Ladki Bahin Yojana Login Process: लाडकी बहीण योजनामध्ये लॉगिन कसे करायचे? याची संपूर्ण प्रकिया स्टेप बाय स्टेप आर्टिकलच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आहे तर शेवटपर्यंत लेख पहा.
महाराष्ट्र राज्यामधील महिलांना लाडकी बहीण योजनामध्ये अर्ज करण्यासाठी आणि त्या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागातर्फे ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले. या पोर्टलद्वारे सुरुवातीला रजिस्ट्रेशन प्रकिया उपलब्ध होती, परंतु काही तांत्रिक कारणामुळे ती बंद करण्यात आली.
Read More: Ladki Bahin Yojana Payment Check
ज्या महिलांनी अर्ज करताना लाडकी बहीण योजनाच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये आपले रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहेत. त्याच महिला पोर्टलमध्ये लॉगिन करू शकतात. ज्या महिलांना पोर्टलमध्ये आता नवीन खाते उघडायचे आहे, त्याची सुविधा देखील बंद करण्यात आलेली आहे.
ज्यांनी पोर्टलमध्ये अकाउंट तयार केले आहे आणि त्यांना लॉगिन प्रकिया जमत नाही. अशा महिलांना सोप्या पद्धतीने ऑनलाइन लॉगिन करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रकिया देण्यात आलेल्या आहेत.
Read More: Ladki Bahin Yojana Status Check
लाडकी बहीण योजना लॉगिन प्रकिया
- योजने अंतर्गत लॉगिन करण्यासाठी सर्वात प्रथम महिलांना Ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलमध्ये भेट द्यावी लागले.
- हे पोर्टल महिला मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये उघडू शकतात.
- पोर्टलमध्ये गेल्यानंतर महिलांना अर्जदार लॉगिनचा पर्याय पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनवर लॉगिन फॉर्म उघडून येईल.
- त्यामध्ये अर्ज करताना रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- पुढे अर्ज करताना तयार केला पासवर्ड टाकणे.
- जर पासवर्ड लक्षात येत नसल्यास Forget Password यावर क्लिक करा.
- त्यानंतर त्यामध्ये जाऊन पुन्हा मोबाईल नंबर, कॅप्चा कोड टाकून ओटीपी व्हेरिफाय करून घ्या.
- स्क्रीनमध्ये नवीन पासवर्ड तयार करून आलेला ओटीपी रीसेट करून घेणे.
- पुन्हा अर्जदार लॉगिनच्या डॅशबोर्डमध्ये येऊन मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून Login बटनावर क्लिक करा.