Majhi Kanya Bhagyashree Yojana 2024: 50,000 रुपये मुलींना मिळणार, जाणून घ्या माहिती

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2024: महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी आई-वडिलांना आर्थिक मदत केली जाते.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

केंद्र व राज्य सरकार नेमहीच जनतेच्या हितासाठी नवीन नवीन योजनांची सुरुवात करत असतात. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींच्या हितासाठी अशीच एक योजना राबविण्यात येत आहे, जिचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना असे आहेत.

राज्यात काही ठिकाणी अजूनही मुलींना योग्यरीत्या वागणूक दिली जात नाही. त्यांना व्यवस्थित शिक्षण करून दिले जात नाही. त्यामध्ये त्यांच्या आरोग्यांवर लक्ष दिली जात नाही. त्याचप्रमाणे काही भागात मुलींच्या जन्मासाठी नकारात्मक प्रतिसाद दिला जातो. 

मुलींच्या अशाच समस्यांना दूर करण्यासाठी, त्यांना चांगले आरोग्य, त्यांना चांगले शिक्षण [प्राप्त होण्यासाठी व उज्ज्वल भविष्य मिळण्यासाठी राज्य सरकार या योजनेच्यामार्फत मदत करतात. 

या योजने बाबतीत आपण आज सर्व माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये योजनाचे महत्त्व काय आहेत? त्यामागचे मुख्य उद्देश काय आहेत? त्यामधून मुलींना कोणते फायदे दिले जाते? यासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या असणार? अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती? आणि अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकियांचे पालन करावे लागणार? अशा संपूर्ण गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत लेख वाचा. 

Majhi Kanya Bhagyashree Yojana in Marathi 

महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजनाची सुरुवात 01 एप्रिल, 2016 रोजी केली. या योजनेच्या माध्यमातून आई-वडिलांना मुलींच्या जन्मानंतर महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत करते. ही योजना महिला व बाल विकास मंत्रालयाकडून राबविण्यात येत आहे. 

मुलीचा जन्म दिलेल्या आई वडिलांना 1 वर्षांमध्ये शस्त्रक्रिया केल्यावरती 50,000 रुपये आर्थिक स्वरूपात मदत प्रदान केले जाते. राज्य सरकारतर्फे योजनेतून ही आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाते. मुलीच्या दुसऱ्या जन्मानंतर पालकांना 25,000-25,000 रुपये प्रमाणे पालकांना बँकेत ट्रान्सफर केले जाते. 

महाराष्ट्र राज्य सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत ही एकप्रकारे गुंतवणूक आहे, जी प्रत्येक 6-6 वर्षांनी व्याज दर काढून मुलींच्या कामासाठी वापरू शकता. पालकांना पहिल्या मुलीच्या जन्मासाठी 1 वर्षाच्या आत नसबंदी शस्त्रक्रिया करावे लागते किंवा दुसऱ्या मुलीच्या पहिल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये करावी लागते. 

Mazi Kanya Bhagyashree Yojana ची माहिती

योजनेचे नावमाझी कन्या भाग्यश्री योजना
श्रेणीमहाराष्ट्र योजना
सुरु केली01 एप्रिल, 2016 रोजी
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
विभागमहिला व बाल विकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन
उद्देशपालकांना आर्थिक मदत करून मुलींच्या प्रमाणात वाढ करणे
लाभार्थीमहाराष्ट्रामधील मुलींचे आई-वडील
लाभ50,000 रुपये आर्थिक मदत
अर्ज पद्धतऑफलाइन

Mazi Kanya Bhagyashree Yojana चे उद्देश

महाराष्ट्र राज्य सरकारचे माझी कन्या भाग्यश्री योजनाचे मुख्य उद्देश राज्यातील मुलींना स्वतःचे उज्ज्वल भविष्य निर्माण करून देणे आहे. पूर्ण देशभरात काही भागांमध्ये आजही मुलींना कमी लेखले जाते. त्यांना हवे तसे सुरक्षित वातावरण जगायला मिळत नाही. 

गरिबीमुळे काही मुलींना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही, त्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये आपले स्वप्न पूर्ण करायला जमत नाही. त्याचप्रमाणे समाजामध्ये मुलींना व स्त्रियांना आदर दिला जात नाही. 

महाराष्ट्रामधील अशा मुलींना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे. त्यांना चांगले आरोग्य प्राप्त होण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे. राज्यमध्ये होणारे बालिकांवरील अत्याचार कमी करणे. 

मुलींच्या बाबतीत समाजामध्ये सकारत्मक विचार आणणे. त्याचसोबत आपल्या अर्जात मुलींचे जन्मदर वाढविण्यात प्रोत्साहन देणे. या सर्व गोष्टींवरती महाराष्ट्र राज्य सरकार या योजनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Majhi Kanya Bhagyashree Yojana Benefits 

  • माझी कन्या भाग्यश्री योजनाचे फायदे महाराष्ट्रामधील मुलींना दिला जातो. 
  • या योजनेच्या माध्यमातून अर्ज केलेल्या पालकांना आर्थिक स्वरूपात मदत पाठविली जाते. 
  • राज्य सरकार एकाच कुटुंबातील 2 मुलींसाठी या योजनेतून लाभ देतात. 
  • पालकांना आपल्या पहिल्या मुलीच्या जन्मासाठी 50 हजार रुपये दिले जाते आणि दुसऱ्या जन्माच्या वेळेला 25,000 रुपये प्रदान केले जाते. 
  • मंत्रालय या योजनेच्यामार्फत मुलगी व तिच्या आईच्या नावाने बँकेमध्ये जॉईंट अकाउंट उघडून दिले जाते. 
  • लाभार्थ्यांना मिळणारी पूर्ण रक्कम मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर त्याचे संपूर्ण व्याज 6 व्या वर्षी काढता येतील. 
  • प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना जॉईंट अकाउंट उघडून दिले जाते व त्यामध्ये राज्य सरकार 1 लाखांपर्यंचा अपघाती विमा प्रदान केले जाते. 
  • त्याचप्रमाणे जॉईंट अकाउंटमध्ये ओव्हर ड्राफ्टची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली जाते. 
  • महाराष्ट्र सरकार योजनेच्यामार्फत मुलींचे प्रमाण मुलांच्या प्रमाणापर्यंत वाढण्यासाठी पालकांना प्रोत्साहित केले जाते. 
  • सुरुवातीला गरीबी रेषेखालील 1 लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाना सहभागी होण्यासाठी परवानगी होती, त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने सुधार करून 7.5 लाख वार्षिक उत्पन्न इतकी करण्यात आली आहे. 
  • या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदतीमुळे मुलाना आपले शिक्षण करण्यास मदत मिळते. 
  • चांगले शिक्षण मिळाल्यामुळे मुलींना आपले भविष्य उज्ज्वल करण्यात मदत होईल. 
  • महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी समाजात आदर वाढावा व मुलींना घेऊन सकारत्मक विचार वाढावे यासाठी शासन पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहेत. 
  • महिला व बाल विकास मंत्रालय बँक ऑफ महाराष्ट्र सोबत मिळून या योजनेतून मुलींना आर्थिक मदत पुरवतात. 
  • तसेच महाराष्ट्र राज्यातील दारिद्रय रेषेखालील सर्व कुटुंबातील मुलींना विविध प्रकारचे लाभ व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन मदत करत आहेत.
  • जर काही नैसर्गिक कारणांमुळे मुलीचे निधन 18 वर्षाआधी झाल्यास योजनेची पूर्ण रक्कम तिच्या पालकांना देण्यात येते.
  • Sukanya Samriddhi Yojana अंतर्गत लाभ घेणारी लाभार्थी या योजनेमध्ये सुद्धा अर्ज करून लाभ घेऊ शकते. 
  • बँकेतर्फे लागू करण्यात आलेल्या व्याज दरानुसार लाभार्थ्यांना रक्कम दिली जाते. 

Majhi Kanya Bhagyashree Yojana Eligibility 

पालकांना आपल्या मुलींसाठी लाभ घेण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजनामध्ये पात्र असणे आवश्यक आहे. यासाठी खालीलप्रमाणे काही अटी व पात्रता दिली आहे, त्यानुसार असल्यास अर्ज करण्यास मान्यता आहे. 

  • सर्वात प्रथम मुलीचे आई-वडील महाराष्ट्र राज्याचे मूळचे स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. 
  • या योजनेमध्ये फक्त जन्म झालेल्या मुलीचे आई-वडील अर्ज करण्यास पात्र आहेत. 
  • ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाखांपेक्षा जास्त आहे ते योजनेमध्ये अर्ज करू शकत नाही. 
  • 01 ऑगस्ट, 2017 नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेतून लाभ देण्यात येतो. 
  • जर कोणत्या पालकांना 01 ऑगस्ट, 2017 च्या आधी मुलगी झाली असेल आणि दुसरी मुलगी दिलेल्या दिनांकानंतर झाली असेल तर दुसऱ्या मुलीला फक्त लाभ दिला जातो. 
  • एकाच कुटुंबामध्ये एक मुलगा व मुलगी असेल किंवा पहिली मुलगी नंतर मुलगा असेल तर या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. 
  • या योजनेमध्ये फक्त पहिल्या व दुसरी मुलगी असेल तर शाशनाकडून अर्ज करण्यास मान्यता आहे. 
  • पालकांना आपल्या मुलीच्या जन्मानंतर लाभ घेण्यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. 
  • त्याचप्रमाणे आई-वडिलाना कुटुंब नियोजनासाठी केलेल्या शस्त्रकियाचा दाखला सुद्धा दाखविणे गरजेचे आहेत. 
  • पालकांना आपल्या तिसऱ्या मुलींसाठी योजने अंतर्गत अर्ज करण्यास मान्यता नाही. 
  • पहिल्या मुलीसाठी योजनेमधून लाभ घेण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी दिला जातो. तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्याच्या आधी अर्ज करणे महत्त्वाचे आहे. 
  • महाराष्ट्र सरकारतर्फे लाभार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम मुलीच्या 18 वर्षतानंतर काढण्यासाठी मान्यता आहे. 
  • पालकांना पैसे काढण्यासाठी मुलगी अविवाहित असणे व तिचे 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे. 
  • या योजनेमध्ये पालकांना दुसऱ्यावेळी दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांनाही लाभ घेता येतो. 
  • त्याच्याशिवाय कोणत्याही पालकांनी दत्तक घेतलेल्या मुलींसाठी सुद्धा अर्ज करू शकतात. परंतु यासाठी अटी व शर्ती शासनातर्फे लागू केल्या जातील. 
  • मुलीचे शिक्षण दहावी पूर्ण न झाल्यास आणि मुलगी विवाहित असल्यास लाभार्थ्यांना अर्जाची रक्कम देण्यात येत नाही. 

Majhi Kanya Bhagyashree Yojana Required Documents

माझी कन्या भाग्यश्री योजनासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेली आहे, त्या यादीनुसार पालकांनी कागदपत्रांची जुळवणी करणे. 

  • पालकांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दाखला 
  • महाराष्टाचे स्थानिक रहिवासी पुरावा 
  • लाभार्थीचे आधारकार्ड (बँक खात्यासोबत लिंक असणे) 
  • मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र 
  • रेशनकार्ड 
  • वार्षिक उत्पनाचे पुरावे 
  • मुलगी दत्तक घेतली असेल तर अनाथ असलेले पुरावे 
  • मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • बँक पासबुकचे पहिले पान
  • पालकांचे हमीपत्र 

Majhi Kanya Bhagyashree Yojana Registration 

पालकांना माझी कन्या भाग्यश्री योजनामध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध आहेत. कशाप्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा? याचे संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. 

  • अर्ज करताना पालकांकडे Majhi Kanya Bhagyashree Yojana Application Form असणे आवश्यक आहे. योजनेच्या फॉर्मसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन घेऊ शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. 
  • फॉर्म डाउनलोड करून प्रिंट करून घ्या किंवा अंगणवाडीमधून प्राप्त करा. 
  • तुम्हाला प्रपत्र अ, ब, क प्रमाणे फॉर्म दिले जातील.  
  • त्यामध्ये पहिल्या प्रपत्र अ मध्ये अर्जाचा नमुना असेल तो व्यवस्थित भरून सही करून घेणे. 
  • प्रपत्र ब मध्ये तुम्हाला मुलीचे सर्व माहिती विचारली जाईल ती भरून घेणे. 
  • त्यानंतर प्रपत्र क मध्ये हमीपत्र असेल ते भरून घेणे व दोघांची सही करणे. 
  • तुम्ही संपूर्ण फॉर्म भरून घेतल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रांची झेरॉक्स जोडून घेणे. 
  • योजनेचा फॉर्म व कागदपत्रे अंगणवाडी शाखेमध्ये जाऊन जमा करणे. 
  • जमा केलेला फॉर्म कार्यरत केलेल्या अधिकाऱ्यांकडून तपासले जातील. 
  • तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ देण्यात येईल. 
  • अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन अर्ज करण्यासाठी प्रकिया पार पाडू शकता. 

निष्कर्ष 

आम्ही या लेखातून Majhi Kanya Bhagyashree Yojana संदर्भात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये योजनेचे सुरुवात कधी झाली? यामध्ये उद्देश काय होते? कोणकोणते फायदे दिले जातात? अर्जसाठी पात्र कोण असणार? आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार? व अर्ज करण्यासाठी काय करावे लागणार? अशा सर्व गोष्टींबद्दल माहिती सांगितली. 

तुम्हाला आमचा हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या कुटुंबातील गरजू लोकांना पाठवा व त्यांच्या मुलींसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मदत करा. 

अशाच नवीन नवीन योजनेच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करू शकता आणि मुलीच्या संबंधित योजनांबद्दल लेख वाचू शकता. 

FAQs

माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे?

या योजनेमधून पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांना गुतंवणूक करण्यासाठी 50 हजार रुपये दिले जाते. 

कन्या योजनेसाठी कोण पात्र आहेत? 

महाराष्ट्र राज्यामधील एकाच पालकांचे जन्म घेतलेली पहिली मुलगी व दुसरी मुलगी योजनेसाठी पात्र आहेत.

Bhagyashree Yojana ची सुरुवात कधी करण्यात आली? 

महाराष्ट्र शासनाने 01 एप्रिल, 2016 रोजी या योजनेची सुरवात केली होती. 

पुढे वाचा: