Maza Ladka Bhau Yojana Maharashtra 2024: जाणून घ्या, काय आहे लाडका भाऊ योजना?

Maza Ladka Bhau Yojana Maharashtra 2024: महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे माझा लाडका भाऊ ही योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या नावाने सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील युवकांना प्रतिमहा 10,000/- रुपयांच्या स्वरूपात आर्थिक मदत सरकारतर्फे दिली जाईल. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महाराष्ट्र सरकारने Ladki Bahin Yojana सुरु केल्यानंतर गोंदिया जिल्ह्यामधील आमगाव तालुक्याचे आमदार सहसराम कोरोटे यांनी विधानसभेमध्ये लाडका भाऊ योजना सुरु करण्याची मागणी केली.

याबदल विधानसभेत आमदार सहसराम कोरोटे सांगताना म्हणाले, असंख्य बेरोजगार युवक महाराष्ट्रामध्ये दरदर भटकत आहेत, त्यांच्या हाताला काम नाही कोणी BSC, BA, Graduate झालेला आहे. परंतु त्या बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अनेक उद्द्योग सुरु होण्याऐवजी बंद झाले, त्यामुळे युवकांमध्ये नैराश्याची भावना ग्रामीण व शहरी भागांमध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे.

बेरोजगार युवकांचा विचार करता, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 2 जुलै, 2024 रोजी विधानसभेमध्ये बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि 10 लाख मुलांना Apprenticeship देणार अशी घोषणा करण्यात आली. 

महाराष्ट्रामधील जे नागरिक Majha Ladka Bhau Yojana Maharashtra याबद्दलची माहिती जाणून घेण्यास इच्छुक असतील, त्यांनी हा संपूर्ण लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहा. या लेखात आम्ही योजनेचे महत्त्व, याचा सुरु करण्यामागील उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याबाबतची संपूर्ण माहिती सांगितली आहे.

Maza Ladka Bhau Yojana Maharashtra in Marathi 

2 जुलै, 2024 रोजी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना बद्दल घोषणा केल्यानंतर, महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक 09 जुलै, 2024 रोजी Ladka Bhau Yojana GR काढण्यात आला. 

महाराष्ट्र शासनाकडून Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana राबविण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांची निवड केलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील 12 वी पास, आय.टी.आय, पदविकाधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांना सरकारतर्फे आर्थिक मदत आणि कामाचा अनुभव होण्यासाठी प्रशिक्षणसुद्धा दिले जाणार.  

या योजनेच्या अंतर्गत शासनाकडून संकेतस्थळ तयार करून रोजगार उपलब्ध करणारे उद्योजक आणि रोजगारासाठी इच्छुक असलेले उमेदवार जोडले जाणार. यामुळे रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण घेऊन कामाचा अनुभव मिळेल, त्याचसोबत उद्योजकांना कार्य करण्यासाठी मनुष्य बळ मिळेल.

 या योजेनच्या माध्यमातून लाभार्थीं उमेदवारांना प्रशिक्षण घेता-घेता प्रतिमहा विद्यावेतन म्हणून आर्थिक मदत दिली जाणार. ही आर्थिक मदत खालीलप्रमाणे तक्त्यामध्ये दिली आहे.

शैक्षणिक पात्रतादरमहा विद्यावेतन स्वरूपात रक्कम
12वी पास उमेदवार6,000/- रुपये
आय.टी.आय / पदविका उमेदवार8,000/- रुपये
पदवीधर / पदव्युत्तर उमेदवार10,000/- रुपये

Ladka Bhau Scheme Maharashtra 2024 Overview

योजनाचे नावमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
सुरु कोणी केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरु झाली09 जुलै, 2024
विभागकौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र
श्रेणीमहाराष्ट्र सरकारी योजना
उद्देशनोकरी मिळण्याची क्षमता वाढवणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक
लाभप्रशिक्षण व विद्यावेतन
अर्ज पद्धतीऑफलाईन/ऑनलाईन
अधिकृत वेबसाईटलवकर चालू होईल

Maza Ladka Bhau Scheme Maharashtra Purpose

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या माझा लाडका भाऊ योजनाचे उद्देश राज्यामधील बेरोजगार युवकांना रोजगार निर्माण करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देऊन युवक वर्गामधील बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवणे. 

राज्यामधील तरुण वर्ग शिक्षण पूर्ण झाल्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी शोध घेत असतात. परंतु त्यांना व्यवसाय करण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे तसेच अनुभव नसल्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची संधी असली तरी चांगले शिक्षण घेतलेले युवक बेरोजगार राहतात. 

यासाठी महाराष्ट्रातील युवकांना चांगले प्रशिक्षण घेत आर्थिक मदत व्हावी, याकरिता Mukhyamantri Apprenticeship Yojana सुरु करण्यात आली.

Maza Ladka Bhau Scheme Maharashtra Benefits 

  • या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक मदत म्हणून विद्यावेतन दिले जाणार. 
  • या योजने अंतर्गत राज्य सरकार दरवर्षी 10 लाख लाभार्थींना प्रशिक्षण (apprenticeship) देणार. 
  • या उपक्रमानुसार युवक प्रशिक्षण घेत असताना प्रत्येक महिन्यात त्यांच्या शैक्षणिक पात्रतानुसार 6000 रुपये ते 10000 रुपये पर्यंत विद्यावेतन देण्यात येणार. 
  • युवकांना या योजनेमार्फत शासनाकडून मिळणारी विद्यावेतन रक्कम डीबीटी (Direct Bank Transfer) च्या माध्यमातून बँक खात्यामध्ये ऑनलाईन जमा केले जातील. 
  • या उपक्रमांतून लाभार्थी युवकांना प्रशिक्षण घेण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला जाणार. 
  • जो उमेदवार या योजने अंतर्गत यशस्वीरित्या 6 महिने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित उद्योजकाकडून त्यांना प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त होणार. 
  • त्याचप्रमाणे, लाभार्थी युवकांना मिळणाऱ्या विद्यावेतन सोबत उद्योजक अधिक वेतन देत असल्यास अधिक आर्थिक मदत मिळण्याची संधी मिळेल. 
  • राज्य सरकारतर्फे या उपक्रमातून बेरोजगारी नियंत्रित ठेवण्यात मदत होईल, त्याचसोबत तरुणांना रोजगार प्राप्त करण्यास सुद्धा मदत होईल. 
  • तरुणांना रोजगार क्षमता वाढविण्यासाठी या उपक्रमातून कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्टस्किल ट्रेनिंग, लाईफस्किल ट्रेनिंग आणि तांत्रिक ट्रेनिंग आत्मसात करण्यास मिळणार. 
  • या योजनेचा फायदा उद्योजकांना आपल्या कामात लागणाऱ्या मनुष्य  बळासाठी सुद्धा घेता येणार, यासाठी शासनातर्फे संकेतस्थळ विभाग तयार करण्यात येणार. 

Maza Ladka Bhau Yojana Maharashtra Eligibility | योजनेसाठी उमेदवाराची पात्रता 

  • या योजने अंतर्गत सहभागी होणारे व्यक्ती महाराष्ट्र राज्याचे स्थानिक रहिवासी असणे. 
  • या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या आत असावे. 
  • 12वी पास, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर असलेले युवकच यामध्ये अर्ज करू शकतात. 
  • उमेदवाराकडे स्वतःचे आधारकार्ड असणे. 
  • उमेदवाराचे आधारकार्ड बँक खात्यासोबत जोडलेले असावे म्हणजेच EKYC. 
  • युवकांनी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी नंबर प्राप्त केलेला असावा.

योजनेसाठी आस्थापना/उद्योजकांसाठी पात्रता

  • या योजनेमध्ये सहभागी होणारे उद्योजकांचे आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे. 
  • आस्थापना / उद्योग करणाऱ्यांना सुद्धा कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी केलेली असणे गरजेचे आहे. 
  • आस्थापना / उद्योग यांची स्थापना 3 वर्षा आधीचे असणे महत्त्वाचे आहेत. 
  • यामध्ये सहभागी होणाऱ्या आस्थापना / उद्योगांनी उद्योग आधार, EPF, GST, ESIC, Certificate of Incorporation आणि DPIT या सगळ्यांची नोंदणी केलेली असणे. 

Maza Ladka Bhau Yojana Maharashtra Required Documents 

  • अर्जदाराचे आधारकार्ड (बँक लिंक असले पाहिजेत) 
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • बँक खात्याचे पासबूकचे पहिले पान 
  • मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • शैक्षणिक प्रमाणपत्र (मार्कशीट)
  • ई-मेल आयडी 
  • रोजगार नोंदणी नंबर

माझा लाडका भाऊ योजनाचे अटी व शर्ती 

  • या योजनेमध्ये शिक्षण घेत असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाही. 
  • शासनाने नेमलेल्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवाराने नोंदणी करणे आवश्यक आहे. 
  • या उपक्रमामध्ये लाभार्थी असलेल्या युवकांना 6 महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
  • जर लाभार्थी प्रशिक्षण घेण्याच्या दरम्यान 10 दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर असतील तर त्या महिन्याचे वेतन मिळणार नाही. 
  • लाभार्थी प्रशिक्षण घेण्याच्या पहिल्या महिन्यामध्ये सोडून गेल्यास विद्यावेतनासाठी पात्र ठरणार नाही. 
  • या योजनामध्ये NAPS किंवा MAPS  पूर्ण केलेले व करत असलेले युवक अर्ज करू शकत नाही. 
  • एक उमेदवार फक्त एकदाच या योजनाचा लाभ घेऊ शकतो. 
  • खाजगी आस्थापना / उद्योजकांना कामासाठी मनुष्यबळ फक्त 10% आणि सेवा कार्यांसाठी 20% उमेदवार प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात. 
  • केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय/ निमशासकीय/आस्थापना / महामंडळ / उद्योजकांना कामासाठी मंजूर पदासाठी फक्त 5% उमेदवार प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात. 
  • या उपक्रमात सहभागी होताना चुकीची माहिती न पुरवणे. 
  • प्रशिक्षण घेणारे लाभार्थी ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) किंवा Apprenticeship अंतर्गत फक्त 6 महिने प्रशिक्षण घेऊ शकतात. 

Maza Ladka Bhau Yojana Maharashtra Registration 

आम्ही माहिती दिल्याप्रमाणे, महाराष्ट्रातील राज्य सरकारने विधानसभेमध्ये नुकतेच 2 जुलै, 2024 रोजी माझा लाडका भाऊ योजना याची घोषणा केली. सरकारने नेमलेल्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्रातर्फे लवकरच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात येतील. त्यामुळे जे युवक या योजने अंतर्गत पात्र असतील आणि इच्छुक असतील, त्यांनी आम्ही दिलेल्या माहितीनुसार  आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आणि आधीच तयारी करून घेणे. जेणेकरून वेळीच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनामध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकता.

तुम्हाला या योजने संबंधित लेटेस्ट अपडेट वेळीच भेटण्यासाठी आमच्या Telegram चॅनेलला जॉईन करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला notification जाईल आणि तुम्ही यामध्ये सहभागी होऊन आर्थिक मदत व प्रशिक्षण प्राप्त करू शकता. 

निष्कर्ष 

आम्ही या लेखातून तुम्हाला Maza Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीमध्ये सांगितली. त्याचसोबत या योजनेचे उद्देश काय? यामधून फायदा काय होणार? यासाठी कोण पात्र असणार आहेत? अर्ज करण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत? शासनातर्फे लागू केलेल्या अटी कोणत्या आहेत? आणि यामध्ये अर्ज करण्यासाठीची सविस्तारित्या माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. 

आताच्या वाढलेल्या महागाईच्या दुनियामध्ये तसेच AI च्या वाढत्या प्रभावामुळे रोजगार निर्माण करण्यासाठी कठीण झाले आहे. अशातच महाराष्ट्र राज्याने काढलेल्या या योजनांचा चांगला उपयोग युवकांना होऊ शकतो. या योजनाचा महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारांना आर्थिक मदतीसोबत प्रशिक्षण घेण्याचा लाभ मिळेल. त्याचसोबत आपल्या राज्यातील युवकांना यामधून प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि चांगली नोकरी करून रोजगार निर्माण करण्याची चांगली संधी आहे.  

आम्ही आशा करतो की, या संपूर्ण लेखातून तुम्हाला मौल्यवान माहिती मिळाली असेल. तर हा लेख तुमच्या जवळच्या गरजू युवकांना नक्की पाठवा आणि अशाच लेटेस्ट योजनांच्या माहितीसाठी आम्हाला Subscribe करून ठेवा.

FAQs

लाडका भाऊ योजना काय आहे? 

लाडका भाऊ या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना कार्य प्रशिक्षणासोबत आर्थिक मदत दिली जाणार. 

लाडका भाऊ योजनेसाठी पात्र कोण असणार आहेत? 

लाडका भाऊ या योजनेसाठी महाराष्ट्रातील 12वी पास, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर असलेले बेरोजगार युवक पात्र असणार आहेत. 

लाडका भाऊ योजनेची सुरुवात कधी झाली? 

लाडका भाऊ योजनेची सुरुवात 09 जुलै, 2024 रोजी झाली. 

Read More: