Ladki Bahin Yojana New Update 2024: महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणारी लाडकी बहीण योजनाचे नवीन अपडेट समोर आले आहे. त्या अपडेटमध्ये काय असणार आहे? त्याची संपूर्ण माहिती या आर्टिकलमध्ये दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजना संबंधित विविध प्रकारचे अपडेट्स आणि घोषणा येत आहे. त्यामध्ये हे अपडेट योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या महिलांना संकटात टाकू शकते.
Read More: Ladki Bahin Yojana
योजनेच्या सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना महिलांनी याआधी सरकारच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे का? किंवा घेत आहेत का? याचे प्रश्न विचारले होते. त्यामध्ये लाभार्थी महिलांनी नकार देऊन योजनेचा लाभ घेत आहेत.
परंतु सरकारने योजनेच्या नवीन अपडेटमध्ये ज्या महिलांनी Sanjay Gandhi Niradhar Yojana अंतर्गत लाभ घेत आहेत किंवा घेतला आहे. अशा महिलांचे स्टेटस ladki Bahin Portal मध्ये आता दिसत आहे. यामध्ये जर कोणत्याही महिला संजय निराधार योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले तर त्यांना समस्या होऊ शकतात.
Read More: Ladki Bahin Yojana 4th List
त्याचप्रमाणे ज्या महिलांनी पोर्टलमध्ये एकाच आधारकार्डनुसार दोन वेळा अर्ज करून योजनेचा लाभ घेतला असेल, तर ते देखील स्टेटस पोर्टलमध्ये दाखविले जाणार आहे. या दोन्ही गोष्टींचा तोटा लाभार्थी महिलांना होऊ शकतो.
योजनेच्या नवीन अपडेटचे स्टेटस तपासण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकिया करू शकता.
- तुम्हाला योजनेच्या Ladakibahin.maharashtra.gov.in पोर्टलमध्ये जाऊन मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- त्यानंतर Application Submitted मध्ये प्रवेश करा.
- पोर्टलमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या नावाच्या पुढे संजय निराधार योजनेचा स्टेटस पाहायला मिळेल.
- त्या स्टेटसमध्ये Yes किंवा No असे दिसेल.
- No चा स्टेटस असल्यास तुम्हाला कोणतीही चिंता करायची आवश्यकता नाही.