Ladki Bahin Yojana Application Status Check: महाराष्ट्र सरकारतर्फे लाडकी बहीण योजना अंतर्गत एप्लिकेशन केलेल्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यामधील गरीब व मध्यम वर्गातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनाची सुरुवात केली होती. ज्यामध्ये सुरुवातीला ऑफलाइन रजिस्ट्रेशन प्रकिया ठेवण्यात आली होती, त्यानंतर सर्व महिलांना सोप्या पद्धतीने ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी योजनेच्या नावाने पोर्टल देखील सुरु केले होते.
ज्या महिलांनी योजने अंतर्गत आर्थिक लाभ घेण्यासाठी एप्लिकेशन अर्ज केला आहे, त्यांना आपले एप्लिकेशन स्थिती पाहण्यासाठी आर्टिकलमध्ये दिलेल्या स्टेप बाय स्टेप प्रक्रियांना फॉलो कराव्या लागतील.
Ladki Bahin Yojana Status काय आहे?
लाडकी बहीण योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने 28 जून, 2024 मध्ये केली होती. त्यामध्ये ज्या महिलांनी योजनेमध्ये एप्लिकेशन सादर केले, त्यांना सुरुवातीला 1500 रुपये आर्थिक लाभ बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात आले.
ज्यामध्ये आतापर्यंत लाभार्थी महिलांना 7500 रुपये एकूण रक्कम प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये पाठविली गेली आहे. ज्या महिलांनी योजनेमध्ये एप्लिकेशन पूर्ण केले आहेत, त्यांना आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 2100 रुपये रक्कम देण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojana Application Status Check
तुम्ही एप्लिकेशन केल्यानंतर अंगणवाडीमध्ये जाऊन विचारपूस करू शकता किंवा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलमध्ये जाऊन ऑनलाइन स्टेटस पाहू शकता. खालीलप्रमाणे आर्टिकलमध्ये आम्ही ऑनलाइन स्टेटस तपासण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रकिया दिलेली आहे.
- सर्वात प्रथम तुम्हाला मोबाइलमध्ये योजनेचे पोर्टल उघडायचे आहे.
- त्यानंतर त्यामध्ये अर्जदार लॉगिनच्या पर्यायामध्ये प्रवेश करायचा.
- पुढे तुम्हाला तुमचे रजिस्टर केलेले मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून घ्यायचे.
- पोर्टलमध्ये दिसत असलेला कॅप्चा कोड टाकून लॉगिन करून घेणे.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती योजने संबंधित एप्लिकेशन स्टेटस दिसून येईल.
Read More:
- Ladki Bahin Yojana Beneficiary List: लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, महिलांना मिळणार आता 2100 रुपये
- Ladki Bahin Yojana Login Process: लाडकी बहिन योजना महाराष्ट्रासाठी लॉगिन कसे करावे?
- Ladki Bahin Yojana Payment Check: लाडकी बहीण योजना पैसे कसे बघायचे?