Mahila Samman Bachat Patra Yojana 2024: महिलांना गुंतवणुकीवर 7.5% व्याज दर, जाणून घ्या माहिती

Mahila Samman Bachat Patra Yojana 2024: भारत देशामधील सर्व महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सम्मान बचत पत्र योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांनी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीवर वर्षाला 7.5% व्याज दर लागू केला जातो. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आज आपल्या लेखातून महिला सम्मान बचत पत्र योजना याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये योजना नक्की काय आहे? त्यांचे उद्देश काय आहेत? कोणते फायदे मिळतील? गुंतवणूक केल्यानंतर योजनेचा कालावधी किती असणार? किती व्याज दर दिले जाणार? यामध्ये कोण पात्र असणार? त्याचप्रमाणे कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? योजने अंतर्गत गुंतवणूक कशी करायची? किती रुपयांची गुंतवणूक करावी लागणार? मिळालेल्या व्याजावर टॅक्स भरावे लागणार का? आणि ही योजना महिलांसाठी फायदेशीर आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घेण्यास मिळणार आहेत. खूप माहितीपूर्ण लेख असणार आहे तर शेवटपर्यंत आर्टिकल पहा.

Mahila Samman Bachat Patra Yojana in Marathi 

महिला सम्मान बचत पत्र योजना म्हणजे नावानुसार ती महिलांसाठी आहे, ज्यामध्ये महिला वर्ग बचत करून गुंतवणूक करू शकतात. योजने अंतर्गत महिलांनी केलेल्या या गुंतवणुकीनुसार त्यांना प्रत्येक वर्षाला मुद्दलवर व्याज दिला जातो. 

2023 च्या आर्थिक अर्थसंकल्पनेत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी Mahila Samman Saving Certificate (MSSC) या योजनेची घोषणा केली. केंद्र सरकारतर्फे या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2023 मध्ये करण्यात आली होती. 

ही गुंतवणूक स्कीम असल्यामुळे यामध्ये 2 वर्षांचा लॉकिंग कालावधी ठेवण्यात आला आहे. लाभार्थ्यांना 1 एप्रिल, 2023 ते 31 मार्च, 2025 पर्यंत गुंतवणुकीची मर्यादा ठेवली आहे. 

या योजनेच्या अंतर्गत महिला वर्ग 1000 रुपये पासून ते 2,00,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात. यामध्ये लाभार्थी 3 महिन्यांच्या म्हणजेच तिमाही प्रमाणे रक्कम गुंतवणूक करू शकतात आणि योजने अंतर्गत गुंतवलेल्या रक्कमेवर प्रति वर्ष 7.5% व्याज दराप्रमाणे आर्थिक लाभ महिला वर्गाला मिळतो. 

Mahila Samman Bachat Patra Yojana 2024 Overview

योजनाचे नावमहिला सन्मान बचत पत्र योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
कोणी सुरु केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
कधी सुरु केलीफेब्रुवारी, 2023 रोजी
विभागआर्थिक कार्य विभाग व वित्त मंत्रालय, भारत सरकार
उद्देशमहिलांना आर्थिक लाभ देणे
लाभार्थीभारत देशामधील महिला व मुली
लाभगुंतवणुकीवर 7.5% व्याजदर
अकाउंटचा कार्यकाळ2 वर्ष
अर्ज प्रकियाऑफलाइन

Mahila Samman Bachat Patra Yojana Objective 

केंद्र सरकारने सुरु केलेल्या महिला सम्मान बचत पत्र योजनाचे मुख्य उद्देश देशामधील लहान मुलींपासून ते वयस्कर वयातील महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करणे आहे. जेणेकरून ज्या महिला आपल्या घरामध्ये पैशाची बचत करतात, त्यामधून त्यांना चांगल्या प्रकारे परतावा (Returns) मिळण्यात मदत होईल. 

आपल्या भारत देशामध्ये पैशांची बचत करणे हे एक संस्कृती बनली आहे. पैशांची बचत करण्यामध्ये प्रत्येक घरातील महिला पुढे आहेत. महिला आपल्या घरातल्या गोष्टींसाठी व इतर आर्थिक खर्चासाठी बचत करतात. परंतु त्या बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक करत नाही. 

गुंतवणूक न केल्यामुळे विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारे फायदे त्यांना घेता येत नाही. त्याचे मोठे कारण म्हणजे अविश्वास व भीती आहे. यामध्ये घरात ठेवलेली रक्कम खर्च होण्यामध्ये व काही वेळेला हरवून जाण्याची समस्या सुद्धा असू शकते 

ही योजना सरकारी असल्याकारणामुळे तुम्ही यावर डोळे झाकून विश्वास ठेऊ शकता. जी महिला बचत करत आहेत त्यांना फक्त या योजनेमध्ये पैसे गुंतवायचे आहे. जेणेकरून त्यांना त्या जमा केलेल्या रक्कमेवर व्याज दर मिळण्यात मदत होईल. 

Mahila Samman Bachat Patra Yojana Benefits

  • महिला सम्मान बचत पत्र योजनाचे फायदे भारत देशामधील महिला व मुलींना घेता येणार. 
  • ही योजना एक गुंतवणूक स्कीम आहे, ज्यामध्ये महिला आर्थिक गुंतवणूक करून व्याज दरप्रमाणे कमाई करू शकतात. 
  • या योजनेमध्ये गुंतवणूक करून भरलेल्या रक्कमेवरती महिलांना 7.5% व्याज दराचे लाभ दिले जाते. परंतु जर तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तिमाही कंपाऊंडिंग रक्कमेनुसार शेवटी कॅलक्युलेट केले तर 7.71% इतके व्याज दर मिळत आहे.
  • यामध्ये देशामधील लहान मुलींपासून ते आजीबाई पर्यंतच्या महिलासुद्धा गुंतवणूक करण्यासाठी अर्ज करु शकता. 
  • लहान मुलींच्या नावाने त्यांचे आई-वडील गुंतवणूक करू शकतात. 
  • केंद्र सरकारने योजनेमध्ये असलेल्या लाभार्थ्यांसाठी 2 वर्षाचा लॉकिंग पिरियड दिला आहे. 
  • योजना अंतर्गत महिला फक्त 1 हजार रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम खात्यामध्ये जमा करू शकतात. 
  • केंद्र सरकारने यामध्ये लॉकिंग पिरियड दिल्यामुळे पैसे काढू शकत नाही. 
  • परंतु महिलेला योजनेमध्ये 1 वर्ष पूर्ण झाले असतील, तर 40% रक्कम काढण्यासाठी परवानगी असते. 
  • त्याचप्रमाणे ज्या महिलेच्या नावाने योजनांमध्ये अर्ज केले असतील, त्यांचे काही कारणामुळे निधन झाल्यास जमा असलेली रक्कम त्यांच्या नॉमिनी सदस्याला देण्यात येणार. 
  • तसेच जर लाभार्थी महिला जर क्रिटिकल अवस्थेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर पूर्ण रक्कम काढू शकते. 
  • योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर लगेचच रक्कम काढू शकत नाही, कारण केंद्र सरकारने 2 वर्षांचा कालावधी मान्य केला आहे. 
  • या योजनेमध्ये गुंतवणूक करून भरलेल्या रक्कमेवरती महिलांना 7.5% व्याज दराचे लाभ दिले जाते. परंतु जर तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर कंपाऊंडिंग रक्कमेनुसार शेवटी कॅलक्युलेट केले तर 7.71% इतके व्याज दर मिळत आहे. 
  • महिला पोस्ट ऑफिस, सरकारी बँक व खाजगी बँकमध्ये जाऊन योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. परंतु क्षेत्रामध्ये फक्त 4 बँकेमध्येच गुंतवणूक करू शकता. 
  • महिला HDFC, ICICI, Axis व IDBI या चार प्रायव्हेट सेक्टर बँकेमध्ये योजना अंतर्गत गुंतवणूक करू शकतात. कदाचित काही बँकेना पुढे जाऊन यामध्ये परवानगी दिली जाईल. 
  • योजनेच्या माध्यमातून पब्लिक व प्रायव्हेट सेक्टर बँकांना केंद्र सरकारतर्फे 27 जून, 2023 रोजी योजना राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. 

महिला सन्मान बचत पत्र योजनेमध्ये टॅक्स भरावा लागणार का? 

महिला सम्मान बचत योजनेमध्ये लाभार्थ्यांना टॅक्स भरावा लागणार आहे. सरकारने लागू केलेल्या टॅक्स स्लॅबप्रमाणे रक्कम भरावी लागणार. ज्या महिला टॅक्स पेयर नसतील, त्यांना यामध्ये कोणत्याही प्रकारचे कर भरावे लागत नाही. परंतु ज्या महिला टॅक्स पेयर आहेत, त्यांना यामध्ये व्याज दर प्रमाणे मिळालेल्या रक्कमेनुसार कर द्यावा लागेल. उदाहरणार्थ, महिला जर 30% स्लॅब अंतर्गत येत असेल, व्याज दराच्या रक्कमेनुसार 30% कर भरावा लागेल. 

या योजनेमध्ये टॅक्स पेयर असलेल्या महिलांना Income Tax Section 194A च्या अंतर्गत TDS भरणे आवश्यक आहेत. तसेच त्याच सेकशनमध्ये दिलेले आहेत की, 40 हजार रुपयाच्या खाली असेल तर TDS भरावे लागणार नाही. जर तुम्ही 2 लाखांच्या हिशोबाने गणना केल्यावर तुम्हाला व्याज दरानुसार 40 हजारच्या आत रक्कम मिळेल. याचा अर्थ कोणालाही TDS भरावा लागणार नाही. 

Mahila Samman Bachat Patra Yojana Eligibility 

महिलांना महिला सन्मान बचत पत्र योजनामध्ये पात्र असण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्रता असणे आवश्यक आहे. 

  • योजने अंतर्गत अर्ज करणारी महिला भारत देशामधील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. 
  • या योजनेमध्ये फक्त महिला वर्ग व लहान मुली अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. 
  • केंद्र सरकारने अर्जदारांना योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकाचे वयाचे बंधन ठेवलेले नाही. 
  • देशभरातील लहान मुली व महिला यामध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात. 
  • वार्षिक उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त असलेल्या कुटुंबातील महिलांना अर्ज करण्यासाठी परवानगी नाही. 

Mahila Samman Bachat Patra Yojana Required Documents 

महिला सन्मान बचत पत्र योजनासाठी लागणारी कागदपत्रे अर्जदारांकडे असणे महत्त्वाचे आहे. यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक असणाऱ्या संपूर्ण कागदपत्रांची यादी दिली आहे, त्यानुसार कागदपत्रे जमा करणे. 

  • महिलेचे आधारकार्ड (बँक खात्यासोबत लिंक असणे) 
  • पॅनकार्ड 
  • ओळखपत्र (पासपोर्ट/वोटर आयडी/वाहनचालक लायसन्स) 
  • स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र 
  • रेशनकार्ड 
  • मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट आकारचे फोटो 
  • कुटुंबातील वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र 
  • ई-मेल आयडी 
  • वयाचा पुरावा (जन्माचा दाखला) 

Mahila Samman Bachat Patra Yojana Registration 

महिला सन्मान बचत पात्र योजनामध्ये अर्ज करण्यासाठी महिलांना खालीलपैकी दिलेल्या प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे आहे. 

  • योजने अंतर्गत महिला पोस्ट ऑफिस किंवा बँकमध्ये जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकतात. 
  • सुरुवातीला महिलेला जवळच्या पोस्टामध्ये किंवा बँक शाखेमध्ये जावे लागेल. 
  • पोस्टामध्ये किंवा बँकमध्ये गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्याकडे योजना संबंधित संपूर्ण माहिती द्यावी लागेल. 
  • ब्रांचमधील अधिकारी योजनासाठी लागणारे अर्जाचे फॉर्म महिलेला प्रदान करतील. 
  • महिलांना सर्वात प्रथम तो फॉर्म संपूर्ण वाचून व्यवस्थितपणे भरावा लागेल. 
  • महिलेने संपूर्ण माहिती फॉर्ममध्ये भरल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे झेरॉक्स करून जोडणे. 
  • त्यानंतर फॉर्ममध्ये अर्ज करणाऱ्या महिलेचा फोटो लावणे व सही करून घेणे. 
  • महिलेला भरलेला फॉर्म व कागदपत्रे घेऊन पोस्ट ऑफिस किंवा बँकमध्ये जमा करणे. 
  • ब्रांचमधील अधिकाऱ्यांकडून फॉर्म तपासले जातील. 
  • जर महिला या योजनेमध्ये पात्र असतील तर फॉर्म स्वीकारला जाईल. 
  • महिला योजनेमध्ये पात्र असल्यास त्यांना गुंतवणुकीची रक्कम जमा करावी लागेल. 
  • त्यानंतर जमा केलेल्या रक्कमेची पावती अधिकाऱ्याकडून दिली जाईल ती सांभाळून ठेवणे. 
  • अशा प्रकारे महिला योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी प्रकिया करू शकतात. 

निष्कर्ष 

अशाप्रकारे Mahila Samman Bachat Patra Yojana संबंधित आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली. यामध्ये आम्ही योजनेचे महत्व, त्यांचे उद्देश, त्यामधून होणारे फायदे, त्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक असणारे कागदपत्रे व अर्ज प्रकिया याबद्दल सविस्तररित्या मार्गदर्शन केले. 

महिला सन्मान बचत पत्र योजना सुरक्षित व चांगले रिटर्न्स देत असल्याकारणामुळे महिलांसाठी ही एक उत्तम गुंतवणूक आहे. या योजनेमध्ये महिलांना गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. 

आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल, तर नक्की तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये पाठवा किंवा तुमच्या नातेवाईकांना पाठवा. अशाच फायदेशीर योजनांच्या माहितीसाठी आमचा Telegram चॅनेल जॉईन करू शकता.  

FAQs

महिला सन्मान योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेसाठी भारत देशामधील सर्व महिला व मुली पात्र आहेत. 

महिला सन्मान बचत पत्र योजना कधी सुरू झाली?

केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2023 रोजी केली होती. 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र बँकेत उघडता येईल का?

होय, पब्लिक व काही प्रायव्हेट बँकेत योजनांसाठी खाते उघडू शकता. 

पुढे वाचा: