Ladki Bahin Yojana 4th List 2024: महाराष्ट्र सरकारने राज्यामधील महिलांना दिवाळी बोनसच्या स्वरूपात आचारसंहिता लागू होण्याआधीच लाडकी बहीण योजनाचा 4था हफ्ता घोषित केला. ज्या महिलांनी योजनेच्या अंतर्गत पहिल्या तीन हफ्त्याचे लाभ घेतले आहे त्या महिलांनी लेखामध्ये दिलेल्या प्रकिया फॉलो करून 4थ्या हफ्त्याचे जिल्ह्याप्रमाणे यादी डाउनलोड करून आपले नाव तपासू शकता.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणांना पैसे मिळण्यासाठी अडचण नको, यासाठी आधीच राज्य सरकारने चौथ्या व पाचव्या हफ्त्याची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे. यामध्ये ज्या महिलांनी आपले आधारकार्ड बँक खात्यासोबत लिंक केलेले आहे, त्यांना योजनाची रक्कम मिळाली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्यामध्ये एकूण 34,34,388 लाभार्थी महिलांना 1,500 रुपये प्रमाणे लाभ देण्यात आलेला आहे. त्यामध्ये तिसऱ्या हफ्त्यासाठी राज्य सरकारने 1545.47 कोटी रुपये लाभार्थ्यांना वाटप केले आहे.
ज्या महिलांनी अर्ज केला परंतु त्यांना अजूनही हफ्ता मिळाला नाही, त्यांनी सरकारच्या पोर्टलद्वारे यादी डाउनलोड करून त्यामध्ये आपली नावे चेक करू शकतात. Ladki Bahin Yojana List कशी डाउनलोड करायची? याबद्दल लेखामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनाची 4थी यादी ऑनलाइन कशी तपासायची?
- सर्वात प्रथम तुम्हाला Ladki Bahin Yojana ची Official Website उघडायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला वेबसाइटमधील डॅशबोर्डवर लाभार्थी यादीचे बटन दिसेल, त्यावर क्लिक करणे.
- पुढे तुम्ही नवीन पेजमध्ये प्रवेश कराल, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याची माहिती द्यावी लागेल.
- त्यामध्ये जिल्हा, पंचायत, ब्लॉक, आणि तुमचे गाव कोणते? ते सगळे ऑप्शन निवडावे लागतील.
- त्यानंतर तुमचा एप्लिकेशन नंबर विचारला जाईल ते भरून सबमिट बटनावर क्लिक करणे.
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेची संपूर्ण यादी पीडीएफ स्वरूपात स्क्रीनवर उघडून येईल.
- पीडीएफ उघडल्यानंतर डाउनलोडच्या बटनचा पर्याय असेल, त्यावर क्लिक करून फाईल सेव्ह करा.
Read More: