Lek Ladki Yojana 2024: महाराष्ट्र सरकारतर्फे लेक लाडकी योजना ही राज्यातील मुलींसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपाने दुर्बळ असलेल्या कुटुंबात जन्म घेणाऱ्या मुलींना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाईल. महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणारी ही आर्थिक मदत मुलीच्या जन्मापासून ते मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत मिळणार आहे.
आजही महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये काही गरीब वर्ग आहे, या कुटुंबामधील मुलींना हवे तसे शिक्षण घेता येत नाही. अशाच कुटुंबातील मुलींना भविष्य काळात चांगले शिक्षण प्राप्त होण्यासाठी राज्य सरकारतर्फे आर्थिक स्वरूपात मदत दिली जाणार.
जे नागरिक आपल्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना या लेखात लेक लाडकी योजना काय आहे? त्याचे फायदे, पात्रता, लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहा.
लेक लाडकी योजना म्हणजे काय? | Lek Ladki Yojana in Marathi
या मदतीसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पनेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये ‘लाडकी लेक’ योजना याबद्दलची घोषणा केली. या योजनेच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील गरीब वर्गातील मुलींना जन्मापासून ते १८ वर्षाची होईपर्यंत पाच टप्प्यात आर्थिक मदत दिली जाणार आणि ही रक्कम एकूण एक लाख एक हजार रुपये असणार आहे.
राज्य सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीचे मुलीच्या भविष्यामध्ये शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चासाठी वापरू शकता. सरकारतर्फे ५ टप्प्यात दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे तक्त्या स्वरूपात माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
Lek Ladki Yojana Installments
टप्पे | आर्थिक लाभाचे वर्णन | आर्थिक स्वरुपात मिळणारी रक्कम |
पहिला टप्पा | मुलीच्या जन्म झाल्यानंतर | 5,000/- रुपये |
दुसरा टप्पा | मुलगी जेव्हा पहिलीला शिक्षण घेईल तेव्हा | 6,000/- रुपये |
तिसरा टप्पा | मुलगी सहावीला गेल्यानंतर | 7,000/- रुपये |
चौथा टप्पा | मुलीच्या अकरावीच्या शिक्षणा दरम्यान | 8,000/- रुपये |
पाचवा टप्पा | मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर | 75,000/- रुपये |
Lek Ladki Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | Lek Ladki Yojana Maharashtra |
राज्य | महाराष्ट्र |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्रातील सरकारने |
विभाग | महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र |
कधी सुरु केली | ऑक्टोबर २०२३ रोजी |
उद्देश | गरीब वर्गातील मुलींना आर्थिक मदत |
लाभ | जन्मापासून ते १८ वर्षाची होईपर्यंत एकूण रक्कम १ लाख १ हजार रुपये मिळणार |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | लवकरच येईल |
हेल्पलाईन नंबर | 022-22027050 |
Lek Ladki Scheme Purpose
महाराष्ट्र सरकारतर्फे सुरु केलेल्या लेक लाडकी योजनाचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिक स्वरूपात दुर्बळ कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवणे हा आहे. जेणेकरून त्या कुटुंबातील मुली स्वतंत्रपणे आपले शिक्षण पूर्ण करतील आणि आत्मनिर्भर राहून आपले भविष्य उज्ज्वल बनवतील. त्याचप्रमाणे मुलीचे आई आणि वडील सुद्धा आपल्या मुलींच्या भविष्याला घेऊन चिंतीत राहणार नाहीत.
तसेच या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचे जन्माचे दर वाढावे, त्यांच्या शिक्षणासाठी चालना मिळावी, मुलींच्या मृत्यूचे दर कमी व्हावे, त्याचप्रमाणे बालविवाहाला रोख लागावी, प्रत्येक मुलीला शिक्षण मिळावे आणि त्याशिवाय कुपोषण कमी व्हावे हे राज्य सरकारचे महत्त्वाचे उद्दिष्टे आहे.
या लेखात आम्ही या योजनाचे कशाप्रकारे फायदे लाभार्थी मुलींना भेटणार तसेच अर्ज करण्यासाठीचे अटी व शर्ती म्हणजेच पात्रता याबद्दल पुढे सांगितले आहे.
Ladki Lek Yojana Benefits
- लेक लाडकी योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरिबीमध्ये असलेल्या मुलींना आर्थिक लाभ मिळणार.
- या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक लाभातून मुलींच्या शिक्षणाला मदत होईल.
- या योजनामध्ये लाभार्थी मुलींना पाच टप्प्यात हफ्त्यांच्या स्वरूपात १८ वर्षाची होईपर्यंत एकूण रक्कम १ लाख १ हजार रुपये मिळणार.
- राज्यामधील पिवळे आणि नारंगी रेशन कार्ड धारकांना आपल्या मुलींसाठी या योजनेचा लाभ घेता येणार.
- याचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या आई किंवा वडील यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- या योजनेमध्ये १ एप्रिल २०२३ नंतर मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये प्रथम रक्कम मिळणार.
- यामधील लाभार्थी मुलगी इयता पहिलीला गेल्यावर शाळेचा दाखला दिल्यानंतर ६,०००/ रुपये ट्रान्सफर केले जाणार.
- मुलगी इयत्ता सहावीमध्ये प्रवेश केल्यानंतर ७,००० रुपयेसाठी अर्ज करू शकता.
- लाभ घेत असलेली मुलगी अकरावीमध्ये गेल्यानंतर ८,००० रुपये प्राप्त करू शकता.
- मुलीच्या १८ व्या वर्षानंतर लग्न न झाल्याचा अविवाहित असल्याचा लेखी घोषणा पत्र दाखवून ७५,०००/- रुपयांसाठी अर्ज करू शकता.
- या योजनेमध्ये शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक आपल्या मुलींसाठी अर्ज करू शकतात.
लेक लाडकी योजना पात्रता | Ladki Lek Scheme Eligibility
- लेक लाडकी योजनामध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील गरीब वर्गातील मुली या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
- या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ नंतर झालेला असला पाहिजे.
- आपल्या मुलींसाठी अर्ज करणाऱ्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक नसले पाहिजे.
- या योजनेमध्ये आपल्या मुलींसाठी लाभ घेणाऱ्या परिवारांकडे पिवळे किंवा नारंगी रेशनकार्ड असणे आवश्यक आहे.
- १ एप्रिल २०२३ नंतर मुलीचा जन्म झाल्यावर ग्रामीण किंवा नागरी क्षेत्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुलीच्या जन्माची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- या योजनेमध्ये एकाच कुटुंबातील २ मुलींसाठी अर्ज करू शकतो.
- जर एका कुटुंबामध्ये १ मुलगा आणि १ मुलगी असेल तरही मुलीला लाभ घेता येणार.
- जन्माच्या वेळेला २ जुळी मुली असतील त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार.
- या योजनेसाठी लाभार्थींचे महाराष्ट्र राज्यामध्ये बँक खाते असणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? | Ladki Lek Scheme Required Documents
- आई-वडिलांचे आधारकार्ड
- पिवळा किंवा नारंगी रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मुलीचे आई-वडील सोबतचा एकत्र फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- मुलीच्या जन्माचा दाखला
- मुलीचे १८ वय झाल्यानंतर मतदार यादीत नाव असणे.
- लाभार्थी मुलगी शिकत असल्यास शाळेचा दाखला
- प्रथम लाभानंतर मुलीचे आधारकार्ड आवश्यक
- बँक खात्यातील पासबुकचे पहिले पान
Lek Ladki Scheme Registration
Lek Ladki Yojana Online Apply करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया चालू करण्यात आलेली नाही. परंतु या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीचा वापर करू शकता.
लेक लाडकी योजना रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रकिया दिलेल्या आहेत त्या लक्षपूर्वक फॉलो करा.
- सगळ्यात आधी तुम्हाला योजनामध्ये ऑफलाईन अर्ज करण्यासाठी फॉर्म लागेल.
- Lek Ladki Form साठी तुम्ही आमच्या Telegram चॅनेलमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता किंवा
- जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, अंगणवाडी केंद्र , ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग या सरकारी कार्यालयामध्ये भेट देऊन फॉर्म प्राप्त करू शकता.
- Application Form प्राप्त झाल्यावर फॉर्ममध्ये विचारल्या गेलेली माहिती लक्षपूर्वक भरून घेणे.
- फॉर्म भरून झाल्यावर त्यामध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून घेणे.
- त्याचसोबत शासनाने दिलेला Lek Ladki Yojana GR सुद्धा जोडून घेणे.
- त्यानंतर संपूर्ण फॉर्म आणि कागदपत्रे तुमच्या जवळील अंगणवाडीमध्ये जाऊन सेविका/ पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे जमा करणे.
- तुमचे फॉर्म आणि कागदपत्रे नेमलेल्या अधिकारीकडून तपासण्यात येतील, काही दुरुस्ती असेल तर ते दुरुस्त करून त्वरित देणे.
- अशा प्रकारे तुमचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील आणि त्यानंतर पुढील नेमलेले अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी जातील.
- त्यानंतर मान्यता मिळाल्यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केला जाईल.
- सगळी प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम यादी प्रसारित केली जाईल आणि तुम्हाला मोबाईलवर SMS येईल किंवा ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
- त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये लेक लाडकी योजना अंतर्गत डीबीटी पद्धतीने रक्कम पाठविण्यात येईल.
Lek Ladki Yojana Form Update Process
- सगळयात आधी लेक लाडकी या योजनाच्या अर्जाचे फॉर्म डाउनलोड करून प्रिंट करून घेणे.
- पहिले लाभार्थी तपशीलमध्ये लाभार्थीचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, लाभार्थींच्या आई/वडिलांचे नाव, त्यांचे आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून घेणे.
- दुसऱ्या भागात तुमचा संपूर्ण पत्ता ज्यामध्ये घर/इमारत/सदनिका क्रमांक, क्षेत्र/परिसर, पोस्ट ऑफिस, जिल्हा, रोड/रस्ता/लाईन, गाव/शहराचे नाव, तालुका आणि पिनकोड लिहून घेणे.
- तिसऱ्या भागात तुमचे चालू असलेले मोबाईल नंबर टाकणे.
- चौथ्या भागामध्ये कुटुंबातील लहान मुलाची संख्या टाकणे.
- पाचव्या भागात कोणत्या हफ्त्यासाठी अर्ज करता आहात त्याची टिकमार्क करा.
- सहाव्या भागामध्ये बँक खात्याचे संपूर्ण माहिती त्यामध्ये बँक खाते क्रमांक, IFSC कोड, EKYC आहे कि नाही याची नोंदणी करणे.
- सातव्या भागामध्ये कोणत्या टप्प्यासाठी अर्ज करत आहेत? त्याची पुन्हा टिकमार्क करायची आहे.
- शेवटी लाभार्थी किंवा पालकांची सही अथवा डाव्या अंगठाचा ठसा द्या.
- सगळा फॉर्म भरून झाला असेल तर शेवटी दिलेल्या कागदपत्रानुसार कॉपी काढून फॉर्म सोबत जोडा.
निष्कर्ष
आम्ही या लेखातून तुम्हाला Lek Ladki Yojana याबद्दल संपूर्ण अपडेटेड माहिती तुम्हाला सांगितली. यामध्ये योजनाचे महत्त्व काय आहे? त्यांचे उद्देश काय आहे? कोणते फायदे आहेत? यासाठी पात्र कोण असणार? यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? यामध्ये अर्ज कसा करायचा? याबदल सविस्तर माहिती आम्ही यातून सोप्या भाषेत सविस्तररित्या सांगितली.
तुम्हाला या संबंधित योजनेचा GR किंवा फॉर्म हवा असल्यास आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. तुमच्या घरात सुद्धा मुलगी असेल तर या उपक्रमाचा फायदा घ्या आणि तुमच्या मुलीचे भविष्य चांगले करण्यासाठी मोलाचा पाऊल उचला.
आम्ही आशा करतो, हा संपूर्ण लेख तुम्ही वाचला असेलच, जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर गरजू लोकांसोबत share करा. अशाच नवनवीन योजनांसाठी आम्हाला subscribe करून ठेवा आणि daily आमच्याशी जुळण्यासाठी social मीडियावर आम्हाला follow करू शकता.
FAQs
लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेसाठी केशरी आणि पिवळे रेशनकार्ड धारक कुटुंबातील १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुली पात्र आहेत.
लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेची सुरवात ३० ऑक्टोबर, २०२३ रोजी महाराष्ट्र सरकारतर्फे झाली.
लेक लाडकी योजनेचा फॉर्म कुठे भरावा?
या योजनेचा फॉर्म ऑफलाईन भरून जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन सेविका/ मुख्यसेविका /पर्यवेक्षिका यांच्याकडे जमा करावा.
लेक लाडकी योजनेचा अर्ज कुठे करायचा?
या योजनेचा अर्ज अंगणवाडीमध्ये जाऊन सेविका/ मुख्यसेविका /पर्यवेक्षिका यांच्याकडे करायचा.