Lakhpati Didi Yojana 2024: महिला होणार आता लखपती, असा करा अर्ज

Lakhpati Didi Yojana 2024: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत देशामधील महिलांना आर्थिक स्वरूपात स्वतंत्र बनविण्यासाठी लखपती दीदी योजना सुरु केली आहे. देशभरातील जवळपास 3 कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून 5 लाखांचे कर्ज व विविध प्रकारच्या कामांबद्दल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

सर्वाना माहीतच असेल, आपल्या देशामध्ये पुरुषप्रधान समाजाचा आदर्श सुरुवातीपासून घेत आले आहेत. त्याचसोबत स्त्रियांना शिक्षणासाठी कमी प्रोत्साहन दिले जाते. या सर्व गोष्टींमुळे महिला वर्ग पुरुषांच्या तुलनेत मागे राहत चालले आहेत. परंतु काही मोठ्या वेबसाइटच्या सांगण्यानुसार, भारत देशामध्ये पुरुष व स्त्रीमधील अंतर कमी होत आहे आणि शहरी भागांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांकडे जास्त पैसे आहेत. याचे कारण असू शकते चांगले शिक्षण व रोजगारांची संधी. 

परंतु ग्रामीण भागात जवळपास 60% पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. याच महिलांना शिक्षण व आर्थिक स्वरूपात सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकारने लखपती दीदी योजनाची सुरुवात केली आहे. ज्यामध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतामधील जवळपास 1 कोटी पेक्षा जास्त लखपती दीदींचा समावेश आहे आणि एक कोटीमधील 10 लाखांपेक्षा जास्त महिला बिहार, वेस्ट बंगाल व आंध्र प्रदेश या राज्यातील आहेत. 

याच लखपती दीदी योजनाबद्दल आज आपल्या लेखातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये योजना काय आहे? त्यांचे उद्देश काय आहेत? त्यामधून महिलांना कोणते फायदे दिले जातात? यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत? महिलांना अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागते? त्याचप्रमाणे अर्ज कसा करावा लागतो? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा. 

Lakhpati Didi Yojana in Marathi 

लखपती दीदी म्हणजेच ग्रामीण क्षेत्रामधील राहणाऱ्या महिलांना Women Self Help Groups (SHGs) च्या मदतीने वर्षाला 1 लाख रुपये रक्कम कमविण्यासाठी मदत करत आहेत. या योजनेची सुरवात 15 ऑगस्ट 2023 मध्ये करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण विकास विभाग नोडल मंत्रालय करते. 

या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारचे स्किल्स व प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये प्लम्बिंग, LED बल्ब बनविणे, ड्रोन ऑपेरेशन, शिवणकाम व विणकाम अशा कामाचा समावेश आहे. त्याचसोबत Multiple Livelihood Activities व Value Chain Interventions या पद्धती वापरून महिलांच्या कमाईला वाढवण्यात येते. 

ज्या महिलांनी योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांना केंद्र सरकारतर्फे उत्पन्न कमविण्यासाठी संधी दिली जाते. त्याचसोबत महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी व्याज मुक्त 1 लाख रुपयांपासून ते 5 लाखांपर्यंत कर्ज केंद्र शासनातर्फे उपलब्ध करून दिले जाते. 

DAY-NRLM म्हणजे Deendayal Antyodaya Yojana – National Rural Livelihoods Mission चा हा एक भाग आहे, ज्याचा मुख्य उद्देश ग्रामीण क्षेत्रामध्ये आर्थिक परिवर्तन घडवून आणणे आहे. 

Lakhpati Didi Yojana 2024 Overview

योजनाचे नावलखपती दीदी योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
सुरु कधी झाली15 ऑगस्ट 2023
कोणी सुरु केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
विभागग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार
उद्देशग्रामीण क्षेत्रातील महिलांना प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणे
लाभार्थीभारत देशातील ग्रामीण महिला वर्ग
लाभप्रशिक्षण व 5 लाखांपर्यत बिनव्याजी कर्ज
अर्ज प्रकियाऑनलाईन व ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://lakhpatididi.gov.in/

Lakhpati Didi Yojana Aim 

लखपती दीदी योजनाचे उद्देश भारत देशामधील ग्रामीण महिलांना वर्षाला 1 लाख रुपये कमविण्यासाठी सक्षम बनविणे आहे. जेणेकरून महिला स्वतंत्रपणे व आत्मनिर्भर बनून आपले जीवन जगू शकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योजनेची सुरुवात केली होती, तेव्हा त्यांचे लक्ष्य देशामधील 2 कोटी ग्रामीण महिलांना लखपती दीदी बनविणे होते. 

मागील वर्षामध्ये वाढत्या लखपती दीदींच्या संख्येमुळे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या अर्थ संकल्पनेत 2 कोटींची संख्या वाढवून 3 कोटी करण्यात आली अशी घोषणा केली. जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना रोजगार निर्माण करून आपले उत्पन्न वाढविण्यात मदत मिळेल. 

Lakhpati Didi Yojana Impact 

  • 2023 मध्ये सुरु झालेल्या लखपती दीदी योजनाच्या माध्यमातून आतापर्यंत ग्रामीण क्षेत्रामधील 1 करोड महिलांनी लाभ घेतला आहे. 
  • या योजनेच्यामार्फत देशामधील महिलांना सक्षम बनवून त्यांना आत्मनिर्भरता आणली गेली आहे. 
  • महिलांच्या या उपलब्धीसाठी केंद्र सरकारच्याकडून ओळख दिली जाते. 
  • ज्या महिलांनी यशस्वीरित्या काम केले आहेत, त्यांना सन्मान दिला जातो आहे. 
  • या योजनेमुळे इतर महिलांनासुद्धा स्वतःचे बिजनेस सुरु करण्यासाठी प्रेरणा मिळते. 
  • त्याचसोबत देशामध्ये योजनेच्या आधारे उद्योजकता वाढली. 

Lakhpati Didi Yojana Benefits 

  • लखपती दीदी योजनाचे फायदे देशामधील 3 कोटी महिलांना होणार आहे. 
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून सक्षमीकरण केले जाते. 
  • महिलांना विविध क्षेत्रामधील कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून सस्टेनेबल इनकम करण्यात मदत होते.
  • विविध कौशल्यामध्ये ड्रोन ऑपेरेशन, LED बल्ब तयार करणे, विणकाम करणे,  शिवणकाम करणे आणि रिपेरिंग करणे  यांचा समावेश आहे. 
  • महिलांना योजनेच्या माध्यमातून उत्पन्न मिळण्यासाठी Self Help Groups च्यामार्फत छोटे-छोटे दुकान चालू करून देण्यात येतात. 
  • या संधीमधून महिलांना वर्षाला कमीत कमी एक लाख रुपये उत्पन्न कमविण्याचे लाभ मिळते. 
  • लाभार्थी महिलेला दुकान उघडण्यासाठी केंद्र सरकारकडून 1 ते 5 लाख रुपयांची आर्थिक मदत लोनच्या स्वरूपात केली जाते. 
  • महिलांना आर्थिक गोष्टींमध्ये जास्त अडचण न होण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून 1 कोटी पेक्षा जास्त महिलांनी लखपती दीदीचा लाभ घेतला आहे. 
  • योजनेमधून महिलांना सुशिक्षित बनण्यासाठी, उत्पन्न कमविण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी व राहणीमान बदलण्यासाठी मदत होईल. 

Lakhpati Didi Yojana Eligibility

लखपती दीदी योजनाची पात्रता जाणून घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे, यासाठी खालीलप्रमाणे पात्रतेच्या अटी सांगितले आहेत. 

  • योजनेमध्ये अर्ज करणारी महिला भारताची स्थानिक रहिवासी असणे महत्त्वाचे आहे. 
  • अर्ज करणाऱ्या महिला कोणत्याही सेल्फ हेल्प ग्रुपची ऍक्टिव्ह सदस्य असणे. 
  • 18 ते 50 वयोगटातील महिला यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. 
  • महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसले पाहिजेत. 
  • सहभागी होणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे. 
  • महिलेकडे योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 

Lakhpati Didi Yojana Required Documents

अर्ज करताना लखपती दीदी योजनाचे आवश्यक कागदपत्रे महिलांजवळ असणे गरजेचे आहेत. यासाठी कागदपत्रांची सर्व यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. 

  • रेशनकार्ड 
  • अधिवास प्रमाणपत्र 
  • महिलेचे आधारकार्ड 
  • पॅनकार्ड 
  • वार्षिक उत्पनाचा दाखला 
  • स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र 
  • महिलेचे बँक खात्याचे पुरावे (पासबुक) 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • वयाचे प्रमाणपत्र 
  • मोबाईल नंबर 
  • शैक्षणिक प्रमाणपत्र (मार्कशीट) 

Lakhpati Didi Yojana Online Apply

महिलांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी लखपती दीदी योजनाचे अर्ज प्रकिया जाणून घेणे आवश्यक आहे, यासाठी खालीलप्रमाणे रजिस्ट्रेशन प्रकिया संपूर्ण स्टेप बाय स्टेप दिलेली आहे.

  • सर्वात प्रथम ऑनलाइन अर्ज करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल. 
  • अधिकृत वेबसाइटमध्ये गेल्यानंतर होमपेज उघडून समोर येईल. 
  • त्या होमपेजमध्ये तुम्हाला लखपती दीदी योजना असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • त्यानंतर पर्यायामध्ये गेल्यावर अर्जाचा फॉर्म उघडेल. 
  • फॉर्म उघडल्यानंतर त्यामध्ये योजनेसाठी वैयक्तिक संपूर्ण माहिती विचारली असेल ती भरून घेणे. 
  • विचारलेली माहिती भरल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून PDF फाईल अपलोड करणे. 
  • भरलेला फॉर्म नीट तपासून घेऊन सबमिट ऑपशनवर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमचा अर्ज यशस्वी होऊन तुम्हाला फॉर्म प्रिंट करावे लागेल. 
  • अशा प्रकारे तुमचा योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज पूर्ण झालेले आहेत. 

Lakhpati Didi Yojana Offline Apply 

महिलेला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी समस्या आल्यास लखपती दीदी योजनामध्ये ऑफलाइन अर्ज करून सुद्धा लाभ मिळवू शकता. ऑफलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील दिलेले स्टेप्स फॉलो करावे लागेल. 

  • ज्या महिला अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे, त्यांना जवळच्या अंगणवाडी शाखेत किंवा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जावे लागेल. 
  • या कार्यालयामध्ये गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्याला या योजनेबद्दल सांगून फॉर्म प्राप्त करणे. 
  • त्याचप्रमाणे फॉर्म भरण्यासाठी मदत घेणे व अतिरिक्त माहिती हवी असेल तर विचारणे. 
  • योजनेच्या अर्जाचा संपूर्ण फॉर्म लक्षपूर्वक भरून घेणे. 
  • त्यानंतर योजनेमध्ये लागणारे कागदपत्रे झेरॉक्स करून फॉर्मसोबत जोडणे. 
  • फॉर्म भरून घेतल्यावर तुम्हाला अंगणवाडी शाखेत किंवा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म जमा करणे. 
  • फॉर्म जमा केल्यानंतर अधिकाऱ्याकडून नोंदणी केलेली पावती मिळेल ती व्यवस्थित ठेवणे. 
  • अधिकाऱ्यांकडून तुमचे अर्ज तपासले जातील तुम्ही पात्र असाल व सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये सहभागी असाल तर अर्ज स्वीकारण्यात येईल. 

निष्कर्ष 

आम्ही लेखाच्या माध्यमातून Lakhpati Didi Yojana संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगितली. यामध्ये योजना सरकारने कोणत्या उद्देशाने सुरु केली? महिलांना कशाप्रकारे फायदा घेता येईल? यामध्ये कोणते कागदपत्रे महिलांना जमा करावे लागणार? स्त्रियांना सहभागी होण्यासाठी पात्रता कोणती असणार? कोणत्या पद्धतीने अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सांगितली आहे. 

लखपती दीदी योजना आपल्या भारत देशामधील स्त्रियांना स्वतंत्रपणे जगायला व स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत करेल. सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना यामधून आर्थिक स्वरूपात सक्षम बनण्यात मदत होईल. महिलांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आमचे हेच ध्येय आहे की, जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा फायदा घेण्यास मदत करणे. 

आमचा आर्टिकल आवडला असेल तर तुम्ही तुमच्या महिला वर्गातील ग्रुपमध्ये पाठवा. तसेच आमच्या Yojana Media च्या YouTube चॅनेल ला Subscribe करा. 

FAQs

लखपती दीदी लाभार्थी कोण आहे?

सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये सदस्य असलेल्या महिला यामध्ये लाभार्थी आहेत. 

मी लखपती दीदीसाठी अर्ज कसा करू शकतो?

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अंगणवाडी शाखेत करू शकता. 

भारतात किती लखपती दीदी आहेत?

भारतामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लखपती दीदी आहेत. 

पुढे वाचा: