Lakhpati Didi Yojana Beneficiary Eligibility: या आर्टिकलमध्ये लखपती दीदी लाभार्थी कोण असणार आहेत? आणि योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी कोणत्या पात्रतेच्या अटी? फॉलो करणे आवश्यक याची संपूर्ण माहिती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
लखपती दीदी योजना अंतर्गत भारत देशामधील ग्रामीण क्षेत्रातील महिला वर्ग लाभार्थी म्हणून सहभागी होऊ शकतात. परंतु योजनेमध्ये अर्ज करण्याआधी त्यांना काही पात्रतेच्या अटी जाणून घेणे आवश्यक आहे यासाठी लेखात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
योजने अंतर्गत पात्र असलेल्या महिला वर्गाला केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण आणि ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये ते 5 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेची सुरुवात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट, 2023 रोजी महिलांना आत्मनिर्भर राहण्यासाठी व आर्थिक मदत करण्यासाठी केली आहे.
लखपती दीदी योजनाची लाभार्थी पात्रता
- केंद्र सरकारतर्फे योजनेच्या माध्यमातून जवळपास 3 कोटी महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- योजनेमध्ये फक्त भारत देशामधील ग्रामीण विभागात राहत असलेल्या महिला सहभागी होऊ शकतात.
- ज्या महिलांचे वय 18 ते 50 वर्ष वयोगटामधील असेल, त्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- महिलांना योजनेमधून कर्ज घेण्यासाठी सेल्फ हेल्प ग्रुप अंतर्गत रजिस्टर सदस्य असणे आवश्यक आहे.
- योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी महिले जवळ राशनकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि वार्षिक उत्पन्न दाखल ही सर्व कागदपत्रे असावी.
- ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तेच फक्त योजनेमध्ये अर्ज करू शकतात.
- त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबामधील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामाला नसावे.
Read More: