MGNREGA Yojana 2024: केंद्र सरकारने ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगा योजना सुरु केली. ज्याचे पूर्ण अर्थ Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act असा आहे.
आपल्या भारत देशामध्ये रोजगाची कमतरता आजही आहे. शहरी व ग्रामीण क्षेत्रामधील सुशिक्षित नागरिक सुद्धा रोजगारासाठी भटक आहेत. त्यामध्ये एका गावातून विविध शहरांमधे कामाच्या शोधात नागरिक स्थालंतरण करत असतात.
परंतु ग्रामीण भागातील काही असे नागरिक आहेत, जे शिकलेले नाही व आर्थिक दृष्टया कमकुवत आहेत. अशा नागरिकांना आपले दैनंदिन खर्च भागविणे कठीण जाते.
ग्रामीण क्षेत्रामधील अशा नागरिकांना त्यांच्या गावाच्या आसपास रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार आण्यासाठी केंद्र सरकारने मनरेगा योजनाची सुरुवात केली.
आज आपल्या लेखाच्या माध्यमातून याच योजनाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये योजना काय आहे? त्यांचे उद्देश, त्यामधून मिळणारे फायदे, पात्रतेच्या अटी, अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि अर्ज प्रकिया याबद्दल सविस्तररित्या माहिती बघणार आहोत, तर शेवटपर्यंत आर्टिकल पहा.
MGNREGA Yojana in Marathi
माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी आंध्रप्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यामध्ये मनरेगा योजनाची सुरुवात 02 फेब्रुवारी, 2006 रोजी केली होती. परंतु 23 ऑगस्ट, 2005 रोजी हा कायदा संसदेने पास केला होता.
केंद्र सरकारने 2006 रोजी NREGA या नावाने सुरु केली होते, परंतु 2009 मध्ये नावामध्ये बदल करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कायदा करण्यात आले.
MGNREGA योजनेची देखरेख व कामकाजावरती लक्ष देण्याचे काम ग्रामीण विकास मंत्रालय करते आणि योजनेच्या माध्यमातून नागरिकांना रोजगार व त्यांचा संपूर्ण डेटा त्या गावातील ग्रामपंचायत करते.
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिले जाते. ज्यामध्ये प्रत्येक गावातील लाभार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून 100 दिवस काम करायची संधी दिली जाते आणि आठवड्यातून एकदा पगार त्यांच्या हातामध्ये दिला जातो.
त्याचप्रकारे काही असे क्षेत्र असतात, जिथे नैसर्गिक आपत्ती आली आहे. तेथील नागरिकांना 50 दिवसांची आणखी मुदत वाढ दिली जाते. म्हणजेच योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 150 दिवसासाठी रोजगाराची संधी मिळते.
MGNREGA Yojana 2024 Updates
केंद्र सरकारने मनरेगा योजना अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी मजुरीच्या रक्कमेत 28 मार्च, 2024 मध्ये 3% ते 10% ची वाढ केली आहे. केंद्र सरकारची Consumer Price Index-Agriculture Labourers (CPI-AL) एजन्सी अंतर्गत दरवर्षी मजुरीचा दर वाढविण्यात येतो.
योजने अंतर्गत केंद्र सरकारने देशभरातील कामगारांसाठी नवीन मजुरी दर 01 एप्रिल, 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे. प्रत्येक दिवसाच्या हिशोबाने मजुरी दर विविध राज्यांमध्ये वेगवेगळे असतात.
2023-24 च्या वर्षांमध्ये योजना अंतर्गत मिळणारी मजुरी सरासरी 261 रुपये प्रति दिवस होती, त्यामध्ये 28 रुपये अधिक वाढ करून आपल्या देशामध्ये मजुरी 289 रुपये इतकी सरासरी झाली आहे.
मनरेगा योजना अंतर्गत सर्वात जास्त मजूर दर वाढ प्रति दिवस 34 रुपयाने गोवा राज्याने केले आणि 7 रुपयांनी सर्वात कमी उत्तरप्रदेश व उत्तराखंड या राज्यांनी केली आहे. गोवा राज्याने 10.56% जास्त मजूर दर वाढ केले आहे आणि सर्वात कमी 3.04% ने दर वाढ यूपी व उत्तराखंडने केले.
New MGNREGA Wage Rates (Per Day)
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, मनरेगा योजनाचे सर्वात जास्त मजुरी प्रति दिवस 374 रुपये हरियाणामध्ये दिली जाते व सर्वात कमी प्रति दिवस 234 रुपये अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यामध्ये दिले जाते. खालीलप्रमाणे योजनेमध्ये लागू केलेली रक्कम व टक्केवारी तक्त्यामध्ये दाखवली आहे.
मनरेगा योजनामध्ये सर्वात जास्त वाढ तक्ता – 1
राज्य | FY 2023-24 | FY 2024-25 | वाढ (%) |
गोवा | 322 | 356 | 10.56 |
कर्नाटक | 316 | 349 | 10.44 |
आंध्रप्रदेश | 272 | 300 | 10.29 |
तेलंगणा | 272 | 300 | 10.29 |
छत्तीसगड | 221 | 243 | 9.95 |
मनरेगा योजनामध्ये सर्वात कमी वाढ तक्ता – 2
राज्य | FY 2023-24 | FY 2024-25 | वाढ (%) |
राजस्थान | 255 | 266 | 4.31 |
केरळ | 333 | 346 | 3.90 |
लक्षद्वीप | 304 | 315 | 3.62 |
उत्तरप्रदेश | 230 | 237 | 3.04 |
उत्तराखंड | 230 | 237 | 3.04 |
MGNREGA Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कायदा योजना (MGNREGA Scheme) |
प्रकार | सेंट्रल सेक्टर स्कीम |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु झाली | 02 फेब्रुवारी, 2006 |
विभाग | ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार |
अंमलबजावणी | ग्रामपंचायत |
उद्देश | ग्रामीण क्षेत्रामधील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | देशभरतील ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब |
लाभ | दिवसासाठी रोजगाराची संधी |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | nrega.nic.in |
MGNREGA Yojana Aim
केंद्र सरकारने सुरु केलेल्या मनरेगा योजनाचे मुख्य उद्देश ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार प्राप्त होऊन आर्थिक दृष्ट्या मजबूत राहण्यात मदत मिळेल.
तसेच मनरेगा ही अम्ब्रेला स्कीम असून यामध्ये विविध योजनांचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये विकास घडविण्यासाठी व तेथील नागरिकांना रोजगार मिळण्यासाठी मदत होते. केंद्र सरकारचे मुख्य ध्येय स्थानिक लोकांना रोजगाच्या शोधासाठी दुसऱ्या ठिकाणी होणारे स्थलांतरण कमी करणे.
MGNREGA Yojana Benefits
- मनरेगा योजनाचे फायदे ग्रामीण क्षेत्रामधील अशिक्षित नागरिकांना रोजगार प्राप्त होण्यासाठी होतो.
- केंद्र सरकारतर्फे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी गॅरेंटी रोजगार उपलब्ध करून दिले जातो.
- या योजेनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 100 दिवसाच्या कालावधीसाठी रोजगार निर्माण केले जाते.
- त्याचसोबत कोणत्याही गावामध्ये नैसर्गिक आपत्ती झाली असेल तर त्या गावातील नागरिकांना 100 दिवसांमध्ये 50 दिवस अजून वाढ करून रोजगार दिले जातो.
- या योजनेमध्ये ग्रामीण क्षेत्रातील 1/3 भाग म्हणजेच 30% महिलांचा समावेश असणार आहे.
- योजने अंतर्गत सर्व कामाची देखरेख ग्रामीण विकास मंत्रालय बघते.
- नागरिकांना रोजगार व कमाई देण्याचे काम ग्रामपंचायत करते.
- योजनेमधील लाभार्थ्यांना त्यांच्या गावाच्या 5 किलोमीटरच्या भागात काम दिले जाते.
- ज्या नागरिकांचे काम 5 किलोमीटरच्या बाहेर असेल तर त्याचा अतिरिक्त 10% प्रमाणे मजुरी दिली जाते.
- नागरिकांनी रोजगारासाठी अर्ज केल्यानंतर 15 दिवसामध्ये काम मिळाले नाहीत, तर बेरोजगारी भत्ता दिला जाईल.
- योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर MGNREGA Job Card 5 वर्षांसाठी दिले जाते.
- लाभार्थ्यांना रोजगारासोबत आरोग्य सुविधा व काही अपघात झाल्यास भरपाई रक्कम सुद्धा दिली जाते.
MGNREGA Yojana Eligibility
नागरिकांना अर्ज करण्यापूर्वी मनरेगा योजनाची पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे, यासाठी खालीप्रमाणे सविस्तर अटी दिलेले आहेत.
- योजनेमध्ये सहभागी होणार नागरिक ग्रामीण भागातील असून स्थानिक रहिवासी असणे.
- अर्ज करणाऱ्या नागरिकांचे वय 18 वर्षा पेक्षा जास्त असावे.
- योजने अंतर्गत 30% महिला वर्गाचा समावेश असणे बंधनकारक आहे.
- गावामधील एकाच कुटूंबातील एकापेक्षा जास्त सदस्य सहभागी होऊ शकतो.
- अर्ज करणारे व्यक्ती सुशिक्षित नसावा.
MGNREGA Yojana Required Documents
मनरेगा योजनामध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे नागरिकांकडे असणे गरजेचे आहे.यासाठी सर्व कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे.
- अर्जदाराचे आधारकार्ड (बँक लिंक असणे)
- ओळखपत्र (मतदान कार्ड/पॅनकार्ड/राशन कार्ड)
- स्थानिक रहिवासी दाखला
- बँक खात्याची माहिती
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल नंबर
- BPL कार्ड
MGNREGA Yojana Registration
जे नागरिक मनरेगा योजनामध्ये नोंदणी करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करून रजिस्ट्रेशन करू शकतो.
- सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालमधील पंचायत सचिव कीच ग्राम रोजगार सहाय्यक अधिकारी सोबत योजनेची माहिती सांगणे.
- पंचायत सचिव किंवा ग्राम रोजगार सहाय्यक अधिकारी यांच्याकडून तुम्हाला साधा कागद दिले जाईल.
- त्या कागदामध्ये तुमचे संपूर्ण नाव, तुमचा पत्ता, लिंग, जात, मोबाईल नंबर, आधार क्रमांक आणि बँक खात्या संबंधित माहिती भरून द्यावी लागेल.
- त्याचसोबत योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे झेरॉक्स करून फॉर्मसोबत जोडणे.
- त्यानंतर भरलेली माहितीचा कागद व वैयक्तिक कागदपत्रे पंचायत सचिव किंवा ग्राम रोजगार सहाय्य्क अधिकारी जवळ जमा करणे.
- अधिकाऱ्याकडून तुमची सर्व माहिती तपासून ऑनलाइन पोर्टलद्वारे पुढे पाठविली जाईल.
- त्यानंतर तुम्ही पात्र असाल तर तुमचे मनरेगा जॉब कार्ड बनविले जातील.
- त्या जॉबकार्डच्या मदतीने तुम्हाला रोजगार मिळण्यास मदत होईल.
- अशा पद्धतीने तुम्ही योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी प्रकिया करू शकता.
निष्कर्ष
आमच्या लेखातून आम्ही तुम्हाला MGNREGA Yojana संबंधित संपूर्ण माहिती मार्गदर्शन केले. ज्यामध्ये मनरेगा योजना काय आहे? त्यांचे महत्व काय आहे? ती कधी सुरु करण्यात आली होती? कोणासाठी सुरु केली होती? कोणते मुख्य उद्देश होते? यामधून कोणकोणते फायदे दिले जाते? त्याचसोबत देशभरात किती रुपये मजुरी दिली जाते? केंद्र सरकारचे योजनेसाठी नवीन अपडेट्स कोणते आहेत? कोणते नागरिक यासाठी पात्र असणार? त्यांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? आणि त्यांना कसा व कुठे अर्ज करावा लागेल? अशा सर्व प्रश्नाची उत्तरे सविस्तर दिली आहेत.
तुम्ही सुद्धा ग्रामीण क्षेत्रात राहत आहेत आणि रोजगाराच्या शोधात असाल, तर योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घ्या. तसेच आमचा आर्टिकल आवडला असेल, तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना पाठवा.
FAQs
मनरेगा काय आहे?
मनरेगा म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार कायदा यामधून गावातील नागरिकांना रोजगाराची संधी मिळते.
मनरेगा ची स्थापना कधी झाली?
मनरेगाची स्थापना 02 फेब्रुवारी, 2006 रोजी झाली होती.
मनरेगा योजनेसाठी अर्ज कसा करावा?
मनरेगा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन करावा लागेल.
पुढे वाचा: