Mission Antyodaya Yojana 2024: देशामधील गरिबी संपविण्यासाठी केंद्र सरकारतर्फे मिशन अंत्योदय योजनाची सुरुवात 2017-18 च्या अर्थसंकल्पनेत करण्यात आलेली होती. केंद्र सरकारचे योजनेच्या माध्यमातून मुख्य उद्देश ग्राम व ग्रामपंचायत स्थरावर सर्वांगीण विकास करून गरिबी हटवणे आहे.
आपल्या देशामधील काही ग्रामीण भागात आजही शिक्षण, मेडिकल, रोजगार, राहणीमान व इतर गोष्टींमध्ये विकास झालेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील काही नागरिकांची संख्या मोठ्या शहरांमध्ये शिक्षण व रोजगाराच्या संधीसाठी स्थलांतरण करत असतात. त्याचसोबत काही नागरिकांची संख्या गावामध्येच काही न काही काम करून आपले घर चालवत असतात.
अशा परिस्थितीमध्ये त्यांना आर्थिकदृष्टया समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे त्यांच्या घरात वीज, पाण्याची सोय, शिक्षणासाठी पैसे, काम करण्यासाठी रोजगाराची संधी, घरांमध्ये LPG गॅसची सुविधा नाही, त्यांच्या जवळपास आरोग्य सेवा केंद्र उपलब्ध नाही आणि लोकांमध्ये एकात्मतेची कमतरता अशा सगळ्या गोष्टींमध्ये विकास करण्यासाठी केंद्र सरकारने मिशन अंत्योदय चालू केले आहे.
आजच्या आपल्या लेखामध्ये याच मिशन संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये कशाप्रकारे मिशन राबविले जाते? कोणकोणत्या गोष्टींचा फायदा करून दिला जातो? कोणते विभाग यामध्ये सहभागी आहेत? ग्रामीण भागातील नागरिकांना कसा फायदा मिळेल? अशा सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत आर्टिकल पाहत रहा.
Mission Antyodaya Yojana in Marathi
केंद्र सरकारने मिशन अंत्योदय योजनाची सुरुवात 2017-18 च्या अर्थसंकल्पनेत केली होती. या योजने अंतर्गत मिशनची अंमलबजावणी करायचे काम Ministry of Rural Development आणि Ministry of Panchayati Raj हे नोडल मिनिस्ट्री करतात.
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रामध्ये सर्वे केले जातील, ज्यामध्ये विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रांचा विकास करण्यात येतो. जवळपास 27 मंत्रालयातर्फे विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी प्रोग्राम चालविण्यात येत आहे.
याच प्रोग्रामच्या माध्यमातून मिळणाऱ्या स्रोतांचा वापर करून ग्रामीण भागातील गरिबी कमी करण्यात मदत करण्यात येते. योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रांचा विकास करण्यासाठी सर्वे करण्यात येते.
Mission Antyodaya Survey (MAS)
ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत केंद्र तयार केले जाते. ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राचे मिशन अंत्योदय अंतर्गत वर्षातून सर्वे करण्यात येते. अकराव्या शेड्युलनुसार पंचायत नियुक्त केले जाते, त्यामध्ये 29 विषयांवर लक्ष दिले जाते.
वार्षिक सर्वेच्या मदतीने ग्रामपंचायत स्थरावर ग्रामीण भागातील विविध विकास करण्यासाठी डेटा गोळा केला जातो. ज्यामध्ये पाण्याचे व्यवस्थापन, आरोग्य, पोषण, सामाजिक सुरक्षा, चांगले प्रशासन आणि इत्यादी डेटाची माहिती जमा करण्यात येते.
ग्रामपंचायत स्थरावर सर्वे करण्याची संकल्पना ग्रामपंचायती राज मंत्रालयतर्फे सुचविण्यात आले होते. ज्यामधून गावच्या ठिकाणी कोणकोणते समस्या आहेत? आणि त्यांचे कसे विकास करायचे? हे सर्वेच्या माध्यमातून पडताळणी केली जाते.
देशामधील सर्व ग्राम पंचायत मिशन अंत्योदय सर्वे करण्यासाठी ग्राम विकास विभाग करतात. मिशनच्या सर्वे अंतर्गत पाच श्रेणींमध्ये कामे विभागले जातात, त्यांची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
Category of Mission Antyodaya
- पंचायत पायाभूत सुविधा
- गावांमधील पद्धती
- पंचायत सेवा
- गावाच्या पायाभूत सुविधा
- गावाची सेवा
Mission Antyodaya Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | मिशन अंत्योदय योजना |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
कधी सुरु करण्यात आले | 2017-18 च्या अर्थसंकल्पनेमध्ये |
कोणी सुरु केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
विभाग | ग्रामीण विकास मंत्रालय आणि पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून विकास करणे |
लाभार्थी | ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब |
लाभ | गावाचा विकास |
अधिकृत वेबसाइट | missionantyodaya.nic.in |
Mission Antyodaya Yojana Objectives
केंद्र सरकारने घोषित केलेल्या मिशन अंत्योदय योजनाचे मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरिबीला कमी करणे आणि गावांना विकसित करून कुटुंबाना सक्षम बनविणे आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण विकास करण्यासाठी केंद्र सरकार इतर संबंधित योजनांना एकत्रित करून सर्व कामे करून घेणे.
जेणेकरून ज्यामध्ये ज्या नागरिकांकडे राहायला घर नाही, त्यांना घर देणे. ग्रामीण क्षेत्रातील पंचायत समितीला रस्त्यांच्या माध्यमातून जोडले जाणे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शैक्षणिक, आरोग्यसेवा व डिजिटल कनेक्शन सुविधा उपलब्ध करून देणे हे अशा सर्व गोष्टींवरती केंद्र सरकारचे लक्ष आहेत.
Reasons of Launching Mission Antyodaya Yojana
Socio Economic and Caste Census (SECC) 2011 च्या निकालाच्या कारणांमुळे केंद्र सरकारने मिशन अंत्योदय योजना सुरु करण्याचे निर्णय घेतले ते कोणकोणते कारणे आहेत, त्यांची खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे.
- SECC 2011 च्यामार्फत ग्रामीण क्षेत्रामधील 90% लोक संख्याकडे पगाराच्या नोकऱ्या नाहीत.
- घर नसलेल्या लोकसंख्येत जवळपास 23.73 दशलक्ष इतका आकडा आहे.
- 6.89 दशलक्ष महिला वर्ग ज्यांना कोणत्याप्रकारे सपोर्ट नाही आणि ते स्वतः घर चालवतात.
- जवळपास 8.88 कोटी घरे गरिबीच्या जाळ्यात अडकले आहेत, म्हणजेच दारिद्रय रेषेखाली येतात.
- त्याचप्रमाणे 53.7 दशलक्ष कुटुंबांकडे स्वतःच्या जमिनी नाही म्हणजेच भूमिहीन आहेत.
- तसेच विविध समस्यांनी ग्रस्त झालेले असे 49% नागरिक आहेत, ज्यांच्याकडे घर, नोकरी व कोणतीही मदत नाही.
Provisions for Antyodaya under Indian Constitution
- भारतीय संविधानच्या अंतर्गत असलेल्या आर्थिक विकास व सामाजिक न्याय नियमनुसार 243G व 243W ग्रामपंचायत स्थरावर विकास करणे.
- ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामसभा अंतर्गत कार्य केले जाते.
- जिल्ह्या स्थरावर विकसित प्लॅन तयार करण्यासाठी District Planning Committee (DPC) नेमले गेले आहेत.
- State Finance Commission (SFC) अंतर्गत आर्थिक मदत पोहोचविण्याचे काम करतात.
- तसेच ग्रामीण भागातील 33% महिला वर्गाला आरक्षण देण्यात येते आणि काही राज्यांमध्ये 50% राखीव जागा ठेवण्यात येते.
- त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व जमाती वर्गातील नागरिकांचा विकास करण्यामध्ये सुद्धा समावेश करण्यात आलेले आहेत.
Mission Antyodaya Yojana Benefits
- केंद्र सरकारने सुरु केलेल्या मिशन अंत्योदय योजनाचे फायदे ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना होतो.
- भारत देशामधील एकूण 26 केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी सल्ला दिला जातो.
- विविध मंत्रालयतर्फे देण्यात येणाऱ्या प्रश्नांना एकूण 13 भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ग्रामपंचायतमध्ये पाठविले जाते.
- त्याचप्रमाणे ऑनलाईन सर्वे रेकॉर्ड करण्यासाठी मंत्रालयतर्फे National Informatics Centre (NIC) यांच्या सोबत मिळून मोबाइल एप्लिकेशन सुद्धा तयार करण्यात आले आहे.
- तसेच मंत्रालयातर्फे इन-हाऊस हेल्प डेस्क सुद्धा तयार करण्यात आले, ज्यामध्ये मोबाईल एप्लिकेशन संबंधित काही समस्या असतील तर त्यामध्ये लक्ष देता येते.
- या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिले जाते.
- त्याचप्रमाणे गावातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येते.
- तसेच विविध जातीमधील कुटुंबाना एकात्मतेने राहण्यासाठी जागरूक केले जाते.
- शहरी व ग्रामीण भाग जोडण्यासाठी रस्ते तयार केले जाते.
- ग्रामीण क्षेत्रातील महिलांना पुरुषांसोबत सामान दर्जा दिले जातो.
- तसेच प्रत्येक घरांमध्ये विजेची व LPG गॅसची सुविधा उपलध करून दिले जाते.
- या मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागातील समस्यांना कमी केले जाते.
- ग्रामीण विकास मंत्रालयतर्फे मिशन अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातून वार्षिक सर्वे करण्यात येते.
Gaps in Gram Panchayats under Mission Antyodaya Survey
मिशन अंत्योदय सर्वेच्या माध्यमातून काढण्यात येणारे ग्रामपंचायतमधील समस्यांचा डेटा खालीलप्रमाणे दिलेले आहेत. खालीलप्रमाणे सांगण्यात आलेला डेटा हा 2019-20 वर्षांमधील उपल्बध आहे, कारण आपल्या देशामध्ये मिशन अंतर्गत सर्वे चालू आहे.
- मिशन अंतर्गत सर्वेनुसार आपल्या भारत देशामध्ये एकूण 2.67 लाख ग्रामपंचायत आहेत.
- या ग्रामपंचायतमध्ये जवळपा1.03 दशलक्ष लोकसंख्याचा समावेश आहे.
- मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेमधून कमीतकमी 10 ते जास्तीत जास्त 100 स्कोर मूल्य दिले जाते.
- सर्वेच्या माहितीनुसार 90 ते 100 च्या स्कोरमध्ये भारतामधील कोणतेही राज्य येत नाही.
- सर्वात कमीच्या स्कोर ब्रॅकेटमध्ये 1,484 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
- 2019-20 च्या सर्वेनुसार केरळ राज्य हे 70 ते 80 च्या स्कोरमध्ये येतो.
- केरळ राज्यानंतर ब्रॅकेटमध्ये गुजरातचा दुसरा नंबर येतो.
- रिपोर्टनुसार 15 ग्रामपंचायत विभागाचा 10 स्कोरच्या खाली समावेश आहे आणि भारतामधील जास्तीत जास्त 5 ग्रामपंचायत 40 पेक्षा स्कोरमध्ये येते.
निष्कर्ष
आमच्या लेखातून Mission Antyodaya Yojana संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये मिशन अंत्योदय योजना काय आहे? ती का सुरु करण्यात आली? कशासाठी सुरु करण्यात आली? कधी सुरवात करण्यात आली? कोणकोणत्या मंत्रालयांचा समावेश करण्यात आले आहेत? त्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकाने कोणते फायदे दिले जाते? कशाप्रकारे सर्वे करण्यात येतात? कोणकोणत्या श्रेणीचा समावेश आहे? कोणत्या कारणामुळे मिशनची सुरुवात करण्यात आले? भारताच्या संविधान अंतर्गत ग्रामीण क्षेत्रासाठी कोणते कामे केली जातात? आणि कोणते समस्या ग्रामीण भागात आहेत? अशा सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेतली.
आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर अशाच योजनांच्या माहिती तुम्ही योजना मीडियाच्या वेबसाइटला Subscribe करू शकता किंवा Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करून लेटेस्ट माहिती मिळवू शकता.
FAQ
अंत्योदय मिशन कधी सुरू झाले?
केंद्र सरकारने अंत्योदय मिशनची सुरुवात 2017-18 च्या अर्थसंकल्पेत करण्यात आलेली होती.
अंत्योदय मिशनमधून काय फायदे होते?
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राचे वार्षिक सर्वे केले जाते व त्यामधून समस्यांवरती काम केले जाते.
मिशन अंत्योदयसाठी कोणती वेबसाइट सुरु करण्यात आली?
केंद्र सरकारने या योजनेसाठी missionantyodaya.nic.in ही वेबसाइट सुरु करण्यात आली आहे.
Mission Antyodaya Yojana अंतर्गत कोणते मंत्रालय येतात?
या मिशन अंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालय आणि पंचायत राज मंत्रालय येतात.
पुढे वाचा: