Lek Ladki Yojana Eligibility: लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे? जाणून घ्या अटी 

Lek Ladki Yojana Eligibility: या आर्टिकलमध्ये लेक लाडकी योजना अंतर्गत कोणत्या पात्रतेच्या अटी सरकारने लागू केल्या आहेत? त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यास मिळेल.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महाराष्ट्र राज्यामधील 18 वर्षा खालील मुलींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने 01 एप्रिल, 2023 रोजी लेक लाडकी योजनाची सुरुवात केली आहे. योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व मुलींना राज्य सरकारतर्फे एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते.

राज्य सरकारचे योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्देश महाराष्ट्रामधील गरीब वर्गातील मुलींना त्यांच्या तरुण वयात शिक्षण व लग्नासाठी आर्थिक मदत करणे आहे. ही एक प्रकारची गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये मुलीचे आई-वडील तिच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकतात. 

मुलींसाठी रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी पात्रता आणि कोणकोणत्या अटी फॉलो कराव्या लागतील? याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 

लेक लाडकी योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

  • या योजनेमध्ये महाराष्ट्रामधील स्थानिक कुटुंबातील मुली लाभ घेण्यास पात्र आहेत. 
  • योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  लाख रुपयांपेक्षा कमी असावे. 
  • 01 एप्रिल, 2023 च्या नंतर ज्या मुलींचा जन्म झाला आहे, त्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळतो. 
  • योजनेमध्ये कुटुंबामधील फक्त दोन मुलीपेक्षा जास्त मुली भाग घेऊ शकत नाही. 
  • त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये जुळ्या मुली झाल्या असतील तर त्या दोघींच्या नावाने खाते उघडू शकतात. 
  • योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी पिवळे किंवा नारंगी राशनकार्ड पालकांजवळ असणे. 
  • कुटुंबामध्ये एक मुलगी आणि मुलगा असेल तर योजनेसाठी पात्र नाही.  
  • ज्या मुलीच्या नावे अर्ज करणार आहेत, तिच्या नावे बँक खाते महाराष्ट्रामध्ये असणे. 
  • तसेच अर्ज करताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

Read More: