Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राज्यातील लोकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. महाराष्ट्र सरकारचे उद्देश महाराष्ट्रामधील जवळपास 12 कोटी लोकांपेक्षा जास्त नागरिकांना वैद्यकीय विमा सेवा प्रदान करणे हे आहे.
आज आपण या योजना बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. MJPJAY योजना काय आहे? त्यांचे फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रकिया आणि बरेच काही बघणार आहोत, यासाठी शेवटपर्यंत लक्षपूर्वक लेख पहा.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana in Marathi
MJPJAY चा पूर्ण अर्थ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असा आहे. 21 नोव्हेंबर, 2013 रोजी तेव्हाच्या महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ही योजना सुरु केली होती. परंतु सध्याच्या महाराष्ट्र सरकारतर्फे 1 एप्रिल, 2017 रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनाचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असे ठेवण्यात आले.
MJPJAY Scheme ही योजना विमा आधारित आहे. राज्यातील लोकांकडे विमा सुरक्षा असेल तर त्या लोकांचा हॉस्पिटल खर्चासाठी खिशातील खर्च कमी होऊन ते गरीब होण्यापासून वाचतात. या योजने अंतर्गत आधी लाभार्थींना वर्षाला 1.5 लाखांपर्यंतचा विमा सुरक्षा दिला जात होता, परंतु राज्यातील सरकारने त्यामध्ये बदल करून वर्षासाठी 5 लाख रक्कमेचा विमा सुरक्षा कव्हर घोषित केला आहे.
या योजने अंतर्गत किडनी ट्रान्सप्लांटसाठी अडीच लाखाची आर्थिक मदत दिली जायची ते बदलून 3 लाख केली आहे आणि कुटुंबाच्या उपचारासाठी दीड लाख ऐवजी 2 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून याआधी 971 रोगांवर उपचार लागू केले होते, परंतु आता एकूण 1034 रोगांवर उपचारासाठी मान्यता देण्यात आली आहे.
MJPJAY Scheme Overview
योजनेचे नाव | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकारने |
कधी सुरु केली | 1 एप्रिल, 2017 रोजी |
विभाग | आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र |
उद्देश | राज्यातील 12 कोटी लोकांना मोफत वैद्यकीय सुरक्षा देणे |
लाभ | लाभार्थींना वर्षासाठी 5 लाख रुपयांचा विमा कव्हर |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | Jeevandayee.gov.in |
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Objective
केंद्र सरकारने चालू केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाचे मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना आपल्या कुटुंबासाठी हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारचे उपचार करण्यासाठी मोफत वैद्यकीय विमा सुरक्षा प्रदान करून आर्थिक मदत करणे.
जेणेकरून राज्यातील गरीब व दुर्बळ वर्गातील नागरिकांना काही खर्च न करता चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास मदत मिळेल. महाराष्ट्र सरकार आधी 5 कोटी लोकांना विमा सुरक्षा प्रदान करत होते, परंतु आता त्यांचे धोरण आहे 12 कोटी लोकांना यातून फायदा करून देणे.
MJPJAY Yojana Benefits
- महाराष्ट्र राज्यातील 12 कोटी कुटुंबांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाचा फायदा घेता येतो.
- तसेच या योजेनचा फायदा महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करून दिला जातो.
- या योजनेतून राज्य सरकार आर्थिक मदत देऊन नागरिकांना मोफत वैद्यकीय विमा सुरक्षा प्रदान करते.
- या मोफत वैद्यकीय सुरक्षा विमामध्ये 5 लाख रुपयांचा कव्हर एका वर्षासाठी दिला जातो.
- या 5 लाखांच्या कव्हरमध्ये 3 लाख किडनी ट्रान्सप्लांट आणि 2 लाख कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी वापरता येतात.
- या योजने अंतर्गत 1034 रोगांसाठी उपचार घेता येतात यामध्ये प्लास्टिक सर्जरी, हृदय रोग, मोतीबिंदू, कॅन्सर अशा बऱ्याच रोगांचा समावेश केला आहे.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Eligibility
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनामध्ये पात्रता असण्यासाठी नागरिक महाराष्ट्र्र राज्यामधील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकंडे पांढरे, केशरी, पिवळे रेशन कार्ड असणे बंधनकारक.
- राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबातील व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबातील सदस्य सहभागी होऊ शकतात.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Documents
- अर्जदाराचे आधारकार्ड
- पॅनकार्ड
- रेशनकार्ड
- वयाचे प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- सरकारी डॉक्टरांकडून आजारी असल्याचे पत्र
- तीन पासपोर्ट आकाराचे फोटो
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Online Apply
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून लाभ मिळविण्यासाठी खालील दिलेल्या प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
- अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला MJPJAY योजनाच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जायचे आहे.
- तुमच्या समोर त्या वेबसाइटचा होमपेज ओपन होईल.
- त्या होमपेज मध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन असा पर्याय निवडायचा आहे.
- न्यू रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक केल्यावर तुमच्या समोर MJPJAY form ओपन होईल.
- त्यामध्ये विचारली गेलेली सगळी माहिती योग्यरीत्या भरून घेणे.
- त्यानंतर लागणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घेणे.
- शेवटी फॉर्म आणि कागदपत्रे व्यवस्थित तपासून सबमिट बटनावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल तो तुम्हाला नेहमी लॉगिन करण्यास वापरात येऊ शकतो. लॉगिन कसे करायचे याबद्दल पुढे प्रकिया सांगण्यात आलेली आहे.
- अशा प्रकारे तुमचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे.
MJPJAY Portal Login Process
- सर्वात प्रथम तुम्हाला लॉगिन करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- त्या होमपेज मध्ये वरच्या कोपऱ्याला login असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करणे.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन वेळी भेटलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तिथे टाकून घेणे.
- माहिती टाकून झाल्यावर लॉगिन बटणवर क्लिक करून तुम्ही पोर्टलमध्ये जाऊ शकता.
- अशा प्रकारे लॉगिन यशस्वीरित्या झालेले आहे.
- हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला health Card बनवावे लागते ते कसे बनवायचे याची सुद्धा प्रकिया पुढे बघायला मिळेल.
MJPJAY Health Card List
- सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट जावे लागेल.
- त्यांनतर तुमच्या समोर होमपेज ओपन होईल.
- त्याच होमपेजमध्ये तुम्हाला हेल्थ कार्डची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करणे.
- त्यामध्ये गेल्यावर तुम्हाला महा ई सेवा केंद्र, संग्राम केंद्र व पोस्ट ऑफिस असे तीन पर्याय दिसतील.
- या तिघांपैकी तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडून घेणे.
- पर्याय निवडून झाल्यावर तुमच्या हेल्थ कार्डची संपूर्ण यादी उघडून येईल.
- ती यादी डाउनलोड करून प्रिंट करून घेणे.
- अशा प्रकारे तुम्हाला health card सुद्धा प्राप्त होऊन जाईल, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताना त्याची गरज लागेल.
MJPJAY पोर्टलवर एनरोलमेंट गाईडलाईन बघण्याची प्रकिया
- तुम्हाला एनरोलमेंट गाईडलाईन पाहण्यासाठी सर्वात आधी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या पोर्टलवर जाणे.
- त्यानंतर तुम्ही वेबसाईटमध्ये लॉगिन करून घेणे.
- तुमच्या समोर होमपेज उघडून आल्यावर त्यामध्ये एनरोलमेंट गाईडलाईन या पर्यायावर क्लिक करणे
- एनरोलमेंट गाईडलाईनमध्ये गेल्यानंतर एक नवीन पेज उघडून येईल.
- त्या होमपेजमध्ये तुम्हाला एनरोलमेंट गाईडलाईन पाहायला मिळेल.
How to check MJPJAY Hospital List?
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनामध्ये समावेश असलेले हॉस्पिटलची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना फॉलो करा.
- सर्वात प्रथम तुम्हाला योजनेच्या वेबसाइटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर त्याच्या होमपेजमध्ये तुम्हाला Network Hospital असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर हॉस्पिटलची पूर्ण यादी उघडून येईल.
- तुमच्या सुविधानुसार तुमच्या जवळील योग्य हॉस्पिटल तुम्ही निवडू शकता.
पॅकेज कॉस्ट कशी तपासायची?
- सर्वात आधी तुम्हाला MJPJAY च्या ऑफिशिअल वेबसाइटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर होमपेज ओपन होईल.
- त्या होमपेजवरील Operational Guideline या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यामधील पॅकेज कॉस्ट च्या लिंकवर जायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर पॅकेज कॉस्टची संपूर्ण यादी उघडून येईल.
- तुम्हाला जी काही माहिती हवी आहे ती त्या यादीमध्ये तपासून घेणे.
MJPJAY Helpline Number
आम्ही या लेखात तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला योजनासंबधीत काहीही समस्या आल्या तर तुम्ही पुढे दिलेल्या हेल्पलाइननुसार संपर्क करून योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माहिती घेऊ शकता. संपर्क नंबर 155377 आणि 18002332200
निष्कर्ष
आम्ही या लेखातून तुम्हाला Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली. यामध्ये आम्ही योजना काय आहे? ती का सुरु करण्यात आली? कोणी सुरु केली? कधी सुरु केली? त्यामागचे उद्देश काय होते? त्यांचे फायदे काय? त्यामध्ये कोण सहभागी होऊ शकतो? किती लाभ मिळतो? अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार? यामध्ये लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? तसेच हेल्थ कार्ड, हॉस्पिटलची यादी याबद्दल सविस्तारित्या मार्गदर्शन केले.
तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आम्ही दिलेल्या माहितीनुसार अर्ज करून लाभ मिळवू शकता आणि आमचा हा लेख आवडला असेल तर गरजू लोकांना पाठवून याचा लाभ घेण्यास मदत करा.
अशाच फायदेशीर व नवीन योजनांसाठी आम्हाला Subscribe करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी Telegram/WhatsApp वर जॉईन करून शकता.
FAQs
जन आरोग्य योजनेसाठी नोंदणी कशी करावी?
जन आरोग्य योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला MJPJAY च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन करावी.
PMJAY MJPJAY म्हणजे काय?
PMJAY म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि MJPJAY म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना होय.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी कोण पात्र आहे?
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सगळे स्थानिक रहिवासी पात्र आहेत.
महाराष्ट्रात मोफत वैद्यकीय योजना काय आहे?
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रात मोफत वैद्यकीय योजना आहे.
हे सुद्धा वाचा: