Ladki Bahin Yojana Online Form: लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या पोर्टलमध्ये जावे लागेल. आता ते पोर्टल कोणते आहे? त्यामध्ये कसा फॉर्म भरायचा? याची माहिती लेखातून जाणून घ्या.
लाडकी बहीण योजनामध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलमध्ये जावे लागेल. या पोर्टलमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण वेबसाइट उघडून येईल आणि योजनेची माहिती देखील पाहायला मिळेल.
Read More: Ladki Bahin Yojana New Update 2024
या पोर्टलमध्ये तुम्हाला योजनेमध्ये एकूण अर्ज किती महिलांनी केला आहे? आणि किती महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे? त्यांची संपूर्ण आकडेवारी पाहायला मिळेल. त्यानंतर पोर्टलमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर योजनेची पात्रता आणि अपात्रता देण्यात आलेली आहे, ती देखील वाचू शकता.
सुरुवातीला महाराष्ट्र सरकारतर्फे महिलांना अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रकिया पोर्टलद्वारे सुरु करण्यात आली होती. परंतु आता पोर्टलमध्ये कोणत्याही प्रकारची रजिस्ट्रेशन प्रकिया सुरु नाही. जर तुम्ही आधीच पोर्टलमध्ये अकाउंट तयार केले असाल तर तुम्हाला फक्त स्टेटस आणि योजनेचे हफ्ते पाहायला मिळेल.
Read More: Ladki Bahin Yojana Payment Check
महाराष्ट्र शासनाने योजनेचे फॉर्म जरी पोर्टलवर बंद केले असतील, तरीही तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून फॉर्म सबमिट करू शकता. योजने अंतर्गत ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये भेट देऊ शकता.
लाडकी बहीण योजना संबंधित काही न काही अपडेट्स सारखे येतच असतात. यामध्ये योजने अंतर्गत ऑनलाईन फॉर्म संबंधित काही अपडेट त्वरित जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्रामला जॉईन करू शकता आणि योजनाबद्दल नवीन माहिती जाणून घेऊ शकता.