Ladki Bahin Yojana Beneficiary List: लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, महिलांना मिळणार आता 2100 रुपये

Ladki Bahin Yojana Beneficiary List: महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आल्यामुळे लाडकी बहीण योजना अंतर्गत आता लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. ज्या महिलांनी योजनेमध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे, त्यांची नावे लाभार्थी यादीमध्ये मिळतील.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महाराष्ट्र राज्यामधील महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनाची सुरुवात केली. ज्या महिलांनी या योजनेमध्ये अर्ज पूर्ण केले आहे, त्यांना आतापर्यंत एकूण 7500 रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.

या योजनेमधून महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने 46 हजार कोटी रुपयांचा बजेट सादर केला आहे. ज्यामध्ये सुरुवातीला योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दिले जात होते. परंतु आता सर्व लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्यात येणार आहे.

ज्या महिलांनी योजनेमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे, त्यांची नावे आता सरकारने जाहीर केलेल्या नवीन यादीमध्ये सुद्धा आली असतील. लाडकी बहीण योजनेची ही यादी तपासण्यासाठी तुम्हाला आर्टिकलमध्ये दिलेल्या प्रकिया फॉलो कराव्या लागतील.

Ladki Bahin Yojana ची बेनेफिशिअरी लिस्ट कशी तपासायची?

  • लाडकी बहीण योजनाची लाभार्थी यादी तपासण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटमध्ये प्रवेश करावा लागेल.
  • योजनेची वेबसाइट तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये सहजरित्या उघडू शकता.
  • लाडकी बहीण योजनेचे पोर्टल उघडल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल
  • पोर्टलमध्ये लॉगिन करण्यासाठी तुम्हाला अर्जदार लॉगिनवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर नवीन डॅशबोर्ड उघडून येईल.
  • त्यामध्ये तुमचे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्या.
  • डॅशबोर्डमध्ये कॅप्चा कोड दिसत असेल तो भरून लॉगिनचे बटण दाबा.
  • पोर्टलमध्ये लॉगिन केल्यावर योजनेची लाभार्थी यादी तुमच्या स्क्रीनवर उघडून येईल.

Read More: