Mahtari Vandana Yojana Status Check: महतरी योजनेची स्थिती कशी तपासायची? या प्रकिया करा फॉलो

Mahtari Vandana Yojana Status Check: आपल्या या आर्टिकलमध्ये महतारी वंदन योजनाचे स्टेटस कसे तपासायचे? याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने योजनेचा फॉर्म भरला असेल. तो फॉर्म शासनातर्फे स्वीकार करण्यात आला कि नाही हे तपासण्यासाठी या लेखात सविस्तर प्रकिया दिलेली आहे.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महतारी वंदन योजनामध्ये अर्ज केलेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 1,000 रुपये म्हणजे वर्षाला एकूण 12,000 रुपये डीबीटीमार्फत ट्रान्स्फर केले जातात. 

छत्तीसगढ राज्यामध्ये योजनेची घोषणा फेब्रुवारी, 2024 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर 5 फेब्रुवारी, 2024 ला तेथील राज्य शासनातर्फे योजनेमध्ये अर्ज करण्याच्या प्रकिया सुरु करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बहुतांश महिलांनी ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले. 

परंतु काही महिलांनी अर्ज करून सुद्धा त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. यासाठी योजनेमध्ये अर्ज केलेल्या फॉर्मची स्थिती तपासण्यासाठी काय करावे लागेल? याची संपूर्ण प्रकिया स्टेप बाय स्टेप आर्टिकलमध्ये दिलेली आहे. 

महतारी वंदन योजनाची स्थिती कशी तपासायची? 

  • अर्जाची स्थिती पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये Mahtari Vandana Yojana ची Official Website उघडायची आहे. 
  • तुम्ही मोबाईलद्वारे वेबसाइट उघडली असेल तर डेस्कटॉप मोड चालू करा. 
  • त्यानंतर तुमच्या समोर डॅशबोर्ड संपूर्ण उघडला असेल, त्यामधील तीन डॉट असलेल्या पर्यायावर क्लिक करणे. 
  • क्लिक केल्यानंतर यादी उघडेल, त्यामध्ये अर्ज आणि देय स्थिती असा पर्याय दिसेल, त्यामध्ये जाणे.
  • त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडले जाईल, त्यामध्ये लाभार्थी क्रमांक किंवा मोबाईल नंबर भरावा लागेल. 
  • ज्या वेळेला तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज केला असेल, तेव्हा तुम्हाला Beneficiary Code दिला असेल तो भरणे. 
  • किंवा तुमचा आधारनंबर लाभार्थी क्रमांकामध्ये जरी टाकला तरी चालेल. 
  • तसेच अर्ज केला तेव्हा सादर केलेला मोबाईल नंबर देखील टाकू शकता. 
  • कोणताही एक नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड भरून सबमिट बटनावर क्लिक करणे. 
  • त्यानंतर तुमच्या समोर योजनाचे स्टेटस उघडून येईल. 
  • त्यामध्ये अर्ज करताना दिलेली संपूर्ण माहिती आणि ऑफलाईन व ऑनलाईन स्थिती दिसेल. 
  • पुढे पीडीएफवर क्लिक करून स्टेटसची फाईल डाउनलोड करून घेणे. 
  • ज्यांनी योजनेमध्ये ऑफलाईन अर्ज केला आहे, त्यांना संपूर्ण स्थिती सुद्धा जाणून घेण्यास मदत मिळेल.

Read More: