकांचे 1 जुलै, 2024 च्या आतील शिधापत्रिका असेल फक्त त्यांना अर्ज करता येणार आहे.
- या योजनेतून मोफत गॅस सिलेंडर प्राप्त करण्यासाठी EKYC करणे बंधनकारक आहे.
- अर्ज करणाऱ्या नागरिकांना आपले आधारकार्ड बँकेत जाऊन लिंक करणे आवश्यक आहे.
Mukhyamantri Annapurna Yojana Required Documents
अर्ज करताना अर्जदारांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाचे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ते खालीलप्रमाणे यादीनुसार दिलेले आहेत.
- अर्जदाराचे आधारकार्ड
- पॅनकार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाईल नंबर
- रेशन कार्ड
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना फॉर्म
- रहिवासी दाखला
- कुटुंबाचे आयडीकार्ड
- बँक पासबुकचे पहिले पान
Mukhyamantri Annapurna Yojana Online Apply
जसे आम्ही सांगितले की नुकताच GR प्रकशित करण्यात आलेला आहे, त्यामुळे सध्यातरी सरकारकडून कोणत्याही प्रकारचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अर्ज प्रकिया सुरु करण्यात आलेले नाही, त्याचसोबत कोणत्याही प्रकारची वेबसाइट सुद्धा सुरु करण्यात आलेली नाही. परंतु विविध बाहेरील स्रोतांकडून ऐकण्यात येत आहे की, जे नागरिक प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज करण्याची गरज लागणार नाही. त्यांना अप्रत्यक्षपणे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रजिस्ट्रेशन प्रकिया चालू झाल्यानंतर तुम्हाला त्वरित माहिती भेटण्यासाठी तुम्ही आमच्या Telegram किंवा WhatsApp Channel ला Join करून ठेवू शकता. जेणेकरून शासनातर्फे काही अपडेट्स आल्यावर लगेच तुमच्या जवळ पोहोचतील. त्यांच्याप्रमाणे तुम्हाला GR ची PDF हवी असेल तर तुम्ही तीही आमच्या टेलिग्राममधून डाउनलोड करू शकता.
Conclusion
आमच्या या लेखातून Mukhyamantri Annapurna Yojana बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला योजनेचे महत्त्व, ती का सुरु करण्यात आली? कशासाठी सुरु केली ? यामधून कोणाला फायदा होणार? त्याचप्रमाणे कोणते फायदे यामध्ये मिळणार? कोण यासाठी पात्र असणार? पात्र असलेल्या व्यक्तींना कोणत्या कागदपत्रांची गरज लागणार आहेत? आणि अर्ज प्रकियाबद्दल अपडेट्स काय आहेत? अशा सगळ्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले.
जर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र असाल तर उत्तम आहे, या योजनेमुळे तुमच्या घरातील आर्थिक खर्च कमी करण्यात मदत मिळेल. या योजनेत अर्ज करून लाभ घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला Subscribe करून ठेवू शकता आणि हा लेख तुमच्या कुटुंबातील गरजू महिलांना पाठवून त्यांची मदत करू शकता.
FAQs
अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज कसा करावा?
राज्यातील शासनातर्फे कोणत्याही प्रकारचे योजनेसाठी अर्ज प्रकिया सुरु करण्यात आलेली नाही.
अन्नपूर्णा योजनेचा लाभार्थी कोण आहे?
या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 1 जुलै, 2024 च्या आधीचे रेशन कार्डधारक हे लाभार्थी असणार आहे.
अन्नपूर्णा योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
या योजनाचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील गरीब कुटुंबाला वर्षाला 3 मोफत सिलेंडर प्रदान करणे आहे.
पुढे वाचा: